Skip to main content

तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??

Published on शुक्रवार, 13/05/2016
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??

वाचन संख्या 3378
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

हे सांगणारा मी पहिला.... आहाहाहाहा!!!!!!!!!!!!! किती दिवसांनी पहिला प्रतिसाद दिला...

मराठी माध्यम

नक्की हायपोथिसिस काय आहे? "इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांची मराठी शब्दसंपत्ती कमी असते" हे आहे, की "इंग्रजी माध्यमात शिकलेले लोक नीट मराठी लिहू शकत नाहीत" हे आहे? असो.
.पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
मी बालवाडीपासून पुढे पूर्ण इंग्रजी माध्यमात शिकलो आहे.

In reply to by बोका-ए-आझम

इच्छायचं काय त्यात बोकेशा. बिनधास्त सांगायचं. ;) मी पण मी पण.... पन माझं इन्ग्लिश वाचन न के बराबर है. मराठी वाचन होते थोड्डेसे पण सध्याच्या खरडफळ्यावर्च्या चर्चा पाहता मी कैच वाचलेले नाही.

भाषाशैली आणि माध्यमाचा तसा संबंध नाही. मी इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा घरी मराठीच बोलत असल्यामुळे मराठीत जास्त प्रभावीपणे विचार व्यक्त करू शकतो (लिहून सुद्धा). तुम्ही विचार कुठल्या भाषेत करता त्यावर तुम्ही कुठल्या भाषेत जास्त परिणामकारकरित्या संवाद साधू शकता हे ठरते. त्याला माध्यमाची अट नाही. उदा. लहानपणापासून मी मराठीत विचार करायला शिकलो (मातृभाषेमुळे), नंतर इंग्रजी माध्यमातून शिकूनही तितकेसे फाड फाड इंग्रजी बोलता येत नसल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावला तेव्हा तेथील गुरुजीन्ने इंग्रजीत विचार करण्याचा सल्ला दिला (आणि तो खूप उपयोगी पडला) तेव्हा माझे इंग्रजी बोलणे आणि लिखाण सुधारले आणि नंतर काही वर्षे आंध्रात (आताचे तेलंगाणा) असताना बरोबरचे लोक तेलुगु शिकवायचे तेव्हा आपसूक तेलुगूत विचार करू लागलो होतो (आता टच पूर्णपणे गेलाय) त्यामुळे थोडे थोडे तेलुगु बोलू लागलो होतो. माझ्या एका मित्राचा भाऊ (मूळचा नगरचा आणि मराठी माध्यमात शिकलेला) अस्खलीत आणि वान्ग्माय्पूर्ण तेलुगु बोलतो. त्यालाही स्वतःशी कधी कधी तेलुगुमध्ये बोलताना/पुटपुटताना पकडायचो आम्ही :P

मी दहावीपर्यंत मराठी माध्यमात आणि अकरावी पासून इंग्लिश माध्यमात शिकले. आता मी कोणते माध्यम माझे म्हणून सांगू? मराठी, कोंकणी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत पाच भाषा वाचते.

In reply to by बोका-ए-आझम

देवनागरी आणि रोमी कोंकणी. कन्नड जिलब्या समजत नैत. बँकेत कन्नडिगांचा भरणा असल्याने थोडेफार कामचलाऊ कन्नड बोललेले समजते इतकेच.

आठवी पासून इंग्लिश माध्यमात शिकलो. मला वाटते, की लहानपणी किंवा कोलेज पर्यंत तुम्ही काय अन किती साहित्यिक वाचले ह्याचा भाषा प्रभूत्वावर खूप परिणाम होतो.

ऊल्टीपालटी कॉवेनंट चेंबुर ११ वी नंतर केम ब्रि़ज ग्रॅजुएशन

zp

अगदी बालवाड़ी पासून. पण त्याचा आणि इंग्रजीतून किंवा मराठीतून लिखाणाचा काय संबंध आहे ते समज़ले नाही. माझे मराठी पुस्तकांचे भरपूर वाचन लहानपणापासूनच आहे, इंग्रजी पुस्तके वाचनाचीही आवड आहे. माझ्या मताप्रमाणे तुम्ही आत्ता काय वाचत आहात त्याचा लिहिण्यावर प्रभाव पडतो - पूर्वीच्या वाचनाचा कमी प्रभाव असतो.