उत्तर अमेरिकेतली महाराष्ट्र मंडळ चळवळ (महाराष्ट्र दिन २०१६)
दोन मराठी माणसे चंद्रावर राहायला गेली तर तिथे तीन मराठी मंडळे स्थापन करतील. दोघांचं मिळून एक अन दोघांच स्वतःचंही प्रत्येकी एक. अमेरिकेतील एका कार्यक्रमात भारतातून आलेल्या एका मराठमोळ्या कलावंताने सांगितलेला हा एक विनोद. यात गमतीचा भाग सोडला तरी एवढे निश्चितच म्हणता येईल की मराठी माणसे जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी मराठी मंडळात सामील होतात अन सामील होण्यास मंडळ उपलब्ध नसल्यास त्याची स्थापना करतात. अमेरिका व कॅनडा मिळून किमान पन्नास मराठी किंवा महाराष्ट्र मंडळे जोमाने आपलं कार्य करत आहेत.
पाच सहा दशकांपूर्वी जेव्हा मराठी माणसे उत्तर अमेरिकेत येऊन नोकरी व्यवसायात स्थिरावू लागली तेव्हा आसपासच्या मराठी मंडळींना एकत्र करून गणेशोत्सव, दिवाळी, साहित्याचा आस्वाद घेणारे लहान प्रमाणावरील कार्यक्रम आयोजित करु लागली. सहभागी मंडळींची संख्या फार नसल्याने कुणाच्या घरी वगैरे हे कार्यक्रम केले जात. जेवणाच्या बाबतीतही पदार्थ वाटून घेतले जाऊन विविध घरगुती चवींचा आस्वाद घेतला जात असे.
या कारणाने लहान प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या मित्रमंडळांचे रूपांतर अधिकृत मराठी किंवा महाराष्ट्र मंडळांमध्ये होऊ लागले. बहुतेक ठिकाणी मंडळांची कार्यकारी समिती दोन वर्षांनी बदलते. काही ठिकाणी तर या समितीच्या निवडीसाठी निवडणुकाही होतात.
बहुतेक मंडळांच्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये संक्रांत, गणेशोत्सव, दिवाळी या सणांशी संबंधीत उत्सवी कार्यक्रमांचा समावेश असतो. त्याखेरीज पिकनिक, सांगीतिक कार्यक्रम, भारतातून येणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम, स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेली नाटके अथवा एकांकिका तसेच लहान मुलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा, आनंद मेळावा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. तसेच भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात इतर भाषिक मंडळाबरोबर सहभाग असतो. कार्यकारी समितीच्या जोडीने स्वयंसेवक सदस्य या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी उचलतात.
मिनेसोटा मराठी मंडळातला गणेशोत्सव
मिनेसोटा मराठी मंडळातल्या बालकलाकारांनी सादर केलेल्या रामायणावरील नाटिकेतला एक प्रसंग
भारतातून येणाऱ्या कलाकारांची विमानतळावरच्या आगमनापासून परतीच्या प्रवासापर्यंत घरगुती पद्धतीने उत्तम बडदास्त ठेवली जाते. भारतात राहून मोठमोठ्या कलाकारांचा सहवास लाभणे ही अनेकांसाठी अतिशय दुर्मिळ गोष्ट असते परंतु या बाबतीत मंडळांचे स्वयंसेवक नशिबवान ठरतात. भारतातून आलेले कलाकारही परदेशात राहून जपलेल्या मराठीपणाने सांस्कृतिक ओलाव्याने भारावून जातात. अशा कलाकारांचे कार्यक्रम रंगतदार तर होतातच तसेच कार्यक्रमाखेरीज इतर वेळी रंगणाऱ्या गप्पांच्या मैफिलीदेखील आयुष्यभर स्मरणात राहतील अशा असतात.
मराठी मंडळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातून अथवा इतर ठिकाणांहून त्या शहरात नव्याने येणाऱ्या मराठी कुटुंबांना येण्यापूर्वी व आल्यावर मार्गदर्शन व प्रसंगी गरज पडल्यास मदतही केली जाते. आणखी एक स्पृहणीय उपक्रम म्हणजे बऱ्याच मराठी मंडळांशी संलग्न मराठी शाळा. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांना मराठी भाषा बोलता तर येते पण मराठी भाषेत लिहिणे वाचणे शिकण्यासाठी दर रविवारी भरणाऱ्या मराठी शाळा एक मोठा आधार असतो.
मराठी मंडळांची भूमिका केवळ सांस्कृतिक किंवा मौजमजेचे कार्यक्रम एवढीच मर्यादित नसून सामाजिक जाणिवांची किनारही तिला असतेच. स्थानिक स्वयंसेवी संस्थांना आर्थिक व श्रमदानाने साहाय्य तसेच भारतातल्या समाजसेवी संस्थांना आर्थिक साहाय्य नियमितरीत्या केले जाते. भारतातल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जमेल त्या मार्गाने मदत पाठवण्याचे प्रयत्न केले जातात.
मराठी मंडळांपुढची आव्हाने
मिनेसोटा मराठी मंडळातल्या बालकलाकारांनी सादर केलेल्या रामायणावरील नाटिकेतला एक प्रसंग
- सर्वात मोठे आव्हान म्हणजे आर्थिक आव्हान. इतर कुठल्याही गोष्टींचे सोंग आणता येते परंतु पैशांचे सोंग आणता येत नसते. मराठी माणूस इतर सर्व वेळी उत्साहाने पुढे येत असला तरी वर्गणी देण्याच्या बाबतीत जुजबी रकमेच्या पलीकडे जाण्यास तयार नसतो. बहुतेक मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये किमान शंभर ते काही शे लोक सहभागी होतात पण त्यावेळी होणारी कामे करण्यासाठी भाड्याचे कामगार घेतले जात नाही. पैसे वाचवण्यासाठी स्वयंसेवकांना मजुरांसारखे राबावे लागते. कमीत कमी पैशात मोठमोठे कार्यक्रम करण्याची एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली गेली की दर्जावर परिणाम होतो.
- नव्या पिढीचा सहभाग. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी माणसांची मुले पौंगंडावस्थेत येईपर्यंत मराठी मंडळांच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत असली तरी अभ्यासाच्या जबाबदाऱ्या वाढल्यावर मंडळांपासून दुरावतात. नंतर अनेक वर्षांनी स्थिरस्थावर झाली तरी मंडळांच्या कार्यक्रमात सहभागी होताना अभावानेच दिसतात. भारतातून नव्याने नोकरी व्यवसायानिमित्त येणाऱ्या लोकांमुळे सदस्यसंख्या वाढत राहिली तरी इथे जन्मलेली पिढी मात्र मोठी झाल्यावर सहभागी होत नाही ही बाब लपून राहत नाही.
- मायदेशावरचे सांस्कृतिक परावलंबित्व - मराठी मंडळे कितीही जुनी झाली तरी उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांचे कार्यक्रम इतर शहरात अगदी अपवादानेच होतात. झाले तरी भारतातून येणार्या नावाजलेल्या कलाकारांच्या तुलनेत किरकोळ लोक श्रोते अथवा प्रेक्षक म्हणून हजेरी लावतात. या परिस्थितीत आगामी काळात फारशी सुधारणा होईल असे वाटत नाही.
वाचने
25910
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
महाराष्ट्र मंडळ हा नव्याने
In reply to महाराष्ट्र मंडळ हा नव्याने by अजया
सहमत
In reply to महाराष्ट्र मंडळ हा नव्याने by अजया
मला आलेला अनुभव भलताच होता.
In reply to मला आलेला अनुभव भलताच होता. by आदूबाळ
+१
In reply to +१ by राघवेंद्र
आदूभौ
- कंपूबाजी फक्त मिपावर/जालावर चालते.
- माणुस (उच्चशिक्षीत)शिकला की सुसंस्कृत होतो.
धन्यवाद ही बाजूही दाखविल्याबद्दल. देशी गांवढळ नाखुउत्तम आढावा घेतला आहे. यात
In reply to उत्तम आढावा घेतला आहे. यात by एस
+१
In reply to +१ by पिलीयन रायडर
न्यु जर्सी मधील मराठी मंडळ
In reply to +१ by पिलीयन रायडर
न्यू जर्सी / न्यू यॉर्क
In reply to उत्तम आढावा घेतला आहे. यात by एस
http://www.mmla.org/
लेख आवडला!!!
हायला रंगा लई भारी. तुमच्या
In reply to हायला रंगा लई भारी. तुमच्या by सनईचौघडा
होय
लेख आवडला !
In reply to लेख आवडला ! by सस्नेह
होय
In reply to लेख आवडला ! by सस्नेह
चांगला आढावा घेतला आहे.
रंगा शेठ
परदेशात सुद्धा मराठी बाणा
छान लेख
खूप सुंदर लेख.
लेख आवडला.
सुंदर लेख ! लेखातला मनोगताचा
न्यु जर्सी - न्यु यॉर्क मधल्या मराठी मंडळाचा संपर्क मिळाला तर बरे होइल.+१. थोडे पुढे जाऊन असे म्हणेन की उत्तर अमेरिकेतल्या सर्वच मराठी मंडळांचे पत्ते इथे दिल्यास ते उपयोगी ठरतील.मराठी मंडळांचे दुवे
In reply to मराठी मंडळांचे दुवे by श्रीरंग_जोशी
हि यादी कदाचित अद्ययावत असु
In reply to हि यादी कदाचित अद्ययावत असु by सखी
धन्यवाद
छान लेख, पंत.
In reply to छान लेख, पंत. by स्रुजा
सुंदर प्रतिसाद!!! बरेच
In reply to छान लेख, पंत. by स्रुजा
क्रमशः वाचून ब्रे वाट्ले..
In reply to छान लेख, पंत. by स्रुजा
सुंदर प्रतिसाद!!!
लेख आवडला.
लेख मस्तं.
माझा महाराश्ट्र मंडळांचा
लेख मस्तच पंत!
मराठी मंडळे आणि नकारात्मक अनुभव
वा!
असे ऐकले आहे की आजकाल
लेख आवडला,