Skip to main content

मोडी शिका

लेखक लालगरूड
Published on मंगळवार, 24/05/2016
खूप दिवसांपासून मोडी शिकण्याची इच्छा होती. त्यासाठी कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लाॅगवरील pdf पुस्तकांची खूप मदत झाली . त्यांचे मनापासुन आभार. इतर लोकांना मोडी शिकण्यास मदत व्हावी म्हणून इथे लिंक देत आहे www.kaustubhkasture.in/p/blog-page_4.html?m=1 ही पुस्तके फक्त वाचून मोडी शिकता येत नाही त्याबरोबर सरावाचीही आवश्यकता आहे.. मोडी शिकणार्यास शुभेच्छा. ॥ जय महाराष्ट्र ॥

वाचन संख्या 2618
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मिपाकर सुहास झेले यांनी ही पुस्तके मला मिपावर पुर्वीच दिलती. काही फारवर्ड केली .. कोण कोण शिकल ठौक नाही.! माहिती साठी धन्यवाद.

In reply to by जेपी

इच्छाशक्ती असेल तर कोणीही शिकू शकतो. मी 6 तासांमध्ये शिकलो खूप सराव केला आता बर्यापैकी वाचता येते लिहता पण येते

उत्तम. ही पुस्तके उतरवून घेईन.

जुनी दप्तरे वाचून होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मोडी वाचायला शिकले पाहिजे.

चांगला दुवा दिलात तुम्ही... याबद्दल आमच्याकडून दुवा घ्या! ;) Sandy

दिवाळी अंकातले एक सुलेखन करण्यासाठी कौस्तुभ कस्तुरेंच्या ब्लॉगचा फायदा झाला होता. छान माहिती दिली आहे.

इतिहास शिकविणार्या आणि शिकणार्या प्रत्येकाला मोडी लिहीता आणि वाचता येणे आवश्यक आहे. बाकी कौस्तुभ कस्तुरेचा ब्लोग तर उत्तम आहेच, पण इतिहास मित्र हे अ‍ॅप देखील उत्क्रुष्ट आहे.