पाककृती - समाजवादी लाडू
" समाजवादी लाडू"
बेसन, तूप, साखर, बेदाणे उत्साहाने आणले जातात. घरी पिंपात भरून ठेवले जातात.
सर्व बारक्या सदस्यांना एका खोलीत कोंडून लाडू बनवायला लावायाचे ठरते. सगळ्यांना मेहनताना म्हणून एकेक लाडू द्यायचे ठरते.
दरम्यान मोठे सदस्य लाडू बनवावे की न बनवावे, लाडूंचा आकार, रंग ,बेदाण्यांचे प्रमाण यावर बिड्या फुंकत चर्चा करत असतात. चर्चेदरम्यान मतभेद झाल्याने लगेच एक भाऊ घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि भाड्याच्या घरात स्वतंत्र संसार मांडतो.
पाहुणे येतात, लाड़वांची वाट बघतात. अखेर एक पाहुणा कंटाळून म्हणतो की अहो तुमच्याकडे उत्तम दर्जाचे बेसन आहे, तूप आहे, साखर आहे ,बेदाणे आहेत, एवढे मोठे कुटुंब आहे लाडू वळायला, अजून लाडू कसे बनले नाहीत?
म्हातारा सदस्य खेकसतो, " देशात 22 कोटी लोक उपाशीपोटी झोपतात आणि तुम्हाला लाडवांचे सुचते? "
पाहुणा म्हणतो, " बरं, आम्ही लाडू वळून देऊ का?"
" वा! माल आमचा, तुम्ही लाडू वळणार, तुम्ही आपल्या घरी नेणार! आम्हाला काय मिळणार? चार लाडू? तुमचे कुटील कारस्थान कळते हो आम्हाला. ते काही नाही, चालते व्हा!"
पाहुणे पळून जातात.
मोठ्यांचे अजून लाडवांच्याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे घरातले बारके सदस्य लाडवांच्या आशेने उपाशी झोपतात.
अशाप्रकारे वर्षानुवर्षे त्या घरात लाडू बनतच नाहीत. मग जेव्हा बारके सदस्य मोठे होतात, तेव्हा ते सगळा कच्चा माल ताब्यात घेऊन लाडू वळायला सुरुवात करतात. मोठे एव्हाना चांगलेच म्हातारे झाले आहेत. ते गल्लीत येऊन शेजाऱ्यांना गोळा करून सांगू लागतात,
" पहा ह्या कारट्यांनी घर ताब्यात घेऊन घराची कशी वाताहत चालवली आहे.. घरातल्या जिन्नसांची कशी नासधूस चालवली आहे. पहा, हे कसे सगळे लाडू स्वतःच खात आहेत, पहा! "
मग ते सगळे एकत्र येऊन "लाडू बचाव संघटना" स्थापन करतात. सायंकाळपर्यंत दोन म्हाताऱ्यांत मतभेद होऊन पुन्हा दोन संघटना बनतात, " लाडू हटाव संघटना" आणि " लाडू दिलाव संघटना."
-- स्वामी संकेतानंद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
काथ्याकूट मधे टाका लागत होते
मलेच कुट्लं असतं.. ;)
मलेच कुट्लं असतं.. ;)
अरे असं कसं कुटलं असतं? काही
=))
बाकी सगळं जाऊ द्या,
जबराट
ते हिस्टॉरीकल ब्लंडरवाले राहीले की...
=>=))=))=)) <=
..
मस्त.
यात डावी कडबोळी आणि साम्यवादी चिवडा
यात डावी कडबोळी आणि साम्यवादी चिवडा
जबराट रेशिपी. पण करुन बघायची
:)
लैच ग्वाड रेशिपी =))
पाककृती आवडली. नितीश आणि
हे