Skip to main content

मदत हवी आहे, Attestation करणे

Published on गुरुवार, 12/05/2016
काही महत्वाच्या कागदपत्रान्चे Attestation(साक्षान्कीत प्रत) करुन हवे आहे. पुण्यात कोठे मिळू शकेल? Attestation हे राज्य/केन्द्र शासनाच्या वर्ग १ अधिकार्याकडून करुन हवे आहे. नगरसेवक/नोटरी नको. आमदार्/खासदार चालतील. सद्ध्या बर्याच शाळाना सुट्ट्या असल्याने मुख्याध्यापक पदावरील व्यक्ती भेटू शकत नाहियेत. नवीन नियमानुसार self attestation चालते हे सान्गु नये, ministry ला वर्ग १ अधिकार्याने केलेले attestation हवे आहे.

वाचन संख्या 3528
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

कुमठेकर रस्त्यावर D G Copiers म्हणून एक Xerox चे दुकान आहे. तिथे ते attest करून देतात असा बोर्ड बघितल्याचा आठवतो मला. फक्त तो नवीन admissionच्या काळातच असतो का ते माहित नाही.

In reply to by स्थितप्रज्ञ

धन्यवाद. xerox च्या दुकानात attestation हे विशेष कार्यकारी अधिकारी ह्यान्च्या नावाने केले जाते. ते चालणार नाहीये.

पोलीस कमीशनर किंवा IAS समकक्ष अधिकार्‍याला गाठा. त्यांना अधिकार असतात. पालिकेचे आयुक्त / कलेक्टर प्रभृती पण चालतील. वरील सर्व लोक्स कुठे सापडतील हे चौकात थांबलेल्या पांढर्‍या वेषातील पोलीसाला (चालत जावून) विचारा.

In reply to by मोदक

IAS, IPS किन्वा समकक्ष अधिकारी हे असली छोटी कामे करीत नाहीत. त्यान्चे PA असल्या कामान्साठी साहेबान्ना भेटूच देत नाहीत.

इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जा. पाहिजे तितके ग्रेड १ ऑफिसर्स मिळतील. - स्वारगेट (पीएमटी वर्कशॉपच्या शेजारी) - बीओ भवन (सिटीप्राईड सातारा रोडच्या समोर) - प्रभात रोड (इन्कम टॅक्स गल्ली) - साधू वासवानी चौक केबिनबाहेर बसणार्‍या इसमाला चिठ्ठी / कार्ड द्या, आणि "साहेबांना भेटायचं आहे" असं सांगा. शक्यतो तुम्हाला अ‍ॅटेस्टेशन पाहिजे आहे हे सांगू नका. थेट ऑफिसरशी बोला. आधी फोन केलात तर फार उत्तम. (माझ्या माहितीप्रमाणे अपडेटेड) डिरेक्टरी इथे आहे: http://office.incometaxindia.gov.in/pune/Documents/Directory%20of%20Officers.pdf पूर्ण डिरेक्टरी वाचा. कदाचित कोणी ओळखीचं निघेल, आणि काम अगदीच सोपं होईल.

In reply to by आदूबाळ

इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेल्यावर साहेबाना कोणत्या केस सन्दर्भात भेटायचय हे आधी विचारतात. पण वैयक्तिक काम आहे, साहेबान्ना फोन करून आलोय सान्गितल्यावर भेटून काम करून घेतले

मोठ्या सरकारी हस्पिटलातील डीन, सुपरिंडेंंट , सिविल सर्जन इ इ

In reply to by mugdhagode

धन्यवाद. ह्या पदावरील व्यक्ती बरेचदा उपलब्ध होत नाहीत. कामाचा ताण प्रचन्ड असतो त्यान्ना.

त्यापेक्षा नोटरी कडुन अ‍ॅटेस्टेशन करुन घ्या ना. लगेच देतात, थोडी फी घेतात पण एकदम कायदेशीर.

क्लास १ अधिकाऱ्या कडून सत्यापित केल्या नंतर काम पूर्ण होणार नाही. इमानदार माणसाकडून हि सत्यापित करून घ्या. भविष्यात अडचण येऊ शकते.

घराच्या आसपास चौकशी करा (पानपट्टी, किरणा दुकान इत्यादी), जवळच कुठेतरी सापडेल attested वाला . किंवा जवळच्या सेना/मनसे/खान्ग्रेस शाखेत विचारा.

In reply to by कंजूस

नोटरी चालणार नाही हे स्पष्ट लिहील आहे. attestation कोणाकोणाच चालू शकेल ह्याची यादी दिली आहे, त्यात नोटरी नाही.

सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रासोबत जावून एका शाळेतून मुख्याध्यापकाच्या सहीने attestaion करून घेतले. ह्या शाळेत (पुण्यातल्या बहुतेक सर्व शाळात) केवळ आजी/माजी विद्यार्थानाच attestaion करून दिले जाते. मित्राच्या ओळखिने काम झाले.

अटेस्टेशन करायला क्लास एकचे अधिकारी लागतात.... ओळखीच्या माणसाकडून करून घ्या असे कुठेही सांगितले नाहीये.... मात्र बरेच लोक खूप भाव खातात...... याच कारणावरून एकदा मित्रासाठी विश्वास नांगरे पाटलांशी भांडून आलो आहे.....न का ओळखेनास बाबा... ओरिजिनल पाहून सही तर कर !! नाही म्हणाला मनुष्य......

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ओळख नसताना बरेच अधिकारी सही करत नाहीत. अनेक अधिकार्यान्ना हे काम दुय्यम दर्जाचे वाटते. त्यामुळे ते सही करत नाहीत.

In reply to by अनिकेत वैद्य

मीही एकदा प्राधीकरणातील ऑफीसमधे गेलो होतो. तिथल्या साहेबाने ओळखत नाही म्हणून अटेस्ट करायला नकार दिला.

ओळख नसताना बरेच अधिकारी सही करत नाहीत. अनेक अधिकार्यान्ना हे काम दुय्यम दर्जाचे वाटते. त्यामुळे ते सही करत नाहीत.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व (पुर्णवेळ) प्राध्यापक हे वर्ग १ चे गॅझेटेड ऑफिसर असतात. त्यांच्याकडुन attestation करुन घेता येते. --- कानडा

सही न देण्याचं कारण म्हणजे जर समजा डॉक्युमेंट फेक असेल (ओरीजनल दाखवून दहा -विस बरोबर डॉक्युमेंटमधे १-२ फेक डॉक्युमेंट सहज टाकता येतात. ) तर सही करणारा अधिकारी अडचणीत येऊ शकतो. शिवाय हे अधिकचे काम आहे. त्यामुळे करण्यास सहसा अधिकारी तयार होत नाहीत. मित्राच्या, नातेवाईकाच्या ओळखीचा अधिकारी असेल तर सहसा टाळटाळ करीत नाही.