खुणावणारं खुलं वाचनालय (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)
काही दिवसांपूर्वी ऑनलाइन काहीतरी वाचत असताना मला अचानक ‘बालभारतीचे’ पुस्तक गवसले. ते पुस्तक चाळताना मन थेट जाऊन पोहचलं ते शाळेत. बालभारतीचे धडे वाचताना अनेक लेखकांची ओळख झाली, अधिकाधिक वाचायची गोडी निर्माण झाली. या आवडीतून माझी ओळख झाली लायब्ररी म्हणजेच वाचनालयाशी. कितीतरी विषयांवरची हजारो, लाखो पुस्तकं
वाचनालयात आपली वाट बघत सज्ज असतात. वाचनालय म्हटलं कि डोळ्यासमोर येते कमी उजेडाची खोली आणि त्या खोलीत दाटीवाटीने कपाटात असलेली पुस्तकं. त्या पुस्तकांचा वास, स्पर्श सगळे तुम्हाला वेगळ्याच अनुभवविश्वात घेऊन जातात. मी कॉलेजमध्ये असताना विद्यापीठाचे अतिशय समृद्ध वाचनालय होते. कॉलेज संपलं कि माझी गाडी थेट वाचनालयाच्या दिशेने
वळत असे. तिथल्या अनेक पुस्तकांना स्पर्श करताना मनात कितीतरी विचार असत. प्रत्येक पुस्तकावर ते कधी घरी वाचण्यासाठी दिले होते त्याची तारीख लिहलेली असे. कितीतरी पुस्तकं कित्तेक दिवस, कित्तेक वर्ष त्या वाचनालयातून बाहेरच पडलेली नसत. त्या पुस्तकांना काय वाटत असेल? त्या पुस्तकाचा श्वास गुदमरत असेल का एकाच खोलीत, एकाच जागी थांबून?
ही पुस्तकं बाहेरून येणाऱ्या पुस्तकाला प्रश्न विचारून भंडावून सोडत असतील का? असे अनेक प्रश्न मला पडत. सजीव-निर्जीव गोष्टींच्या यादीत पुस्तकं निर्जीव यादीत येत असली तरी इतके भरभरून सांगू पाहणारी पुस्तकं निर्जीव असतात हा विचार मला करता यायचा नाही. पुस्तकं घरी नेतांना मला फार आनंद व्हायचा. कितीतरी चांगल्या पुस्तकांची ओळख करून देणारे हे
वाचनालय मोकळ्या हवेत असतं तर असा विचार सतत मनात येई.
जर्मनीत येतांना सामानाच्या वजन मर्यादेमुळे अगदीच एखादं दुसरं पुस्तक घेऊन येता आलं होतं. हातात निवांत वेळ असताना नदीकाठाला अथवा एखाद्या बागेत जाऊन मोकळ्या हवेत पुस्तक वाचत बसायची अनावर उर्मी त्या वेळी दाटून यायची. बाहेर जायचा अगदीच कंटाळा आला किंवा थंडी झोंबायला लागली तर घरात निवांत बसून, अधेमधे कॉफीचा घोट घेत पुस्तक वाचत
बसावे असे मनोराज्य मी करत असे. पण हे करायला पुस्तकं नको का? मग पुस्तकांचा शोध घेतांना माझी ओळख झाली जर्मनीतील ‘ओफने बुशरश्रांक’ (Offene Bücherschränke) अर्थात खुल्या पुस्तकांच्या कपाटांशी..म्हणजेच मिनी वाचनालयाशी.. वाचनालयातील बंदिस्त पुस्तकांना बाहेरचे जग पाहता आले तर किती छान, हा कॉलेजला असताना मनात
येणारा विचार इथे जर्मनीतील या ‘खुल्या वाचनालयांनी‘ प्रत्यक्षात आणला होता.
गजबजलेल्या रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं भरलेलं कपाट.. हे कपाट कुलुपबंद नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटले तर त्यांनी थांबावे, पुस्तकं चाळून हवे ते आणि हवी तेवढी पुस्तकं वाचायला घेऊन जावी. पुस्तकं घेऊन जाताना कायम रागावलेल्या ग्रंथपालाशी तुमचा काही संबंध येत नाही किंवा कुठल्याही कागदावर सही करावी लागत नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अगदी कुठल्याही ऋतूत हे वाचनालय सुरूच असते. अगदी बारा महिने, चोवीस तास.. इथे एकच नियम असतो कि पुस्तकं वाचून झाली कि परत आणून ठेवा किंवा तुमच्याकडचे वाचनीय पुस्तक तिथे ठेवून जा. कधीही पुस्तकाचे कपाट रिकामं असू नये त्यासाठी ही तरतूद.
या खुल्या वाचनालयाची कल्पना ९० च्या दशकात जर्मनीमधे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्थाच्या उपक्रमामुळे आकाराला आली. पण मुखत्वे या खुल्या वाचनालायाचे श्रेय जाते ते ‘क्लेग आणि गुटमान’ (Clegg and Guttmann) या कलाकारांच्या जोडीने राबविलेल्या प्रकल्पाला. शहरातील विविध ठिकाणी कुठल्याही देखरेखीशिवाय अथवा ग्रंथपालाशिवाय खुले
वाचनालयय उभे करून त्याद्व्यारे लोकांच्या ‘वाचनसवयी, वैचारिक आवड आणि समाजाचा एकत्रितपणे होणारा वावर’ समजून घेणे हा त्यांच्या प्रकल्पाचा उद्देश होता. या प्रकल्पातून निर्माण होणारी ‘समाजाचे पोर्ट्रेट’ जाणून घेण्याचा या दोन कलाकारांचा मानस होता. त्या अंतर्गत १९९१ साली ग्राझ या शहरात खुल्या वाचनालयाचा सगळ्यात पहिला प्रयोग करण्यात आला. त्यानंतर १९९३ साली हाम्बुर्ग येथे विद्युत विभागात वापरण्यात आलेली जुनी कपाटं या खुल्या वाचनालयासाठी वापरण्यात आली. शहरातील तीन भागात राबवलेल्या या योजनेत एक ठिकाण सपशेल नापास झाले तर बाकी २ ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. १९९४ साली माईन्झ येथे या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.
हळूहळू जर्मनीमधे अनेक ठिकाणी अशा खुल्या वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला काही ठिकाणी हे वाचनालय यशस्वी झाले नाही तरी नंतर ही संकल्पना रुजू लागली. नागरिक जबाबदारीने ही सोय वापरताना दिसू लागले. कालांतराने सगळीकडे ही कल्पना पोहचली, रुजली. आज जर्मनीभर निरनिराळ्या शहरात ५०० हून अधिक पुस्तकांची कपाटं आहेत. या
कपाटांना वेगवेगळे आकार, रंग आहेत. कमीतकमी २००-२५० पुस्तकं असणारं हे पुस्तकाचं कपाट उभारताना प्रत्येक शहरातील कार्यालय आर्थिक भार उचलत असतं. या कपाटांची निगराणी करण्याचे काम स्वयंसेवक करतात. नागरिकदेखील जबाबदारीने वागून सहकार्य करतात. एखादी दुसरी घटना वगळली तर ही योजना अतिशय उत्तम सुरु आहे. संगीतविषयक पुस्तकं, कादंबऱ्या, कविता, लहान मुलांची पुस्तकं अशा अनेक विषयांवरची पुस्तकं इथे भेटतात. अधिकतर पुस्तकं जर्मन भाषेत असली तरी वेगवेगळ्या भाषेवरची पुस्तकंदेखील सहज सापडतात. इंग्रजी भाषेसाठी पुस्तकांचे स्वतंत्र कपाट फ्रंकफुर्ट शहरात आहे. डार्मस्टाट शहरात तर बागेतच असे मिनी वाचनालय आहे. झाडाखाली बसून निवांतपणे पुस्तकं वाचत बसायची सोय..
अनेक लोकं त्यांच्याकडच्या उत्तम पुस्तकांची भर या वाचनालयात घालत असतात. आजवर कधीही कुठलंही पुस्तकाचं कपाट मला रिकामं दिसलं नाही. नागरिकांच्या सहकार्यातून किती छान गोष्टी आकाराला येऊ शकतात याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वीच मी माझ्याकडची काही मराठी पुस्तकं या कपाटात नेऊन ठेवली. न जाणो शहरात नव्यानेच आलेलं
कोणी मराठी पुस्तकांच्या शोधात असेल आणि माझ्याकडची पुस्तकं त्या मोकळ्या हवेत बाहेर पडायची वाट बघत असतील..
- शिल्पा गडमडे
फ्रांकफुर्ट, जर्मनी

वाचने
28228
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
छान लेख.
In reply to छान लेख. by अजया
+१
In reply to +१ by सस्नेह
स्नेहांकिता- फ्रांकफुर्टला
In reply to +१ by सस्नेह
स्नेहांकिता- फ्रांकफुर्टला
In reply to छान लेख. by अजया
नागरिकांचा प्रतिसाद कसा असेल
In reply to छान लेख. by अजया
+१
वाह वाचनालय मस्तच
In reply to वाह वाचनालय मस्तच by कविता१९७८
धन्यवाद!
युरोपात अशा वाचनालयाबद्दल
In reply to युरोपात अशा वाचनालयाबद्दल by सानिकास्वप्निल
लंडनमध्ये इंग्रजी भाषेत
सुंदर माहिती !
In reply to सुंदर माहिती ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद!
आहा! काय मजा येत असेल ना
In reply to आहा! काय मजा येत असेल ना by नूतन सावंत
खरंच..असे वाचनालय दिसले कि
छान माहिती. खुले वाचनालय
In reply to छान माहिती. खुले वाचनालय by हेमंत लाटकर
असा प्रयोग करून बघायला हरकत
विलक्षण.
In reply to विलक्षण. by उल्का
समजू शकते..धन्यवाद!
अहाहा!
In reply to अहाहा! by पैसा
हा हा हा!
In reply to अहाहा! by पैसा
अगदी अगदी!!!
In reply to अगदी अगदी!!! by प्रीत-मोहर
इकडे रद्दीवाला नसतो म्हणून
वा!
In reply to वा! by एस
धन्यवाद!
असे वाचनालय पाहिले आहे.
In reply to असे वाचनालय पाहिले आहे. by मितान
धन्यवाद!
कितीही प्रकारे विचार करुन
In reply to कितीही प्रकारे विचार करुन by पिलीयन रायडर
एखादं पुस्तक न परत करण्याचा
In reply to कितीही प्रकारे विचार करुन by पिलीयन रायडर
म्हणूनच तर मी इ बुक्सना जास्त प्राधान्य देतो आजकाल.
मस्त लेख आणि असं वाचनालय असणं
In reply to मस्त लेख आणि असं वाचनालय असणं by क्रेझी
धन्यवाद!
वा
In reply to वा by सविता००१
धन्यवाद!
तुझ्या त्या मराठी
In reply to तुझ्या त्या मराठी by मधुरा देशपांडे
धन्यवाद! म्हणत असशील तर तू
मस्तच.. इथे पण आहेत असे खुले
In reply to मस्तच.. इथे पण आहेत असे खुले by Mrunalini
फ्रांकफुर्ट मोठे शहर
सुंदर माहिती!
Khupach mast kalpana....
वाह, मस्तं वाचनालय़. लेख
भन्नाट कल्पना!