एकदम सडेतोड लेख. फारच छान.
अशीच स्थिती भारतात असणार्या मंदिरांची (मस्जीद आदी सर्व) आहे. कितीतरी पैसा या ठिकाणी कुजतोय.
आणि भारतात लोकशाही आहे म्हणून आपण तो वापरात काढू शकत नाही.
"आपण स्वत: कसं जगावं हे आपण art of living मधून शिकण्याइतपत आपण विचारहीन झालो आहोत का?? जगायचं कसं हे सूद्धा दूसऱ्यानी सांगावं?"
खरयं. आणि लोकं या बुवांकडे जावूनसूध्धा त्यांच्या विचारात फरक पडत नाही.
-( बुवाबाजी च्या नादी न लागणारा सणकी )पाषाणभेद
बाबा बुवा प्रकार पुरातन काळापासून आहेत. लोक अती व्यवहारी बनल्यामुळे देवाशी सुद्धा व्यावहारिक पातळीवरुनच संवाद साधत असतात. :)
काही केल्या तुझे मन पालटेना ।
दास म्हणे जन सावधान
असे रामदास पूर्वीच म्हणाले आहेत :)
ज्ञानेश्वरी स्वत: वाचून स्वत: त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही का??
मी नाही लाऊ शकत. त्यासाठी मला सोनोपंत दांडेकरांचे पाय धरावे लागतात.
आपल्या लेखाच्या शीर्षकाच्या पुढे सारथी असे लिहिले आहे. म्हणजे काय?
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
प्रतिक्रिया
सडेतोड
बाबा बुवा