Skip to main content

काय घेतलं, काय राहिलं?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 22/03/2016 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिखाण पर-प्रकाशितच. कुणी अनामिकाने* लिहिल्यानंतर WhatsApp वर आलेल्या एका स्फुटाला मुक्तकाचं रुप द्यावंसं वाटलं, दिलं. काय घेतलं, काय राहिलं? पर्स, फोन, किल्ल्या हाती आई निघे पोटासाठी पगार मिळेल हातात कसे यावे शब्द ओठी 'सगळं घेतलंय दिवसासाठी', तान्हं बाळ घरात! मंडप जेंव्हा होतो रिता आईचे डोळे आभाळ ओले रिक्त खुर्च्या, आणि अक्षता इतस्ततः पसरलेले 'काय राहिले' शोधी पिता गौरीहाराशी मलूल फूले 'सारंच तर मागे राहीलंय आता!' आईची धडाडणारी चिता स्मशान हळू रिकामे झाले आवेगाने तो मागे फिरता "काय राहीले?" भटजींंनी विचारले चिमूटभर राख लागे हाता "राहीलेले येणे नाही, किती दूर निघून गेले!" ------------------ *मूळ लेखक बहुतेक श्री. योगेश जोशी हे असावेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4538
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

वाऱ्याने उधळवून लावलेल्या फुलांना वेचून माळ गुंफावी यातच त्यांच्या सुगंधाचे खरे सार्थक असते. अगदी, त्याचप्रमाणे तुम्ही छान सर्व शब्दांना एका धाग्यात आणून सुंदर शब्दमाळच गुंफली आहे! बाकी, शिर्षक वाचून वाटलं की, गुलजार यांच्या "क्या बीता, क्या रख्खा!" या कवितेवरच काही लिहिलं आहे! Sandy

In reply to by योगसाधना

एवढे सुंदर मुक्तक लिहिणारे मिपाकर आहेत हे वाचून बरं वाटलं. मलाही व्हॉट्स अ‍ॅपवर हे फॉर्वर्ड आलं होतं, तुमच्या नावासकट. मात्र कसं काँटॅक्ट करावं कळले नाही. ब्लॉगवर लिहिता तसे मिपावरही लिहा प्लीज. बहुगुणी, मूळ आशय कवितेच्या माध्यमातून जसाच्या तसा पोचवलात!

.

अत्यंत त्रासदायक..

शेवटचा परिच्छेद....कोणावरही, कधीही ही वेळ न येवो....

जबरी लिहीले आहे!

:(

गोष्टींचे मोल नसल्यावरच जाणवते (हा नियतीचा खेळ की माणसाचा करंटेपणा) अजून उत्तरे शोधतोय.. रचना आत हाडापर्यंत जाणार्या थंडीसारखी.

......

मूळ लेख आणि काव्यरूप दोन्ही चटका लावणारे !