Skip to main content

महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/04/2016 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, समस्त मिपाकरांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!! तर या नवीन वर्षात नवीन उपक्रम घेऊन येत आहोत १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। अशा आपल्या महाराष्ट्र देशाच्या काल आज आणि उद्याचा आढावा, महाराष्ट्राचे देशाला योगदान हे या निमित्ताने मिपावर यावे या हेतूने साहित्य संपादक मंडळ घोषित करत आहे महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला. या उपक्रमात खालील विषयावर लेख लिहून मिपाकर भाग घेऊ शकतात. १. महाराष्ट्र काल, आज आणि उद्या (उदा. चित्रकला, खेळ, विज्ञान, वैद्यक शास्त्र, अर्थकारण, समाज यात होत गेलेले बदल्/प्रगती असे काही) २. महाराष्ट्राचे भारताप्रती योगदान ३. महाराष्ट्रातील स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान (यातही काही अपरिचित व्यक्तींविषयी लिहिल्यास अधिक उत्तम) ४. महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव ( याशिवाय अर्थकारण, समाजकारण किंवा साहित्य यातील प्रभाव याबद्दल देखील लिहिता येईल.) ५. मराठी सण आणि संस्कृतीत इतर भाषिक महाराष्ट्रीय लोकांचा सहभाग ६. हिंदी चित्रपटजगतावरचा मराठी ठसा ७. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र (महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या लोकांचे अनुभव - भारतातील इतर राज्य, परदेशातील महाराष्ट्र मंडळ इत्यादी) लेख २५ एप्रिलपर्यत साहित्य संपादक या आय डीला व्यनि करावेत. नेहमीप्रमाणेच आपल्या भरघोस प्रतिसादाच्या प्रतीक्षेत -साहित्य संपादक मंडळ
लेखनविषय:

वाचने 2457
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

२५ एप्रिल पर्यंत लेख अवश्य पाठवा. काही शंका किंवा अडचणी असल्यास साहित्य संपादक या आयडीला व्यनि करावा. लेखांच्या प्रतीक्षेत.

महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव कृपया यात अर्थकारण ,समाजकारण आणि साहित्य पण समाविष्ट करावे तसेच maharashtrach vibhaajan vhave ka ka jawlalant mudda ghyava ka he tumchywar

In reply to by एकुलता एक डॉन

वेगळ्या विदर्भ वगैरे प्रश्णावर औचित्य ठेउन चर्चा होणार नाही ह्याची खात्री आहे. लोकं ताळतंत्र सोडणार.