✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कपालभातीं, प्राणायाम

अ
अर्जुन यांनी
गुरुवार, 04/21/2016 - 02:01  ·  लेख
लेख
मला खुप वर्षांपासून सायनसचा त्रास आहे. मला त्यावर आमच्या ओळखींच्यानी कपालभातीं, प्राणायाम करण्यास सांगितले. माझा सायनसचा त्रास खुपच कमी झाला, पण त्यामूळे मला कमी रक्तदाबचा त्रास सुरु झाला आहे. कपालभातीं, प्राणायाम न थांबवता रक्तदाब नियमित कसा राहील ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6137 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

चुकीचा सम्बन्ध

रमेश आठवले
गुरुवार, 04/21/2016 - 07:45 नवीन
प्राणायाम आणि कपालभाती यांचा रक्तचाप कमी होण्याशी सम्बन्ध असावा असे वाटत नाहि. या बाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे जरूर आहे. केवळ तर्कावर फायदा देणारे योगोपचार बंद करणे बरोबर नाही.
  • Log in or register to post comments

संबंध आहे.

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/21/2016 - 15:18 नवीन
संबंध आहे. रक्तदाबाचा विकार असणार्‍यानी कपालभाती करु नये अथवा संथ आणि काळजीपूर्वक करावे असे मी वाचले आहे. http://www.yoga-for-beginners-a-practical-guide.com/kapalabhati-and-high-blood-pressure.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

डॉक्टरना विचारा

पैसा
गुरुवार, 04/21/2016 - 08:59 नवीन
तुमच्या खाण्यात एकदम काही मोठे बदल झाले आहेत का? कपालभाती आणि रक्तदाबाचा काही संबंध असेल असे अजिबात वाटत नाही.
  • Log in or register to post comments

कदाचित तुम्ही आहारातून मीठ

एस
गुरुवार, 04/21/2016 - 09:15 नवीन
कदाचित तुम्ही आहारातून मीठ वर्ज्य केले असावे असा एक अंदाज.
  • Log in or register to post comments

प्राणायाम

सोनुली
गुरुवार, 04/21/2016 - 10:56 नवीन
प्राणायाम जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन करावेत.
  • Log in or register to post comments

+१

अजया
गुरुवार, 04/21/2016 - 12:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments

रक्त्दाब वाढला की प्रथम

उल्का
गुरुवार, 04/21/2016 - 12:26 नवीन
रक्त्दाब वाढला की प्रथम आहारातले मीठ कमी करायचा सल्ला दिला जातो. तेव्हा रक्त्दाब कमी झाला आहे तर आहारातील मीठ किन्चित वाढवुन फरक पडतो का बघु शकता. कदाचित तुम्ही मीठ जरुरीपेक्षा कमी खात असाल. मी काही डॉक्टर नाही पण एक तर्क मान्डला. एसनी देखिल तेच सान्गितले आहे. डॉक्टरान्चा सल्ला घेणे कधीही योग्य ठरते. माझ्या वाचनात आलेली एक लिन्क इथे देते आहे. जरुर वाचा. http://meethkitikhave.blogspot.in/
  • Log in or register to post comments

कपालभाती, इतर प्राणायाम ,

उगा काहितरीच
गुरुवार, 04/21/2016 - 12:49 नवीन
कपालभाती, इतर प्राणायाम , योगासने हे अतिशय चांगले आहे. पण टिव्हीवर बघून , पुस्तकात वाचून , तुनळीवर पाहून करणे अतिशय चूक आहे असे माझे मत आहे. प्राणायाम , योगासने वगैरे शिकवीणारी व्यक्ती निदान काही दिवस तरी प्रत्यक्ष समोरासमोर शिकवीणारी हवी असे माझे मत आहे. अशा बर्याचश्या व्यक्ती , संस्था आहेत त्या विनामूल्य वा नाममात्र पैसे घेऊन या क्रिया शिकवतात. स्पेशली तुम्ही जर कुठल्या आजारामुळे जर या क्रिया चालू करणार असाल तर जरूर तज्ञ व्यक्तिंचा सल्ला घ्यावा.
  • Log in or register to post comments

+१००

राजाभाउ
गुरुवार, 04/21/2016 - 13:11 नवीन
+१०० मझ्या माहीती प्रमाणे सायनस, सर्दीचा त्रास असेल तर प्राणायाम टाळायला सांगतात व कपालभारती करायला सांगतात पण आपल्या अनुभवा नुसार प्राणायाम (व कपालभारती) केल्याने आपला सायनसचा त्रास कमी झाला. तर मुद्दा असाकि या बाबत अनेक मतमतांतरे सापडतील तेंव्हा तज्ञ व्यक्तिंचा सल्ला आवश्यक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

राजाभाऊ, परिवारात अजून एक

अभ्या..
गुरुवार, 04/21/2016 - 14:40 नवीन
राजाभाऊ, परिवारात अजून एक भारती नको. कपालभांती असावे ते. ;) . (फ्यान ऑफ द दिव्याभारती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

हो बरोबर आहे. कपालभांतीच आहे.

राजाभाउ
गुरुवार, 04/21/2016 - 16:43 नवीन
हो बरोबर आहे. कपालभांतीच आहे. आय एम स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खूप तिखट खाल्ले का? कमी

कंजूस
गुरुवार, 04/21/2016 - 13:44 नवीन
खूप तिखट खाल्ले का? कमी रक्तदाब हा रोग नव्हे.?मानेच्या मागच्या बाजूस मालिश करून घ्या.कोणत्याही डॅाक्टरच्या गोळ्या घेऊ नका.फसाल.
  • Log in or register to post comments

मानेची मागची बाजू ? मान मागेच

उगा काहितरीच
गुरुवार, 04/21/2016 - 14:33 नवीन
मानेची मागची बाजू ? मान मागेच असते ना ? मानेची मागची बाजू म्हणजे गळा होईल ना ! बाकी गळ्याला मालिश केली तर रक्तदाबच काय सगळेच रोग ठीक होतील . ;-) . . हघ्या हेवेसांनलगे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हाहा मानेलाच म्हणायला पाहिजे

कंजूस
गुरुवार, 04/21/2016 - 15:35 नवीन
हाहा मानेलाच म्हणायला पाहिजे.बाकी साइनस हासुद्धा रोग नाहीच.ती एक प्रकारची रिअॅक्शनच असते.काही जणांना कोंदट,थंड,सर्द ,धुळीच्या जागी,बस कारचे सीट रेक्झिनस न पुसल्यामुळे त्यावरची धूळ यामुळे साइनस होते.त्या जागेंपासून दूर राहिल्यास साइनस होत नाही.नाकाला आतून सूज वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

नियमित वाफ घेण्याने सायनसचा

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/21/2016 - 16:03 नवीन
नियमित वाफ घेण्याने सायनसचा त्रास कमी होतो, बाकी व्यायाम पण बघू शकता जसे सूर्यनमस्कार, मध्यम गतीने धावणे वा वेगात चालणे. व्यायामाने अ‍ॅलर्जीचा त्रास हळू हळू कमी होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बरोबर.

कंजूस
गुरुवार, 04/21/2016 - 16:38 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मला आलेला अनुभव

अजयिन्गले
गुरुवार, 04/21/2016 - 15:15 नवीन
मी प्राणायाम भत्रिका,कपाळ भाती, अनुलोम विलोम, अतिसार व ओमकार हे सर्व मागील ८ महिन्या पासून सुरु केले आहे, करयाला ३५ मिनटे लागतात व सकाळी आणि सायंकाळी करतो. हे करण्याचा मुख्य उदेश मला गासेस चा motion चा आणि उच्च रक्दाब (९५ तो १६०) असा त्रास होता. जून मध्ये योगा day च्या एक दिवस आधी प्राणायम सुरु केले मागील ८ मिहीन्या पासून दरोरोज करतो सकळी आणि सायंकाळी. हे सर्व नळी वर बघून सुरु केले. गासेस ९०% कमी झाले आणि बिपी लोवर (७८ तो ८४) & ऊप्पेर (११८ तो १२५) येतो आहे. बिपी ची गोळी पण बंद केली आहे. मी बाहेर देशात आहे त्या मुले सर्व काही नळी वरच बघून सुरु केले. मी हे सर्व न चुकता करतो. या बरोबर मी diet पण खूप कंट्रोल केले आहे. भारतात आल्या नंतर योग शिक्षकला भेटायचं ठरवले आहे. जर पुण्यात कुठे योगाचे center असेल तर सांगावे.माझा अनुभव योग बदल खूप सकारत्मक आहे. आसन कुठले पण करीत नाही. रात्री झोपण्या पूर्वी साधनेला बसतो आणि ४५ मिन्स तो ६० मिन्स करतो. फक्त आसनावर बसून रहातो जे विचार येतात ते येऊ देतो जी काही क्रिया होते ते बघत राहतो (हे मला काही वर्षा पूर्वी एका सत्पुरुषाने सांगतले होते कि साधना चालू करा, शंकर महाराजांचं स्मरण करून ते पण मी दरोज करतो.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियांबद्दल आभार,

अर्जुन
गुरुवार, 04/21/2016 - 18:09 नवीन
प्रतिक्रियांबद्दल आभार, खाण्यामधे काही विशेष बदल नाही.मिठही कमी केले नाही. उलट माझे जेवणात थोडे जास्तच मिठ असते. मी खूप तिखटही खात नाही.
  • Log in or register to post comments

योगासनांनी रोग बरे होतात का?

कंजूस
गुरुवार, 04/21/2016 - 19:12 नवीन
योगासनांनी रोग बरे होतात का? म्हणजे झाला अमुक रोग की कर हे आसन आठदहा दिवस आणि हो बरा असं.इतर कोणतेही औषध न घेता.
  • Log in or register to post comments

सूर्य नमस्कार केल्याने बर्

भीमाईचा पिपळ्या.
गुरुवार, 04/21/2016 - 20:23 नवीन
सूर्य नमस्कार केल्याने बर्‍याच आसनांचा फायदा मिळतो व स्नायूंचे किरकोळ दुखणे असेल तर आराम मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

रक्त दाब नियंत्रणात

भीमाईचा पिपळ्या.
गुरुवार, 04/21/2016 - 20:19 नवीन
रक्त दाब नियंत्रणात आणण्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम , ओंकार गुंजण चांगले आहेत. व्यवस्थित शिकुन ट्राय करा. फायदाच होईल.
  • Log in or register to post comments

कपालभातीचा

लाल टोपी
Fri, 04/22/2016 - 08:28 नवीन
कपालभातीचा आणि उच्च रक्तदबाचा संबंध आहे; ज्यांना हा त्रास आहे त्यांनी कपालभाती अगदीच बंद न करता तीस तीस ची तीन आवर्तने करावीत एका वेळी तीस पेक्षा जास्त वेळा कपालभाती करु नये. सायनस साठी शुध्दीक्रीया अधिक फायदेशीर आहेत जलनेती आणि सूत्रनेती जरुर करा जलनेती केल्यानंतर कपालभाती करणे आवश्यक आहे. मात्र या क्रिया योग्य प्रशिक्षका मार्फत शिकून घेणे आवश्यक आहे. प्राणायाम देखील उपयुक्त आहेत विशेषतः अनुलोम विलोम उज्जेयी सारखे प्राणायाम करणे श्रेयस्कर आहे. मात्र क्रिया सकाळी सूर्योदयापूर्वी कराव्यात.
  • Log in or register to post comments

कपाल्भाती करणे म्हणजे उछ्वास

जयन्त बा शिम्पि
Sat, 04/23/2016 - 00:47 नवीन
कपाल्भाती करणे म्हणजे उछ्वास जोराजोरात बाहेर टाकणे. श्वास आपण घेण्याची गरज नाही, ती क्रिया आपोआप घडतच असते. सुरवातीला एका मिनीटात किमान साठ वेळा ही क्रिया जमली पाहिजे. सरावाने हा वेग दुप्पट व्हावयास हवा. पोट जोराजोरात आतबाहेर करणे म्हणजे अग्निसार करणे होय. हा शुद्धिक्रियेचाच एक प्रकार आहे. गुढघ्यात किंचित वाक देवून , दोन्ही हात , गुढग्यावर ठेवून उभे रहावे. घेतलेला श्वास , पुर्णपणे बाहेर टाकून, पोट रिकामे असतांना, आत बाहेर करावे. श्वास जितका वेळ आतमध्ये घेतला जाणार नाही , तेव्हढ्या वेळात जितके शक्य होईल, तितक्या वेळा पोट आत बाहेर जलद गतीने करणे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा