३६ दिवसांच्या संघर्षानंतर आज शक्तिमानचा दुर्देवी अंत झाला . उत्तराखंडमध्ये सेवा बजावत असताना हा ' जवान ' आंदोलनादरम्यान पाय घसरून पडला . तो पुन्हा स्वतःच्या पायावर उठलाच नाही .
या ' शहिदास ' भावपूर्ण श्रध्दांजली .
हे करणाऱ्या गणेश जोशी या आमदाराला अटक झालेली आहे अशी बातमी वाचली होती. त्यांना याबद्दल शिक्षाही व्हायला हवी. जनावरांवर हात उचलणे आणि त्यांना इजा करणे हे कायद्याने तेवढे गंभीर गुन्हे नाहीत आणि घोडा हा अस्तित्व धोक्यात आलेला प्राणी नसल्यामुळे शिक्षाही तेवढी गंभीर नसेल. तरीपण ती व्हायलाच हवी.
शिक्षा कुणाला झाली पाहिजे, घोडा काही शिकारी जनावर नव्हे लोकांच्या अंगावर साठी. (कुत्रे जरूर सोडले जातात). अंग्रेजान्न्तर नंतर प्रथमच प्रदर्शनकारी लोकांच्या अंगावर घोडे दौडविण्याचा प्रकार तुम्ही बघितला होता. भांबावलेला घोडा घसरून पडला कुणाचीही काठी त्याला लागली नव्हती. (वाहिनींवर विडीयो तुम्ही बघितलेच असेल). मुक्या प्राण्याचा असा उपयोग करणार्यांना शिक्षा झाली पाहिजे. माणसांच्या विरुद्ध प्राण्याचा वापर बंद केला पाहिजे. भाजपचे लोक तर घोड्यांच्या लाथांनी जखमी झाले असेल.
झालं ते फारच वाईट झालं, मुक्या प्राण्यांच्या वेदना सहन होत नाहीत जेव्हा त्यांचा काहीच संबंध नसतो.
एक विडियो त्याचा पाय कसा मोडला ते शुट झालेला दाखवत होता, बराच वायरल झाला होता.
http://www.ndtv.com/cities/police-case-filed-against-uttarakhand-bjp-lawmaker-for-allegedly-beating-horse-1287373
ह्यात त्या बिचार्या शक्तिमानची काहीच चूक नव्हती. पण ह्यानिमित्ताने माणसाच्या सैतानी प्रवृत्तीचे दर्शन झाले. घोड्यासाठी कळवळलेल्या लोकांची भाजपभक्तांनी खिल्ली उडवण्याचे घृणास्पद काम केलेच.
अन्ग्रेजान्च्या राज्यात प्रजेवर घोडे दौडविले जात होते. कॉंग्रेस च्या राज्यात हि तेच झाले, खरे दोषी प्रजेवर घोडे सोडणारे आहेत. कुठल्या हि राज्यात प्रदर्शन कारी लोकांवर घोडे सोडताना तुम्ही बघितले नसेल. कॉंग्रेसच्या राज्यातच असे होते. मी विडीयो बघितला आहे, घोड्याला कुठल्याही प्रदर्शन करीने इजा केली नव्हती. बाकी तुमच्या अंगावर कुठले जनावर धाऊन आले तर तुम्ही काय कराल, स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न कराल कि नाही. घोड्याचा मृत्युला राज्य सरकार जवाबदार आहे.
ठिक आहे Mr.X एका पक्षाच्या विचारधारेशी बांधिल आहेत आणि Mr.Y दुसर्या कुठल्यातरी राजकिय पक्षाच्या पण यार आता जर मुक्या प्राण्यांच्या हत्येतहि (हा शब्द फार जबाबदारीपुर्वक वापरतोय) जर राजकारण आणुन आपण बांधिल असलेल्या पक्षाच्या दोषि माणसाला वाचवु पाहत आहोत तर मग काय बोलावे हेच सुचेनासे झालेय.
"घोडा पाय घसरून पडला" कस शक्य आहे हे...अरे निसरड्यातल्या निसरड्या उतारावर घोडा कधि पडत नाहि ना स्वाराला काहि ईजा होउ देत. कुत्र्यानंतर हाच तर दुसरा प्राणि आहे यार निष्ठेसाठि प्रसिध्द, आपला स्वार मेला किंवा बेशुध्द झाला तर बरोबर त्याला घरापर्यंत घेउन येत हे मुक जनावर. आणि शोकांतिका हि आहे कि आपली पक्षनिष्ठा सिद्ध करायला आता ह्याचे मरण सुद्धा वापरले जाणार.
मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजुने अथवा विरुद्ध कधीच आपले मत देत नाही , ना टिका ना सहानुभुती, पण हा घोडा जखमी कसा झाला याची बातमी आणी विडीयो देशभर प्रसिद्ध होउन लोकानी ते पाहुन त्यावर हळहळ व्यक्त करुनही धागाकर्त्याने पाय घसरुन जखमी होण्याचे कारण कुठला विचार करुन दिले आहे हे काही समजले नाही म्हणुन न राहवुन ईथे प्रतिसाद दिले
आंदोलनादरम्यान भाजपा आमदाराने घोडयासमोर काठी जोरजोराने आपटली . त्या बरोबर त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी देखिल तेच केले . त्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली आणि घोडा घाबरून मागे सरकला व पाय घसरून पडला . ही गोष्ट सर्वज्ञात आहे . त्यामुळेच त्याचा वर उल्लेख टाळला . राजकीय पक्षाचे नाव घेतलं की लगेच पक्षाचे समर्थक व विरोधक एकमेकांवर चिखलफेक करायला लागतात . मला ती या धाग्यावर अपेक्षित नाही .
माणसांच्या गाढवपणामुळे एका घोडयाचा जीव गेला हेच सत्य आहे . वर शक्तिमान चा उल्लेख ' शहीद ' असा केला आहे . यातच सगळे आले .
बरय आता तुम्हीच लिहीलय की घोडा पडण्याआधी त्याच्या पायाला दुखापत झाली मग तो पडला, सविस्तर या लिन्क मधे दिलय http://m.maharashtratimes.com/nation/bjp-leader-ganesh-joshi-accused-of-attacking-police-horse-shaktimaan-arrested/articleshow/51452302.cms
लोकहो,
गणेश जोशींनी घोड्यास दिलेला मार अत्यंत किरकोळ आहे. अश्वचालक (=जॉकी) लोकं कसे बडवतात ते पहा इथे : https://youtu.be/BPFhN9JwalE?t=1m12s
एक चालक तर एव्हढा भयंकर होता की तो तबेल्यात शिरल्या शिरल्या घोडा भीतीने फळफळू लागे. या पार्श्वभूमीवर गणेश जोशींचा मार म्हणजे केवळ पुठ्ठ्यावरील धूळ झटकणे आहे. मात्र फट म्हणता ब्रह्महत्या होते, तसाच दुर्दैवी प्रकार घडला. :-(
आ.न.,
-गा.पै.
मी जो काल व्हिडिओ पाहिला आजतक वर, त्यात एका पांढर्या रंगाच्या घोड्यावर पोलीस बसले होते आणि एक माणुस जीवाच्या आकांताने काठीने मारत होता घोड्याला. मला ते पाहुन तरी त्या माणसामुळेच घोड्याला लागले असे वाटले. कारण पुढच्याच क्षणी घोडा मटकन खालीच बसलेला दिसला.
फार फार वाईट वाटलं हे पाहुन.
पोरगा सारखा विचारत होता की शक्तिमानला काय झालं?
म्हणलं एका राक्षसानी मारलं..
तर म्हणे मग तो शक्तिमान आहे ना.. त्याने त्याला फाईट का नाही दिली..
......
म्हणलं असु देत.. पोलीस राक्षसाला ढिशुम करणारेत...
स्वतःचीच समजुन घातली एका अर्थी.. जो कोणी जबाबदार असेल त्याला १०००% शिक्षा व्हावी..
व्हिडीओबद्दल उलटसुलट वाचले आहे. बघितले आहे. त्यात आमदाराच्या मारहाणीने घोडा मेला हे पटत नाही. पण त्यामुळे आमदाराने घोड्याला मारले हे नाकारता येत नाही. ते तर दिसतेच आहे. स्वतःची खुमखुमी मिटवण्यासाठी आणि सत्तेचा माज दाखवण्यासाठी एका मुक्या प्राण्याला इजा करताना लाज वाटायला हवी होती. त्यामुळे त्या आमदाराला कडक शिक्षा करणे गरजेचे आहे.
सत्ता आल्यावर जबाबदारी अजुन वाढते. त्यामुळे असली थर्डक्लास प्रकार करणार्या माण्सला शिक्षादेखील तेवढीच कडक हवी. इथे आमदार भाज्पाचा असो नाहितर काँग्रेसचा प्रकार घॄणास्पद आहे आणि दोषीईंना शिक्षा ही झालीच पाहिजे,
शक्तीमान अश्वाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे वाचून अत्यंत संताप आला. कोणत्याही प्राण्याचा, पक्षाचा, जलचरांचा छळ केला जाणे हे अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे निदर्शक आहे. शक्तामानच्या मृत्युला भाजपचा गणेश जोशी किंवा जो कोणी जबाबदार असेल त्याच्या खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात यावे व त्याप्रमाणे शिक्षा द्यावी.
शक्तीमानच्या मृत्यु हे प्राण्यांवरील अत्याचाराचे एक उदाहरण आहे. प्राण्यांवर यापेक्षाही भीषण अत्याचार अनेक शतके सुरू आहेत. शर्यतीतला घोडा पळण्यास असमर्थ झाला की त्याला गोळी घालून मारण्यात येते, खाण्यासाठी जगभरात रोज लाखो प्राण्यांची, पक्षांची, जलचरांची निर्घॄण हत्या केली जाते. नदीकाठावर खे़कडे पडल्यावर त्याचे चारही पाय तोडून तो पळू शकणार नाही याची व्यवस्था केली जाते. शिंपले, खेकडे, कासव इ. जलचरांना जीभेचे चोचले पुरविण्यासाठी जिवंतपणी उकळत्या पाण्यात टाकून शिजविले जाते. हंसासारख्या पक्षांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्यापुढे खाण्याचा पदार्थ धरून मान पुढे आली की मान उडविली जाते, कोंबड्या, गायी, शेळ्या-मेंढ्या, म्हशी, बैल, शहामृग अशा अनेक प्राण्यांची खाण्यासाठी झटका किंवा हलाल पद्धतीने निर्घृण हत्या केली जाते. शेतीकामासाठी बैलाचे वृषण क्रूर व यातनामय पद्धतीने चेचून निकामी करून व पायात खिळे व नाल ठोकून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचे हालहाल केले जातात (शेतकर्यांना बैलांचे तळतळाट भोवत असावेत का?), वृषण खच्ची करून त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घेतला जातो आणि म्हातारा झाला की त्याची कसायाकडे रवानगी होते, मांग समाजात लग्नाच्या वेळी डुक्कराला जिवंत जाळण्यात येते ... अंगावर काटा येईल अशा पद्धतीने या सजीवांचे हालहाल केले जातात. हे सर्व करणार्या गुन्हेगारांना काय शिक्षा देणार?
मांसाकरता निर्घृण ह्त्या होणार्या असंख्य सजीवांची केवळ हालहाल होत झालेल्या मृत्युनेच सुटका होते. शक्तीमानचे हाल झाले, पण बिचार्याची निदान ३६ दिवसांनी मृत्युनेच सुटका केली. आयुष्यभर नालावर चालून नांगराचे जोखड मानेवर बाळगणार्या बैलांची सुटका कोण करणार?
गणेश जोशीला शिक्षा व्हायलाच हवी. पण स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांच्या, पक्षांच्या, जलचरांच्या हालासाठी जबाबदार असणार्यांना कोण शिक्षा करणार?
शक्तामानच्या मृत्युला भाजपचा गणेश जोशी किंवा जो कोणी जबाबदार असेल त्याच्या खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात यावे व त्याप्रमाणे शिक्षा द्यावी.
कैच्याकै. घोड्याला मारणं किंवा त्याचा पाय मोडेल अस करण हा खून?? काहीही. असे शेकडो प्राणी रोज मरत असतात. पोलीसांचा घोडा असेल तर शिक्षा ठीक आहे. पण उगाच घोड्याचा पाय मोडला म्हणून खून??
किरकेटपटु व विनोदपटु अशा एका भाजपा लोकप्रतिनिधीने एका बाचाबाचीत एकाचा मनुश्यवध केला होता. त्याला शिक्षा नाही झाली , तिथे घोड्याचा पाय मोडल्यावर खुनाचा चार्ज कसा लागेल नै का ?
मुगोबाई,
तुमच्या विधानावरून आठवलं की कुठल्याशा विद्यापीठात सर्वोच्च न्यायालयास कातील म्हणून संबोधण्यात आलं होतं. मनुष्यवध कुठेही कसाही होऊ शकतो बरं.
आ.न.,
-गा.पै.
देहरादून मधील एका पुलाचे जुने नाव बदलून त्याचे नाव शक्तिमान पूल असे ठेवण्यात आले आहे . हा घोडा जीवंतपणी आणि मृत अवस्थेत कॉंग्रेसची चांगली सेवा करत आहे .
प्रतिक्रिया
पाय घसरुन पडला नाही,भाजपच्या
शक्तिमान जखमी कसाझाला याची
http://maharashtratimes
वाईट झालं.
घोडा आपल्या आप पाय घसरुन
शिक्षा कुणाला झाली पाहिजे,
साल वाचुनच कसतरी झाल यार
झालं ते फारच वाईट झालं,
अन्ग्रेजान्च्या राज्यात
आपण सरकारी नोकरीमधे आहात
खरय तजो...हे जरा अतिच होतय आता
अहो उपरोध होतात तो!
ह्या प्रतिसादात मला उद्देशुन
ह्या प्रतिसादात मला उद्देशुन काय म्हणायचे आहे नक्की तुम्हाला?
प्रश्न डेडपुल यांना आहे. पण
मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या
आंदोलनादरम्यान भाजपा आमदाराने
बरय आता तुम्हीच लिहीलय की
कवित तै
काही विडियो इथे डकवतोय.
अजून एक चित्रफीत आहे त्यात एक
खालील व्हीडीओ पहा म्हणजे कोणी
तरी जर आपण दुखावल्या गेल्या असाल तर माफि मागतो.
नाही हो रागावले नाही,
अश्वताडन व अश्वचालक
> फट म्हणता ब्रह्महत्या होते,
शक्तिमानला श्रद्धांजली.
पंजा नाही खुर
पुलं
मी जो काल व्हिडिओ पाहिला आजतक
व्हिडीओबद्दल उलटसुलट वाचले
तो घोडा त्याने मेला असेल वा
१००% सहमत
शक्तीमान अश्वाचा दुर्दैवी
निरर्थक फाफटपसारा
नॉन व्हेज
गिरे तो भी?
=)) चला गाणं म्हणा, दुनियामें
शक्तामानच्या मृत्युला भाजपचा
.. सहमत
यावरून आठवलं की...
शक्तिमान पूल
घोड्याला कळता का ?