मराठी कथालेखक यांनी सदाहरित धाग्यावर विचारणा केल्याप्रमाणे येथे थिटा मेडीटेशन बाबत माझे स्वतःचे काही अनुभव आणि काही वस्तुस्थिती तसेच माहिती नमूद करत आहे. याबाबत सर्वप्रथम नोंद घ्यावी की आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचे मत व मार्गदर्शन नक्कीच घ्यावे. तसेच अशा प्रकारची मेडिटेशन्स गर्भवती स्त्रिया, 25 वर्षांखालील व्यक्ती यांनी करु नये अशीही माहिती मला याबाबतची आंतरजालीय माहिती वाचताना मिळालेली आहे.
माझी माहिती वैयक्तिक अनुभवांवर तसेच आंतरजालीय माहितीवर आधारीत आहे आणि कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ उत्सुकतेपोटी मी हे थिटा मेडिटेशन केलेले आहे. मला स्वतःला यातून कोणताही त्रास झाला नाही की वाईट अनुभव आला नाही. उलट अतिशय रिफ्रेशिंग करणारे अनुभव आले. याबाबत आंजावर देखील अनेक लोकांनी निर्वाळा दिलेला आहे की हे प्रयोग पूर्ण सुरक्षित आहेत तरी पण आपण असले प्रयोग वैद्यकीय सल्ल्याशिवाय करु नयेत असे स्पष्ट नमूद करतो.
एकूण 10 ते 12 दिवस फक्त मी हे मेडीटेशन केलेले आहे. परंतु मला पारंपारिक हिंदु पद्धतीचीच उपासना आवडत असल्याने पुढे माझा यातील रस कमी झाला व सध्या तरी मी हे प्रयोग बंद केलेले आहेत. (मला व्यक्तिशः ईश्वराच्या सगुण साकार रुपाची उपासना हीच आवडते).
एकूण जितक्यावेळा हे थिटा मेडिटेशन मी केले त्यापैकी साधारण 70 ते 80 टक्के वेळाच मी गहन निद्रावस्थेचा अनुभव घेतला. म्हणजे success rate 100 टक्के नसावा. याला निद्रावस्था पण म्हणता येत नाही. आतून तुम्ही जागृत असता असा अनुभव येतो पण विचारप्रक्रिया पूर्ण थांबलेली असते. हे शब्दांत सांगता येत नाही नक्कीच. ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे.
तर असो, आंतरजालावर मोठ्या प्रमाणात brainwave entrainment उपलब्ध आहे. यामध्ये मेंदूच्या अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा व थिटा या मूलभूत लहरी कर्णमधुर संगीताच्या माध्यमातून तुमच्या कानांद्वारे मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात आणि अपेक्षित परिणाम साधला जातो.
बीटा – 13 ते 40 हर्ट्स
अल्फा – 8 ते 12 हर्ट्स
थिटा – 3 ते 8 हर्ट्स
डेल्टा – 0.5 ते 3 हर्ट्स
या पेक्षा अधिक किंवा कमी फ्रिक्वेन्सीच्या तरंगलांबी मेंदु निर्माण करतो. पण त्याबाबत अद्याप फारसे संशोधन झालेले नाहीये. तसेच पुरेशी माहिती देखील उपलब्ध नाही. गॅमा तरंगलांबी तशा प्रसिद्धच आहेत. पण मी त्यांचा फारसा उत्सुकतेने अभ्यास केलेला नाहीये. त्यामुळे लिहू शकत नाही.
तर यातील बीटा तरंगलांबी म्हणजे आपली नैसर्गिक जाणीव जागृतीची अवस्था. याच अवस्थेत आपले दैनंदिन कामकाज आपण पार पाडतो. (Beta is a ‘fast’ activity, present when we are alert, attentive, engaged in problem solving, judgment, decision making, and engaged in focused mental activity.)
बीटाच्या खालोखाल येतो अल्फा. येथे मेंदू रिलॅक्स होऊ लागतो. एखादे सुंदर दृश्य पाहिल्याने, संगीत ऐकल्याने आपल्याला जो एकदम शांततेचा अनुभव येतो तो हाच.
याखाली थिटा तरंगलांबी. येथे अगदी गहन निद्रावस्थेत गेल्यासारखे अनुभव येतात. तुमची स्वची जाणीव देखील गायब होते. काळाची जाणीव सुद्धा या अवस्थेत होत नाही.
डेल्टा तरंगलांबी अतिशय सूक्ष्म activity आहे. हा प्रयोग मी मुद्दामच केलेला नाही. कारण तितका आत्मविश्वास नव्हता. पण ही अगदी unconscious अवस्था आहे. अतिशय उच्चावस्थेला गेलेले योगी, साधु, झेन उपासक यांचे मेंदू या तरंगलांबीत कार्य करताना आढळतात. पण त्यासाठी हे लोक आयुष्य खर्ची घालतात. आपणांस विज्ञानामुळे ही सुविधा काही मिनिटांत उपलब्ध होते आहे.
यातील प्रत्येक तरंगलांबीसाठी वेगवेगळे स्वतंत्र संगीत उपलब्ध आहे. वरकरणी एखादे relaxing music वाजत असते. परंतु त्याच्या आत भुंग भुंग असा एक आवाज येत असतो. त्याच या तरंगलांबी. प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळ्या प्रकारे function करीत असतो. त्यानुसार प्रत्येकाची वेगवेगळ्या तरंगलांबीची आवश्यकता असेल. ते संबंधित डॉक्टरच ठरवू शकतील.
हे संगीत ऐकण्यासाठी अर्थातच चांगल्या दर्जाचा मोबाईल आणि हेडफोन आवश्यक आहेत. काही ट्रॅक्ससाठी हेडफोन आवश्यक नसतात. ज्या संगीतात binaural beats वापरलेले आहेत ते बहुदा हेडफोननेच ऐकावे लागतात. Binaural beats म्हणजे प्रत्येक कानाला स्वतंत्रपणे वेगवेगळ्या तरंगलांबीचे ध्वनी ऐकवले जातात. त्यांच्यामध्ये जो फरक असतो त्या तरंगलांबीचा एक नवाच ध्वनी मेंदू स्वतःच भासमान निर्माण करतो. अर्थात यात इतके डीप जाण्याची गरज नाही. याविषयी अधिक माहिती खाली मिळेलः
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=r…
संगीत ऐकताना आवाज शक्यतो 70 टक्के वरच ठेवावा हे स्वानुभवावरुन सुचवतो. यापेक्षा जास्त आवाज ठेवला तर त्या भुंग भुंग आवाजाचा त्रास होऊ लागतो. या लहरींना आपला मेंदू frequency following response देतो. म्हणजेच ज्या लहरी संगीताच्या अवगुंठनातून पुरविल्या जातात त्या लहरींमध्ये तो स्वतः काम करु लागतो.
कानांत हेडफोन लावून सरळ गादीवर मस्त निवांत आडवे पडायचे. कोणत्याही परिस्थितीत सदरचे संगीत ड्रायव्हींग करताना, अवजड मशीन्स हाताळताना किंबहुना कोणतेच व्यावहारिक काम करताना ऐकावयाचे नाही. मला तर हे संगीत संध्याकाळी ऑफिसवरुन दमून भागून घरी परत आले की मगच ऐकावे हेच योग्य वाटते. कारण सकाळी सकाळी तुम्ही थिटा मेडीटेशन ऐकलेत आणि मेंदू अगदी relax अवस्थेत गेला तर तुमच्या दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होऊ शकेल असे मला तरी वाटते. कारण एक सामान्य जीव म्हणून जगण्यासाठी आपणांस बीटा लहरी अतिशय आवश्यक आहेतच. जेव्हां साधुत्वाकडेच वाटचाल करावयाची असेल तर थिटा आणि डेल्टा हे पर्याय आहेत.
या सर्व प्रक्रियेत शरीर अजिबात हलवायचे नाही. थोड्या देखील हालचालीने ध्यान भंग होऊ शकते. त्या दृष्टीने आधीच तयारी करावी. घरातील व्यक्तींना देखील कल्पना द्यावी. सर्व टी.व्ही., मोबाईल, रेडिओ बंद करावेत. या अवस्थेत छोटेसे जरी आवाज आले तरी फार धसका बसल्यासारखा होतो. म्हणून विशेष काळजी घ्यावी. माशा, मच्छर असतील तर त्यांचा बंदोबस्त अगोदरच करावा लागेल. नियमित जप करणा-यांना हा अनुभव असेलच की अशा वेळीस उगाचच इकडे तिकडे खाजवणे, खोकला येणे, मुंग्या येणे असे प्रकार शरीर करु लागते. त्यावेळीस शांत राहणे व पुन्हा संगीत ऐकण्याकडे ध्यान देणे आवश्यक असते. तुम्हाला केवळ ऐकण्यापलिकडे काहीच करावयाचे नाही. आणि ऐकण्याकडे लक्ष नाहीच गेले तरी कान त्यांचे काम करतच आहेत हे लक्षात ठेवावे.
खाली मला जो सर्वात उत्तम व्हीडीओ वाटला त्याची लिंक देत आहे. व्हीडीओ थेट ऐकणे योग्य नाही ठरणार. कारण अशी मेडीटेशन्स दीर्घ काळ चालतात त्यामुळे मध्येच बॅटरी बंद पडून रंगाचा भंग होऊ शकतो. सरळ मोबाईलवर mp3 डाऊनलोड करणे व ऐकणे सर्वात बेस्ट.
https://youtu.be/RqrssdH6ET4
Ho’ponopono ही एक प्राचीन हवाईयन उपासना पद्धती आहे. यामध्ये आपण खालील 4 मंत्र सतत स्वतःशीच repeat करत राहतो. यामागे हेतु असा की, आपल्या आयुष्यात जी काही दुःखे, वाईट परिस्थिती आपणच आपल्या विचारांद्वारे, कर्मांद्वारे निर्माण करतो त्यांचे निरसन व्हावे. याविषयी अधिक माहिती इथे मिळेलः
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=5&cad=r…
I love you
I am sorry
Please forgive me
Thank You
मराठी कथालेखक यांनी विचारल्याप्रमाणे lucid dreaming काय? तर हे मेडिटेशन करताना या 10 – 12 दिवसांत मला माझी स्वप्ने कमालीची live, vivid आणि colorful होत असल्याची जाणीव झाली. Lucid dreaming हा वेगळा विषय आहे. परंतु असे का झाले हे मला सांगता येत नाही. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
वाचने
10091
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके
खरच हे शक्य आहे का ?
अहो हे केवळ संगीत ऐकवले जात
In reply to खरच हे शक्य आहे का ? by गॅरी शोमन
यातील प्रत्येक ट्रॅक असा
In reply to खरच हे शक्य आहे का ? by गॅरी शोमन
:)
हा शवासन आणि शांत करणार्या
In reply to :) by पैसा
बाकी तुम्ही ते भुंग भुंग
In reply to हा शवासन आणि शांत करणार्या by विजय पुरोहित
ओक्के... !
मस्त लेख! करून बघायला आवडेल!
In reply to ओक्के... ! by उगा काहितरीच
इथे
मुख्य म्हणजे माझा सर्वात
In reply to इथे by सस्नेह
धन्यवाद
युट्युबवर अनेक प्रकारचे
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
ध्वनी आणि आपण..
हे काही तरी वेगळे आहे खरे
नाही पैजारबुवा. या
In reply to हे काही तरी वेगळे आहे खरे by ज्ञानोबाचे पैजार
how binaural beats works
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- Geniushttp://earthvision.info
धन्यवाद डॉक्टरसाहेब. दुवा
In reply to http://earthvision.info by सुबोध खरे
हं मघाशी घाईत होतो त्यामुळे
बहुतेक क्लोझींग टॕग मधे गडबड
In reply to हं मघाशी घाईत होतो त्यामुळे by उगा काहितरीच
डॉक्टरांचे मत घेऊन(च)
In reply to हं मघाशी घाईत होतो त्यामुळे by उगा काहितरीच
फक्त बीटा च करुन बघायचे असेल
In reply to डॉक्टरांचे मत घेऊन(च) by विजय पुरोहित
डॉक्टर
+१
In reply to डॉक्टर by चित्रगुप्त
शंका आहे
नाही येणार
In reply to शंका आहे by अनंत छंदी
धन्यवाद
In reply to नाही येणार by सुबोध खरे
डाॅ. साहेबांनी योग्य तो
In reply to धन्यवाद by अनंत छंदी
डाॅ. साहेबांनी योग्य तो
In reply to धन्यवाद by अनंत छंदी
ऐकावे ते नवलच.. वारकरी
In reply to नाही येणार by सुबोध खरे
जप
सहमत भागवत साहेब. दचकणे हाच
In reply to जप by शाम भागवत
@विजय पुरोहित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुकुरुकुकुरुकुकुरुकु कुक... ;) :- Kick 2गॅमा ऐकताना डोळे मिटणे गरजेचे
In reply to @विजय पुरोहित by मदनबाण
मस्त लेख
चांगली
रात्री अगदी झोपण्यापुर्वी हे मेडीटेशन करता येतं का?
@मराठी कथालेखक गॅमा ऐकताना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कदी ते हस बोल वे , न ज़िन्द साड्डी रोल वे... :- Love Aaj Kalधन्यवाद बाणराव
In reply to @मराठी कथालेखक गॅमा ऐकताना by मदनबाण
धन्यवाद
In reply to @मराठी कथालेखक गॅमा ऐकताना by मदनबाण
छान लेख प्रयोग करून पाहतो
असेच म्हणते. :)
In reply to छान लेख प्रयोग करून पाहतो by अजय देशपांडे
Why Increase your brain alpha waves
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बारिश... :- Yaariyan