बाकी या सिग्नेचरने तुमचं टाळकं सटकतं म्हणजे कमालच आहे...
असो.
मित्रा, तुझी 'इणंती' काही विचारार्ह वाटत नाही. क्षमस्व... :(
तू मोठ्या मणाचा दिसतोस्..(ह. घे.).. क्षमा करशील अशी आशा आहे...!
तुझी 'ण' ची ष्टाईल लै भारी रे...!
-झेल्यामी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
बाकी या सिग्नेचरने तुमचं टाळकं सटकतं म्हणजे कमालच आहे...
तुम्हाला कमाल वाटते याचीच कमाल वाटली ... बाकी मिपाच्या नियमित लोकांपैकी १० लोकांना विचारा मी ते काय म्हंटलो ते .. तुम्हाला पुन्हा कमाल वाटेल .. मग आम्ही तुम्हाला "कमाल अकमाल" किंवा "कमाल खाण" म्हणू ;)
तुझी 'इणंती' काही विचारार्ह वाटत नाही. क्षमस्व...
ती सिग्णेचर खरडीत जा लोकांना रोज .. तुम्हाला कळेलच
तू मोठ्या मणाचा दिसतोस्..
ह्म्म ... मुलगा असुन तु "चांगल्या स्वभावाचा" वाट्टोस .
क्षमा करशील अशी आशा आहे...!
आशा क्षमा करेल का पण ?
तुझी 'ण' ची ष्टाईल लै भारी रे...!
धण्यवाद रे .. णाकाचं हाड वाढलं की असं होतं .. आणि माझी हाडं वाढलीत ;)
-दयावान ) टारझन
लहानपणी दर १५ दिवसांनी बदलायचं काहीतरी. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही.
बाकी प्रवास नेति नेति पद्धतीचा.. साधारण ८-९ वी मधे जाहीर करून टाकलं की डॉक्टर वा इंजिनियर होणार नाही. वकील होणार नाही. शाळामास्तरीण होणार नाही. सी ए, एफ आय सी डब्लू ए ( हे मला तेव्हाही म्हणता येत होतं! :) ) असंही काही करणार नाही एवढा नन्नाचा पाढा जोडला होता. त्याबरोबर घरीच बसणार नाही हे ही नक्की होतं.
१० वी नंतर मग मला काळजीने ऍप्टिट्यूड टेस्ट ला पाठवलं गेलं होतं. तिथे त्या लोकांनी 'कॉम्प्युटर प्रॉग्रॅमिंग' असं लिहून कळवलं होतं. (त्या काळात हे म्हणजे काहीतरी सॉल्लिड नवीन आहे असं वाटायचं सगळ्यांना!) त्यांना काही येत नाही हे मला तेव्हाच कळलं होतं.
हवाई दलात फायटर पायलट व्हायचं असं वाटल्याने एन सी सी एयरविंग ला गेले होते. पण मुलींना घेत नाहीत आणि कमर्शियल पायलट लायसन्स च्या ट्रेनिंगसाठी अति प्रचंड फी आहे जी बहुतेक परवडणं शक्य नाही हे कळल्यावर इंटरेस्ट संपला. मग १२ वीच्या सुट्टीत नागपूरला कॉस्मेटॉलॉजी मधे बी टेक करण्याचाही विचार करून झाला होता. पण १२ मधे माझे मार्क इतके उच्च होते की ते जमलंच नाही. खरंतर हे माझंच सुदैव...
साधारण एस वायच्या दरम्यान नाटकाचा किडा चावला आणि हळूहळू टी वाय पर्यंत लक्षात आलं की हेच माझं पंढरपूर. त्यात मधेच विक्रम गायकवाडकडे शिक्षण घेणं पण सुरू केलं होतं. किडा मोठा होऊन नाटकाबरोबर चित्रपटाचाही झाला होता. माझ्या पंढरपुराचा जिल्हा झाला होता पण या पंढरपुरातली नक्की आपली आळी कोणती याचा निर्णय मात्र लागत नव्हता. मग एम ए -नाटक, एम एफ ए - कॉश्च्यूम डिझाइन.. असं मेकप्-कॉश्च्यूम चं शिक्षण घेऊन व्यावसायिकरित्या तेच करते आहे तरीही लेखन-दिग्दर्शन आणि क्वचित अभिनय सुद्धा अश्या गल्ल्यांमधे उंडारत असतेच मी.
असं सगळं चालू आहे.. अजून खूप काही व्हायचंय करायचंय त्यामुळे श्टोरी पूर्ण झालेली नाही
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मला शिक्षक व्हायचे होते आणि आपल्याच शाळेत शिकवायचे होते- ज्यांनी ज्यांनी मला हाणले आहे त्यांची मुले पण एक दिवस माझ्या शाळेत येतील आणि मी त्यांना बदड बदड बदडीन असे स्वप्न होते.
नंतर विसरलो आणि काम्पुटरवाला झालो
ज्यांनी ज्यांनी मला हाणले आहे त्यांची मुले पण एक दिवस माझ्या शाळेत येतील आणि मी त्यांना बदड बदड बदडीन असे स्वप्न होते.
:-D
हे मला अजूनही वाटतं. आता बहुतेक शिक्षकांची मुलं नाही पण नातवंडं असतील बालवाडीत, अजून आहेत काही वर्ष!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
आमचे भविश्य पडले आहे
मला ना सगळ्यात जावेसे वाटते कधी नाटक करतो कधी लेखन ,कधी काव्य ,आणि कधीतरी अभ्यासही करावासा वाटतो
असो पण काहितरी चांगले करायचे आहे स्वतःसाठी आणि जगासाठीदेखील
बघु भगवंत काय घडवतोय माझ्याहातुन
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
कारण हल्ली मुलंच शिक्षकांना बदडतात असं ऐकिवात येतं! :T तुम्हाला शिक्षकांचा आणि त्यानंतर त्यांच्या मुलांचाही मार खावा लागला असता तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं नसतं का? ~X( (ह.घ्या.)
चतुरंग
हा विषय निघाला म्हणजे मला लहानपणीचा एक मजेशीर प्रसंग आठवतो.
मी पाचेक वर्षांचा असेन......असेच एका पाहुण्यांनी विचारले "तू मोठा झाल्यावर कोण होणार ?"
मी उत्तरलो, "मी बाबा होणार !".
....आणि योग्य वेळी हे स्वप्नही सत्यात उतरलं.
आता ते कर्तव्य शेवटपर्यंत आनंदाने पार पाडायचं !
मला लहानपणी बस कंडक्टर व्हायचं होतं, कारण त्याच्याकडे खूप पैसे (तेव्हा खूप सारी नाणी म्हणजे खूप पैसे असं वाटायचं) असतात असं वाटायचं....पण नंतर झालो काहीतरी वेगळंच.
मला बीई Computer,लायब्ररीयन, पुस्तकं-कपड्यांची दुकानदार.. इत्यादी इत्यादी व्हायचे होते.. :)) माझं एकंदरीत अभ्यासावरील 'प्रेम' पाहून आई म्हणायची होम सायन्सला जा! :) बाबांना मी त्यांच्यासारखी सीए व्हावे असं वाटायचं.. इतक्या गोंधळातून मी शेवटी कंप्युटर इंजिनिअर झाले.. ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
प्रतिक्रिया
मी
मला
हार्डवेअर
:(
१००% सहमत
मला
http://www.misalpav.com/node/
असो असो!
:)
बाकी या
बाकी या
लहानपणी दर
.
आळशी होण्यात आळशीपणा केला नाहीत ते बरं..
शिक्षक
ज्यांनी
आम्हाला
बरं झालं शिक्षक होऊन त्याच शाळेत नाही शिकवायला गेलात
आयला
आम्हाला
सह्ही...
मला देव व्हायचे होतं
'राम राम..'
मला
मला हॉटेल
मजेशीर !
हा हा हा!
झकास!
मला डॉक्टर
आम्हालाही
बस कंडक्टर
येडा हैस!
मला बीई
मला पोलिस