बेडरूम मधील समानतेची गुढी
हि एक लेखमाला असून ह्याचे एकूण पांच भाग असतील. लेखन अतिशय संक्षिप्त ठेवण्यात आले आहे पण लोक ज्या प्रकारचा प्रतिसाद देतात ते पाहून पुढील भाग लिहिले जातील. हि लेखमाला फक्त मिपावर सर्वप्रथम प्रकाशित करत आहे.
एका माणसाची पत्नी फ़ेमिनिस्ट होती. स्त्रियांना सगळी कडे समान हक्क मिळावेत म्हणून तिचे दर रोजचे भांडण. बाजूच्या सलून मध्ये न्हाव्याने "इथे फक्त पुरुष आणि लहान मुलांचे केस कापले जातात" अशी पाटी लावली होती त्याला "मिसोगिनिस्ट" म्हणून त्याला स्त्रियांचे केस सुद्धा कापण्यास भाग पाडले गेले.
तर सदर महिला एक दिवस थोड्या लवकर घरी आली. घरी येवून बेडरूम मध्ये जावून पाहते तर काय ? आपली पती मोलकरणी सोबत इथे आपली कल्पना शक्ती वापरा, त्याला X असे नाव द्या> होता. ते पाहतांच तिच्या पायाची आग मस्तकांत गेली.
"तुझी हिम्मत कशी झाली अविनाश …. " ती.
"अग थांब आधी माझे ऐकून तर घे …. तुझ्या समतेची गुढी मी घरांत सुद्धा उभारायचे ठरवले. मोलकरणी विषयी पूर्वग्रह ठेवून तिला बिचारीला माझ्या बिछान्यात न घेता मी तिझ्यावर अन्याय करत आहे हे तुझे भाषण ऐकून मला वाटले म्हणून मी मनातील तिच्या प्रती असमान व्यवहार करण्या एवजी तिला तुझ्या प्रमाणेच समान वागणूक द्यायचा प्रयत्न करतो होतो… " आपण आपल्या पत्नी बरोबर X १ वर्षा आधी केले होते सोयीस्कर रित्या विसरून अविनाश ने स्पष्टी करण दिले. मोलकारिणीला कदाचित ह्या प्रसंगाची सवय असल्याने तिने कपडे परिधान करून पोबारा केला होता.
"मुर्खा हा आमचा बेडरूम आहे, रस्त्यावरील मंदिर नाही" - तिने म्हटले.
"आमचा बेडरूम आमची मालमत्ता आहे तसे ते देवूळ सुद्धा कुणाची मालमत्ता आहे ना ? तिथे समतेची गुढी उभारली तीच गुढी आम्ही आमच्या घरांत उप्भारायला नको ? समाजसेवा घरापासून सुरु होते असे कुणी तरी म्हटले आहे ना ? " अविनाश.
"मला शिकवू नकोस. मी तुझही लग्न झालेली पत्नी आहे, तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे. लग्न झालेल्या पुरुषाने इतर बायाकाशी संबंध ठेवू नयेत अशी समाज मान्य परंपरा आहे. " ती.
"पण एकाद्या मंदिरांत अमक्याला प्रवेश आहे किंवा नाही हि सुद्धा त्यांचीच परंपरा आहे ना ? तिथे समता पाहिजे तर लग्नात का नाही ? इतर महिलांवर अश्या प्रकारे discriminate करणे अन्याय्य कारक नाही का ?" अविनाश.
"पण तू आणि मी शपथ घेतली होती ना लग्नाच्या वेळी ? ती तिच्या पती कडे जायील माझ्या पतीकडे का ? " ती.
"बरोबर आहे पण त्यामुळे मोलकारिणी वर अन्याय का ? भक्त लोक त्यांची स्वताची देवळे उभारू शकत नाहीत का ? लोकांचा देवळांत घुसल्यानेच त्यांना समता भेटते तर इथे सुद्धा तोच नियंम लागू आहे." . अविनाश
भांडण जास्त वेळ चालले नाही. अविनाशला आपले समान घेवून घरा बाहेर पडावे लागले.
तात्पर्य : असल्या समतेची गुढी उभारताना एक तर पत्नीचे परमिशन घ्यावे नाहीतर कडी तर लावावी.
सूचना: प्रतिसाद टाकताना तारतम्य बाळगण्याचे कारण नाही. वाट्टेल तितका गोंधळ घालावा. प्रतिसाद शक्यतो विनोदी ठेवावे आणि त्याला कारुण्याची किंवा इतर कशाची झालर वगैरे लावली तरी चालेल.
रेफेरेन्स: https://www.youtube.com/watch?v=KKgHc6bWqZ4
प्रतिक्रिया
धुरळाच! जियो साहनाजी!
कल्पनाशक्तीचे कौतुक वाटले.
प्रतिसाद शक्यतो विनोदी
प्रतिसाद विनोदीच का पाहिजेत?
बेडरूम पर्यंत ठीक आहे पण
अरेरे
फार अपेक्षेने धागा उघडला होता
गंभीर सहमती
वाटले नव्हते हा दिवस इतक्या
:) सहमतीबद्दल सहमती.
अगदी सहमत
कधी काही दर्जेदार
वावा वा. दर्जेदार नक्की हवे .
तशी व्याख्या करणं कठीणच. पण
विषमतेच विष उकळवून कोळून
टनाटनी टनाटनी
विषमतेच विष उकळवून कोळून
कैच्या कै !!
असल्या गोष्टी इंग्रजीत बोलल्यावर जरा भारदस्त वाटतात म्हणून -
+10000
सूचना: प्रतिसाद टाकताना
अख्खा लेख नसता तरी चालला असता
आमच्या बेडरुम मधे समानता नाही.
मानल बुआ. हा लेख तृप्ती देसाई
खत्तरनाक! दर्जा!
मला वाटत त्यांना शनी मंदीर
अहो साहना बै ,पेशवाईत
चंद्रनील मुल्हेरकर
हा हा, पेशव्यांची घटकंचुकी
येस
असल्या धाग्यांना.....