✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पु. ल. आणि Atheism

ट
टिकाकार यांनी
Mon, 09/17/2007 - 16:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47569 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 16:06 नवीन

काही प्रश्न

१. atheist म्हणजे काय? २. पु.ल. म्हणजे काय? ३. अहे म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 16:13 नवीन

क्रुप्या

क्रुप्या हे प्रश्न दुसर्या विशयात टाका. ज्यान्न्ना पु. ल. आनि Atheism ह्या विशयि महिति आहे त्यान्च्या साठि वरिल प्रशन अहे. टिकाकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 16:15 नवीन

का?

माझे सर्व प्रश्न चर्चा विषयाशी निगडीत आहेत. शिवाय तुम्ही तसे डिस्क्लेमर टाकले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 16:08 नवीन

http://en.wikipedia.org/wiki/

http://en.wikipedia.org/wiki/Atheism टिकाकार
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 16:14 नवीन

ओके

पण पु.ल. हे निरीश्वरवादी होते अशी शंका कशी काय आली? " एक शून्य मी" वाचून का?
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 16:48 नवीन

टिकाकाराचा

निरीश्वरवादाचा मह्या भाईकाकाच्या इचाराशी काय बी संबध नाय. त्येन्ला फकस्त मिसळीत खडे टाकून याची सूपारी दिलेली हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
र
रंजन Tue, 09/18/2007 - 00:22 नवीन

पु.ल

पु. ल किति सुंदर लिह्यचे .. मला बट्टयाची च्अळ खूप अवडते.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 09/18/2007 - 15:56 नवीन

खरतर

आपण त्यांच लेखन वाचुन आनंद घेवुया बाकी गोष्टीशी का देण घेण. मी तर मुळातच म्हणतो की दुसर्‍या माणसाला त्याची विचारसरणी आहे त्याप्रमाणे जगु द्यावे. की फरक पेंदा. जर त्याने तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला केला तरच चुक नाहीतर काय गरज.
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Wed, 09/19/2007 - 00:51 नवीन

होते

"देवाची" देणगी वगैरे बोलल्याचं ऐकलेलं नाही. ते नेहमी निसर्ग म्हणत. शिवाय मुहूर्त बघणे, नारळ फोडणे ह्यावर सुद्धा विश्वास कमीच होता असे म्हणतात. मात्र इतरांची देवभक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, त्यांनी कधीही हसण्यावारी नेली नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/19/2007 - 17:17 नवीन

होय

मात्र इतरांची देवभक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, त्यांनी कधीही हसण्यावारी नेली नाही. खर आहे, "का?" नावाची एक लघुपट ईएम आर सी च्या मदतीने अंनिस ने काढला होता. त्यात पुलंचे दैववाद व बुवाबाजीवर मार्मिक भाष्य असणारी दृष्यफीत शेवटी दाखवली आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
ज
जगन्नाथ Wed, 09/19/2007 - 19:13 नवीन

होय

खर आहे, "का?" नावाची एक लघुपट ईएम आर सी च्या मदतीने अंनिस ने काढला होता. त्यात पुलंचे दैववाद व बुवाबाजीवर मार्मिक भाष्य असणारी दृष्यफीत शेवटी दाखवली आहे. मिळवून बघता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 22:00 नवीन

नक्की

होय माझ्या कडे त्याची सीडी उपलब्ध आहे. पुण्यात साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ पोलिस चौकि समोर पुणे येथे ती उपल्ब्ध आहे. नसल्यास मिळवून देण्याची जबाबदारी माझी. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
ज
जगन्नाथ गुरुवार, 09/20/2007 - 22:51 नवीन

धन्यवाद !

होय माझ्या कडे त्याची सीडी उपलब्ध आहे. पुण्यात साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ पोलिस चौकि समोर पुणे येथे ती उपल्ब्ध आहे. नसल्यास मिळवून देण्याची जबाबदारी माझी. म्हणजे उपलब्ध अाहे! मी नोव्हेंबरात मुंबईत येतो अाहे. बहुतेक मिळेल . . . नाही मिळाली तर देतो त्रास तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
व्यंकट Wed, 09/19/2007 - 05:19 नवीन

व्यक्ति आणि वल्ली

खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. पण व्यक्ति आणि वल्ली चा मी फ्यान आहे, त्यातच मी मागच्या आठवड्यात "हर मे हरी को देखा" ही अमिर खुस्रो लिखीत कव्वाली बर्‍याच दिवसांनी ऐकली. आपल्यातच कुठे हरवलेल्या अंतू बर्वा, हरितात्यांना व्यक्त करून आपल्या समोर आणणार्‍याचा देवावर विश्वास असावा, देवत्वाची व्याख्या मात्र त्यांची का ती तेच जाणोत.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 06:49 नवीन

देव आणि शक्ती

आजवर पुलंनी लिहिलेला, बोललेला प्रत्येक शब्द माझ्या संग्रही असवा (पुरुषराज अळुरपांडेंसकट) मी प्रयत्न केला आहे. त्या वाचना वरून सांगतो. पुलंचा देव ह्या मूर्त स्वरूपावर विश्वास नाही. (म्हणजे आधी होता, पण हे विचार अर्थातच नंतर म्हणजे सुनिताबाईंकडून आलेले आहे, हे स्पष्ट आहे.) पण एक अज्ञात शक्ती विश्वावर राज्य करते, ह्यावर त्यांची शेवटपर्यंत गाढ श्रद्धा होती. सुनिताबाई ह्या जरा संजोपराव, प्रकाश घाटपांडे ह्यांच्या वळणावर गेलेल्या ;-) पण पुलं हे नेहमीच बॅलन्स्ड राहिलेत. जोगेश्वरीच्या चाळीत कुणी शेंदूर लावूना दगड ठेवला, तर त्या चाळकर्‍यांच्या मन:शांतीसाठी मनात नसले तरी गावदेखला नमस्कार करणारे. अहो, मनात नसताना आपण कितीतरी गोष्ह्टी करतो. फक्त कौटुंबिक स्वास्थ्यासाठी. पुलंनीही तेच केले. अथीइस्ट ही व्यक्ती देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. त्यामुळे पुलं अथीइस्ट नव्हते, हे नक्की. कारण देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. त्यामुळे वरवर देवाच्या संकल्पनेला मान्यता देऊन, स्वतः मात्र देव नव्हे, शक्ती ह्या स्वतःच्या मताच्या जवळपासच ते राहिले. - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 09/19/2007 - 06:56 नवीन

पटले

>>>अथीइस्ट ही व्यक्ती देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. त्यामुळे पुलं अथीइस्ट नव्हते, हे नक्की. कारण देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. त्यामुळे वरवर देवाच्या संकल्पनेला मान्यता देऊन, स्वतः मात्र देव नव्हे, शक्ती ह्या स्वतःच्या मताच्या जवळपासच ते राहिले>> आपले विचार पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
कोलबेर Wed, 09/19/2007 - 08:02 नवीन

प्रति:

देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. हे काहिसे कळले नाही! सामान्य माणूस मान्य आहे म्हणजेच सामान्य माणूस आणि त्याचे सर्व विचार मान्य आहेत असेच काय? मला नाही वाटत 'सामान्य माणसाच्या' सर्वच विचारांशी पु.लं. सहमत असतीलच असे. अर्थातच हा आपला एक अंदाज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 08:19 नवीन

म्हणजे

१. आमचे आमच्या सरांवर प्रेम आहे. २. सरांचे त्यांच्या मुलीवर प्रेम आहे. या दोन समीकरणांचा वापर करून तिसरे भलतेच फाजील समीकरण शोधणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 09:35 नवीन

एक प्रॉब्लेम

प्रेमाची बदलती व्याख्या ही ट्रान्झिटिव्ह नाही. काय राव ? ट्रान्झिटिव्ह रिलेशन साठी दोन्ही रिलेशन्स ची व्याख्या एकच असायला पाहिजे कमीत कमी. आता हे पण आम्हीच सांगायला हवे ? - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 09:42 नवीन

एक शक्यता... (किंवा खरे तर दोन!)

प्रेमाची व्याख्या निश्चितपणे बदललीच, असे गृहीत धरता येणार नाही. सदर व्यक्ती ही सरांच्या मुलीवर पुत्रीवत् प्रेम करत असण्याची शक्यता जमेस धरायला हवी. (उलटपक्षी... जाऊद्या!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 09:44 नवीन

हेच

आम्हीही हेच लिहिणार होतो (अशी फिल्डिंग लावून क्याच पकडणे आम्हाला हल्ली जमते) पण तुम्ही आधीच त्रिफळाचीत करून टाकले सर्किटरावांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ज
जगन्नाथ Wed, 09/19/2007 - 09:31 नवीन

"सामान्य माणूस"

>> देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. > > हे काहिसे कळले नाही! काहीतरी बोलावं लागतं, म्हणून. बोलण्याइतकं बोलून झालं. अाणखी खोलात जाता येत नाही . . . कुणाला atheist म्हटल्याने त्याची बदनामी होते असला "अमरीकी" भाबडेपणा मात्र अापण नाही करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 09:38 नवीन

खाली बघा..

ट्रान्झिटिव्हिटी बद्दल आपलेही नेह्मीच सापडणारे गैरसमज आहेत असे दिसते. - सर्किट (मिसळपावच्या पंचायत समितीत ट्रान्झिटिव्हिटी समजणार्‍या सदस्यांना मते मिळावीत... ह्याचे मी समर्थन करतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ज
जगन्नाथ Wed, 09/19/2007 - 09:46 नवीन

ट्रान्झिटिव्हिटी

(मिसळपावच्या पंचायत समितीत ट्रान्झिटिव्हिटी समजणार्‍या सदस्यांना मते मिळावीत... ह्याचे मी समर्थन करतो.) वरील मताचे मी समर्थन करतो.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Wed, 09/19/2007 - 15:03 नवीन

निरीश्वरवादी पु.ल.

श्री.आजानुकर्ण यांनी "एक शून्य मी" (ले. पु.ल. देशपांडे) या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकात "धर्म,अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही." या शीर्षकाचा एक लेख आहे. त्यातील पृष्ठ. १२८ वरील काही वाक्ये : (ही वाक्ये सलग आहेत. संदर्भ सोडून दिलेली नाहीत.) ************** "एक तर धर्म,ईश्वर,पूजा-अर्चा ह्यांत मला (पु.ल.यांना) कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात..समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही..पूर्वजन्म,पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही. देव,धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या आहेत, याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. .....धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील.......देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे......... मला कुठल्याही संतापेक्षा ,अऍनेस्थियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. " ************************* संदर्भः एक शून्य मी. ...लेखकःपु.ल.देशपांडे. दुसरी आवृत्ती:२००२,....मूल्यः एकशेंपंचवीस रुपये. प्रकाशकः मौज प्रकाशन गृह,मुंबई ************************* हे पुस्तक विनोदी नाही. विविध विषयांवरील पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे मला वाटते. ...........यनावाला.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 22:15 नवीन

आणि उलटे देखील

धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील आणि "वास्तव, वास्तव करणार्‍या लोकांइतके धर्माचे आणि देवांचे दुसरे शत्रू नसतील". - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ज
जगन्नाथ गुरुवार, 09/20/2007 - 02:27 नवीन

आणि उलटे देखील

धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील आणि "वास्तव, वास्तव करणार्‍या लोकांइतके धर्माचे आणि देवांचे दुसरे शत्रू नसतील". असा कॅलिफोर्न्येत कायदा झाला अाहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ट
टीकाकार-१ Wed, 09/19/2007 - 15:06 नवीन

म्हणजे

म्हणजे श्री. टिकाकार ह्यान्चे म्हनन्ने बरोबर आहे असे आप्नस वाटते क?
  • Log in or register to post comments
य
यनावाला गुरुवार, 09/20/2007 - 14:01 नवीन

निरीश्वरवादी पु.ल.

श्री. टीकाकार यांचा मूळ प्रश्न आहे :पु. ल. हे Atheist होते हे खरे अहे का? .......या प्रश्नाला माझे उत्तर आहे : "हो. हे शत प्रतिशत (१००% ) खरे आहे." ......यनावाला.
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 14:04 नवीन

धन्यवाद!! प

धन्यवाद!! पु. ल. विषयी माहिती असलेला १ तरी पु. ल. प्रेमी इथे आहे याचा आनन्द वाटला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 14:09 नवीन

पूल प्रेमी

लै है भो हिथं पर ते बी मानसं पहून बोल्तेत है का ठाऊक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 14:11 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
त
तर्री गुरुवार, 09/20/2007 - 14:26 नवीन

पु.ल.

पु.ल. कोन्टिनेन्ट्ल कुल्कर्णयान्बरोबर पन्ढर पूर ला गेले होते.............पान्डूरन्गाच्या चरणी मस्तक टेकवल्यावर काय झाले?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 22:09 नवीन

नरहर कुरुंदकर

नरहर कुरुंदकर म्हणायचे,' माझा देवावर विश्वास नाही, माझा धर्मावर विश्वास नाही. पण माझ्या सभोवती असंख्य लोक जे देवावर व धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यापासुन तुटून जाण्यावर ही माझा विश्वास नाही. पुलंच ही तसेच होते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 10:05 नवीन

म्हणजे

म्हणजे पु.ल. कन्फुयज्ड होते आसे तुम्हास वाटते काय. क्रुपया मोघम उत्तरे देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ज
जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 12:29 नवीन

क्रुपया

क्रुपया मोघम उत्तरे देऊ नका. प्रेषक: टीकाकार-१ विनोद चांगला अाहे!
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 12:55 नवीन

तुमचा सेंस

तुमचा सेंस ऑफ ह्युमर शुन्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
ज
जगन्नाथ Sun, 09/23/2007 - 01:42 नवीन

सेंस की सैंसिबिल्टी?

तुमचा सेंस ऑफ ह्युमर शुन्य आहे. क्रुपय्या धण्यवाध!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा