✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सैराट २ - सैरभैराट

प
प्रशु यांनी
Tue, 05/17/2016 - 12:53  ·  लेख
लेख
अनाथ आकाशला मराठी अम्मा लहानाचं मोठं करते. डोशाच्या गाडीवर कांदा कापत कापत आकाश बेगमपेठला शिकतो. (इथं अजयच्या आर्त सूरात एक दीनवाणं गाणं, मात्र ठेका तोच) Software Consultant बनून US ला onsite जातो. इकडे अम्माची झोपडपट्टी redevelop होते पण सुनेने हाकलल्या मुळे अम्मा वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजतेय. तिला भेटायला आकाश हैद्राबादला येतो. तीची अंतीम ईच्छा म्हणून तीच्या अस्थी तीच्या मूळ गावच्या विहीरीत विसर्जन करायला तो करमाळ्याला येतो. आणी बघतो तर काय? विहिर चक्क कोरडीठक्क पडलीय. वारेमाप ऊस पिकवल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातच पाण्याची बोंब आहे. अखेर गावात पाणीची जलराणी दाखल होते. पाणी भरायला हि... झुंबड उडते. आणी त्यातच त्याला 'ती' दिसते. भेटि वाढतात, प्रेम जुळतं (अजय आणी श्रेयाच्या आवाजात फक्कड प्रेमगीत, ठेका मात्र तोच) आणी एक दिवस आकाशला त्या भयानक सत्याला सामोरं जावं लागतं. त्याची 'ती' दुसरी तीसरी कोणी नसून त्याच्या मामाचीच मुलगी आहे. होय तोच तो प्रिंसमामा, ज्याच्यामुळं आकाशची होलपट झाली. बास्.. आकाश तीला पळवून US ला घेऊन जातो. कंसमामा... Sorry sorry प्रिंसमामा US visa न मिळाल्यामुळं रागात धावत जावून विहिरीत उडी मारतो. मागून मामी धावत जाते. मामीच्या चेहर्याचा closeup shot. डोळे चटकन् पाण्याने भरतात... मामी हंबरडा फोडते. मग camera विहिरीचा closeup, प्रिंसमामा आत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो..... No background score, कारण उडी मारताना मामा विसरतो कि.. कि.. दुष्काळामूळं विहिर कोरडीठाक पडलीय. - सैरभैराट
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
2688 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

हम्म

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 13:03 नवीन
वाट्सएपच्या सौजन्याने की स्वतंत्र लेखन आहे, स्वतंत्र लेखन असेल तर मनापासून वाचतो, नै तर मी फक्त सध्या शेवटच वाचला आहे....! सैराट २ कसा असेल याची कल्पना सध्या सर्वत्र ढकला, ढकलीतुन चालु आहेच. पण, सैराट पार्ट २ चं सध्या काही डोक्यात नै, असं नागराज मंजूळे कालच दै. दिव्य मराठीला बोलले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

स्वतंत्र लेखन आहे.

प्रशु
Tue, 05/17/2016 - 13:36 नवीन
स्वतंत्र लेखन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी :-)

बबन ताम्बे
Tue, 05/17/2016 - 13:03 नवीन
पण स्टोरी डबल का छापली गेलीय ?
  • Log in or register to post comments

चुकून झालंया....

प्रशु
Tue, 05/17/2016 - 13:51 नवीन
चुकून झालंया... बदलायचं कसं ते माहित नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

ह ह पु वा

सुमीत
Tue, 05/17/2016 - 13:07 नवीन
हसून हसून पुरे वाट, पण पाण्याचा प्रश्न नेमका मोठा दाखिवला आहे.
  • Log in or register to post comments

ही: ही: ही: म्हणजे बघा, शेवटी

एस
Tue, 05/17/2016 - 13:19 नवीन
ही: ही: ही: म्हणजे बघा, शेवटी सर्व समस्यांचे मूळ हे पाणी आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण लोक काय करतात? पाणी उपसा आणि पाणी उडवा!
  • Log in or register to post comments

ओके

स्पा
Tue, 05/17/2016 - 14:02 नवीन
ओके
  • Log in or register to post comments

ते पाचोळा च बघा कि जर फुडच

सामान्य वाचक
Tue, 05/17/2016 - 14:51 नवीन
,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा