Skip to main content

कळण (अत्यंत पौष्टिक)

लेखक समिधा
मंगळवार, 13/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
विवरण: हि पाकृ. खूप पौष्टिक आहे कारण कळण हे मटकी शिजवलेल्या पाण्या पासुन केले जाते आणि मटकी शिजवल्यावर त्यातिल सत्व पाण्यात राहते. विशेषतः लहान मुलांना हे पचण्यास हलके आहे. KaLaN साहित्य: भिजवलेली मटकी पाव किलो ओले खोबरे १/२ वाटी ताक १/२ वाटी (ताक आंबट नसावे) लसुण ४पाकळ्या तुप १ चमचा जिरे १/२ चमचा हिंग १/४ चमचा मिरचि १ कडिलिंब मीठ ,साखर चविनुसार कोथिंबीर कृति: भिजवलेली मटकी कुकर मध्ये शिजवुन घ्यावी मटकीतील पाणी काढुन घ्यावे (उरलेल्या मटकीची उसळ /मिसळ करावी ) त्या पाण्यात ताक मिसळावे नंतर त्यात खोबरे मिसळावे मीठ ,साखर घालावे नंतर त्यावर तुपाचि जिरे,हिंग, मिरचि,कडिलिंब,लसुण घालुन फोडणी करुन घालावी. मग कणळ उकळावे. वरुन कोथिंबीर घालावी . गरमा गरम प्यावे. अथवा भाता बरोबर खावे.

वाचने 6410
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कळण हे भारतीय सुपच म्हणावे लागेल. मटकीचे कळण चवदार तर होईलच पण असेच कांहीसे मुगाचे, मसुराचेही करतात. तेही मस्त लागते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

कुळथाचेही कळण करतात कोकणात. L) पुण्याचे पेशवे Since 1984

फारचं छान नि पौष्टिक आहे...... ---वल्लरी

In reply to by प्राजु

वाह! सुंदर कल्पना.अशा तर्‍हेने न आवडणार्‍या भाज्याही खाल्या जातील. A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others.

पौष्टिक आणि सोपे. (प्राजु - ताक घालून भाज्यांच्या साराचीही कल्पना मस्त आहे.)

मी कुळथाचे पिठल करते.आता कळण करुन बघेन. प्राजु तुझी कल्पना ही आवडली.

कुळथाचं कळण खरंच अप्रतिम लागतं. आणि पोष्टीक तर असतंच. आपला, केवळ कुळथाचं कळण खाणारा (कोकणातला) व्यंकु

In reply to by व्यंकु

तोन्दाला पानी सुतल्येय्.....राजापुरात चला... चुचु

In reply to by विसोबा खेचर

मी सुद्धा वा र लो!!! =)) (स्वगतः काकूपासून दडवल्या पाहिजेत ह्या व्हेरियस कळणांच्या पाककृती!!!! तात्या, असा एखादा पेरेन्ट्रल कंन्ट्रोलप्रमाणेच "हजबंड्रल कंट्रोल" शोधून काढायला सांगा ना नीलकांताला!!!!)