मंडळी नमस्कार
माझ्या एका मित्राला करविषयक सल्ला हवा आहे ,आपण सुज्ञ जाणकार मिपाकर्स नक्की मदत कराल अशी अपेक्षा ...
मित्र परदेशी असताना काही रक्कम भारतात NRE अकाऊंट वर पाठवले होते . नंतर भारतात येवून ती रक्कम अन्य बँक मध्ये FD मध्ये गुंतवली ,कारण एनआरई बँक पेक्षा दुसरी बँक जास्त व्याज देत होती .
त्यातच निम्मी रक्कम त्याने आईच्या नावाने गुंतवली कारण सीनियर सिटीजन एफडी व्याजदर जास्त आहेत.
अशा सर्व परिस्थितीत आज तो टेंशन मध्ये आहे कारण एनआरई एफडी वरील व्याज करमुक्त असले तरी त्याने ती रक्कम तिथून काढून अन्य बँक मध्ये गुंतवली आहे कारण जास्त व्याजासाठी . तर आता नवीन बँक मधील एफडी वरील व्याज करपात्र असेल की करमुक्त ? याबाबत बँकेत चौकशी केल्यास समाधानकारक उत्तर मिळाले नाही .
*उत्पन्नाचा स्रोत NRE Money आहे , यास्तव काय करावे? विवरणपत्र भरून व्याज भरावे लागेल का? याबद्दल शक्य असल्यास मार्गदर्शन करावे ,ही नम्र विनंती !
धन्यवाद
वाचन संख्या
2835
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणत्या देशात राहतो
सौदी अरेबिया
In reply to कोणत्या देशात राहतो by श्रीरंग_जोशी
ओके
In reply to सौदी अरेबिया by रमेश भिडे
१. अनिवासी भारतियाने जवळच्या
दोन वर्षापूर्वी सौदी मध्ये
दोन वर्षापूर्वी सौदी मध्ये होता, सध्या भारतात आहेम्हणजे तुमचा मित्र सद्या अनिवासी भारतिय (एनआरआय) नाही असेच दिसत आहे. अनिवासी भारतीय व्यक्ती भारतात कायमची परत आल्यावर, तिचे शेवटचे अनिवासी (एनआरआय-पात्र) आर्थिक वर्ष संपले की, पुढची दोन आर्थिक वर्षे तिचे "रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट (RNOR)" असे स्टेटस असते... या दोन वर्षांत बँकेतले एनआरई खाते चालू ठेवता येते. ही सुविधा परदेशातून येणे असलेले पैसे (फायनल बेनेफिट्स, इ), परदेशातील गुंतवणूक भारतात आणणे, इ साठी असते. या दोन वर्षांच्या शेवटी (अ) सर्व एनआरई खाती बंद करावी लागतात (याला एफसीएनआरई फिक्स्ड डिपॉझिट्स अपवाद असतात व ती त्यांची मुदत पूर्ण होईपर्यंत चालू ठेवता येतात) , (आ) एनआरओ खाते ऑर्डिनरी एसबी मधे परावर्तित करावे लागते. यानंतर, सद्य नियमांप्रमाणे आयकर विभागाला न कळविलेली भारताबाहेरील सर्व संपत्ती अवैध ठरते. RNOR ची दोन वर्षे संपल्यानंतर, अर्थातच, ती व्यक्ती सर्वसाधारण निवासी भारतिय बनते व तिला सर्वसाधारण भारतियाचे सर्व करनियम लागू होतात. अजूनही बरेच परिस्थिती/व्यक्ती-सापेक्ष बारकावे आहेत, पण ते इथे लिहिणे क्लिष्ट होईल. मात्र, तुमचे वरचे विधान पाहता, तुमच्या मित्राला एनआरई नियमांसंबंधी अनुभवी सीए च्या सल्ल्याची गरज आहे असे वाटते आहे.धन्यवाद एक्का साहेब
१. सद्य आर्थिक वर्ष :
In reply to धन्यवाद एक्का साहेब by रमेश भिडे
उत्तम माहिती डॉक्टर् साहेब!
बिझनेस व्हिसावर (एकदा अथवा
In reply to उत्तम माहिती डॉक्टर् साहेब! by खेडूत
वाचतिये.
अधिक माहितीसाठी खालील दुवा