क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान
गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते)
गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो.
२००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत.
१) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता
२) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता
३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता
४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता
५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता
६) २०१४ - ?
आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला).
एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही.
यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत.
माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल.
स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.
१) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड
२) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान
३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज
४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका
५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका
७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान
८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका
९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज
१०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान
११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान
१२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड
१३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान
१४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
१५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज
१६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान
१७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका
१८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज
१९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया
२०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका
______________________________________________________________________
२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना
२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना
______________________________________________________________________२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना
______________________________________________________________________वर्गीकरण
वाचने
26012
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाण तू!!!!
Samuels पण गेला.
In reply to हाण तू!!!! by दिग्विजय भोसले
ते गेलं आलं
:)
In reply to ते गेलं आलं by जव्हेरगंज
घाई करू नये!
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:-(
In reply to घाई करू नये! by प्रदीप साळुंखे
अरे व्वा कोहलीने विकेट घेतली,
सोपा म्याच
हे आवाज वाढवनो बाॅल
नो बाॅल
तुज्या आईची!!!पंड्या
गेली तिच्या मारी !
चला चला मित्रांनो गाशा
च्यामारी पोपट झाला कि!!
चला गुंडाळा धागा
भेंडी
ऐसा क्या गुनाह किया जो लूट गए
खिक्क...
In reply to ऐसा क्या गुनाह किया जो लूट गए by दिग्विजय भोसले
पंड्या
हारले रे हारले... बिस्कीट
चला गवारी, पडवळ, दुध्या ...
गांडू बॉलर आहेत...
विंडीज खेळाडूंचे फटके पाहून
जस्ट चिल... ,चालायचचं
तरी बरं झेल पकडल्यावरच नो बॉल
अरारा, वाईट झाले!
ओवर कॉन्फिडेंस, डनिंग-क्रुगर इफेक्ट ?
हरल्याचे दु:ख झाले, पण
इतकाच मुद्दा पटला.
In reply to हरल्याचे दु:ख झाले, पण by श्रीगुरुजी
अजिंक्य रहाणेबद्दल सहमत नाही.
In reply to इतकाच मुद्दा पटला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल फटकेबाजी आवश्यक होती
In reply to इतकाच मुद्दा पटला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त!
In reply to इतकाच मुद्दा पटला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि हा प्रतिसाद जकातदार यांना
In reply to मस्त! by DEADPOOL
चला भरा पेग....
+1
In reply to चला भरा पेग.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेस्ट इंडीज जिंकणार...!!!
आज त्यांचा कोनाडा जिंकला
In reply to वेस्ट इंडीज जिंकणार...!!! by जव्हेरगंज
शेवटची ओव्हर म्हणजे 'आ बैल
नै तर काय
In reply to शेवटची ओव्हर म्हणजे 'आ बैल by जव्हेरगंज
विंडीज १५ षटकात ४ बाद १०४
नेट वरील एका मुलाचे मनोगत,