Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Anand More on Mon, 05/09/2016 - 18:38
घरी DEN चे HD केबल आहे. पण त्याच्या बकाल सर्विसने जेरीला आलोय. आता डिश एन्टेना लावावा म्हणतोय. मग टाटा स्काय की व्हिडीओकोन की डिश टीव्ही अश्या गोंधळात पडलोय. कुठली कंपनी चांगली सर्विस देते? प्रोग्रॅम रेकोर्डिंग ची सुविधा असणे ही पूर्व अट आहे. आणि HD channels असणे देखील. मराठी मध्ये झी, ABP; इंग्रजी मध्ये Star world, Star Movies, HBO, Movies Now, बातम्यांसाठी इंग्रजी आणि हिंदी NDTV असावेत ही अपेक्षा आहे. जाणकार आणि अनुभवी मिपाकर मदत करू शकतील काय?
  • Log in or register to post comments
  • 14178 views

Book traversal links for टी व्ही साठी कुठला डिश सर्विस प्रोव्हायडर घेऊ ?

  • ‹ सविता कोर्कू... भाग - १
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 18:42

Permalink

व्हिडियोकोन डी२एच चा वैयक्तिक

व्हिडियोकोन डी२एच चा वैयक्तिक अनुभव खूप चांगला आहे. जास्तीत जास्त च्यानल्स कमीत कमी किंमतीत मिळतात. सुस्पष्ट चित्र आणि आवाजाची गुणवत्ता आहे. वेगवेगळी च्यानेल प्याकेजेस आहेत शिवाय हवे ते च्यानेल्स a la carte पद्धतीने देखील निवडता येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Mon, 05/09/2016 - 18:46

Permalink

संपादक मंडळाला विनंती सदर

संपादक मंडळाला विनंती सदर धागा सदाहरीत धाग्यामधे हलवावा. माझ्या घरी डीश टिव्ही आहे. ४-५ वर्षांपासून पण hd चा अनुभव नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 05/09/2016 - 19:41

In reply to संपादक मंडळाला विनंती सदर by उगा काहितरीच

Permalink

आलरेडी आहे

दुसर्‍या का तिसर्‍या भागात. कुणीतरी शोधून द्या रे
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 05/09/2016 - 19:44

In reply to आलरेडी आहे by तुषार काळभोर

Permalink

हाय रे माझ्या कर्मा !!!!!!!

निर्गुणी भजनानंतर मी इथे पण धागा काढण्यात दुसरा आलो की काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 05/09/2016 - 18:49

Permalink

Airtel चा Universal Remote हा

Airtel चा Universal Remote हा प्रकार फार आवडला. TV च्या remote ची फारशी गरज पडतच नाही. पण थोड्याशा पावसातही Airtel चे signals गडबडतात. त्याबाबतीत Tata Sky चा performance चांगला वाटला , अगदी मुसळधार पावसातच फक्त सिग्नल मिळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 05/09/2016 - 18:57

In reply to Airtel चा Universal Remote हा by मराठी कथालेखक

Permalink

पावसात सगळ्यांचेच सिग्नल

पावसात सगळ्यांचेच सिग्नल गडबडतात. टाटा स्काय अपवाद नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Mon, 05/09/2016 - 22:33

In reply to पावसात सगळ्यांचेच सिग्नल by मृत्युन्जय

Permalink

+ १

+ १ एअरटेल चांगलं आहे पण एखादं नवीन चॅनल / प्रमोशन आधी टाटा स्काय वर उपलब्ध होतं असा अनुभव आहे. त्या मानाने एअरटेल ला वेळ लागतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 05/10/2016 - 11:29

In reply to पावसात सगळ्यांचेच सिग्नल by मृत्युन्जय

Permalink

माझा अनुभव असा आहे की टाटा

माझा अनुभव असा आहे की टाटा स्काय खूप मुसळधार पावसात गंडते, एअरटेलला थोडा जोराचा वाराही पुरतो. पुन्हा एकदा टेक्निशियनला बोलावून बघेन काही करु शकतो का ते. बाकी एयरटेलचा Remote च्या प्रेमात पडलोय टीवी रिमोटचा एक अगदी खास फिचर पण एयरटेल रिमोटला शिकवला (ट्रान्सफर केला) आणी टीवी रिमोट कपाटात ठेवून दिला
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Mon, 07/11/2016 - 12:13

In reply to Airtel चा Universal Remote हा by मराठी कथालेखक

Permalink

टाटाचा ही रिमोट युनिव्हर्सल

टाटाचा ही रिमोट युनिव्हर्सल करता येतो.त्या न्यायाने सर्व रिमोट युनिव्हर्सल करता येत असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 05/09/2016 - 19:05

Permalink

??

कोणताही घेतला तरी फक्त २ टक्के चानल चांगली आहेत.इंग्रेजी सिनेमा चानलचा सगळा रंग उडाला आहे. हॉलिवूड ही थकत चालले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 05/09/2016 - 19:07

Permalink

मुख्य गोष्ट सर्विस

तुम्ही ज्या भागात राहता तेथे कोणत्या नेटवर्कची सर्विस चांगली आहे ते पहा. काही भागात डीश टीव्ही प्रभावी आहे तर काही भागात टाटास्काय. मी कस्टमरला टाटास्काय सजेस्ट करते कारण आमच्याकडे ती सर्विस चांगली आहे, एच डी पण.हल्ली या कंपन्या एकत्र येऊन एकाचवेळी पॅकेज किंमत ठरवतात, न विचारता नविन चॅनल्स चालू करतात, त्याबाबतीत जागरूक राहणे आवश्यक असते. येणारे मेसेज न वाचता डीलिट करू नका. कस्टमर केअर फोन करून योग्य माहिती मिळवा, फोन करायचा कंटाळा करून स्वतःचे नुकसान होते. आपण न पाहता नेटवर्क बंद झाले की अस्वस्थ होऊन लगेच रीचार्ज करून टाकतो. टाटास्काय १८७०/- एक महिना फ्री. २७०/- चे पॅकेज फ्री. डीश टीव्ही सेम. १६००/- + रीचार्ज ( पॅकेज कॉस्ट प्रमाणे)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Mon, 05/09/2016 - 19:49

Permalink

टाटा स्काय

माझ्यामते टाटा स्काय ह्या सगळ्यात उत्तम आहे. उत्तम कस्टमर केअर, चांगले पॅकेज, अगदी ४के पर्यंतचे सेट टॉप बॉक्स, टाटा स्काय प्लस मध्ये रेकॉर्डींग आणी मोबाईल वॉचींग सुविधा आणी इतर बरेच. (त्यामुळे माझ्या पर्सनल अनुभवानुसार टाटा स्काय बेस्ट)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 05/09/2016 - 19:57

Permalink

जाणकार आणि अनुभवी मिपाकर

जाणकार आणि अनुभवी मिपाकर म्हणून सांगतो, कोणतेही कनेक्शन न घेता आहे तो टीव्ही विकून/देऊन टाका, जीवन जास्त आनंदमय, मंगल आणि सृजनशील होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Mon, 05/09/2016 - 20:03

In reply to जाणकार आणि अनुभवी मिपाकर by चित्रगुप्त

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 05/09/2016 - 20:05

In reply to जाणकार आणि अनुभवी मिपाकर by चित्रगुप्त

Permalink

हा हा हा …. म्हणजे माझ्याकडचे

हा हा हा …. म्हणजे माझ्याकडचे चित्र देखील गुप्त करण्याचा विचार आहे तुमचा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 21:20

In reply to जाणकार आणि अनुभवी मिपाकर by चित्रगुप्त

Permalink

+ १

प्रचंड सहमत... टी.व्ही. म्हनजे टाइम किलिंग मशीन.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 05/09/2016 - 21:37

Permalink

माज्याकडे आहे dish tv

माज्याकडे आहे dish tv महिना 260 बेसीक पॅक..बाकी ala carte घ्याचे.. धुवांधार पाऊस पडला की बंद पडतो.. कष्टमर केअर वाले रोज फोन करतात..पॅक अपग्रेड करा म्हणुन.. पायजे असल्यास कळवा निम्या किमतीत देऊन टाकीन.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 21:40

In reply to माज्याकडे आहे dish tv by जेपी

Permalink

असा देता येतो का?

माझ्या कडे पण गेले वर्ष भर कुठल्यातरी कंपनीची डिश पडून आहे. आजकाल हॉट-स्टार, यु ट्युब आणि टोरँट मुळे ही डिश पडूनच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Wed, 05/11/2016 - 09:05

In reply to माज्याकडे आहे dish tv by जेपी

Permalink

टाटा स्काय वाले भय्ये पण रोज

टाटा स्काय वाले भय्ये पण रोज फोन करून डोकेदुखी देत होते , एकदा दम भरला जोरात आणि संगितले की आता consumer court ला complaint टाकतोय म्हणून ... आजतागायत परत फोन आलेला नाही .
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 05/09/2016 - 22:28

Permalink

मनोरंजनाचं साधन आहे जेवढे

मनोरंजनाचं साधन आहे जेवढे पैसे ओताल तेवढी मजा वाढतच जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश पाटील on Tue, 05/10/2016 - 10:46

Permalink

मला तर बुवा रात्री स्वीट डिश

मला तर बुवा रात्री स्वीट डिश आवडते. टीवी सहसा पाहत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Tue, 05/10/2016 - 11:30

Permalink

टाटा

टाटा स्काय चा अनुभव चांगला आहे. एकंदरीत स्वानुभव आणि मित्रमंडळींकडून जे ऐकलय त्यावरून टाटा स्कायची ग्राहक सेवा जास्त उजवी आहे असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 05/10/2016 - 11:38

Permalink

डी टी एच सेक्टर मध्ये ६

डी टी एच सेक्टर मध्ये ६ पर्याय आहेतः १. टाटा स्काय २. डिश टीव्ही ३. व्हिडीओकोन ४. एयरटेल ५. सन ६. रिलायन्स. सन आणी रिलायन्स फार कुठे दिसत नाहित. टाटा, डिश आणी व्हिडीयोकोनची स्पर्धा आहे खरे सांगायचे तर. व्हिडीयोकोनचा सबस्क्रायबर बेस वेगाने वाढत आहे इतरांच्या मानाने. सगळ्यात अद्ययावत प्लॅटफॉर्म देखील माझ्या मते त्यांचाच आहे. सर्व्हिस चांगली आहे. पॅकेजेस सगळ्यांची थोड्याफार फरकाने सारखीच असतात. क्वालिटीत फार फरक पडणार नाही. पण व्यक्तिशः मला टाटा आणी व्हिडीओकोन इतरांपेक्षा उजवे वाटतात. मात्र बाकीचेही फार वाईट नसावेत. व्हिडीयोकोन चे अ‍ॅड ऑन पॅकेजेस चांगले आहेत. डीटुएच सिनेमा या अ‍ॅड ऑन चॅनलवर (महिना ६० रुपये) साधारण २-३ महिने जुने चित्रपट सतत दाखवतात (एका आठवड्याला एक). तसेच किड्स साठी एक पॅकेज आहे. ज्यात नर्सरी र्‍हाइम्स आणि स्टोरिज चे २ वेगळे चॅनल्स येतात (रु. २५ प्र.मा.). एकुणात मला डी टु एच सर्वात चांगले वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Tue, 05/10/2016 - 14:07

In reply to डी टी एच सेक्टर मध्ये ६ by मृत्युन्जय

Permalink

आमच्याकडे पण विडिओकॉन D2H आहे

आमच्याकडे पण विडिओकॉन D2H आहे. बाकी मुद्दे वर आलेच आहेत. अजून एक मुख्य मुद्दा. वाईट हवामानात खूप कमी वेळ बंद पडते जे मित्रांकडे बाकी सर्विसेस ला खूप जास्त वेळ बंद पडते.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Tue, 05/10/2016 - 12:46

Permalink

उगाचच

चेपूवर आणि कायअप्पावर फुकट मनोरन्जन होत असतना कशाला ह्वाय इडीयट बॉक्स...!?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 05/11/2016 - 08:10

Permalink

डिश टीव्हीचा गेले तीन

डिश टीव्हीचा गेले तीन वर्षांचा अनुभव आहे. एरवी काही अडचण येत नाही. पण घेतलेल्या पॅकमधील चॅनेल मनमानी पद्धतीने काढले / अ‍ॅडवले जातात. म्हणजे तुम्ही अमुक एक चॅनेल हवा म्हणून विशिष्ट पॅक घ्याल, पण नंतर तो चॅनेल दिसेनासा होईल. तुम्ही तक्रार केल्यावर तो चॅनेल आता त्या पॅकमध्ये नाही असं तुम्हाला सांगण्यात येईल. तसेच तुम्हाला या पॅकवरून त्या पॅकवर मायग्रेट केले जाईल (तुम्हाला न विचारताच). तुम्ही जो पॅक घेतला होता तो आता अस्तित्वातच नाही असे तुम्हाला कळेल. हवे ते चॅनेल अ-ला-कार्टे घेतले तर खूप महाग पडतात. क्रिकेट मॅच पाहण्याचा शौक असेल तर डीटीएच पेक्षा केबलवाला चांगला. हा डिश टीव्हीचा अनुभव असला तरी बहुधा टाटा स्काय आणि एअरटेल यांचाही इतरांना तसाच अनुभव असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बोलबोलेरो on Mon, 07/18/2016 - 16:01

In reply to डिश टीव्हीचा गेले तीन by नितिन थत्ते

Permalink

सत्यवचन

डिश टीव्हीवाले शुद्ध मराठीत "चोर" आहेत. 1. तुम्ही घेतलेला पॅक कधी बंद होईल किंवा झालेला असेल, हे सांगता येत नाही. 2. घेतलेल्या पॅक मधील कोणते चॅनेल कधी चालू अथवा बंद होतील हेही नक्की नाही. 3. एकाच पॅक मध्ये वेगवेगळ्या जोडण्यांवर वेगवेगळी चॅनेल दिसू शकतात. 4. pick by channel घेतल्यास कमीत कमी तीन महिने वापराचे पैसे भरावे लागतात. 5. त्याशिवाय ऍक्टिव्हेशन शुल्क वेगळे, कसेही करून महिना 250 पेक्षा जास्त शुल्क घेतातच ते. 6. नवीन व जुना कोणत्याही पॅक मध्ये नक्की कोणते चॅनेल दिसणार याची जंत्री दिली जातच नाही. तुम्ही कायम साशंक. 7. इन्व्हॉईस किंवा बिल कधीही मिळत नाही. टाटा स्काय घ्या, एकदम स्वछ आणि पारदर्शक कारभार. डिश टीव्हीला वैतागून सेट टॉप बॉक्स फोडून टाकावा , या विचाराप्रत आलेला बोलबोलेरो
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 05/11/2016 - 08:22

Permalink

टाटा स्कायचा अनुभव चांगला आहे

टाटा स्कायचा अनुभव चांगला आहे,तक्रार नोंदवल्यास पटकन मदत मिळाल्याचा अनुभव आहे. त्यांच सेटटॉपबॉक्स मात्रं एक नंबरच मंद आहे, २-३ वेळा बटन दाबले तरच हिरवा -लाल-हिरवा असा खेळ करुनच ते चालु होते { माझे हे टिनपाट डबडे २-४ वेळा बदलुन देखील या त्याच्या सुस्तीत बदल नाही.} बाकी एचडी चॅनल्स महाग होत चालले आहेत, त्यामुळे पुढच्या वेळी अ‍ॅन्यूअल पॅक रिचार्ज करणार नाही अशा विचारात आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ, धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM RE
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Wed, 05/11/2016 - 08:55

Permalink

मी पूर्वी डिश टीव्ही चा

मी पूर्वी डिश टीव्ही चा कस्टमर होतो. दोन वर्षापूर्वी टाटा स्काय घेतले. डिश टीव्ही वर बरेच चॅनेल फ्री पॅक मध्ये आहेत जे दूरदर्शन च्या फ्री डिश वर देखील मोफत दिसतात . पण हेच चॅनल टाटा वर पेड आहेत . बाकी टाटा चा अनुभव बारा आहे. मी सध्या बाकी सगळी झेंगट बंद करून 99/-बेस पॅक + 26/- मराठी पॅक चालू ठेवला आहे . त्यामुळे 125/- महिना रेंट मध्ये फ्री चॅनल अधिक मराठी चॅनेल दिसतात . याचे कारण नेट व युट्यूब मुळे टीव्ही पाहण्याची वेळच येत नाही फारशी... ! सिग्नल बाबत महत्त्वाचे म्हणजे उपग्रह. इस्रो चे इन्सॅट / GSAT उपग्रहांचे सिग्नल्स भारतीय उपखंडात चांगले मिळतात . दूरदर्शन /टाटा / व्हीडिओcon इस्रो चे उपग्रह वापरतात ,तर डिश टीव्ही एनएसएस-6 हा परदेशी उपग्रह आहे . सन /रिलायन्स/एयरटेल देखील परदेशी /चायनीज उपग्रहाची सेवा घेतात . त्यामुळे सिग्नल स्ट्रेन्थ मध्ये फरक पडतो .
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/11/2016 - 10:31

In reply to मी पूर्वी डिश टीव्ही चा by मंदार कात्रे

Permalink

नेट व युट्यूब मुळे टीव्ही पाहण्याची वेळच येत नाही फारशी... !

सेम हियर.... गेले २-३ वर्षे आमचा टी.व्ही. धूळ खात पडलेला आहे. ५००/- महिन्यात नेट मिळत असेल तर ह्या मूर्ख खोक्याचा तसा काहीच उपयोग नाही. हॉट-स्टार, यु-ट्युब, टोरंट हे क्रिकेट, मालिका आणि सिनेमे, हवे ते, आपल्या वेळेनुसार आणि प्रत्येकाची आवड-निवड जपत देत असतील तर टी.व्ही. कशाला बघायचा?
  • Log in or register to post comments
Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on Wed, 05/11/2016 - 12:01

In reply to नेट व युट्यूब मुळे टीव्ही पाहण्याची वेळच येत नाही फारशी... ! by मुक्त विहारि

Permalink

मी एअरटेल 4जी नेट वापरत आहे.

मी एअरटेल 4जी नेट वापरत आहे. केबल वा डीशनाही घरात.. 2300 रूपये महीना आणि 40gb डाटा आहे. 2 mbps actual download speed मिळतो. आपण कोणत्या प्रकारचे नेट वापरत आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 07/10/2016 - 20:28

In reply to मी पूर्वी डिश टीव्ही चा by मंदार कात्रे

Permalink

आता सर्वच( जुन्या ) कंपन्या

आता सर्वच( जुन्या ) कंपन्या सटेलाइट बदलून नवीन mpeg4 वर अपग्रेड करत आहेत शिवाय अधिक ट्रान्सपोंन्डर भाड्याने घेत आहेत.सिग्नल स्ट्रेन्थसाठी डिश नीट फिरवून ९५-९८%वर लावावी.इतर भाषिक ग्राहक त्यांचे चानेल्स दाखवणारी डिश घेतात.सरकारी डिटिएच ( फ्री डिश) माझ्याकडे दहा वर्षे विनातक्रार चालू आहे.त्यातले सर्वच चानेल्स डिशटिव्ही दाखवत नाही.झी २४तासही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Sat, 07/09/2016 - 13:45

Permalink

कोणती डिश घेतली?

आनंद सर, कोणत्या कंपनीची डिश घेतली ते सांगा की... किती चार्जेस भरावे लागले? काही ऑफर वगैरे मिळाली का? या महिन्याअखेरीस टाटा स्काय घ्यायचा विचार करतोय. टाटा स्काय वापरणार्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 07/10/2016 - 16:55

In reply to कोणती डिश घेतली? by सॅगी

Permalink

टाटास्काय वापरली सहा वर्षे

टाटास्काय वापरली सहा वर्षे.नंतर गुंडाळून माळ्यावर ठेवलीय.डिशटिव्हीचा रेकॅार्डिंग डबा घेतला हजार रुपयात दोन वर्षांपूर्वी.पेनड्राइवमध्ये रेकॅार्ड होतात प्रोग्राम.कोणतीही डिश घ्या पण रेकॅार्डिंग हवेच.
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Sun, 07/10/2016 - 17:41

In reply to टाटास्काय वापरली सहा वर्षे by कंजूस

Permalink

धन्यवाद

धन्यवाद कंजूस सर, रेकॉर्डींग वाले सेट टॉप बॉक्स बघतो आता..
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 07/18/2016 - 14:44

In reply to कोणती डिश घेतली? by सॅगी

Permalink

नाही हो .. अजून DEN वरच

नाही हो .. अजून DEN वरच अडकलोय .. आता पुढच्या वर्षी एप्रिल च्या आसपास ठरवीन
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 07/18/2016 - 19:11

In reply to नाही हो .. अजून DEN वरच by Anand More

Permalink

अद्यापही डिश घेतली नसेल तर....

ह्याचा अर्थ अद्यापही त्यावाचून तुमचे काही अडत नाही. "एखाद्या गोष्टी वाचून आपले काम अडत नसेल, तर उगीच त्या गोष्टीच्या मागे लागू नये." इति बाबांची प्रवचने, "डू अँड डोंट" , खंड ७ वा समास ७७७.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 07/19/2016 - 17:55

In reply to नाही हो .. अजून DEN वरच by Anand More

Permalink

सर

माझ्या घरी डेनचा डब्बाच आहे आणि तो व्यवस्थित चालतो. आता सगळ्या चॅनेल चे जुने कार्यक्रम त्यांच्या अ‍ॅप वर ऊपलब्ध आहेत मग रेकॉर्ड काय करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sun, 07/10/2016 - 14:18

Permalink

एरटेल रिमोट काय भानगड आहे?

एरटेल रिमोट काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by महेश_कुलकर्णी on Mon, 07/18/2016 - 17:10

Permalink

वेगळा विचार: महागडी सेवा असलेले घ्या..

नमस्कार आनंदजी, आपणास कदाचित आवडणार नाही पण माझे मत आहे की आपण सगळ्यात महागडी सेवा देणार डीश घेणे. फायदे: १. आपल्या गरजा आपण नक्की करू शकतो व तेवढेच च्यानेल घेतो. २. उगाच आहेत वाहिन्या म्हणून बघत बसावे असे होत नाही. एकदा टीव्ही बघण्याला आकृष्ट करणाऱ्या गोष्टी कमी झाल्या कि आपोआप टीव्ही बघणे कमी होते व हळू हळू त्याचे सकारात्मक फायदे दिसु लागले की टीव्ही पाहणे आपोआपच बंद होते. त्यानंतर मिळणारा आनंद पराकोटीचा आहे.. भरपूर रिकामा वेळ मिळतो जो आणखी काही चांगल्या गोष्टीसाठी वापरता येवू शकतो. धन्यवाद, महेश रा. कुलकर्णी
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com