आपण नेहमीच ऐकतो/बोलतो कि पृथ्वीचे तापमान वाढते आहे. हवामानात बदल होऊन ऋतुचक्र बिघडले आहे, ई. ई. पण मुळात पृथ्वीचे तापमान का वाढते आहे? बऱ्याच जणांना हे नीट कळत नाही. ते जेवढे मला कळले तेवढे सांगण्याचा हा प्रयत्न:
वातावरणात मिसळणारी उष्णता हि थेट आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. आपली आजची जीवनशैली हि मुख्यतः तंत्रज्ञानावर (technology) अवलंबून आहे. आपले तंत्रज्ञान जी उर्जा वापरते ती मुख्यतः खनिजांपासून येते - म्हणजे कोळसा, तेल, खनिज वायू यांपासून. कुठलेही उत्पादन करायचे, कुठलेही काम करायचे तर उर्जा लागतेच. जसे पंखा चालवायचा तर वीज (उर्जा) लागते आणि पंखा तयार करायचा तरीही उर्जा लागते. कच्चा माल मिळविण्यासाठीही उर्जा लागते, त्याचे पक्क्या मालात (उदा. खनिजापासून लोखंड) रुपांतर करण्यासाठीही उर्जा लागते, पक्क्या मालाला परत हवे तसे स्वरूप देण्यासाठी, जोडण्यासाठी, त्याची वाहतूक करण्यासाठीही उर्जा लागते. आणि भौतिक शास्त्राचा असा नियमच आहे कि आपण जेव्हा जेव्हा उर्जा वापरतो तेव्हा तेव्हा एकूण उर्जेपैकी थोडीच उर्जा आपल्या कामात वापरली जाते आणि बाकीची उर्जा मुख्यतः उष्णतेच्या रुपाने बाहेर पडते. उदा. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तेलातली काही उर्जा प्रकाश देते तर काही उर्जा उष्णता बनून बाहेर पडते. हीच गोष्ट जिथे जिथे आपण उर्जा वापरतो त्या सर्व ठिकाणी लागू पडते. मग ते घर असो कि कारखाना, देऊळ असो कि सिनेमागृह. कोळसा, पेट्रोल, डीझेल, गॅस, विद्युत असे कुठलेही ईंधन/उर्जेचे साधन जेव्हा आपण वापरतो तेव्हा बहुतेक उर्जा उष्णतेच्या रुपात बाहेर पडत असते आणि वातावरणाचे तापमान वाढवत असते.
दुसरे म्हणजे निसर्गाने जमिनीवर निर्माण केलेली वेगवेगळी आच्छादने - दाट वने, खुरटी झुडुपी जंगले, गवताळ प्रदेश, ई. या अच्छादनांना 'कुलिंग स्ट्रक्चर्स' (थंडाव्याची वास्तुशिल्पे) म्हटले गेले आहे. हि आच्छादने उष्णतेच्या निर्मितीला प्रतिबंध करतात आणि परिसर थंड राखतात. आपला कोणताही उपक्रम असो, जसे शेती, घरबांधणी, लोकवस्तीची वाढ, उद्योगांची वाढ, रस्तेबांधणी, कोणताही उपक्रम या 'कुलिंग स्ट्रक्चर्स' ना हटविल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि ज्या प्रमाणात हे 'कुलिंग स्ट्रक्चर्स' नष्ट होतात त्या प्रमाणात उष्णता वाढते.
सौर उर्जा, पवन उर्जा हे सुद्धा आपल्याला वाटतात तितके चांगले नाहीत, कारण सोलर सेल बनवायला किंवा पवन चक्कीचा पंखा व ईतर भाग बनवायलाही खनिज तेल, वीज, ई जाळले जातेच !
तेव्हा आपणच भस्मासुर होऊन आपलाच अंत करायचा नसेल तर वने (forests), कुरणे (grasslands), पाणथळ जागा (wetlands), नद्या, डोंगर, ओढे हे सर्व वाचवले पाहिजे, आपल्या गरजा, "शॉपिंग", इंधनाचा वापर, ई. कमी करून आपले बाबा, आजोबां, आणि शक्य झाल्यास पणजोबा यांची होती तशी 'साधी राहणी' जमेल तेवढी अंगिकारली पाहिजे; 'ये दिल मांगे मोअर' न म्हणता तुकोबांसारखे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' असे म्हटले पाहिजे. नाहीतर आपलं काही खरं नाही पुढे भौ !
(काही भाग पक्षी व पर्यावरणतज्ञ स्व. प्रकाश गोळे यांच्या 'वास्तव' या पुस्तकातून घेतला आहे)
वाचन संख्या
3618
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण दिलेली कारणे फारच त्रोटक
तुम्ही म्हणता तो बरोबर आहे.
In reply to आपण दिलेली कारणे फारच त्रोटक by चंद्रनील मुल्हेरकर
सौर उर्जा, पवन उर्जा हे
साधन बनवून तिच्याद्वारे
तुम्हीच जरा दोन्ही दुव्यातला
In reply to साधन बनवून तिच्याद्वारे by पथिक
तुम्हीच जरा दोन्ही दुव्यातला
In reply to तुम्हीच जरा दोन्ही दुव्यातला by तर्राट जोकर
नीड वॉन्ट प्रकरण अव्यावहारिक
In reply to तुम्हीच जरा दोन्ही दुव्यातला by पथिक
ज्यांना जागा नाही त्यांना
In reply to नीड वॉन्ट प्रकरण अव्यावहारिक by तर्राट जोकर
एक माहितीपट काही दिवसांपूर्वी बघन्यात आला
पृथ्वीचे तापमान दर काही हजार
आत्ता झालेली वाढ हि हजारो
In reply to पृथ्वीचे तापमान दर काही हजार by अप्पा जोगळेकर