बीजे मेडीकल कॉलेजात असताना एकंदर ४ ऑफिशियल अन एक अनॉफिशियल कँटीन्स होती. होस्टेल कँटीन अन कॉलेज कँपसच्या दरम्यान सेंट्रल बिल्डिंगच्या कॉर्नरला जे आहे (अजूनही असेल कदाचित. तिथे पादचारी पूल झालाय रस्ता ओलांडायला) ते अनऑफिशियल सेंट्रल कँटीन. हे नुस्तंच टिपिकल इराणी हॉटेल होतं, पण आमची इतकं पोरं पडीक असत, की जणू कँटीनच असावं.
कॉलेज कँपसमधे मेन बिल्डिंगमधे जे ऑफिशियल कँटीन आहे (हे सिंहासन सिनेमात दाखवलंय), त्याला म्हणायचे "अँटिरियर" कँटीन. पीजी होस्टेलमधे सेकंड फ्लोअरवर होते ते "सुपिरियर" अन ससूनच्या मुख्य बिल्डिंगच्या मागे, जे आजकाल पेशंटच्या नातेवाईकांसाठी राखीव समजले जाते, व बरेच घाणेरडे झालेंय, ते "पोस्टिरियर" कँटीन.
या सर्व कँटीन्समधे आमचा मुक्त वावर असायचा, अन प्रत्येकाच्या काही खासियत डीशेस असत. अँटिरियरला अर्थातच पडीक असणे होई. तिथले ऑम्लेट करण्याची पद्धत म्हणजे सुमारे ५० कपात अंडी फोडून ठेवलेली, अन तिथला घामट शेट्टी, आली ऑर्डर की टाक त्यात मूठभर मिर्च्या, कांदे अन थोडं मीठ, अन ओत समोरच्या मोठ्या पत्र्यासारख्या डोसा तव्यावर, या पद्धतीने अर्धेकच्चे ऑम्लेट करून ते बनमधे सारून तिसर्या मिन्टाला टेबलावर सादर करी. ते आलं, की बन उघडून ओघवत्या आम्लेटातून त्या मिरच्या वेचत, "मा****चे ऑम्लेटात इतक्या मिर्च्या कशाला घालतात" हा प्रश्न वेटरला विचारत ते गट्टम करणे हा रोजचा ब्रेकफास्टिय नाईलाज असे.
पोस्टेरियर कँटीनच्या डेलिकेट डोसा ऑम्लेटचा शोध पीजी करताना लागला.
तिथल्या शेट्टीची ही डिलिशियस स्पेशालिटी. पोळीला ऑम्लेट लावून खातो तसं डोशाला लावून नाही खायचं. तर ते एकत्रच बनवायचं.
तर पाककृती.
लागणारे साहित्यः
डोश्याचे तयार बॅटर. (घरी केले की विकत आणले फरक पडत नाही)
बाऽरीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिर्ची.
हवं तर तिखट, मीठ.
तेल. हवं तर बटर.
अंडी.
क्रमवार पाककृती:
आधी मोठ्या भांड्यात अंडी, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, मिर्ची एकत्र करावे. चमचाभर पाणी घालून मस्त फेटून घ्यावे.
तव्यावर डोसा घालावा. पिठाचा रंग बदलून शिजतंय असं दिसलं, की चमच्याने त्यावर ऑम्लेट मिश्रण ओतावे.
झाकण ठेवावे.
थोड्यावेळाने झाकण काढून पहावे. डोश्याच्या कडा सुटायला लागल्यात असे दिसेल. मग ऑम्लेटवर दोन थेंब तेल सोडावे. नाजुकपणे डोसा उलटावा. थोडा वेळ शिजू द्यावे.
हा रिझल्ट येतो :
वाढणी/प्रमाण
भूक किती व खाणारे किती त्यावर.
अधिक टीपा:
सोबत कालच केलेलं घरच्याच कैरीचं ताजं लोणचं आहे.
डोसे मला छान करता येतात. मीच केलेत. काकूंची कारागिरी माझ्या नावावर खपवलेली नाही.
या जेवायला!
वाढणी/प्रमाण
भूक किती व खाणारे किती त्यावर.
अधिक टीपा:
सोबत कालच केलेलं घरच्याच कैरीचं ताजं लोणचं आहे.
डोसे मला छान करता येतात. मीच केलेत. काकूंची कारागिरी माझ्या नावावर खपवलेली नाही.
या जेवायला!
वाचने
16537
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठे पाहिले खाल्ले नाही, पण
भारी लागतं.
In reply to कुठे पाहिले खाल्ले नाही, पण by तुमचा अभिषेक
मी पयली.
मस्त !
In reply to मी पयली. by नूतन सावंत
मस्तंय, कल बनायेगा.
अय्यय्यो! माय्यं
याला हैद्राबादला egg dosa/
अगदी हेच! मला ज्यांनी या
In reply to याला हैद्राबादला egg dosa/ by उगा काहितरीच
पाकृ व फोटू आवडले. हा प्रकार
वा, वा ! जुन्या आठवणी जाग्या
येस्सर!
In reply to वा, वा ! जुन्या आठवणी जाग्या by डॉ सुहास म्हात्रे
यावरून आठवलं.
In reply to येस्सर! by आनंदी गोपाळ
प्रकार भारी आहे.
नवीन प्रकार
माझ्या मनात आले होते.
करुन पाहीन. सोपे दिसते आहे,
हटके पाककृती
.
हायला
डोश्याच्या पिठात अंड्याचं
अॅंटिरियर पोस्टिरियर सुपिरियर
हहा ह्हा
In reply to अॅंटिरियर पोस्टिरियर सुपिरियर by अजया
मेडिकल टर्मिनाॅलाॅजी
In reply to अॅंटिरियर पोस्टिरियर सुपिरियर by अजया
मस्त!
+१
In reply to मस्त! by पैसा
सुपर्ब
भारी च !
वेगळा प्रकार
कबिला
डोसा आणि ऑम्लेट दोन्ही खूप
मस्त पाकृ.करुन पहाते.
गोपाळराव
मेस ची भारी आठवण!
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
शिवाय बी जे च्या मेस मध्ये
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
शिवाय बी जे च्या मेस मध्ये रविवारी सकाळी "फीस्ट" साठी दोस्तांच्या जीवावर जात असू त्याचीही आठवण झाली.अहाहा ! "रविवार सकाळची अनलिमिटेड स्वीटवाली फीस्ट" म्हणजे काय लिजंडरी आठवण आहे ! मंडळी काय चापून स्वीट खायची तेव्हा ! आमच्या बॅचला एक मुलगा होता. पट्टीचा खवय्या हा शब्द त्याला अत्यंत तोकडा पडत असे. तो पहिल्या पंगतीला जेवायला बसून तिसर्या पंगतीबरोबर उठायचा. त्याचे स्वीटसकट जेवण पूर्ण होईपर्यंत तिसरी पंगत सुरू होत असे. मग तिसर्या पंगतीत तो अधिक स्वीट खाण्याच्या पैजा लावत असे... उदा: १० रुपयांची पैज, अजून २५ गुलाबजाम / दहा वाट्या फ्रूट सॅलॅड खाऊन दाखवतो. पहिल्या सहा एक महिन्यांत त्यांने अनेक बकरे पकडून भरपूर कमाई केली. नंतर त्याच्या पोटाची क्षमता सगळ्यांच्या ध्यानात आल्यावर पैजा बंद झाल्या. त्याच्या नावे आम्ही एक (खोटी खोटी) "राजू (नाव बदलले आहे) टेस्ट" बनवली होती : राजूच्या घश्यात बोटे घातल्यावर बोटांच्या टोकाला अन्न लागले तर राजू टेस्ट पॉझिटिव्ह... म्हणजे राजूचे जेवण पूर्ण झाले. नाहीतर राजू टेस्ट निगेटिव्ह, तो अजून एक पंगत जेवेल ! :)मस्त प्रकार आहे.सर्व प्रथम
आवडला प्रकार!
हा प्रकार आधी केला आहे. भारी
नक्की करून बघेन
एग डोसा हा प्रकार इथे एका
आर वा गोपाळराव. चक्क पाककृती.
छान दिसतोय डोसा..
कँटीनचे किस्से धमाल. =)))
झकास....