आप की आखों में कुछ
मेहेके हुएसे राज हैं
आप से भी खूबसूरत
आप के अंदाज हैं !
काय म्हणावं यार ह्या गाण्याबद्दल ! रेखाला सुरेख म्हणावं , कि विनोद मेहराला ! चित्रीकरणाची तारीफ करावी , की आर डी सारख्या संगीतकाराची ! किशोरच्या सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ ,उमद्या तरीही भाऊक अशा अस्सल मर्दानी आवाजाची तारीफ करावी कि लता बाईंच्या स्वर्गीय पण लाडिक (तशी त्यांची अशी लाडिक गाणी कमी आहेत) आवाजाची ! दिग्दर्शक माणिक चटर्जी हे नाव फार ऐकिवात नाही ,परंतु त्याने ह्या गाण्याला वातावरणाचा इफेक्ट मात्र अतिशय सुंदर साधलाय !
आणि आता बोलूच का ?................ तर गीत कार गुलजार आहेत !
काही म्हणा , पण ह्या गाण्यात भट्टी काहीतरी अफलातूनच जमून आलीये यार ! सुरुवात करतानाच समोर येतो अतिशय भाऊक असा चेहरा लाभलेला विनोद मेहरा, त्यानी परिधान केलेला पांढरा शुभ्र नेहरू शर्ट. समोर कोण ? तर रेखा. गच्चीवर (बहुधा) खाली बसलेली रेखा आणि तिच्या नेत्रांची तारीफ करणारा विनोद मेहरा. लाजेने अजूनच सुंदर दिसणारी रेखा. मागचा परिसर , गाणं शूट करताना साधलेली वेळ , हलक्या वाऱ्याने उडणारे केस , आरडी नी सतारीचा , सरोदचा माफक परंतु सुरेख वापर केलाय या गाण्यात. अतिशय सुरेख असा ठेका. हा ठेका खय्याम साहेबांच्या जवळचा वाटतो नाही ? खय्याम नी ह्या ठेक्याचा खूप वापर केलाय.असो. मुद्दा... “आप की आखों...”
लब हिले तो मोगरे के
फूल खिलते हैं कहीं
आप की आंखो में क्या
साहिल भी मिलते हैं कहीं
आप की खामोशीया ही
आप की आवाज हैं
शेवटच्या दोन ओळी म्हणजे कहर ! रेखाच्या सौंदर्यावर फिदा न होणारा आमच्या काळी सापडणं अवघडच बरं का ! साडी , मोठ्ठं कुंकू हे रेखा आणि शबानाला अगदी शोभून दिसायचं-म्हणजे दिसतं. अशीच गोड शबाना “स्वामी” त दिसलीये. पुन्हा “आप की आंखो वर” ...
पहिल्या कडव्याच्या अगदी शेवटी ,खरं म्हणजे कडवं संपल्यावरच लता बाई अवतरतात. हा सिनेमा १९७८ चा आहे (घर). एव्हाना लता बाईंचा आवाज थोडा जाड , प्रगल्भ जाणवतो. ह्याच काळातल्या त्यांच्या गाण्यांना एक वेगळीच धार आहे. ह्या वेळी रेखाची साडी क्र.२ काळ्या ठिपक्यांची पांढरी साडी. मोठ्ठं कुंकू आहेच. विनोद मेहरा पाठमोरा आहे, पण “आप से भी खूबसूरत आप के अंदाज हैं !” असं ती म्हणत असताना , त्याचा बेदरकार धूर सोडण्याचा “अंदाज” पाहण्यासारखा आहे. आणि रेखाही तो धूर अगदी सहज बिनदिक्कत – अगदी तोंडावर असूनसुद्धा झेलते !
दुसरं कडवं अर्थात रेखा- म्हणजे लता बाईंचं. ह्याचं शुटींग पुन्हा गच्चीवरच. पण रात्रीची वेळ साधलीये. रेखाची साडी क्र.३ – लाल-काळी-पांढरी अशी काहीतरी मिक्स साडी आहे. सुरेख. त्यापूर्वी एक लटका , जरा romantic असा प्रसंग देखील गाण्याची लज्जत वाढवतोच.
आपकी बातों मे फिर
कोई शरारत तो नहीं
बेवजाह तारीफ करना
आपकी आदत तो नहीं
आपकी बदमाशियोंके
ये नये अंदाज हैं
यातल्या “ आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज हैं” ह्या ओळींना लता बाई अश्शा काही हसल्या आहेत ना... बस्स ! इतक्या अल्लड तशा त्या कमी गातात. शेवटी त्यांनी एक छानशी तानही घेतलीच आहे. छोटीशी. नजाकत वाढवणारी.
जियो ... आरडी , लताबाई, किशोरदा, गुलजार साहब !
वाचने
5140
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी लेख छान , फक्त शबाना
शबाना ....
In reply to बाकी लेख छान , फक्त शबाना by वीणा३
लताचं ते हसणं
लता बाई तेव्हा "बन चुक्या" होत्या न !
In reply to लताचं ते हसणं by फेरफटका
मस्त!!
अतिशय आवडतं गाणं. मस्त
व्वा !
In reply to अतिशय आवडतं गाणं. मस्त by उल्का
आप की आंखो में क्या
धन्यवाद !
In reply to आप की आंखो में क्या by पुंबा
अजुन एक वैशिष्ठ म्हणजे
मादल
एक र्हीदम चे वाद्य
In reply to मादल by महासंग्राम
विडिओ मधल्या एखाद्या पार्ट मध्ये ....
In reply to एक र्हीदम चे वाद्य by मराठी_माणूस
माफ करा , माझा थोडा गोंधळ
In reply to विडिओ मधल्या एखाद्या पार्ट मध्ये .... by १००मित्र
त्यात सांगा. उत्कंठा वाढलीये !
In reply to माफ करा , माझा थोडा गोंधळ by मराठी_माणूस
मस्त लिहिलय!
अतिशय आवडते गाणे. धन्यवाद.
गाणं छान आहे. अभिनय वगैरे पण
सिगरेट
In reply to गाणं छान आहे. अभिनय वगैरे पण by उगा काहितरीच
मुद्दा मान्य आहे. पण मला असं
In reply to सिगरेट by फेरफटका
घर चित्रपट छानच आहे.
+ १२३४५६७८९
In reply to घर चित्रपट छानच आहे. by बोका-ए-आझम
फिर वहीं ....
In reply to घर चित्रपट छानच आहे. by बोका-ए-आझम
+१०००
सदाबहार
आवडतं गाणं
प्रयत्न ... आपल्या शुभेच्छा
नेमकी