देशी पद्धतीचा मसाला पास्ता
मुलांना सुट्ट्या लागून बरेच दिवस झाले असल्यामुळे ही पाककृती मिपावर टाकायला अंमळ उशीरच झाला आहे. रोज संध्याकाळी खायला मुलांना वेगवेगळे पदार्थ करून देऊन आया खरंच थकून जातात. हा देशी पद्धतीचा मसाला पास्ता अजून एक पर्याय म्हणून नक्की उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. बहुतेक सर्व मुलांना पास्ता आवडतो त्यामुळे इतरवेळी भाज्या न खाणाऱ्या मुलांना पास्त्याच्या निमित्ताने थोड्या भाज्या खाऊ घालण्याची सुद्धा ही नामी संधी ठरू शकते.
सूचना: सध्या अमेरिकेत असल्याने इथे उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा मी उपयोग केला आहे. आपल्याला आणि आपल्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही या पाककृतीमध्ये वापरू शकता. (वांगी, दोडके इत्यादी वापरले तर चालेल का असे खट्याळ प्रश्न प्रतिक्रियांमध्ये विचारू नयेत)
खालील साहित्य साधारणपणे दोन वाट्या पास्त्यासाठीचे आहे. पण आपल्या अंदाजानुसार कमी अधिक प्रमाण केले तरी चालेल.
पाककृतीसाठीचे साहित्य
कृती
पास्ता शिजवण्याची कृती
पास्ता मध्यम आचेवर भरपूर पाण्यात शिजण्यास ठेवावा. पास्त्याच्या जाडीनुसार तो १५-२० मिनिटांत शिजून तयार होतो. हाताने दाबून शिजल्याची खात्री करता येते. गरम पास्त्यावर गार पाणी ओतल्यास पास्त्याचे तुकडे एकमेकांना चिकटत नाहीत. पास्ता बाहेर काढून चाळणीमध्ये पूर्णपणे निथळून घ्यावा. पास्त्यातील सर्व पाणी निघेल याची खात्री करावी.
पास्ता सॉसची कृती
आता शिजवून बाजूला ठेवलेला पास्ता भांड्यात घालून व्यवस्थित हलवून सॉस पास्त्याला नीट लागेल याची खात्री करावी. १-२ मिनिटांत अतिशय रुचकर मसाला पास्ता तयार होईल.
बाउलमध्ये पास्ता घालून कांद्याच्या पातीचे बारीक तुकडे त्यावर घालावे आणि गरम गरम पास्ता खाण्यास द्यावा.

- २ वाट्या पास्ता (बाजारात निरनिराळ्या आकाराचा पास्ता मिळतो. आपल्या आवडीच्या आकाराचा पास्ता निवडावा)
- २ लसूण पाकळ्या - अगदी बारीक चिरून
- आल्याचा छोटा तुकडा - अगदी बारीक चिरून
- २ मध्यम आकाराचे कांदे - अगदी बारीक चिरून
- २-३ टोमॅटो - गरम पाण्यात उकडून साल काढून बारीक चिरलेले (ब्लांच केलेले)
- छोट्या गाजराचे बारीक काप
- ब्रोकोलीची फुले
- २ मध्यम मश्रूमचे तुकडे
- ढोबळी मिरचीचे काप
- मक्याचे दाणे
- कांद्याची पात (सजावटीसाठी)
- फोडणीसाठी ओलिव्ह ओइल आणि जिरे (घरातील कुठलेही तेल किंवा बटर घातले तरी चालेल)
- १ ते दीड चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- २ चमचे मध (नसल्यास साखर चालेल)
- २-३ चमचे टोमॅटो केचप
- पसरट भांडे मध्यम आचेवर ठेवावे. फोडणीसाठी ओलिव्ह ओइल / तेल किंवा बटर घालावे. फोडणीमध्ये जिरे घालून ते तडतडल्यावर बारीक चिरलेले लसूण आणि आले घालून लालसर करून घ्यावे.
- बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंग येईपर्यंत शिजवावा.
- कांदा शिजल्यावर ब्लांच केलेले टोमॅटो घालून २-३ मिनिटे शिजवावे.
- इतर भाज्या घालून २-३ मिनिटे शिजवावे. (भाज्या फार शिजवू नये. अर्ध्या कच्च्या भाज्या पास्त्यामध्ये छान लागतात)
- गरम मसाला, मीठ, मध (किंवा साखर), टोमॅटो केचप घालून पास्ता सॉस मिळून येईपर्यंत (३-४ मिनिटे) मिश्रण सतत ढवळत राहावे.
वाचने
8430
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रकार आवडला
आभारी आहे. मुख्य म्हणजे या
In reply to प्रकार आवडला by पैसा
चीज जंक असते असे कोणी सांगितले हो
तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत
In reply to चीज जंक असते असे कोणी सांगितले हो by विदेशी वचाळ
अमेरिकेमध्ये बहुतेक सर्व
In reply to तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत by विद्यार्थी
अगं भेसळ म्हणजे इतर
In reply to अमेरिकेमध्ये बहुतेक सर्व by पिलीयन रायडर
या आकार वाढवलेल्या अन्नाचे
In reply to अगं भेसळ म्हणजे इतर by स्रुजा
छान आहे कृती.. मी साधारण असाच
असाधारण करायचा असल्यास?
खिक्क
In reply to असाधारण करायचा असल्यास? by राजेंद्र मेहेंदळे
मध शिजवायचा नसतो ना?
छान कृति आहे. माझा मुलगा पण
येऊ द्या पाककृती लवकर
In reply to छान कृति आहे. माझा मुलगा पण by विवेकपटाईत
पास्ता शिजवताना त्यात १-२
छान पाककृती