"केशवा अन्याय झालाय माझ्यावर!"
"आणि तु केलास तो न्याय होता दुर्योधना?
भर सभेत तु मांडी उघडून दाखवलीस तो न्याय होता?"
दुर्योधन विषण्णपणे हसला!
"माझी अंधपुत्र म्हणून हेटाळणी झाली तो न्याय होता? प्रत्येक वेळी मी भीमाच्या बरोबरीचा असतांना फक्त पितृहीन म्हणून भीष्म, विदुर आणि द्रोण यांचा प्रेमाचा झरा त्याच्यासाठीच वाहणे हा न्याय होता?"
"तू आपली बाजू निवडून घेतलीस दुर्योधना!"
"नाही केशवा लादली गेली ती बाजू माझ्यावर. जेव्हा आपल्याच लोकांचा आधार संपतो, तेव्हा मनुष्य कुठलाही आधार शोधतो!"
"तुझा अहंकार तुला आडवा आला."
"मला अंधपुत्र म्हणताना अहंकार नव्हता? आपल्या स्त्रीला जुगारात पणाला लावणे हा अहंकार नव्हता? युद्धाचे सर्व नियम मोडून माझ्या जाँघेवर आघात करणे हा हल्ला नव्हता?"
"हे युद्ध धर्मरक्षणासाठी झालय दुर्योधना!"
"एका स्त्रीला पाच पुरुषाबरोबर संसार करायला लावणे हा धर्म? स्त्रीला जुगारात पणाला लावणे हा धर्म? लोकलज्जेमुळे आपल्या शिशुला नदीत सोडणे हा धर्म?
न्याय शेवटी विजयी पक्षाकडूनच होतो!
केशवा अजूनही विजय निश्चित नाही!तो बघ तक्षक!"
केशवाने चमकून बघितले!
बोरातून तक्षक परीक्षित राजाकडे निघाला होता!
"धर्मयुद्ध राजाच्या अंतानंतर संपत नाही केशवा, ते राज्याच्या अंतानंतर संपते!!!"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3400
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
याआधीची कथा http://www
एकदम ड्रॅमॅटिक लिहिलंय...
+१
In reply to एकदम ड्रॅमॅटिक लिहिलंय... by विजय पुरोहित
अगदी सुंदर.
परिक्षित पुरु च्या वंशात
In reply to अगदी सुंदर. by mugdhagode
..
In reply to परिक्षित पुरु च्या वंशात by मृत्युन्जय
नाही. तशी सोय नाही. वंश बदलतो
In reply to .. by mugdhagode
कोणता शाप?
In reply to अगदी सुंदर. by mugdhagode
http://misalpav.com/node
In reply to कोणता शाप? by परिंदा
धन्यवाद. अजुन एक वाचनीय लेख
In reply to http://misalpav.com/node by मृत्युन्जय
छान लिहिली आहे कथा. आवडली.
शेवटच्या दोन ओळी...
अर्जुनाने खांडव वनात अनेक
In reply to शेवटच्या दोन ओळी... by मुक्तछन्द
..
In reply to अर्जुनाने खांडव वनात अनेक by इस्पिक राजा
हायला ... रुषी पकूर
In reply to .. by mugdhagode
जय नावाचा ईतीहास
खूप छान लेख.
दुर्योधन- काका विधाते.
In reply to खूप छान लेख. by जगप्रवासी
महाभारत सिरीअल