साहित्य
६ मोठे बटाटे
६ अंडी
१/२ कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची (हिरवी, लाल, पिवळी)
१/२ कप किसलेले processed चीज (अमूल किंवा गोवर्धन)
१ टे स्पून मिक्ड हर्ब्स (पिझ्झा बरोबर आलेली पाकिटे वापरू शकता )
१ टे स्पून कुटलेली काळीमिरी पावडर
१ ते २ टे स्पून बटर (वितळवून)
मीठ चवीनुसार
तेल लागेल तेवढे
कृती
बटाटे स्वच्छ धुऊन घ्या. घाण आणि वाळूचे कण काढण्यासाठी ब्रशने हलके घासून घ्या. ओवन १८० डिग्री अंश से. ला प्रि-हिट करून घ्या. बटाट्यांना फोर्क किंवा टाचणीने सगळीकडून टोच्या मारून (फक्त सालीवर टोच्या मारा, ह्याने स्किन मध्ये अडकलेली हवा बाहेर पडेल आणि स्किन फुगणार नाही), हलक्या हाताने (बोटाने), सगळीकडून तेल लावून घ्या. ओवन मध्ये बटाटे तासभर बेक करा. बटाटा शिजला याची खात्री करण्यासाठी मध्यभागी एक toothpick ने टोचून बघा.
बटाटे बाहेर काढून गार करायला ठेवा. बटाटे थंड होत असताना सारणाची तयारी करून घ्या.
बटाटे गार झाले कि एका सुरीने बटाट्च्याचा एक layer कापून घ्या. एका चमच्याने, आतील शिजलेला बटाटा काढून, बटाट्यात एक पोकळी तयार करा. हे काम जरां काळजीपूर्वक करा. बटाट्याला कुठेही भोक पडता कामा नये. थोडा पांढरा मासल भाग आत राहिला तरी चालेल. सर्व बटाटे अश्या रीतीने पोकळ करून घ्या.
ब्रशने सगळ्या बटाट्यांच्या आतील पोकळ बाजूंना बटर लाऊन घ्या.
आता बटाट्याच्या आत थोडं किसलेले चीज, एक चमचा थंड झालेला सारण भरा. [जास्ती भरू नका, कारण अजून ह्यात अंडा फोडून घ्यायचा आहे]. प्रत्येक बटाट्यात एक अंड फोडून घाला. वरून चिमुटभर मीठ आणि थोडी काळीमिरी भुरभुरा.

हे असे भरलेले बटाटे पुन्हा oven मध्ये १८० डिग्री अंश से. ला १५ ते २० मिनिटे बेक करा. बाहेर काढून, थोडं चीज भुरभुरून, अजून २ मिनिटे ओवेन मध्ये ठेवा
गरमागरम सर्व करावे.
सारणासाठी
एका पँन मध्ये १ मोठा चमचा बटर टाका. त्यात ढोबळी मिरच्या टाकून मध्यम आचेवर परतून घ्या. त्यात mixed herbs टाकून अजून २ ते ३ मिनिटे शिजवा. चव घेऊन त्याप्रमाणे मीठ व काळीमिरी पावडर टाका. मिश्रण ताटात काढून थंड करून घ्या. सारण जास्ती शिजवायचा नाही.
टिप
सुटीच्या दिवशी हे बनवून खाऊ शकता. आदल्या दिवशी तयारी करून फ्रीज मध्ये ठेऊ शकता. ऎन वेळेस अंडी फोडून बटाट्यात टाकून बेक करू शकता.
चिकन किंवा पोर्क खात असल्यास, बाजारात मिळणारे sausages चे बारीक तुकडे करून सारणात टाकू शकता, किंवा बेकन तव्यावर फ्राय करून त्याचे बारीक तुकडे देखील टाकू शकता.
अगदी अस्सल देशी ऑमलेट (मिरची, कांदा, कोथिंबीर , हळद, तिखट, मीठ ) करून देखील ह्यात टाकून बेक केले तरी चांगल लागेल.
प्रतिक्रिया
फारच खटाटोप केलेला दिसतोय.
अंडे कच्चे असावे
In reply to फारच खटाटोप केलेला दिसतोय. by सूड
चान चान!! प्रश्न पुन्हा एकदा
In reply to अंडे कच्चे असावे by टवाळ कार्टा
विशेष काही नसावे...
In reply to फारच खटाटोप केलेला दिसतोय. by सूड
काळजी म्हणजे सारण जास्ती भरू
छान दिसते आहे.
खटाटोप करायला लावणारा पदार्थ
चमचमीत खायचं असेल तर कष्ट
केडी भौ
सही है केडी भाऊ.
मस्त पाकृ!
मस्तं!
मस्त रेसेपी. असेच सेम अ
तो पहिलाच फोटो असला जीवघेणा
मस्त वाटतय. :)
ओवन विकत घ्यायला जात आहे.
अंडी शोधतो आहे....
In reply to ओवन विकत घ्यायला जात आहे. by sagarpdy
अरे बाबारे....
In reply to अंडी शोधतो आहे.... by नावातकायआहे
__/\__
In reply to अरे बाबारे.... by ज्ञानोबाचे पैजार
छान पाकृ
मस्त दिस्तेय पाककृती. पण अंड
स्टफ केला नाही, पण सगळे
वाह छान प्रकार!
In reply to स्टफ केला नाही, पण सगळे by आनंदी गोपाळ
या महान विडीओची आठवण झाली.
मस्त पाकृ. !
मस्त पाकृ. !
अनुस्वार फार महत्त्वाचा असतो
फार दिवसापासून हे बनवायची इच्छा होती
अरे वाह....
In reply to फार दिवसापासून हे बनवायची इच्छा होती by फेदरवेट साहेब
साहेब
In reply to अरे वाह.... by केडी
बहुदा बटाटा जून असेल किंवा
In reply to साहेब by फेदरवेट साहेब
हा पदार्थ करुन पहाण्याची फार
धन्यवाद!
In reply to हा पदार्थ करुन पहाण्याची फार by पिलीयन रायडर