Skip to main content

पालक पुऱ्या

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 16/04/2016 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या शाळा -कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत. रोज रोज मुलांचा एकच प्रश्न -- आई आज काय बनवणार्. चला म्हटलं आज पालक पुऱ्या बनवूयात. आधी पालक पाने एक मिनीट पाण्यात उकळून घेतली.त्याची पेस्ट बनवली. लसूण जिरे ओवा मिक्सर मधून बारीक करून घेतले. थोडी कणिक व थोडेसेच बेसन पीठ,हिंग,हळद,लाल तिखट,चवीनुसार मीठ व चिमुटभर साखर,एक चमचा तेल घातले त्यात पालक पेस्ट घालून पीठ घट्ट मळून घेतले.लगेचच पुऱ्या लाटून तळल्या.व गरम गरम सर्व्ह केल्या.

वाचने 7233
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

फटु??

In reply to by नाना स्कॉच

पाककृतीत फटू पाहिजेच. मी अगोदर फोटो पाहतो, (मग प्रतिसाद वाचतो) अन मग कृती. -दिलीप बिरुटे

छान

मुले खुष झाली असणार ना! पुढच्या वेळेसाठी थोडे बदल (वेरिएशन) सुचवू का? मला आवड आहे म्हणुन सुचवते आहे. राग नसावा. १. पालकाबरोबर तीळ छान लागतात हा मझा अनुभव आहे. २. वाटताना हिरवी मिरची घेतली तर जास्त हिरवा रन्ग येइल. काळ्जी नका करू. जे कोणी पहिले करुन बघतिल ते फोटो अप्लोड करतील. :)