Skip to main content

१०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे...

लेखक समी
Published on शनीवार, 07/05/2016
माझी १०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे.... सीट नंबरहि आठवत नाहिय... काय करावे डुप्लीकेट मिळवण्यासाठि. आणि किती लवकर मिळू शकेल? कृपया कोणाला माहित असल्यास सांगा.

वाचन संख्या 4418
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

म्हणजे कोर्टापासून बोर्डापर्यंत सगळे शोधतात पण तुम्हाला दाखवावी लागत नाही. ( ह घ्या)

नविन परीक्षा द्यावी म्हणजे कसे शोधण्याचा त्रासहि वाचेल आणि नविन अभ्यास केल्याने मार्कही वाढतील

शाळेत चौकशी करा, दरवर्षीचा निकालपत्रक असते

उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि परीक्शा मंडळ (बोर्ड)आठवतेय का? असल्यास त्यावरून त्यांच्याकडे नक्कल प्रत मिळण्यासाठी अर्ज करावा.

:)) उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि परीक्शा मंडळ (बोर्ड)आठवतेय.... पण साधारण किती दिवसात / महिन्यात मिळू शकेल?

परिक्षा मंडळात अर्ज आणी लागणारे शुल्क भरल्यावर 7 दिवसात नक्कल मिळते. पण परिक्षेचे वर्ष आणी आसन क्र. माहिती हवा. वरील माहिती साठी शाळेल भेट द्या. आणी आल्यावर 'माझी शाळा' असा निबंध मिपावर लिहा.;)

दंगा बाजुला- असे धागे संपादकांनी 'सदाहरित धागे -मनातील प्रश्न...' सदरात स्वत: टाकायला हवेत..

In reply to by जेपी

यासाठी एकोळी संपादक असे नवीन पद निर्माण करुन ज्पीची नेमणूक करावी आणि मराठवाड्याचा संपादकीय अनुशेष भरुन काढावा

In reply to by कपिलमुनी

प्रतिक्त्र्या सुद्दा एकोळीच द्याव्यात की काय ? तसेच एकोळीण्म्तर चारोळी आरोळी या साठी वेगळा काव्य विभाग असेल काय? तूर्त इतकेच बाकी चिमणला भेटून पुढील यादी देऊ. आडगावची पत्रेवाला नाखुस

ज्या बोर्डामधून परीक्षा दील्यात तीथे संपर्क साधल्यास काम होइल. मुंबई बोर्ड असल्यास कलीना ऑफीसमधे जावे. शाळा, पास झालेले वर्ष हे माहीत असेलच. बहुतेक वेगळा चार्ज द्यावा लागेल. फार जुने असल्यास त्याच डीजाइनमधे मिळणार नाही. प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेचे जे सद्याचे डीजाइन असेल त्यामधे परत छापून मिळेल.

In reply to by खटपट्या

१०-१२ बोर्डाच्या गुणपत्रिका तिथे नाही मिळणार. मुंबई बोर्ड असेल तर वाशीला जावं लागेल. हरवल्याचा FIR करुन त्याची copy घेऊन वाशीच्या office मध्ये जा. हाॅल टिकिट असलं तर फारच उत्तम. एखादी photocopy शिल्लक असली तर ती कदाचित दाखवावी लागेल. बाकी कुठले धागे कुठे टाकावेत याबद्दल संपादक आणि मालक सोडून इतरांनाच (काही अपवाद सोडल्यास) जास्त चोंबडेपणा करायचा आहे आणि एखाद्याला मदत हवी असल्यास उद्धट उत्तरं द्यायची आहेत हे बघून मजा वाटली. विशेषतः अध्यात्मात प्रगती केलेल्या स्वाभिमानशून्य लोकांचे प्रतिसाद बघून तर फारच. यालाच आॅरगॅझम म्हणत असावेत अध्यात्मात ;)

पुणे बोर्डातून काढलेली. त्यावेळी FIR ची गरज नव्हती पडली. एक किचकट फॉर्म आणि १५० रू. एवढ्यात काम झालेले आठवतेय! Sandy

गमंत म्हणून लिहितो आहे १०वि १२वि ची duplicate marksheet मिळाल्या नन्तर श्रीमान सत्यवादी आदमी कडून एकदा सत्यापित करवून घ्याल.