मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या आंतरजाल सख्याहरींचे काय करावे?

विसोबा खेचर · · कौल

वाचने 3912 वाचनखूण प्रतिक्रिया 58

विसोबा खेचर 14/12/2008 - 13:03
मिपावरील स्त्री सभासदांना नस्त्या खरडीं/व्य निं पाठवणार्‍या अनोळखी/अभ्यागत सभासदांना हा कौल पाहून जरब बसावी असा या कौलाचा मुख्य हेतू आहे हे कृपया ध्यानात घ्यावे, समजून घ्यावे.. आपला, (जबाबदारीची पूर्ण जाणीव असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 14/12/2008 - 16:05
मला वाटतं सर्व सख्याहरींना एकाच तराजूत तोलून कोणतीही एक कारवाई करणे योग्य नाही. किमान एकाच खरडीत तरी हकलून देणं, आयपी ब्लौक करणं बरं नाही... यावर एक उत्तम उपाय म्हणजे मित्र मंडळाला सुचित करावे .. म्हणजे तिकडे सर्व लोकं खरडी टाकून "आमच्याशी पण मैत्री करा " म्हणून सख्याहरीला हैराण करावे. बाकी चालु द्या !! आम्हाला पण एक मैत्री व्हायरस चावलेला.... पण त्याचा काही त्रास नाही झाला, इट वौज औके - टारझन कार्यकर्ते

अवलिया 14/12/2008 - 13:06
हा हा हा इथे एक गोष्ट प्राणंळपणे कबूल करतो की ही आंतरजालीय सडक सख्याहरि मंडळी पाहिली की आम्हालाही आमचे कॉलेजचे दिस आठवतात, ज्या काळात आम्हालाही मुलींशी एन्ट्रो वगैरे करून घ्यायची नसती हौस होती. तात्या खरे आहे. आजकाल या नेटमुळे खुप काम सोपे झाले आहे. आपल्या वेळेस अवघड होते. फार दिव्य करावे लागायचे. ब-याच वेळेस एकट्यादुकट्याचे काम नसायचे. अनेक जणांना मदतीला घ्यावे लागायचे. निकाल लवकर लागत नसे. आजकाल लगेच व नेटवरच निकाल लागतो. पण ती मजा नाही हे नक्की असो. "बंर हं बाळ! भेटू केव्हातरी..!" अशी उलट गंमत करावी! आणि सोडुन द्यावे.गंमतीत घ्यावे जास्त विचार करु नये बर तात्या गंमत सांगायचीच राहीली... सध्या मला एका स्त्री सदस्याचा व्यनी येत आहे. भेटायचे म्हणुन... काय करु? ;) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

विसोबा खेचर 14/12/2008 - 13:09
सध्या मला एका स्त्री सदस्याचा व्यनी येत आहे. भेटायचे म्हणुन... काय करु? तुम्ही आणि ती पाहून घ्या! मी काय सांगू? :) अर्थात, तुमची काही कंप्लेन्ट असेल तर जरूर कळवा, मी त्या स्त्री सभासदाचा आयपी आणि आयडी ब्लॉक करण्याची जरूर कारवाई करेन.. परंतु आपली काही तक्रार आहे असे वाटत नाही! :) असो, शुभेच्छा..! :) तात्या.

In reply to by अवलिया

छोटा डॉन 14/12/2008 - 13:17
"बंर हं बाळ! भेटू केव्हातरी..!" अशी उलट गंमत करावी! आणि सोडुन द्यावे.गंमतीत घ्यावे जास्त विचार करु नये
+१, असेच म्हणतो .... येणारे नादान असतात हो, शिवाय पाठीशी "ऑर्कुटचा १-२ वर्षाचा अनुभव" असतो, त्यामुले जास्त सिरीअसली घेऊ नये ... आत्तापर्यंत पाहिलीली बरीच प्रकरणे "शांततेत" मिटली आहेत. जास्ती काही झाले तर तुम्ही लगेच "कारवाई" केल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, त्यामुळे जास्त काळजी नाही ... गमतीत घ्यावे, जास्त विचार करु नये .... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by अवलिया

बापु देवकर 17/12/2008 - 18:55
"बंर हं बाळ! भेटू केव्हातरी..!" अशी उलट गंमत करावी! आणि सोडुन द्यावे.गंमतीत घ्यावे जास्त विचार करु नये हेच म्हणतो मी....

विनायक प्रभू 14/12/2008 - 13:08
विश्वासु काका मंडळी ना पण कळवावे. पुढील कार्य सिदद्धिस नेण्यास काका समर्थपणे उपस्थित राहतील.

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर 14/12/2008 - 13:11
विश्वासु काका मंडळी ना पण कळवावे. हो, पण काका मंडळी विश्वासू पाहिजेत ना? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विनायक प्रभू 14/12/2008 - 13:15
ह्या बाकि खरां हो. काका पण वासु कंपनीतील निघाला तर घोळच झाला की.

यशोधरा 14/12/2008 - 13:11
दुर्लक्ष करावे. व्यनि येत असतील तर व्यनि ब्लॉक करायचीही सोय आहेच. खूपच त्रास होत असेल तर मिपा व्यवस्थापनाला कळवता येईलच ना?

मृदुला 14/12/2008 - 14:10
दुसर्या पर्यायाला मत दिले आहे. काही अपमानकारक मजकूर नसल्यास गमतीत सोडून देणे इष्ट.

भडकमकर मास्तर 14/12/2008 - 14:28
दुसर्‍या पर्यायाला मत दिले आहे. पण नवीन धागा उघडून तिथे या सदस्यांची आणि त्यांच्या खरडीची नोंद करावी,ही तात्याची कल्पनाही आवडली.. इतरांचीही करमणूक होईल ना मस्त......... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

घाटावरचे भट 14/12/2008 - 14:30
त्यांच्या खरडवह्यांमधे अवांतर खरडी टाकून त्यांचा ख.फ. बनवावा.... --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

In reply to by घाटावरचे भट

भडकमकर मास्तर 14/12/2008 - 14:39
१.खव चा खफ करताना त्यात मुलींच्या नावाच्या फेक आय्डींनी त्यांना "मला लवशिप देतोस का?" अशा खरडी टाकाव्यात.. २. टेक्स्ट चिन्हे वापरून केलेल्या दिव्य आकृत्या , ढकलपत्रातली चित्रे पाठवावीत.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 14/12/2008 - 16:38
तात्या, माझी कंप्लेंट वेगळी आहे. दहा मिनिटात 'स्त्री' सदस्य होऊन मिपावरील संपादकापैकी प्राडॉला ओळखून प्राध्यापक म्हणून स्त्री-पुरुष भेदभाव करणारे लेखन ठेवणे शोभते का अशी विचारणा होते ! च्यायला मी तर वैतागलो आहे. :) मागे एका स्त्री सदस्येने व्य. नी करुन विचारले होते की, आपले संस्कृतच्या लोकांशी पटत नाही याचे काही विशेष कारण? संबधितांना उत्तरे मात्र गंभीरपणेच लिहितो. :) -दिलीप बिरुटे (वैतागलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उर्मिला०० 17/12/2008 - 18:42
माननीय प्रा.डॉ.दिलीप बिरुटे महोदय, आपण या आंतरजाल सख्याहरींचे काय करावे? या लेखनात तुमचा प्रतिसाद वाचला.वाचुन खुप वाईट वाटले.यामध्ये तुम्ही दहा मिनिटात 'स्त्री' सदस्य होऊन मिपावरील संपादकापैकी प्राडॉला ओळखून प्राध्यापक म्हणून स्त्री-पुरुष भेदभाव करणारे लेखन ठेवणे शोभते का अशी विचारणा होते ! च्यायला मी तर वैतागलो आहे. मागे एका स्त्री सदस्येने व्य. नी करुन विचारले होते की, आपले संस्कृतच्या लोकांशी पटत नाही याचे काही विशेष कारण? असे माझ्या प्रतिसादविषयी म्हटलेले आहे.वास्तविक एक आदर्श senior आणि उत्तम लिखाण करणारी माझ्या क्षेत्रातील व्यक्ती म्हणुन मी आपल्याशी संपर्क साधला होता.जसा मा.प्रभु काकांशी .तरी आपणा सारख्या महान व्यक्तीला माझ्यासारख्या नविन अध्यापिकेकडुन त्रास झाला त्याबद्दल हात जोडुन माफी मागत आहे. तुम्ही मला पाठवलेल्या प्रतिसादात म्हटले होते नमस्कार, मी मराठी विषय शिकवतो आणि आपण संस्कृत विषय शिकवता हे खरडी वाचून समजले. भेटून आनंद झाला. पण दुर्दैवाने संस्कृतच्या लोकांशी आमचे पटत नाही. तसा अनुभव गाठीशी आणि पाठीशी आहे. असे असले तरी आपले लेखन वाचायला आवडेल, आपल्या लेखनासाठी / प्रतिसादांसाठी हार्दिक शुभेच्छा !!! या तुमच्या विधानाला अनुसरुन मी अतिशय गंभीरपणे आपल्याला विशेष कारण विचारले होते.असो.एका सुसंस्क्रुत स्त्री सदस्याकडुन आपणासारख्या महान प्रा.ला आपल्या क्षेत्रातील आहेत या कारणानेही कोणताही संपर्क साधला जाणार नाही.असो. आम्हा शिक्षक मंडळींचा एक ग्रुप आहे.त्यामध्ये अगदी प्राथमिक शिक्षकापासुन ते वेगवेगळ्या शाखांमधील Ph.D. प्राध्यापकांपर्यंत बरेच जण आहोत्.आम्ही एकमेकांच्या अनुभवाचा फायदा एकमेकांना करुन देतो.त्यामध्ये तुमच्या लेखनाविशयी बोलले होते म्हणुन व्य नी. केली.असो .पुनश्च महान व्यक्तिला स्त्री सदस्याकडुन झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. प्रतिसाद दाती, सौ.उर्मिला किरणसिंह चव्हाण.

In reply to by उर्मिला००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 17/12/2008 - 21:09
नमस्कार !!! आपली खरड वाचून वाईट वाटले... खरं आहे की मी तसे लिहिले पण कोणाला कोणता संदर्भ....... ''दहा मिनिटात 'स्त्री' सदस्य होऊन मिपावरील संपादकापैकी प्राडॉला ओळखून प्राध्यापक म्हणून स्त्री-पुरुष भेदभाव करणारे लेखन ठेवणे शोभते का अशी विचारणा होते ! च्यायला मी तर वैतागलो आहे. '' माझी खरडवही आपण काळजीपुर्वक वाचली तर लक्षात येईल की ते कोणासंबधी होते ज्यांना उद्देशून हे लिहिले आहे त्या सन्मानीय स्त्री सदस्या या होत्या. त्यामुळे आपला गैरसमज झाला आहे. अजून एका स्त्रीने ( जो पुरुष असावा ) त्यांनीही सेम संस्कृतविषयी असेच विचारले ज्यांचे खाते आता मिपावर नाही. तेव्हा आपल्याला उद्देशून लिहिण्याचे काहीच कारण नाही. तरिही आपणास तसे वाटत असल्यास मी झाल्या त्रासाबद्दल आपली क्षमा मागतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 14/12/2008 - 17:18
अशा सख्याहरींना मुस्काटात मारल्याचे चित्र पाठवावे हा पर्याय निवडला. मात्र प्रत्यक्ष मुस्कटात मारण्याची संधी मिळणे आवश्यक आहे असे वाटते. एखाद्या कट्ट्यात हा कार्यक्रम आयोजित करता यावा. मात्र हा फक्त मिसळपावचाच प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही. याआधीही हा प्रकार झाल्याचे मनोगतावर पाहिले आहे. मात्र उपक्रमावर काही पाने चाळत असताना हे दिसले आणि अंमळ अचंबित झालो. मराठी संकेतस्थळांवर छानशी पोरगी पटवून धमाल मौजमस्ती करणे यासाठी सख्याहरीपणा करावा लागतो की ते आपोआप साध्य होते? मात्र मराठी संकेतस्थळांवर प्रथमच संचालकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे ही बाब उल्लेखनीय वाटते. आपला, (मराठी संकेतस्थळांना पर्सनल डेटिंग क्लब न मानणारा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

इनोबा म्हणे 14/12/2008 - 18:15
धन्यवाद रे कर्णा! तेवढीच माहितीत भर पडली. :D कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

३_१४ विक्षिप्त अदिती 14/12/2008 - 18:11
माझ्यामते साधी (!) मैत्री करणार का अशी खरड (किंवा व्यनी) आल्यास आपल्या तेव्हातेव्हाच्या मूडप्रमाणे काही मजेशीर गोष्टी करता येतील (त्यातले काही प्रकार तात्यांनी दिलेले आहेतच): १. 'बरं बाळ ...' (तात्यांचा पर्याय क्र. २) २. मिपावर एक धागा उघडून तिथे असल्या कन्हैयांची नावं जाहीर करणे. (तात्यांचा पर्याय क्र. ४) ३. आपल्या सबंध मित्रमंडळाला मैत्रीचा 'हल्ला-बोल' करायला सांगणे. (या उपायाचा उपयोग प्रा.डॉ. ना ज्या प्रकारचा त्रास देण्यात येत आहे त्याही बाबतीत व्हावा.) या प्रकारातले तज्ञः (सर्व म.म.) आनंदयात्री, टिंग्या/टिंगी, टारू, बिपीन कार्यकर्ते, इनोबा म्हणे, धमाल मुलगा, सहज. (ज्यांची नावं राहिली असतील त्यांची क्षमा आणि त्यांनीही आपली नावं इथे कळवा, पुढच्या वेळेस फायदा होईल. त्यातही टारूचे त्याच्या खवमधले फोटो दाखवून माझ्या धाकट्या भावाशी बोल वगैरे सांगणे.) ;-) ४. आलेल्या निरोपाच्या शंभरपट गळेपडू उत्तर देणे. (अजून या उपायाची चाचपणी मी करुन पाहिलेली नाही. पण मूडप्रमाणे करण्याचा विचार आहे.) ५. अगदीच आई-बहिण काढायची गरज नाही, पण पुरेसा अपमान केला की पुन्हा उत्तर येत नाही (हा स्वानुभव).

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इनोबा म्हणे 14/12/2008 - 18:20
आमच्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तसेच वरील उपायांच्या यादीमध्ये '६. जिमची पावती दाखवणे.' या उपायाचा ही उल्लेख करावा. :) माझ्यामते क्रमांक ३ चा उपाय उत्तम आहे. नाहीतरी आम्हालाही नवनविन मित्रमैत्रिणी जमवण्याची आवड आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

३_१४ विक्षिप्त अदिती 14/12/2008 - 18:22
ठेंकू हा इनूभाव! मी 'जिमच्या पावती'बद्दल विसरलेच होते! आणि हो, पर्याय क्रमांक तीनमुळे मैत्रीणी मिळण्याची शक्यता कमीच आहे, हे विसरू नका! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 14/12/2008 - 18:28
त्यातही टारूचे त्याच्या खवमधले फोटो दाखवून माझ्या धाकट्या भावाशी बोल वगैरे सांगणे.)
माझ्या नातवाशी बोल असं म्हणायचंय का ? हा पण आता त्यामुळे तु आजी आहेस हे समजून आजोबा लोकांच्या खरडी नाही आल्या म्हणजे मिळवली .. भाऊ नका बनवू .. बौडी कमावल्याचा एवढा मोठा तोटा ? आई गं (ह.घे) - ९९_१०० वजनी टारू

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नीधप 15/12/2008 - 08:43
माझ्या (आणि त्या व्यक्तीच्याही) सुदैवाने मला अजूनतरी मराठी संकेतस्थळांवर अश्या विचारणा केल्या नाहीयेत. (वय आणि विवाहित असणं हे उघड केल्याने असेल कदाचित.) पण ऑर्कुट वर मात्र नक्कीच त्रास झालाय. आपण करू शकतो ते उपाय... १. निरूपद्रवी असेतो केवळ दुर्लक्ष २. हाताबाहेर जाउ लागल्यास समज देणे. पण होतं काय आपण समज देण्याइतपत तरी रिप्लाय करतोय/ वेळ देतोय यामुळे अश्यांचे फावते. तेव्हा समज देण्यासाठी एकदाच काय ते कडक भाषेत बोलून मग सरळ ब्लॉक करणे आणि सगळा संवाद त्या त्या संकेतस्थळाच्या अधिकारी व्यक्तींकडे पाठवणे हेच होऊ शकते ३. खूपच हाताबाहेर जाउ लागलं तर पुरावे गोळा करून (आलेले इमेल्स, व्यनि किंवा अजून इतर निरोप इत्यादी) सरळ सरळ पोलिस कंप्लेंट करणे. ह्यातून खरंच किती नी काय निष्पन्न होतं माहीत नाही. मला तात्यांचा उपाय मात्र फारच आवडला.. (मिपावर एक धागा उघडून तिथे असल्या कन्हैयांची नावं जाहीर करणे.) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

३_१४ विक्षिप्त अदिती 15/12/2008 - 10:26
माझ्या (आणि त्या व्यक्तीच्याही) सुदैवाने =)) हे भारीच!

विनायक प्रभू 14/12/2008 - 18:25
इनोबा,टार्झन मंडळी ची धुलाई संपल्यावर राहिलेले "डाग" मी काढीन. शिल्लक राहतील की नाही ह्याबद्दल अंमळ शंका आहे.

In reply to by विनायक प्रभू

घाटावरचे भट 14/12/2008 - 18:28
>>शिल्लक राहतील की नाही ह्याबद्दल अंमळ शंका आहे. त्या मंडळींची 'जिद्दी से जिद्दी दाग हटाये, कम से कम पानी में' अशी ख्याती ऐकली आहे... --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

In reply to by विनायक प्रभू

३_१४ विक्षिप्त अदिती 14/12/2008 - 18:59
त्यापेक्षा काका, तुम्ही काही लोकांचे 'बोळे' काढून दाखवा. टारू, आजोबा लोकं असले धंदे करतील का नाही माहित नाही, बहुदा नाहीच! आजोबा लोकंही तरण्या मुलींकडेच बघतात, वर "छ्या, अंमळ तंग कपडे घालतात आजकालच्या मुली!" असले शेरे मारतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

llपुण्याचे पेशवेll 15/12/2008 - 05:02
विप्र सरांनी समजा अशा लोकांचा बोळाच काढून टाकला तर मजा येईल. :) आणि काम सुध्दा अगदी गांधिगिरीने होईल. पुण्याचे पेशवे

प्रियाली 14/12/2008 - 19:01
अशी एक सखूहरी हल्ली माझ्या मागे लागली होती. ;) तिला तुझ्यात काहीही रस नाही असे सांगून झाले तरी तिचे समाधान होईना. तिने माझा आयडी चोरायचा २-४ वेळा प्रयत्न केला. त्यानंतर माझे नाव वापरून लिहू लागली. :) विकृतपणा समजून मी दुर्लक्ष करते आहेच पण या बाईला ट्रिटमेंटची गरज आहे हो!

रामपुरी 15/12/2008 - 01:37
जोपर्यन्त प्रत्यक्ष भेटून काही त्रास देत नाहीत तोपर्यन्त दुर्लक्ष करणे चांगले.. चिखलात दगड मारला कि घाण आपल्याच अंगावर उडते. नाहीतरी जालावर भ्रमण करताना बर्‍याच नको त्या गोष्टी दृष्टीला पडतात त्यातलाच हा एक प्रकार मानावा आणि आपल्या मेलबॉक्स मधे ब्लॉक करुन टाकावा.

रेवती 15/12/2008 - 02:31
दिले आहे. कधी कधी मूड वाईट्ट असताना आलेल्या अश्या खरडी किंवा व्य. नि. ला उत्तरादाखल सर्व पवित्र शब्द वापरावेसे वाटतात. त्यापेक्शा पर्याय दोन बरा. शेवटी त्या व्यक्तीला समजल्याशी कारण. रेवती

पिवळा डांबिस 15/12/2008 - 05:33
मिपावर ज्या कुणा स्त्रीला (यात भगिनी, मावश्या, आज्या सगळ्या आल्याच!!) सख्याहरी छळत असेल तर त्याला त्यांनी खालील मेसेज पाठवावा..... "तुझा प्रस्ताव मी माझ्या भावांकडे पाठवला. ते लवकरच तुझी भेट घेतीलच. तरी प्रकृतीची काळजी घेणे... कळावे...." ... :) -डांबिसकाका कार्यकर्ता, जागतिक मिपाभगिनी क्षेमप्रित्यर्थ राडाउत्सुक मंडळ अमेरिका ब्रॅन्च (आमच्या आफ्रिकेतही शाखा आहेत!!!)

अनिल हटेला 15/12/2008 - 08:58
पर्याय क्र.५ आवडला.. "तुझा प्रस्ताव मी माझ्या भावांकडे पाठवला. ते लवकरच तुझी भेट घेतीलच. तरी प्रकृतीची काळजी घेणे... कळावे...." फूल टू डांबीस पर्याय.... जबरा........ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चित्रा 15/12/2008 - 09:57
अन्य उपायांना मत दिले आहे. अज्जुकाचे पर्याय चांगले आहेत. "आपण माझ्याशी मैत्री कराल का?" हे व्यनिने लिहीण्याची गरज पडू नये. पूर्णपणे अनोळखी व्यक्तीने माझ्याशी लिहीण्यासाठी शक्यतो खरडीचा अवलंब करावा असे अप्रत्यक्ष रित्या सुचवते. आधीच शंका घेत नाही, पण म्हणून बेसावध असते असेही नाही.

पद्मश्री चित्रे 15/12/2008 - 10:11
एक म्हणजे -दुर्लक्ष करणे. अशी माणसे फार भित्री अस्तात .. जास्त त्रास देत नाहीत.. दिलाच तर शाब्दिक समज आहेच... पण मि पा वर तरी असा अनुभव अजुन नाही..

ऋचा 15/12/2008 - 10:33
कधी कधी मी लक्ष देत नाही,... खुप वैताग आला की टारु,आंद्या,इनो ह्यांना सांगते..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

लिखाळ 17/12/2008 - 18:54
मिपावर एक स्वतंत्र धागा उघडला जावा अन् तिथे ही "एन्ट्रोची (!)खरड प्रकरणे" चारचौघात उजेडात आणावी. -- लिखाळ.

व्यंकु 17/12/2008 - 19:47
यावर आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींची मदत घेणेच योग्य

सखाराम_गटणे™ 17/12/2008 - 21:08
वाह वाह, छानच आहे, आवडले पुकौ शु ---- सखाराम गटणे

संदीप चित्रे 17/12/2008 - 21:36
जोपर्यंत एक-दोनदाच विचारलं गेलंय तो पर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष करावं... 'इंटरेस्ट नाही' हे कळवण्याइतकाही वेळ आणि शब्द वाया घालवू नये असं मला वाटतं. शहाण्याला (असलाच तर) शब्दांचा मार पुरतो... इथे शब्द न वापरून, अनुल्लेखाने, मार द्यावा. त्यापुढेही त्रास झालाच तर संपादक मंडळ आहेच -- तक्रार करायला. तरीही त्रास थांबला नाही तर आय. डी. ब्लॉक करावा. ------- तात्या: ह्या कौलात 'दुर्लक्ष करावे' असा पर्याय ठेवता येईल का?

प्रकाश घाटपांडे 17/12/2008 - 22:08
मैत्री लांबची गोष्ट. अगोदर परिचय. स्त्री पुरुष मैत्री बाबत काही वेळा पुरुष द्वेष्ट्या स्त्रिया वा स्त्री द्वेष्टे पुरुष हे आपल्या पुर्वानुभवावर वा पुर्वग्रहावर आपल्या मतांचे सामान्यी करण करतात. माणुस हा काही मशीन नाही. एखाद्या कृतीतुन आपले पणा चे रुपांतर परकेपणात होते वा उलट. आम्ही याबाबत तटस्थ होता होता इतके तटस्थ होतो कि त्रयस्थ हा देखील जवळचा वाटावा. एकदा अलविदा केला कि मैत्री ही नको व शैत्रीही नको. (दोष कि गुण माहित नाही) स्त्रीत्व वा पुरुषत्व याचे भांडवल करु नये. परिमार्जित होउ शकणार्‍या चुकांचेही भांडवल करु नये. स्त्री पुरुष आकर्षण स्वाभाविक आहे. आम्ही पर्याय दोन ला मत दिले. जो देगा उसका भला जो नही देगा उसका भी भला! प्रकाश घाटपांडे

नीधप 18/12/2008 - 08:14
मैत्री किंवा परिचयासाठी येणारा प्रत्येक व्यनि हा वाईट हेतूचाच असतो असे नाही. पण हेतू वाईट नसला तरी आपण जे लिहितो त्याचा आपल्या मनात बोलताना असलेला टोन आणि वाचताना दुसर्‍याच्या डोक्यात होणारा टोन यात फरक असतो त्यामुळे अनेक गैरसमज होऊ शकतातच की. मागे एकदा एकांनी व्यनि करून मला एक दुवा पाठवला आणि 'ओळखताय का? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!' असा निरोप बरोबर. मला कळेना हे 'ह्यॅ ह्यॅ ह्यॅ'' कशासाठी. आणि दुव्यावर जे होतं ते मी पूर्वीच पाह्यलेलं होतं. तर मी ते तसं विचारलं पण व्यनि करणार्‍या सदगृहस्थांना माझ्याकडून ज्या प्रतिसादाची अपेक्षा होती तो माझ्याकडून गेला नाही. झालं लगेच माझ्यावर शिक्का बसला इथे चालणारे विनोद कळत नाहीत, विनोदाचं वावडं.. इत्यादी. लगेच त्याचा प्रचारही झाला. त्याचे पडसादही जाणवले इथे. असो.. तर मुद्दा हा की सगळेच सख्याहरी नसले तरी जेव्हा नवीन परीचयासाठी आपण काही लिहितो तेव्हा निदान त्यातून काही वेगळे अर्थ निघतील किंवा वाचणार्‍याला 'यांना नक्की काय म्हणायचंय?' हे समजूच नये इत्यादी गोष्टी टाळल्या गेल्या तर गैरसमज टळू शकतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रकाश घाटपांडे 13/02/2009 - 14:09
वर्तमान पत्रात आम्ही कधि निवेदन दिले कि लोकांचे फोन येतात कि तुमची "जाहिरात "वाचली. आमी 'निवेदन' अशी दुरुस्ती करण्याचा दुबळा प्रयत्न करतो. 'तेच जे काय आसल ते' असे म्हणुन पुढचे संभाषण चालू होते. आम्हीही मग शब्दोच्छल करीत बसत नाही. कारण त्यातील मजकुर हा महत्वाचा हे त्याला सांगायचे असते हे आम्ही जाणतो. व्यनि व खरडवही यात फरक आहे. खरडवही पारदर्शक असते. ती सर्वांना वाचता येते. त्याची शहानिशा करता येते. व्य नि हा इतरांना वाचता येत नाही. शहानिशा लांबची गोष्ट कधी कधी व्यक्तिमत्वाचा खरा परिचय खरडवहीतुनच होतो. इतरांच्या खरडवहीत शक्य असले तरी डोकावणे हे कितपत योग्य आहे हा वादाचा विषय होउ शकतो. आम्ही इतरांच्या खरडवहीत सर्रास डोकावतो. आमच्याही खरडवहीत इतरांनी डोकवायला आमची ना नसते. खर तर इथे ना किंवा हा चा संबंधच येत नाहि. ग्रह म्हणले कि ज्योतिष आलेच. पुर्वग्रह म्हणले तरी आले. काही वेळा अपरिचित माणुस पाहिला कि तुम्हाला त्याच्या दोन कानफाटात द्याव्याश्या वाटतात. खर तर अस वाटण्याचे काही तर्कसुसंगत कारण नसते. त्याचा तुमचा संबंधही नसतो. त्याने तुमचे घोडे मारलेले नसते. केवळ चेहरा पाहुन तुम्हाला तसे वाटते. असे का होते याचे उत्तर आपल्याला देता येत नाही. कधी असेही होते कि अपरिचित माणुस तुम्हाला विनाकारण तुमचा जन्मोजन्मीचा परिचित , मार्गदर्शक वा हितचिंतक वाटतो. त्याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला आश्वासक वाटते. कधी कधी आपण एखाद्या माणसाला टाळत असतो तेव्हा तोही माणुस आपल्याला टाळत असतो. अर्थात सगळ्यांशी आपल जमल पाहिजे असे थोडेच असते.ज्योतिषात ग्रहमैत्री वा शैत्री च्या नावाखाली हे खपवता येते. (कुणी तरी तिकड कुजबुजतय कि इथही ज्योतिष आणलच पाहिजे का? जाउ दे भासच तो) कधी कधी आपल्या लिखाणाची दखल घेतली नाही ही सल लेखकाच्या मनात बोचत असते. कधी कधी ती जेव्हा घ्यायला पाहिजे होती तेव्हा घेतली नाही अशीही असते. पुण्यात झालेल्या साधना साहित्य संमेलनात याची झलक आम्हाला दिसली. संकेतस्थळांवरही ती दिसते. ते स्वाभाविक ही आहे. लेखकात मानवी भाव भावना दडलेल्या असतात. त्या अलिप्त ठेवता येत नाहीत. जी ए नावाच्या माणुस घाण्या लेखकात ही त्या दडलेल्या दिसतात. अर्थात असे माणुस घाणेपण ही त्यांची ताकद आहे हेही आम्ही जाणतो. माणुस म्हणला कि गुणधर्म आलेच. त्याला गुण म्हणायची कि दोष हे सापेक्ष आहेत. एक व्यंगचित्र आठवले . एक पोलिस व श्वान चालले आहेत. श्वान त्याला ओढत आहे. पोलिसाला च्या मनात चोर दाखवला आहे आन कुत्र्याच्या मनात हाड श्वानप्रकाश घाटपांडे

विकि 18/12/2008 - 13:32
मिपावर एक स्वतंत्र धागा उघडला जावा अन् तिथे ही "एन्ट्रोची (!)खरड प्रकरणे" चारचौघात उजेडात आणावी. मी याला मत दिलेले आहे.वरती प्रतिसाद देणारे(अपवाद सोडून)जे काही सख्याहारी आहेत त्यांचे काय करणार तात्या ? त्या लोकांना प्रतिसाद लिहीताना लाज देखील वाटली नाही.

नीधप 18/01/2009 - 23:00
अश्या आयडीज ना जाहीर करण्याचा धागा तयार करण्याचा प्रस्ताव होता ना? काय झाले त्याचे? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

३_१४ विक्षिप्त अदिती 19/01/2009 - 09:52
एका 'मित्रा'च्या फुल्टू गळ्यात पडले, वर काही खर्‍या मित्रांनी (बिपीन, टारू, घाटावरचा भट) त्याच्याशी 'दोस्ताना' करण्याचा आव आणला ... पुढे काहीही, कोणालाही त्रास नाही. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नीधप 20/01/2009 - 00:31
नाही मला नावं जाहीर करायची आहेत म्हणून विचारलं.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

कोलबेर 20/01/2009 - 01:47
तुम्हीच सुरू करा नविन धागा. इतर सभासद भर घालत जातील. -को http://ajunek.blogspot.com

अविनाशकुलकर्णी 21/01/2009 - 00:34
आमच्या तरुण पणी मुलि नुकत्याच बाहेर नोकरि करावयास पडल्या होत्या..त्या वेळि विनय भंग नावाचा एक प्रकार होता..विनय भंगाचि निश्चित व्याख्या नसल्याने कशाने विनय भंग होइल सांगणे कठिण होते...त्यामुळे मुल घाबरत..[आमचि पिढि सालि घाबरटच] पण आता काळ बदलला आहे...आता समजात मुक्त वातावरण आले आहे..त्या मुळे जर एखाद्या मुलाने खरड वहित भेटण्याचि किंवा ओळ्ख वाढवण्याचि इछ्या दर्शवलि तर चुक नाहि..जर तिला तसे नको असेल तर ति ऑफर नकारु शकते...त्या उप्पर हि जर त्याला त्याचा अर्थ कळत नसेल तर अनेक पर्याय आहेत..असे वाटते....त्या वर मी एक कविता हि लिहिलि होति....ति ईथे भित भित टाकित आहे.. Impossible Is Nothing............. एखादा अनोळखी Scrap व Friends Request आली की त्या कडे दुर्लक्ष नको करुस.. किंवा एखाद्या काकुबाइ सारख Who are you? Do I know you? असे प्रश्ण हि नको विचारुस...काय माहित? कदाचित तो तुझ्या स्वप्नांचा राजकुमार हि असु शकतो.. स्विकार त्याचि विनंति..हो त्याचि मित्रिण... अग काहिहि होऊ शकत एका संध्याकाळच्या कातर वेळी डोअर बेल वाजेल कोण आहे म्हणुन वैतागुन तु दार ऊघडशील.. अन समोर तोच असेल.Handsome.. देखणा.. Wrangler चि Blue Denim जिन.. चेक्सचा शर्ट..वरच्यी एक गुंडि ऊघडी पाठिवर सॅक.....हातात Ray Ban चा गोगल..पायात अदिदास चे शुज विचारात पडशील..कोण आहे हा? कशाला आला असेल? हसुन तुला विचारेल..आत येवु? मी तुझा मित्र.. विचारशिल त्याला..पण तुम्हि कॊण आहात??? मी तुझा प्रियकर जन्मो जन्मिचा..तुझा मित्र.. पटेल तुला जन्म जन्माचि ऒळख...घाबरुन ह्रुदयावर हात ठेवशिल . पण त्यान ते चोरल असेल..अग परिकथा कथा खोट्या नसतात.. त्या ख~या असतात..अश्याच घडत असतात.. जिवनात सारे काहि शक्य आहे.. एखादा अनोळखी Scrap व Friends Request आली की त्या कडे दुर्लक्ष नको करुस.... काय माहित..?? ति तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराकडुन आलि असेल... Impossible Is Nothing @Avinash....

In reply to by अविनाशकुलकर्णी

नीधप 21/01/2009 - 12:07
जिथे तिथे स्वतःच्या दळिद्री कविता नाचवायलाच हव्यात का? तुम्हाला मुलगी असेल तर तिला हीच कविता तिला सांगा हं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

३_१४ विक्षिप्त अदिती 21/01/2009 - 14:14
असल्या मैत्रीच्या भिका मागणारा जिच्या स्वप्नातला राजकुमार असतो तिचं कोणीही भलं करू शकेल का नाही याबद्दल मला जरा शंकाच आहे. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

21/01/2009 - 14:28
Wrangler चि Blue Denim जिन.. चेक्सचा शर्ट..वरच्यी एक गुंडि ऊघडी पाठिवर सॅक.....हातात Ray Ban चा गोगल..पायात अदिदास चे शुज आजोबा कोणत्या जमान्यात आहात हो? हे सर्व इतिहास जमा झालं आहे. तेव्हा जमत न्हाय तर कशाला उगाच.......

ऋचा 21/01/2009 - 11:19
मिपावर एक स्वतंत्र धागा उघडला जावा अन् तिथे ही "एन्ट्रोची (!)खरड प्रकरणे" चारचौघात उजेडात आणावी. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्रभाकर पेठकर 21/01/2009 - 14:08
दुर्लक्ष करावे. व्यनि येत असतील तर व्यनि ब्लॉक करायचीही सोय आहेच. खूपच त्रास होत असेल तर मिपा व्यवस्थापनाला कळवता येईलच ना? १. निरूपद्रवी असेतो केवळ दुर्लक्ष २. हाताबाहेर जाउ लागल्यास समज देणे. पण होतं काय आपण समज देण्याइतपत तरी रिप्लाय करतोय/ वेळ देतोय यामुळे अश्यांचे फावते. तेव्हा समज देण्यासाठी एकदाच काय ते कडक भाषेत बोलून मग सरळ ब्लॉक करणे आणि सगळा संवाद त्या त्या संकेतस्थळाच्या अधिकारी व्यक्तींकडे पाठवणे हेच होऊ शकते ३. खूपच हाताबाहेर जाउ लागलं तर पुरावे गोळा करून (आलेले इमेल्स, व्यनि किंवा अजून इतर निरोप इत्यादी) सरळ सरळ पोलिस कंप्लेंट करणे. यशोधरा आणि अज्जुकाच्या वरील उपाययोजनांशी १००% सहमत. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!