प्रारंभी देवाने स्थलावकाश व समरभूमी निर्माण केली.
तेव्हा (समर)भूमी आय्डीविरहीत व शून्य होती, आंतरजालीय पृष्ठावर गांभीर्याचा अंधःकार होता आणि देवाचा आत्मा (आंतर)जालावर तळमळत राहिला होता.
तेव्हा देव बोलला, हास्यचैतन्याचा प्रकाश होवो आणि प्रकाश झाला !
देवाने हास्य-चैतन्य-प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने हास्यप्रकाश आणि प्रशासकी गांभीर्यांधार वेगळे केले.
देवाने हास्यप्रकाशाला दिवस आणि गांभीर्यांधाराला रात्र म्हण्टले ; हा पहिला दिवस.
मग देव म्हणाला, आंतरजालाच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते आंतरजालास (म्हणजे त्यातील लोकांस एकमेकांमधे) विभागणारे होवो. आणि तसे झाले.
मग देव बोलला, आंतरजालाखाली आय्ड्यांचा एके ठिकाणी संचय होवो व अन्यत्र माणसे दृष्टीस पडीत. आणि तसे झाले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
मग देव बोलला , नवनवे आयड्या देणारी माणसे बनोत आणि ही माणसे त्या आयड्यांवर निरनिराळ्या नावाने वसोत आणि तसे झाले.
मग देव बोलला , हास्यचैतन्यमय दिवस आणि अन्यपामर रात्र ही भिन्न करण्यासाठी आंतरजालमंडळात ज्योती होवोत , ज्या इतरांना हास्यचिन्हे , हास्यऋतु, हास्यकारी दिवस व वर्षें दाखवणार्या होवोत.
पृथ्वीला हास्यप्रकाश देण्याकरता आकाशमंडळात त्या दीप होवोत आणि तसे झाले.
देवाने दोन मोठ्या ज्योती आणल्या. हास्यदिवसावर प्रभुत्व चालवण्याकरता संजोती आणि हास्येतर रात्रिलोकावर चालवण्याकरता जोतिनुजोती. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
मग देव बोलला , आयडीजंतूच्या थव्यानी हास्यजाले भरून जावीत आणि पृथ्वीवरून अंतराळात हास्यपक्षानी उड्डाणे करावीत.
हास्यविरहित अंधारात जगणारे राक्षसी जलचर , प्रत्येक जातीचे सर्व आय्डी आणि प्रत्येक जातीचे सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले.
मग देवाने आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला , देवाचेच प्रतिरूप असा तो निर्माण झाला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
देवाने त्यांस आशीर्वाद दिला : सफल व्हा , वृद्धी पावा , आंतरजातील सर्व जले व्यापूं टाका आणि आय्डीरूपी पक्षी बहुगुणित होवोत. हास्यप्रकाश व अन्यअंधार लोकांत तुमची च सत्ता चालो.
आपण निर्माण केलेले सर्व बहुत चांगले आहे असे देवाने पाहिले. मग सायंकाळ व प्रातःकाळ झाला.
इति बायबलकारी : उत्पत्ति : पाठ १
वाचने
5737
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय बी नाय
:)
आय्डीसृष्टी
हाललुया
इनो??
In reply to हाललुया by सहज
कैच्याकै भाग २
In reply to इनो?? by कोलबेर
आमचे 'हिरो
In reply to कैच्याकै भाग २ by सहज
सहजराव
In reply to आमचे 'हिरो by कोलबेर
हाहाहा.
हे करत
निरुपण टाका ...
अहो
In reply to निरुपण टाका ... by छोटा डॉन
आवडले
सफरचंद
In reply to आवडले by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आम्हालाही सांगा ...
In reply to आवडले by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सहमत आहे
In reply to आवडले by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मुक्तराव, ल
मुक्तराव
वाहवा !
थोडं समजलं असं वाटतंय!
तुम्ही
In reply to थोडं समजलं असं वाटतंय! by चतुरंग
मस्त
बायबल कारी
कां की...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
मजेशीर
मुक्तसुनीत
कळले नाही...
थोडेफार समजले
पार