दिनांक २२ जानेवारी २०१६
रात्रीचे सव्वा दहा वाजलेत, केदार, श्रीहास, अमोल आणि विशाल पुण्याला पोहचत आहेत. मी सुद्धा दुकान वाढवून घरी पोहोचलोय. इतक्यात केदारचा फोन आलेला,
केडी :- निघालास का रे?
मी :- आत्ताच घरी पोहोचलोय, जेवनार आणि निघणार.
आणि ..........
धप्प. धडाम.
केडी :- का रे कसला आवाज येतोय?
मी :- काही नाही. बारा वाजता निघेन, सकाळी ६ वाजेच्या आसपास शिवाजीनगरला घ्यायला या.
फोन बंद.
च्यामारी असा कसा पडलो? दिवे लावून बघितल, पायात मोज़े आणि गुळगुळीत फरशीवर पडलेल्या कपड्या वरुण पाय सटकला आणि जोरात पडलो. ठीक आहे, पडलो आणि उठलो. काय झाल? काहीच नाही.
जेवण करून १२ वाजताची येष्टी घेउन पुण्याला निघालो. ३ वाजलेत आता थोड्फार त्रास जाणवायला लागलय. ५ वाजलेत आता जरा जास्त त्रास होतोय. ६ वाजता शिवाजीनगर ला उतरलो श्री ला बोलवल, घ्यायला येतोय. चला चहा घेऊ. बाहेर होटेलात बसलोय चहा घेतला गाड़ी आली......
पण उठता कुणाला येतय? बापरे, हे काय अजुन. कसा बसा जोर लाउन उठलो. श्री सोबत रूम वर गेलो. सगळा किस्सा सांगितला. सुदैवाने, श्री, अमोल आणि विशाल तिघेही डॉक्टर आहेत. त्यानी निदान केल की नुसता फटका बसला असणार आणि मासपेशिला मार लागलेला असावा.
श्री :- पाठीच हाड मोडल असत तर तू घरातून बाहेर आलाच नसतास.
(मी:- हुश्श... वाचलो बुआ.)
वेद्नाशामक गोळ्या घे, २-३ दिवसात सूज उतरली की बर वाटेल. काहीही काळजी करू नकोस. पुढील ४ दिवस आम्ही सोबत आहोत की.
आणि सकाळी साडे आठ वाजता पुण्याहून दिवेआगार कड़े प्रस्थान केल,
गणपती बाप्पा मोरया.
मंगलमूर्ति मोरया.
सर्वात पुढे मी, मागे चाश्म्यावाला श्री, बाजूला फोनवर बोलणारा विशाल, मागे काळा गोगल वाला केदार आणि बाजूला अमोल.
आरामशीर टाईम पास करत दिवेआगार ला पोहोचलो. होटल मध्ये ब्याग टाकल्या, थोडा आराम करुन संध्याकाळी पाण्यात मनसोक्त भिजुन घेतल. पहिला दिवस संपला. त्रास काही कमी झालेला नाही. परंतु, गोळ्या घेतल्यावर बर वाटतय.
दिवेआगर सगळ्याना माहित आहे. कस जायच, काय खायच, काय बघायच आणि कुठे रहायच याचे स्वतंत्र धागे आहेत, म्हणून दिवेआगर बाबत जास्त काही नाही. दिवेआगार आता खुप म्हणजे खुपच कमर्शियल झालय. खुप जास्त गर्दी. होटेलच्या सुद्धा काही च्या कही किमती झाल्यात. पण ते जाऊ दया.
दिवस दूसरा:-
पहिला समुद्र किनारा :-
किना-यावर खुपच जास्त गर्दी झाल्यामुळे आणि बोट फेरीवाले यांच्या कलकलाटा पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. होटलवाल्या व्यक्तीलाच विचारून निघालो.
गावाच नाव :- कोंड्विले.
कसे जावे :- दिवेआगर ते श्रीवर्धन ह्या सुप्रसिद्ध “शेखाडी” मार्गावर वसलेले गाव आहे कोंड्विले. दिवेआगार वरुण निघाल्यावर शेखाडी गावाच्या पुढे जिथे हा रास्ता समुद्र किनारा सोडून देतो तो शेवटचा किनारा म्हणजेच कोंड्विले गाव. अजुन एक निशानी म्हणजे आपण टेकडी उतरून समतल जमिनीवर येतो. तेथे एका बाजूला समुद्रकिनारा व दुस-या बाजुस वसलेल गाव म्हणजे कोंडविले.
दिवेआगर ते श्रीवर्धन मार्गावरून होणारे (कोंडविले गावातील) समुद्रकिनार-याचे पाहिले दर्शन.
हे रस्त्यात भेटलेले सायकलस्वार. चढ़ चढताना यांच्या सोबतचे सगळे लोक सायकलला धक्का मारत होते तेव्हा हे एकटेच सम्पूर्ण चढ सायकल चालवत चढून आले. याना पहिल्या पहिल्या मोदक रावांची आठवण झाली होती, आणि काय योगायोग मोदकराव (परवा फोटो बघितलेला) सुद्धा असेच गुबगुबीत आहेत.
या समुद्रिकिना-या वर पाण्यात जास्त आत जाता येत नाही. दुस-या दिवसाची पूर्ण दुपार आम्ही तेथेच घालवली, एक ते दिड किलोमीटर चा शांत समुद्रकिनारा. किना-यावर जास्तीत जास्त ४०-५० लोक्स असतात.
चेंडू फलीचा खेळ खेळायला मस्त जागा आहे.
त्या सम्पूर्ण समुद्र किनार्यावर एकच घरगुती खानावळ आहे. वक्रतुंड खानावळ. खानावळी समोर एक छोटा बेंच, एक मोठ्ठ जेसीबीच रबरी चाक ठेवलेल आहे. पुढील २-३ तास त्या बेंच आणि चाकावर झाडाच्या सावलीत फक्त बसून घालवले. वाह एकदम झक्कास वेळ गेला. समोर शांत समुद्रकिनारा, सोबत मित्र, आणि फक्त बसून रहा. वाह. मुड एकदम फ्रेश.
वक्रतुंड खानावाळीतिल पुसाळकर काकानाच जेवान्याबाबत विचारपूस केली. जेवायला मस्त पैकी सुरमई / पापलेट (माझ्या मते पापलेटच होता) कोलंबि (झींगे) असा झक्कास मेनू होता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरचे जेवन (एकदम कोंकणी पद्धतीने बनवलेले / होटल सारखे नाही) मिळाले. वाह. क्या बात. मस्त दिवस गेला. मनसोक्त खादाडी केली.
जेवन झाल्यावर सूर्यास्त बघत तिथेच बसायचे ठरवले, आणि दिवस सत्कारणी लावला.
चाकावर बसल्यावर दिसणारे संध्याकाळचे दृश्य.
तीसरा दिवस:-
दूसरा समुद्र किनारा :-
तीसरा दिवस उजाडलाय. (पाठीचा त्रास जनवतोच आहे.) आज काय करायच? आज पण होटलवाल्या बंधुला विचारून घेऊ.
गावाच नाव :- आद्गाव (आङगाव).
कसे जावे :- दिवेआगार कडून दिघी बंदराकड़े जाण्यास निघावे. ८-१० किलो मीटर वर एक फाटा आद्गाव साठी लागतो. तिथून पुढे फार तर फार २ किलो मीटर वर आहे हे छोटस खेड गाव. थोड़ी विचारपूस करावी लागते. लोक्स सुद्धा नीट पत्ता सांगतात.
आँ?
हे काय पाहतोय मी?
बब्बो
मी भारतात आहे???
माझ्या महाराष्ट्रात आहे?
हे कस शक्य आहे?
इतक स्वच्छ पाणी? एक सेल्फी तर घ्यावीच लागेल.
ईतक स्वच्छ पाणी? ते पण महाराष्ट्रातल्या समुद्रकिनारी. क्या बात. वाह. अरे, पण हे शापित सौन्दर्य आहे. वाळू खुपच अस्थिर आहे. ठीक आहे. आज पाण्यात नाही जायच नुसती समुद्राची मजा बघायची.
सर्व प्रथम सगळ गाव बघून घेऊ आणि मग ठरवू की कुठे पाण्यात उतरायचय. संपूर्ण गाव फिरून बघितल. एकदम छोटस टूमदार गाव. दिघी बंदर जवळच अस्ल्याने गावात बरीच ठिकाणी जाळे वाळत घातलेल दिसत होत. लोक सुद्धा निवांत दिसत होते. गावाच्या पुढील टोकाला गेलो तर तिथे किना-याला तीव्र उतार होता, आणि वाळू खुपच अस्थीर होती. तिथे बसायचा विचार सोडून दूसरी जागा शोधायला निघालो. ज्या रस्त्याने आलोत त्या रस्त्यात अमोलनी एक दोन ठिकाणी मस्त जागा बघून ठ्वेल्यात. तिथे जान्याच ठरल.
जागा शोधली. मस्त सुरूच बन आहे. सावली आहे. मोठा समुद्र किनारा, किना-यावर कुणीच नाही. वाह. कालच्या समुद्र्किना-यावर तरी ४०-५० लोक्स होते, आज इथे तर कुणीच नाही. आम्हिच ५-६ लोक आहोत. वाह. कुनी पाण्यात बसलय, कुणी फोटो काढतय, कुणाला सावलीत बसायला मजा वाटतेय.
संपूर्ण समुद्र किनारा फिरून काढला. इथे तर खाड़ी सुद्धा आहे. काही पक्षी बसलेत. शांत वातावरण आहे. आद्गावात ४-५ तास मनसोक्त टाईम पास केला. कही खेकडे पकडले, सोडून दिले. धिंगाना घातला. कुणीच नाही. वाह.
मध्येच ह्ये साहेब सुद्धा भेटले.
इथे मात्र एक धोका आहे. खाडी. समुद्राला ओहोटी आहे. पाणी वेगाने वाहतय. आणि खाड़ी पाशी कोरड्या वाळूत सुद्धा फुट भर पाय आत जातोय. बापरे पळा. आज बिलकुल पाण्याशी पंगा घेतला नाही.
दुपार टळायला लागलिये. जेवण?
परत कोंड्विले गाव, वक्रतुंड खानावल. आज सुद्धा कालच्या सारखाच फक्कड बेत. आज सुद्धा सांध्यकाल येथेच घालवली.
मध्येच ह्ये साहेब भेटून गेले.
थोडा फार क्लिक्काट करून घेतला.
.
दिवस चौथा:- सकाळी किनार्यावर एक फेरी मारून टूर संपवला. आवरा आवर करुण, औरंगाबादला प्रस्थान केले. येताना सुद्धा त्रास झालाच.
वापस आल्यावर १५ दिवस झालेत तरी त्रास कमी झाला नाही म्हणून स्पेशलिस्ट डॉक्टर ला दाखवल, एक्स-रे काढला, तेव्हा कळाल की माकड हाड मोडलय. ३ महीने गाडी चलवने बंद. जमेल तितका आराम.
सध्या सर्वकाही व्यवस्थित झालय. पाठ व्यवस्तिथ आहे.
जर छोटीशी टूर काढायची आहे, गर्दी, गोंधळ ई. पासून दूर जायच असेल तर दिवेआगार च्या आस पास ची ही दोन्ही ठिकाने उत्तम आहेत. परंतु, पाणी कितपत सुरक्षित आहे सांगता येत नाही. माझी कंबर मोडल्याने मी काही व्यवस्तित फोटो काढू शकलो नाही. या लेखातील बरेचसे फोटो अमोल आणि विशाल या दोघानी काढलेले आहेत. मला या ठिकानच सौन्दर्य शब्दात मांडता आलेल नाही. परन्तु या ठिकाणी एक भेट दयायला हरकत नाही.

वाचने
11296
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी ट्रिप. वेगळी मजा.आवडलं
तेव्हा कळाल की माकड हाड मोडलय
होय
In reply to तेव्हा कळाल की माकड हाड मोडलय by कानडाऊ योगेशु
हे इकडचे दोन्ही किनारे
दिवेआगरचा रूपनारायण पाहिलात
In reply to हे इकडचे दोन्ही किनारे by प्रचेतस
हो. ते गेल्या चार / पाच
In reply to दिवेआगरचा रूपनारायण पाहिलात by बाबा योगीराज
बाबाजी!!
फोटो अणि प्रवासवर्णन ....दोन्ही मस्त....
चांगल्या, अनवट जागांचे प्रवासवर्णन!
मस्त लिहिल आहे.पुढच्यावेळी
Mast
अवांतर : मिपाकर अमृता जोशी
In reply to Mast by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)

सर आपण दोघे 22 फेब्रुवारीला
In reply to Mast by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रवासवर्णन , फोटो आवडले. पण
मस्तच लेख बाबाजी!
निर्मनुष्य वाटणार्या
भारी :)
हे दोन्ही किनारे फारच सुंदर
छान लेखन आणी फोटो
खूपच मस्तं!
छान लिहिलत
भारीच !!
सर्व प्रथम सर्वांचे धन्यवाद.
धागा मस्त
अतिशय छान, वाखू साठवत आहे.
भारी सफर केलीत. तब्बेतीची
योगी भाऊ .. दिवेआगार बद्दल
बाकी ते तुम्ही बुलेट इकायचं
In reply to योगी भाऊ .. दिवेआगार बद्दल by सतिश पाटील
दिवेआगरच २-३ वर्षात मजबूत
कोंड्विले चा किनारयावर
योगीबाबा, धुरळाच उडीवला की
लवकर बरे व्हा भाऊ
स्पांडुरंग स्पांडुरंग
In reply to लवकर बरे व्हा भाऊ by स्पा
दिवेआगर श्रीवर्धन दोन्ही
शुभेच्छा आहेतच.