जगप्रसिद्ध “पूना” पानाचे माहेरघर
तुम्ही जर पानाचे शौकीन असाल, तर कलकत्ता,मघई,बनारस ह्याप्रमाणे पूना पानही खूप प्रसिद्ध आहे-होते.मला लहानपणी आठवतं की मी वडिलांनी “जारे पानपट्टी वरून सगळ्यांना पानं घेऊन ये” म्हटलं की “पूना मसाला” च घेऊन यायचो.आताही मी पान खातो, पण कलकत्ता किंवा तत्सम. पूना किंवा “देशी” पान अभावानेच.पण सर्व छोट्या गावांमध्ये किंवा इथेही छोट्या छोट्या पान टपऱ्यावर साधं पान मागितलं तर ते “पूना”च असतं.मला आठवतं त्याप्रमाणे हे पान डबल (दोन पानांचे) लावलं जातं; त्यात फक्त कात-चुना-सुपारी आणि एखादा तामुल शौकीन असल्यास काही अंशी तंबाखू अशा पद्धतीने हे पान जास्त प्रमाणात खाल्लं जातं. अर्थात पूना हा पानाचा प्रकार झाला, त्यात तुम्हाला हवा तो माल-मसाला घालून तुमचा खास विडा तयार करायला पानवाला तयार असतोच.
ही पानं येतात तरी कुठून ?
बनारस आणि मघई बद्दल मी ऐकलं होतं , की ही पानं तिथून उत्तरेतूनच येतात म्हणे. कालकत्त्याचाही यथावकाश तपास लागेलच, पण “पूना” चा उगम अगदी ओघाओघानेच परवा अॅग्रोवन मध्ये सापडला , आणि माझी पावलं अगदी आपसूकच “निमगाव-केतकी” ह्या गावाकडे वळली.पुणे जिल्ह्यात ,पण थोडसं दूरवर म्हणजे सोलापूर-पुणे जिल्ह्याचा सीमेजवळ हे गाव आहे.येथे सविस्तर पोचायचं कसं हा उल्लेख येईलच, आधी इथल्या वैशिष्ट्याविषयी थोडंसं ...
निमगावचा पानाचा बाजार
पानं ही नागवेलीवर येतात, हे सर्वश्रुत आहे. पूर्वी म्हणे निमगावात भरपूर पान मळे होते. तेव्हापासून इथे पानांचा बाजार भरतो. काहींच म्हणणं ५०, तर काहींचं ७०, काही तर म्हणतात की १०० वर्षांहूनही जास्त जुना इथला बाजार आहे. सत्य काहीही असलं तरी हा बाजार “जुना-पुराणा” आहे हे नक्की. आजमितीला काही अगदी थोडेच मळे इथे-म्हणजे निमगावात शिल्लक आहेत, पण बाजार मात्र भरतो. आजूबाजूच्या खेड्या पाड्यातून, शेतकऱ्यांनी पानाची लागवड केलेली आहे, ते इथे पानं घेऊन येतात, किंवा पाठवतात, अडते त्यांचा लिलाव करतात, अशी ही पारंपारिक पद्धत आहे.काही मंडळी जीप-ट्रेलर मधून, काही बैल-गाड्यांतून , तर काही चक्क मोटार सायकलींवर देखील हे घेऊन येतात. त्यांचे अडते ठरलेले असतात.तिथे तिथे ते-ते डाग लावून ठेवले जातात.आवाज दिला जातो, खरेदीदार किंमती पुकारतात, १-२-३ पद्धतीनेच व्यवहार ठरतो. पैशांचा हिशोब होतो, सौदा पूर्ण.
मालाचे इको-फ्रेंडली वेष्टण
ही पानं एका खास वेष्टणातून बाजारापर्यंत आणली जातात. त्यात मी पाहिल्याप्रमाणे प्लास्टिक अभावानेच सापडले. मला वाटतं, फक्त गुंडाळायला जो धागा किंवा रस्सी लागली तेवढीच बहुधा प्लास्टिक असावी. संपूर्ण पानांचे ढीग हे उसाच्या पाचटामध्ये गुंडाळलेले असतात. चांगलं जाड-जूड वेष्टण असतं हे. आतील तापमान थंड राहावं ह्याकरिता केलेली ही अगदी नैसर्गिक, अत्यंत कमी खर्चिक अशी “packaging system” आहे. शिवाय प्रत्येक डाग तयार झाला की त्यावर विक्रेता-खरेदीदार ह्यांची नावं टाकण्याकरिता एक पट्टी असते. तीही केळीच्या खोडाचा निरुपयोगी भाग वापरून केलेली असते.इथेही पुन्हा काटकसर-हिशोब हा आहेच! निमगाव हे इंदापूर-बारामती-अकलूज ह्या उस पट्ट्याच्या अगदी लागून असल्याने इथे उसाचे पाचट अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध असतंच. शिवाय केळी बागासुद्धा आहेत. आणि प्रथेप्रमाणे,आपला बळीराजा कमीत कमी पैसे खर्च करून काटकसरीने त्याचे packing करतो. ते सुद्धा कोणत्याही प्रकारचे पर्यावरणाला हानिकारक असे waste न ठेवून !
दर्जानुसार किंमती
पानांच्या किंमती त्यांच्या दर्जाप्रमाणे ठरतात. मला काही विशेष नाही समजलं, परंतु मी एक पान खाल्ले. ते थोडे जास्त तिखट होते, हे पुढचे पान खाल्ल्यावर कळले. माझे निमगावातले मार्गदर्शक श्री.विठ्ठलराव जाधव ह्यांनी पुढे खुलासा केल्याप्रमाणे कमी तिखट पान अधिक चांगल्या दर्जाचे होते. ते लिलावात साधारण ४००० रु. डाग असे विकले गेले, तर जास्त तिखट वालं पान १७००-१८०० रु डाग याप्रमाणे.मुळात एका डागात ३०० कवळ्या असतात. एक कवळी म्हणजे ४०० पाने. म्हणजे एका “डागा”त सुमारे १२,००० पानं असतात. सर्वाधिक किमतीचं जे पान होतं त्याला “कळी” चं पान म्हटलं जातं.
निमगावातच हा बाजार का ?
नक्की काही कारण नाही कळू शकलं. पण आसपासच्या भागात इथे बरेच पान मळे आहेत. नागवेलीला जास्त कोरडं व उष्ण हवामान, तसेच तापमानात अचानक होणारे बदल मानवत नाहीत. ४० अंशाच्या वर तापमान गेलं , तर वेलीची वाढ खुंटू शकते , पानेही जळू लागतात. ह्या सर्व बाबी , असं वातावरण ह्या सर्व भागात पूर्वापार ह्या पिकाला ह्याच भागात मिळत असणार, म्हणून हा भाग. आणि सर्वात जास्त बागा निमगावात असतील एखादे वेळेस , म्हणून निमगाव. तसं भौगोलिक दृष्टीने बघितलं , तर निमगाव हे बारामती-इंदापूर-माळशिरस ह्या तीन तालुक्यांच्या हद्दीवर वसलेलं आहे. त्यामुळे व्यवहारही जास्त होत असतील.
असाच बाजार गोकाक (कर्नाटकातील) ह्या गावीसुद्धा भरतो , असं माझ्या आईने मला सांगितलं. ही बहुधा २० एक वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. आता गोकाक काय किंवा निमगाव काय, दोन्हीही “थंड” किंवा “आर्द्र” हवामानासाठी गणले जात नाहीत. खरं म्हणजे थोडं “उष्ण”च हवामान आहे ह्या दोन्ही ठिकाणांच , मग तरीही इकडेच का ? ह्याचं तार्किक उत्तर नाही मिळू शकलं.
हे असं वातावरण आपल्या कोकणात तयारच आहे की. मग कोकणात का नाही ? काही तरी शास्त्रीय कारण असेल. नसेलच, तर हे पिक कोकणात घ्यायला उत्तम वाव आहे !
गुटख्या मुळे पानांना अवकळा !
“तरी बी आता पूर्वीसारखा बाजार न्हाय!” जाधव सांगत होते. कारण ? एक म्हणजे सतत तिसरं सलग वर्ष दुष्काळ , शिवाय लोकांच्या बदललेल्या सवयी. सोयीस्कर असा गुटखा लोकांना अधिक पसंत.खिशात पुडी ठेवली, टाकली तोंडात, काम संपलं. पानाची झंझट कोण करणार ? अर्थात ही मतं झाली. पण पूर्वीपेक्षा निम्मासुद्धा बाजार आता नाही , असं मात्र अनेक लोकं म्हणत होती. म्हणता म्हणता जाधवांनी एक-दो-तीन ठिकाणांहून पानं घेऊन माझ्या पोतडीत नको-नको म्हणत असतानाही कोंबलीच. वर परत “आजच्याला थांबून उद्या गावाचा कुस्तीचा आखाडा बघूनच जावा” असा स्नेहांकित आग्रहही केला. ही खरी श्रीमंती! कृत-कृत्य वाटलं !
निमगावात कसं जाल ?
पुणे-मुंबई-नाशिक कडून आलात, तर पुणे-सोलापूर रस्ता.इंदापूर पर्यंत यायचं.पुढे इंदापूर बारामती रस्त्याने निमगाव-केतकी (एसटीने फक्त २० मि).टमटम अर्थात शेअरिंग रिक्षाही बस स्थानका बाहेरून चालतात.
दुसरा मार्ग पुणे-बारामती-निमगाव. स्वारगेट हून बारामती नॉन stop एसट्या सतत चालूच असतात. पुढे बारामती-इंदापूर.
सोलापूर कडून आलात तर अकलूज किंवा इंदापूर मार्गे, सातारा-कोल्हापुरातून आलात, तर सातारा-बारामती, पुढे बारामती-इंदापूर रस्त्यावर निमगाव-केतकी.
बाजाराची वेळ, दिवस साधा
आठवड्यात ४ दिवस हा बाजार भरतो. रविवारचा दिवस खास असतो, बाजार दुपाराहून भरतो. साधारणत: ५ च्या पुढे. माझ्यासारखेच एसटीने जाणार असाल, तर साधारणत: ४-४.५ तास आधी निघा-म्हणजे स्वार-गेट हून एसटी पकडा. स्वत:च्या वाहनाने जाणार असाल, तर ३-३.५ तासांत सहज पोचाल.साधारण १५० किमी अंतर असेल.
क्षमस्व : मोबाईल वरून फोटो घेतलेत, काही काही चांगले नसतील आलेले !

वाचने
14597
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
सुंदर लेख. आवडला. असं काहीतरी
धन्यवाद !
In reply to सुंदर लेख. आवडला. असं काहीतरी by तर्राट जोकर
लेख फारच सुंदर आहे! आमच्या
फारच सुंदर असा संदर्भ दिलात !
In reply to लेख फारच सुंदर आहे! आमच्या by कैलासवासी सोन्याबापु
इधर खालि कपुरी अउर पट्टी
In reply to लेख फारच सुंदर आहे! आमच्या by कैलासवासी सोन्याबापु
मस्त लेख. माझ्या वडीलांच्या
सुर्डी ...
In reply to मस्त लेख. माझ्या वडीलांच्या by अभ्या..
सौमित्रा प्रशांत कुणी नाहीत
In reply to सुर्डी ... by १००मित्र
सोलापूर जिल्ह्यातच मंगरूळ
In reply to मस्त लेख. माझ्या वडीलांच्या by अभ्या..
निमगावकर active
In reply to सोलापूर जिल्ह्यातच मंगरूळ by पुंबा
सुर्डी बार्शी साईडला.
In reply to सोलापूर जिल्ह्यातच मंगरूळ by पुंबा
वा वा वा ! मस्त लेख! मन
पिंकही टाका .. फकस्त डब्यात !
In reply to वा वा वा ! मस्त लेख! मन by जव्हेरगंज
विड्याच्या पानांबद्दल एवढी
मलाही नव्हती हो !
In reply to विड्याच्या पानांबद्दल एवढी by विद्यार्थी
नवीच माहिती कळली लेखामुळे.छान
धन्यवाद !
In reply to नवीच माहिती कळली लेखामुळे.छान by अजया
उत्तम लेख. आजकाल पानमळे कमी
अधिक माहिती खरेच आवडेल
In reply to उत्तम लेख. आजकाल पानमळे कमी by एस
मस्त लेख आणि माहितीपण.
गाव बघायला आवडेल..
In reply to मस्त लेख आणि माहितीपण. by दा विन्ची
मस्त लेख,
धन्यवाद
In reply to मस्त लेख, by नीलमोहर
लेख भारीच.
बादवे, ही नागवेल घरी एखाद्या
माझ्याकडे आहे कूंडीत नागवेल
In reply to बादवे, ही नागवेल घरी एखाद्या by एस
मी निमगाव केतकीचाच आहे..
भारी
धन्यवाद !
In reply to भारी by सविता००१
हो हो
In reply to धन्यवाद ! by १००मित्र
मस्त माहितीपूर्ण लेख!
सुरेख संदर्भ !
In reply to मस्त माहितीपूर्ण लेख! by बोका-ए-आझम
असाच एक लेख देण्यासाठी पडघा
येस. पडघ्याला ढाबे खूप.
In reply to असाच एक लेख देण्यासाठी पडघा by कंजूस
डोरली नसेल हो, इरलं (अनेकवचन:
In reply to असाच एक लेख देण्यासाठी पडघा by कंजूस
इरलं (अनेकवचन: इरली) असेल.
In reply to डोरली नसेल हो, इरलं (अनेकवचन: by सूड
कुस्ती आणि पानमळे ही निमगाव
nostalgic !
In reply to कुस्ती आणि पानमळे ही निमगाव by पुंबा
उत्तम लेख
माहितीपूर्ण लेख.
पानावरचा लेख आवडला. मिरजेहून
क्या बात है, ह्याला म्हण्तात
In reply to पानावरचा लेख आवडला. मिरजेहून by बॅटमॅन
रसिक आणी व्यासंगी !
In reply to क्या बात है, ह्याला म्हण्तात by तर्राट जोकर
उत्तम माहितीपूर्ण लेख.
आम्ही इंदापूरकर....
मटण
In reply to आम्ही इंदापूरकर.... by दत्ताभाऊ गोंदीकर
बोकडांना पानं खायला देत असतील
In reply to मटण by सुनील