यूट्यूबवर सर्फींग करत असताना काही अपरिचित तरीही अतिशय नादमधुर वाद्यांशी संबंधित व्हीडीओज पहायला मिळाले. त्यांच्याशी संबंधित यूट्यूब दुवे येथे मुद्दाम टेक्स्ट स्वरुपात डकवत आहे जेणेकरुन आपणांस ही त्यांचा आनंद घेता येईल. तसेच त्या त्या वाद्याशी संबंधित विकीपीडियावरील माहिती थोड्याफार प्रमाणात सोबत देत आहे. ते ते वाद्य कसे दिसते हे संबंधित यूट्यूब व्हीडीओत दिसेलच, त्यामुळे स्वतंत्र वर्णन करत बसण्याची गरज नाही. तसेच वाद्याचे मूळ इंग्रजी स्पेलींग मुद्दाम दिलेले आहे जेणेकरुन तुम्हाला तो कीवर्ड वापरून यूट्यूबवरील इतर व्हीडीओदेखील पाहता येतील. ऐकताना हेडफोन वापरले तर जास्त चांगले!
आपल्याला काही माहिती असेल तर ती पण ऍड करा.
1) Array Mbira – हे आधुनिक काळातील साधारण हार्प किंवा बेल्स सारखे वाद्य आहे. 60 च्या दशकात यूएसए मध्ये बिल वेसली यांनी हे वाद्य प्रथम तयार केले. परंतु त्याचे मूळ आफ्रिकन Mbira या वाद्यामध्ये आहे. त्यानंतर यात अनेक बदल / सुधारणा होत गेल्या आहेत.
2) Harp – हे वाद्य एशिया, युरोप येथे अति प्राचीन काळापासून माहीत आहे. सामान्यतः प्रबोधनकाळात या वाद्याला फार मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता लाभली. अगदी एका हातात धरता येतील अशा छोट्या आकारापासून ते स्वतंत्र बैठक व्यवस्था लागेल अशी मोठी हार्प्स उपलब्ध आहेत. खाली एलिसा सादिकोव्हा या छोटुकलीचा हार्प वाजवतानाचा व्हीडीओ आहे. केवळ अप्रतिम श्रवणानुभव आहे. डोळे बंद करुन हेडफोन लावून ऐकलेत तर अतिशय सुंदर अनुभव येईल. तिच्या हार्प वाजवतानाच्या हालचाली तर एखाद्या परीची आठवण करुन देणा-या आहेत. एकदा तरी नक्कीच ऐका.
3) Mbira / Kalimba – हे वाद्य आफ्रिकेत हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. तीन हजार वर्षांपूर्वी लाकडाचा वापर होत होत होता तर साधारण दीड हजार वर्षांपूर्वी धातूचा वापर केला जाऊ लागला. याला गंमतीने thumb piano असेही म्हणतात. कारण वाजवताना होणारा अंगठ्यांचा वापर. हे वाद्य Gods must be crazy या हॉलीवूड चित्रपटात बरेच वापरलेले आहे.
4) Eagle Bone Whistle – आपल्याकडील अलगुजसारखेच वाद्य. पण अतिशय अप्रतिम माधुर्य आहे ध्वनीत. स्थानिक अमेरिकन जनजाती याला अतिशय पवित्र वस्तू मानतात आणि याचा वापर त्यांच्या धार्मिक समारंभांमध्ये करतात. हा पावा अमेरिकन बाल्ड ईगल आणि गोल्डन ईगल यांच्या लांब पंखांच्या अस्थिपासून करतात. याच्या ध्वनीने आत्मे आकर्षित होतात असा समज आहे. परंतु आता अमेरिकन बाल्ड ईगल आणि गोल्डन ईगल यांना संरक्षित पक्षी असा दर्जा देण्यात आलेला आहे.
5) Gajda / Goat Bagpipe – हं बरोबर ओळखलंत! एका मृत बोकडापासून बनवलेला बॅगपाईप. बोकडाचे डोके आणि खूर देखील त्याला जोडलेले असतात. बोकडाच्या पोटाची थैली ही पेटीच्या भात्यासारखी काम करते. (मीठ लावून बोकडाची पोटाची थैली वाळवली जाते.) अतिशय विचित्र दिसणारं तरीही अतिशय श्रवणीय आहे. युरोपातील बाल्कन प्रदेशात अधिक प्रसिद्ध आहे.
6) Ancient Sambuca – एक प्राचीन आशियाई वाद्य. फिनिशियन आणि ऍरेमाईक लोकांत प्रचलित असलेले. याचा उल्लेख बायबलमध्ये देखील आहे.
7) Lyre – मूळचे ग्रीक अतिप्राचीन वाद्य. ब-याच जुन्या ग्रीक चित्रांत हे वाद्य वाजवणारी माणसे दिसतात.
8) Mayan Clay Flute – आंजावर फारशी माहिती मिळाली नाही. मायन संस्कृतीत प्रचलित असलेल्या चीनीमातीपासून बनवलेल्या फ़्ल्यूटचा व्हीडीओ सोबत दिला आहे.
9) Beautiful girl playing an unknown instrument – नेटवर एवढीच माहिती दिसतेय. वाद्याचा काही उल्लेख नाहीये दिसत. पण ऐकण्यासारखे आहे. मला वाटतं टॅंक ड्रमच आहे.
10) Bellowphone - विकीवर काही माहिती उपलब्ध नाही. पण बहुतेक आधुनिक काळातील वाद्य आहे. शिट्ट्या मारल्यासारखा ध्वनी आहे. पण एकंदरीत आनंदी, उत्साही ध्वनी आहेत.
11) Tank Drum – रिकाम्या प्रोपेन टॅंकपासून बनवले जातात. त्याच्यावरती स्वराच्या कंपनानुसार विशिष्ट आकारात खाचा कापून तो तो स्वर निर्माण केला जातो.
या प्रवासात तुम्हांला देखील काही अपरिचित तरीही मधुर आवाजाची वाद्ये पहावयास मिळतील. ती येथे ऍडवलीत तर धन्यवाद.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9978
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह ! क्या बात है ! आवाडला
*आवडला
In reply to वाह ! क्या बात है ! आवाडला by उगा काहितरीच
दोन क्रमांकाचा हार्प ऐक!
In reply to वाह ! क्या बात है ! आवाडला by उगा काहितरीच
हा तो पण ऐकला. भारी आहे. (तसे
In reply to दोन क्रमांकाचा हार्प ऐक! by विजय पुरोहित
मस्त माहीती
हे मला आवडते
मस्तं लेख. ती हार्प वाजवणारी
Theremin
खरोखर अफलातून प्रयोग आहे...
In reply to Theremin by मराठी_माणूस
अनवट वाद्यांचा दृक्श्राव्य
धन्यवाद सर!तुमची आणि
In reply to अनवट वाद्यांचा दृक्श्राव्य by डॉ सुहास म्हात्रे
क्रमांक ९ चे वाद्य "हँग ड्रम
स्टील ड्रम हे वाद्य अक्षरशः
विजुभाऊ...
In reply to स्टील ड्रम हे वाद्य अक्षरशः by विजुभाऊ
लेखनाला अतिशय सुरेख विषय निवडलात.
बॅगपाईप ऐकताना आपल्या 'तारपा'
In reply to लेखनाला अतिशय सुरेख विषय निवडलात. by हकु
तारपा हे आपल्या भारतीय
In reply to बॅगपाईप ऐकताना आपल्या 'तारपा' by विजय पुरोहित
मस्त रे मांत्रिका.
खूप छान माहिती आहे. वा खू
मस्त धागा
हा धागा असा आहे की इथे
In reply to मस्त धागा by चौकटराजा
मस्त, यातले एखादे वाद्य सोडले
मस्तच लेख!
एवढी वाद्ये?
करताफुंकता येत नाही!साक्षात अन्नू मलिकचे एवढे घोर
In reply to एवढी वाद्ये? by अन्नू
.
In reply to साक्षात अन्नू मलिकचे एवढे घोर by विजय पुरोहित
वाह वा!!!
छान धागा
छान
छान
मरिंबा हे एक अफ्रिकन वाद्य
हा पहा मरिंबाचा आणखी एक
(No subject)
स्टील ड्रम चे हे आणखी एक
हा मिरिंबा चा ऑर्केस्ट्रा.
धन्यवाद विजुभाऊ!
In reply to हा मिरिंबा चा ऑर्केस्ट्रा. by विजुभाऊ
अतिशय सुंदर लेख
पुरोहित्जी, खुप छान लेख. खूप
सुरेख माहितीपूर्ण लेख !!!