Skip to main content

मलपृष्ठ

लेखक अनाहिता यांनी सोमवार, 29/02/2016 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
"अनाहिताचा अंक तयार करायचाय!" या एका हाकेसरशी जगभरातून एकत्र आलेल्या मैत्रिणींच्या सामूहिक प्रयत्नांतून पूर्णत्वास आलेला अनाहिताचा आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष 'भटकंती विशेषांक - २०१६' आपल्यातल्या प्रत्येक हिरकणीस समर्पित!
संपादक - स्वाती दिनेश, मधुरा देशपांडे


अंकासाठी मोलाचं सहकार्य देणारी आमची संपूर्ण टीम इडलीडोसा, ईशा१२३, गिरकी, Mrunalini, पलाश, पिलियन रायडर, प्रश्नलंका, प्रीतमोहर, पूर्वाविवेक, पद्मावति, रेवती, सानिकास्वप्निल, सुरन्गी, अजया, पैसा, किलमाऊस्की, मधुरा देशपांडे, स्वाती दिनेश, पाहुण्या मैत्रिणी - आसावरी, मुग्धा, विकी तंत्रज्ञ - प्रशांत, नीलकांत QRCode #भटकंतीविशेषांक२०१६

वाचने 9711
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

__/\__

__/\__

एकदम व्यावसायिक सादरीकरण. जुन्या काळातल्या लिफाफ्यांसारखी किनार. सध्याच्या काळातले क्विक रिस्पॉन्स कोड. लै भारी. कल्पकता आवडली.

टेक्स्ट ओव्हरलॅप होत असल्यामुळे जरा मजा कमी झालीये. पत्ता लिहितो तसे छापील रेषांच्या वर सुलेखनाने नावे लिहिली असती तर अजून छान वाटले असते असे माझे वैयक्तिक मत.

In reply to by एस

टेक्स्ट ओव्हरलॅप कुठे दिसतंय? मोबाईलवर, काही स्पेसिफिक ब्राऊजर वर की कसं? म्हणजे तसं चेक करता येईल. कारण मलाही टेक्स्ट ओव्हरलॅप दिसत नाहीये.

In reply to by मधुरा देशपांडे

माझ्या मोबाइल ब्राउजरवर तसं दिसतंय. वरून दुसरी ओळ व खालच्या एका परिच्छेदाचीही ओळ पाकिटाच्या रेषांमध्ये मिसळलीयं. बाहेरही गेलीयं.

In reply to by एस

मी मोबाईलवर मोझीला, क्रोम आणि आय ई वर ओपन करुन पाहिलं. असं दिसतंय. फोनवरचा स्क्रिनशॉट असल्याने थोडं ब्लर दिसेल चित्रात. https://lh3.googleusercontent.com/-uUeGpD51Elg/Vt8i-McAfGI/AAAAAAAAFiU/MYIVvRuHQb8/s512-Ic42/SmartSelectImage_2016-03-08-14-03-29.png

अनाहिता रॉक्स !!

मस्त एकदम!

सगळ कस छान छान आणि शेवट तर फारच गोड. मधुरा आणि स्वाती ताई जिंकलात बर का तुम्ही. किलमाऊस्की तुझे सुद्धा विशेष कौतुक.

In reply to by एस

स्क्रीनशॉट्ससाठी धन्यवाद. तुमच्या फोनच्या स्क्रीनचे रिझॉल्युशन काय आहे. माझ्या फोनच्या स्क्रीनचे रिझॉल्युशन आहे 720 x 1280@294 PPI. मला ही समस्या अजिबात येत नाहीये.

In reply to by एस

फोनची कंपनी व मॉडेल चे नाव / क्रमांक वापरून जालावर त्याचे स्पेक्स शोधल्यास त्यामध्ये रिजॉल्युशनबाबत माहिती मिळेल. पूर्वी बर्‍याच वेबसाइट्सच्या फूटरमध्ये Best viewed in xxx * yyy असे लिहिलेले असायचे. त्या रिझॉल्युशनपेक्षा कमी रिझॉल्युशनच्या स्क्रीनवरून पाहिल्यास दृश्यमानतेच्या बाबतीत तडजोड होऊ शकते याची ती सूचना असायची. आता तसा उल्लेख फारसा दिसत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

रिझॉल्यूशन फक्त ४८० × ८५४ आहे! (स्वगत : एस, गड्या तू आणि तुझा फोन, दोन्ही आउटडेटेड झालेत की रे!)

In reply to by एस

फोन आडवा धरल्यास या विशेषांकाचे वेबपेज असेच दिसते का? देवनागरी लिपीत मजकूर असणारे वेबपेजेस मी बहुतेक वेळी फोन आडवा करून वाचत असतो.

In reply to by एस

:( काय प्रॉब्लेम असू शकतो माहित नाही. कारण बाकी कुणालाच असे दिसत नाही. वेगवेगळे मोबाईल, टॅब, लॅपटॉप यावर जमेल तसे अंक प्रकाशित होण्यापूर्वी टेस्ट केले होते. पण तरीही काही अपवाद असू शकतात असे दिसते. त्यामुळे तुर्तास तरी असे का दिसते याचे उत्तर देऊ शकत नाही.

हा अंक अगदी व्यवसायिक सफाईने सादर केला आहे.