- पुस्तकं स्वच्छ हातांनी हाताळावीत.
- शक्यतो पुस्तक वाचातांना / हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.
- खुणेसाठी पानं कोपर्यात दुमडण्याऐवजी पुस्तकखुणा (बुकमार्क्स) वापरावेत.
- नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं.
- पुस्तकांचं कपाटं सूर्यप्रकाश थेट पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं.
- पुस्तकं अधून मधून हाताळत रहावी.
- पुस्तकांच्या कापाटात पुस्तक लावतांना खूप गर्दी करुन लावू नयेत. पुस्तकाच्या कपाटाची वेळोवेळी साफसफाई करावी.
- पुस्तकं शक्यतो उभी लावावीत. एकाच उंचीची, आकाराची पुस्तक जवळजवळ लावावीत.
- पुस्तक लावताना विषयानुरूप वा लेखक/लेखिकेच्या नावानुसार लावावीत.कमीतकमी हाताळली जातात.ठेवताना सोयीचे होते.
- बुकशेल्फमध्ये चंदनाची काडी, लवंग ठेवावेत.
- दर तीन - चार महिन्यांनी पुस्तकांना ऊन दाखवावे.
- पुस्तकं सतत शेल्फफमधून काढून ती जागा पुसून घ्यावी.
- पुस्तकाच्या कपाटात डांबर गोळ्या ठेवाव्यात.
- बकुळीचे सुकलेले गजरे.वेखंडाचे तुकडे पुस्तकांचे वाळवीपासून संरक्षण करतात.
- पुस्तकाचे कपाट पातीचहाच्या तेलाच्या बोळ्याने पुसून काढावे.त्यानेही पुस्तके चांगली रहातात.
- पुस्तके ठेवण्याआधी कपाटात.फळीवर वर्तमानपत्र पसरावे.
- लहान मुलांची पुस्तक त्यांना काढता येतील अशा जागी ठेवावीत.
- पुस्तकांवर क्रमांक टाकुन एक यादी केल्यास त्याप्रमाणे पुस्तक शोधायला सोपे जाते.
- पुस्तकांचे शेल्फ शक्यतो बंद काचेचे असावे. धूळ कमी बसते आणि पुस्तकं नीट दिसतात.
- पुस्तकावर खुणा,चित्र रंगवणे,रेघा मारणे टाळावे.पुस्तकाचे सौंदर्य नष्ट होते.
- पुस्तकावर सुवाच्य अक्षरात नाव व तारीख टाकावी. जास्त मजकूर लिहून पुस्तक खराब दिसायची शक्यता असते.
- दुसर्या व्यक्तीस पुस्तक वाचायला दिल्यास तशी नोंद करुन ठेवावी.
- पुस्तक पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवावे. फडक्याने पुसायचा प्रयत्न करू नये.पुस्तक आधिक खराब होते.
- पुस्तक पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवल्यानंतर त्या पानांवरुन मध्यम गरम इस्त्री फिरवावी.
- लहान मुलांची पुस्तक कितीही काळजीपूर्वक हाताळली तरी थोडीफार फाटतातच. अशावेळेस घरात 'बुक अँब्युलन्स' म्हणून एखादं छोटंसं बास्केट अथवा खोका ठेवता येईल. त्यात अशी फाटलेली पुस्तकं मुलांना एकत्र करायला सांगून फावल्या वेळात पुस्तकांची डागडूजी करायला शिकवता येऊ शकेल. या 'बुक अँब्युलन्स' मधे रिपेयरिंगसाठी लागनारं सामान जसं - गोंद, सेलोटेप, कात्री, स्टेपलर, सुई-दोरा अशा वस्तू 'पुस्तकांची प्रथमोपचार पेटी ' म्हणून ठेवता येतील.
- वाचनालयातून आणलेलं पुस्तक आपल्या हातून फाटलं तर त्याची डागडुजी घरी करु नये. वाचनालयात पुस्तकांची डागडुजी करण्याकरीता खास सोय असते.
- पुस्तक उघडून उपडं ठेऊ नये. अशाने पुस्तक जिथे सांधलं गेलेलं असतं (क्रिझ) त्याठिकाणी खराब होऊ शकतं. जर पुस्तकाचा या भागाचं फार नुकसान झालेलं असेल तर तो पूर्णपणे काढून टाकून पुस्तक नव्याने सांधावं लागतं.
- कात्री
- गोंद
- बोन फोल्डर
- खोडरबर
- सेलोटेप
- करेक्शन टेप
- ब्लेड
- पुस्तक शिवण्याची खास सुई (Sewing Awl)
- पुस्तक शिवण्यासाठी वापरला जाणारा खास दोरा
- वॅक्स पेपर
- बुक वेट (सॉफ्ट्/हार्ड)
- बुक रिपेयर नाईफ
- पंच मशिन
- सँड पेपर (पुस्तकाचे कोपरे साफ करण्यासाठी वापरतात)
- बुक क्लॉथ (पुस्तकाच्या आत वापरलं जाणारं जाळीचं कापड)
- सिलीकॉन रिलीज पेपर
- ग्लू ब्रश
- कटींग मॅट
- स्प्रिंग डिवायडर
- डस्ट जॅकेट - पुस्तकाची सर्वात बाहेरची बाजू अथवा कव्हर. यावर बरेचदा पुढच्या बाजूस पुस्तकाचं मुखपृष्ठ व मागच्या बाजूस मलपृष्ठ, पुस्तकाचा सारांश ( blurb) छापलेला असतो. हे कव्हर पुस्तकापासून वेगळं करता येतं. पुस्तकाच्या कव्हरबोर्डच्या तुलनेने हे वजनाने हलकं असतं. जाहिरातीसोबतच ड्स्ट जॅकेट पुस्तकाचं संरक्षक कवच म्हणून काम करतं.
- कव्हरबोर्ड - ड्स्ट जॅकेटच्या आतलं पुस्तकाचं कव्हर.
- स्पाईन - पुस्तकाची पानं सांधलेली बाजू. पुस्तकं शेल्फवर उभं केलं असता या बाजूवर पुस्तकाचं नाव दिसतं. स्पाईन अर्थातच पुस्तकाचा कणा.
- हेडर कॅप - स्पाईनचा वरचा भाग.
- बॉटम कॅप - स्पाईनचा खालचा भाग.
- क्रिझ - बुक स्पाईनच्या कडांना क्रिझ असं संबोधतात.
- सिग्नेचर - सिग्नेचर अर्थात पुस्तकांची दुमडलेली पानं. हि पानं चाराच्या पटीत दुमडतात. जसं की ४,८,१२,१६,३२ पानांची मिळून एक सिग्नेचर बनते.
- ट्युब - बुक स्पाईन आणि सिग्नेचर यांच्या मधल्या भागाला ट्युब असं संबोधतात.
- एंड पेपर - पुस्तकाचं सर्वात पहिलं व मागचं पान. याचा अर्धा भाग कव्हरबोर्डला चिकटवलेला असतो व उरलेला अर्धा भाग मोकळा असतो त्याला 'फ्लाय लीफ' असं म्हणतात.
- पेपर लायनिंग - पुस्तकं बाईंड करतात तिथे चिकटवलेला कागदाचा अथवा कार्डबोर्डचा तुकडा. पुस्तकाला आधार देण्यासाठी वापरतात. पेपर लायनिंगच्या आत जाळीचं पातळ कापड लावतात त्याला 'सुपर' असं संबोधतात.

वाचने
29359
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच मस्त!
अजुन एक. लोकं किती दुखावली
पुस्तके दुसर्यांना देऊ नये.
In reply to अजुन एक. लोकं किती दुखावली by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजुन एक. लोकं किती दुखावली
In reply to पुस्तके दुसर्यांना देऊ नये. by मितान
एक डायरी करावी, त्यात पुस्तक
In reply to पुस्तके दुसर्यांना देऊ नये. by मितान
संकलन छान झालेय शिवाय बुक
छान माहिती
किंडल मुळे हा प्रकार येत्या
+१ हो खरं आहे.
In reply to किंडल मुळे हा प्रकार येत्या by स्पा
नक्की लिहा. किंडल
In reply to +१ हो खरं आहे. by किलमाऊस्की
कशाला उगीच?
In reply to नक्की लिहा. किंडल by स्पा
अगदी, अगदी. लैच सहमत!
In reply to कशाला उगीच? by पिवळा डांबिस
किंडलमुळे मुद्रित पुस्तकं
In reply to किंडल मुळे हा प्रकार येत्या by स्पा
पिडां प्रचेतसशी सहमत.
मी तर चुकुनही कोणालाच
चायला उत्सहावर पाणी फेरलत:)
भले!
In reply to चायला उत्सहावर पाणी फेरलत:) by स्पा
मस्त लेख..
मस्त टिप्स. मितानतैशी सहमत.
आमच्याकडीलही बरीच पुस्तके
In reply to मस्त टिप्स. मितानतैशी सहमत. by प्रीत-मोहर
छान संकलन आणि माहिती.
छान संकलन
ती परत मिळत नाहीत हे एक आणि
In reply to छान संकलन by पैसा
छान माहिती. या सर्व संज्ञांना
सर्वात महत्वाचं म्हणजे बेग
उत्तम
छान संकलन झालाय.
छान संकलन
.
In reply to छान संकलन by इडली डोसा
संकलन उत्तम. छान माहिती
छान माहिती व सूचना...
छान सूची!
छान माहिती.