यात चुक कोणाची? / आता काय करयला हवे?
हि कथा आहे स्वप्ना आणि स्वप्नीलची (नावं काल्पनिक आहेत पण कथा खरी आहे.)
दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा फक्त तोंड ओळख होती. हाय हेल्लो पुरतेच बोलायचे. यथावकाश कॉलेज संपले आणि ते वेगवेगळ्या मार्गाला गेले.
अचानक १-२ वर्षांनी त्यांची गाठ पडते. पुन्हा तेच हाय हेलो. मग असाच एक दोनदा भेट झाल्यावर फोन नंबर एक्स्चेंज होतात. मग ते फोन वर बोलन…. एकमेकांची आवड निवड जाणन. हे सगळ सुरु होत. मग डेटिंग सुरु होत. तिला तो मनापासून आवडतो. मनोमनीच ठरवते कि लग्न करेन तर याच्याशिच.
पण तो… तो फक्त टाईमपास करत असतो. ती बिचारी सगळ खर समजून त्याला भरभरून प्रेम देते.
आणि अचानक एक दिवस तो तिला काहीही न सांगता सोडून जातो. ती बिचारी रडरड रडते. सगळीकडे चौकशी करते. तेव्हा तिला कळत कि त्याच तिच्यावर कधी प्रेमच नव्हत. खूप वाईट वाटत तिला. कारण तिच्या आयुष्यातलं ते पहिलच प्रेम असत आणि तेही असं फसवं निघत. दिवस जातात, महीने जातात. हळूहळू तिची गाडी रुळावर यायला सुरुवात होते. मग सगळ विसरायचा प्रयत्न करते. पण ते तिच्यासाठी अशक्य असत कारण तो कसाही वागला तरीही तीच प्रेम खरच असतं.
पुन्हा एकदा तिचं आयुष्य एक वेगळ वळण घेत. २ वर्षांनतर तो तिच्या समोर उभा राहतो. अगदी परिस्थितीने गंजून गेलेला असा. हात जोडून तिची माफी मागतो मला एकदा माफ कर म्हणतो. स्वत: पासून वेगळ करू नकोस म्हणतो. हि तर प्रेमच करत असते त्याच्यावर. चूक समजून घेऊन माफ करते त्याला. तो तिला सगळ समजाउन सांगतो. ती पुन्हा त्याला तिच्या आयुष्यात स्थान देते. आता हा हि तिच्यावर मनापसून प्रेम करू लागतो. तिला कुठे ठेऊ अन कुठे नको अस होऊ लागत. जगातली सगळी सुख द्यायचा प्रयत्न करतो. सगळ सुखासुखी सुरु असतं.
आता ती त्याला लग्नाची गळ घालते. आपण लग्न करूया म्हणते. तो हि 'हो' म्हणतो. पण इतक्यात नको, थोड सेटल होऊ दे म्हणतो. ती हि मग जास्त आढेवेढे न घेता समजून घेते. आता ते एकमेकांच्या 'जास्तच' जवळ येतात. तीही त्याच्यावर 'विश्वास' ठेवते. त्याच्या प्रेमात आकंठ बुडते.
एक दिवस तो तिला म्हणतो 'मी गावी जात आहे कामासाठी पूर्ण कुटुंबाबरोबर' असं सांगतो. ती हि जास्त काही विचारत नाही. तो गाडीत बसतो तोच त्याचा शेवटचा 'कॉल' असतो. त्यानंतर त्याचा एकही कॉल येत नाही आणि हि कॉल करते तर फोन बंद येतो. हिच्या मनात नको नको ते विचार यायला लागतात. काय झाल असेल? तो ठीक तर असेल न? त्याच्या वडिलांना बर नव्हत, ते तर ठीक असतील न? एक न दोन हज्जार शंकांनी तीच मन ढवळून निघत. दिवस पुढे जात असतात.
बरोबर १५ दिवसांनी तो तिला न सांगता न कळवता तिच्यासमोर येउन उभा राहतो. (तसंही त्याला तिला सर्प्राईजेस द्यायला आवडायचं) तिला काय करू अन काय नको अस होऊन जात. तश्याही परिस्थितीत भर रस्त्यात ती त्याला मिठी मारते. मग स्वतः ला सावरून घेते. मग तो तिला घरी सोडतो. पूर्ण वेळ ती त्याच्या बाईक वर मागे बसून रडत असते. तो मात्र शांत असतो. घर जवळ येत तास तो तिला शांत करतो आणि 'सगळ ठीक होईल' अस म्हणतो.
'सगळ ठीक होईल' हे एकाच वाक्य तिच्या मनात गुंजी घालत असतं. तसाही आल्यापासून त्याच्यात पडलेला बदल तिला जाणवत होता. खूप शांत शांत वाटत होता तिला तो. तिला समुद्रकिनारे फार आवडतात हे त्याला माहित असत. एक दिवस तो तिला अचानक फिरायला घेऊन जातो. समोर तो शांत समुद्र आणि त्याच्या समोर बसलेले हे दोघे जण. ती नेहमीच्या मस्करीच्या मूड मध्ये असते आणि हा मात्र शांतच. आणि मग तो बोलू लागतो, 'स्वप्ना मला तुला काहीतरी सांगायचं……. मी तुझ्यापासून काहीच लपऊ शकत नाही. माझा साखरपुडा झाला' ……… मी गावी गेलो होतो ते त्याचसाठी. माझ्या आई वडिलांनी परस्पर सगळ ठरवलं. मला काहीही न सांगता हे सगळ झाल. वडिलांनी आत्महत्येची धमकी दिली मला आणि त्यामुळे मला त्यांच्या मनाप्रमाणे करावच लागल… स्वप्ना मला माफ कर……. मला दूर नको लोटू तुझ्यापासून'…. तो रडत होता. माफी मागत होता.
पण ती ……… 'माझा साखरपुडा झाला' …… हे एवढेच शब्द ऐकले तिने आणि ती कोसळली. ते शब्द जणू कानात कोणीतरी गरम शिसे ओतावे तसे भासले तिला… पुढच काही ऐकूच आल नाही. तिचं त्याच्याबरोबर एकत्र राहाण्याच स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं. धरणीमाय पोटात घेईल तर बर अस वाटत होत तिला. डोळ्यापुढे फक्त आणि फक्त अंधार येत होता. सावरण्याच्या मनस्थितीतच नव्हती ती. कशी बशी घरी गेली.
तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ तरळू लागला. खूप खचली ती. तो तिला परोपरीने समजावत होता पण आता तिच्या अंगात चंडी संचारली होती. खऱ्या प्रेमाचा असा दगा व्हावा हेच तिला पटलं नाही. तिने त्याला सांगून टाकल कि ती जे काही त्या दोघांमध्ये झालं ते त्याच्या आई वडिलांना सांगून टाकेल. तो तिच्या हाती - पाई पडू लागला. आई वडील काहीतरी करून घेतील असं सांगू लागला. पण ती त्याच काहीच ऐकून घेत नव्हती. शेवटी ती शांत झाली. शांत डोक्याने विचार करू लागली. आई वडिलांना शिक्षा का द्यायची? म्हणून ती शांत बसली.
आता तिचा प्रेमावरून विश्वास उडाला होता. एकीकडे तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात झाली होती. लग्न करण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण केवळ जन्मादात्यांकडे बघून ती सगळ्याला तयार झाली. इथेही तिच्या नशिबात सुख नव्हतच. पुन्हा त्याने फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली होती. तू काहीही झाल तरी माझ्याबरोबर राहा… अस त्याच म्हणन होत तर ती आत्ता ह्या जबरदस्तीच्या नात्याला तयार नव्हती. ती तर लग्नाला तयार होती त्याच्याबरोबर. पण त्याला तिच्याबरोबर लग्न न करता राहायचं होत. ती कॉलला उत्तर देत नाही म्हणून तो तिला मेसेजेस करू लागला. 'तू कधी हि सुखी राहणार नाही, तुला नवरा मिळेल पण फक्त नावापुरता, तू स्वार्थी आहेस, तुला फक्त लग्न हवाय मी नको' … अस आणि आजून बराच काही.
हीच कामात लक्ष नाही लागत आहे. सततच्या ह्या टोर्चरमुळे ती वैतागली आहे. काय करावं? कुणाशी बोलावं काळात नाही आहे.
तर हि तिची व्यथा आहे. तुम्हाला काय वाटत यात चूक कोणाची? आणि तिने आत्ता आयुष्याच्या अश्या वळणावर काय निर्णय घायला हवा?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्याच्या बायको आणी आईवडीलाना
सहमत.
आंधळेपणाने अती विश्वास ठेवला
सर्वात आधी फोन नंबर बदला
माझे मत... त्या मुलाला स्पष्ट
पोलिसांकडे जाऊ शकता.
चूक कोणाची
पोलीस!
त्याने त्याचे आई बाबा
पण त्याला तिच्याबरोबर लग्न न
खरी परीक्षा पुढेच आहे
अगदी, अगदी.
सहमत!
ही महामूर्ख मुलगी आहे आणि
..
काही मिपाकर एकच अॅक्सेस
..
बॉयफ्रेंडपण? नाही, चालूद्या
मीच चूकीचं वाचलं का काय अशी
त्यात चुकीचं काय ?
आपल्याव्यतिरिक्त अजुन दोन
चुकिच काय
He wacha
अरे देवा ....
सर्वप्रथम सगळ्यांचे मनापासुन
धन्यवाद
ज्यांनी सल्ले दिले भलेही
सद्य केस मध्ये त्या मुलावर
..
हो की ग मुग्धे. तू माझ्यावर
हा प्रतिसाद पातळी सोडलेला आहे
मला नाही वाटत. मुग... ह्या
समोरचा पातळी सोडत असेल तर आपण
काम झाले. आवडले. पोरीला
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद....
छान.... बरे वाटले वाचुन
हो..आणि पुन्हा आयुष्यात कधीही
....
गुड. शुभेच्छा!
उधळुन लाव डाव!!!