मी मारलेल्या एकूण माश्या
मी मारलेल्या एकूण माश्या
सत्तावीस
मोजण्यात खूप वेळ जातो
खिडकीचा एक ग्रील तुटला आहे
त्याच्या जरासं खाली
एक झुरळ फिरते आहे
बघण्यात खूप वेळ जातो
कंटाळा आल्यावर मी
एखादी कविता लिहायला घेतो
शब्द?
शोधण्यात खूप वेळ जातो
आरसा फुटलाय माझ्याकडचा
रोज उठून कोण बघणार त्यात?
साला,
जगण्यात खूप वेळ जातो
आयुष्य !
ही तर एक शिक्षाच आहे
भोगण्यात खरंच खूप वेळ जातो
-जव्हेरगंज
अच्च जालं तल!!
लोल!
लय भारी कविता
क्विता
पैजारबुवा, रातराणी, नीलमोहर इ
:)
आयुष्य सुंदर आहे हो...जगता
तुम्हाला मुद्दा समजलेला नाही
कविता आणि प्रतिसाद आवडला,
ओक्के! समजवा मग...
केवळ आणि केवळ वेळ आहे म्हणून...
उगाच ते मोठे जाळे घेऊन कशाला
जव्हेरभाऊ म्हणजे लै मोठ्ठा
आवडली
:)
जबरदस्त
+1
हेच नाही आवडले . बाकी कविता
छान .
आवडलीय कविता.
जबरदस्त