Skip to main content

छगन भुजबळांच्या निमित्ताने...

लेखक अर्धवटराव यांनी बुधवार, 09/03/2016 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
छगन भुजबळांच्या मागचा एसीबी सामेमीरा हटायचे काहि लक्षण दिसत नाहि. त्यांना आता कोर्टाने समन्स बजावला म्हणतात. यामागे काय राजकारण असायचं ते असु दे. राज्यसरकार, बारामतीकर, भाजपा-काँग्रेसचे स्टेकहोल्डर्सचा या प्रकरणातला सहभाग पण वेगळा विषय आहे. मला प्रश्न पडलाय हे असे घोटाळे (झाले असतीलच तर) होतात तरी कसे. सरकरी कंत्राटं मिळवायचे, त्यांचा निधी बनावट कंपन्यांकडे वळवायचा, तो परत लेजीटीमेट कंपन्यांना ट्रान्स्फर करायचा. या सगळ्या प्रकरणात नेमका पैसा कसा आणि कुठे मुरतो ? बनावट कंपन्या म्हणजे नेमकं काय तयार करतात हे लोकं ? कुठेतरी त्याचं रजीस्ट्रेशन होतच असणार ना ? लाचलुचपत शोधायला काय टेक्नीक वापरतात? साधं हौसींग लोन घेतो म्हटलं तर एल.आय.सी, एस.बी.आय हज्जारदा कागदपत्रं चेक करतात आपले. मग इतक्या मोठाल्या रकमांचे ट्रान्स्फर्स कुठेही ट्रेस न ठेवता, कुठेही तपासल्या न जाता होतातच कसे? नेमके काय लूपहोल्स असतात सिस्टीममधे जे या प्रकरणात प्रथमदर्शनी एक्स्प्लॉइट केल्या गेले ? आणि मुख्य म्हणजे, गोष्टी या थराला जात पर्यंत उजेडात येत कशा नाहित? आणि बरच काहि...

वाचने 15892
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

अगदी सामान्य माणूस असाल तर कंपनीसाठी आयएसओ पासून सगळी प्रमाणपत्रे दहा-विस हजारात फक्त फोनवर मिळतात. मी सामान्यच आहे माझी प्रत्यक्षात कंपनी (प्रॉप फर्म) अस्तित्वात आहे याची बहुतांशाना कल्पनाही नाही हे व्यावसायिक गुपित अतिशय उघड आहे. आता मीच अधिकृत सर्वेसर्वा असल्याने निव्वळ त्याबेसिस वर आयेसो सर्टिफिकेट कसे मिळवु ? व्यनी केलात तर बरे होइल. खुप चांगली कामे हातची जातात हो याकारणाने

सहकारी संस्था काढून त्या चालवणे हे काँग्रेस+राष्ट्रवादीकडून शिकावं(हा उपरोध नाहीये) खरंय ,नाशिक जिल्हा मध्यवर्ती आणि धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघून ह्याची साक्ष येते

हा हा हा हे म्हणजे डाव्या आघाडीने अभाविप ची तक्रार भागवतांकडे करण्यासारखे आहे।

विजय मल्या बुडाले डेक्कन एअरवेज च्या खरेदीत.. तोट्यात चालणारी डेक्कन खरेदी केली आणी गाळात गेले. या मागे डेक्कनच्या आडुन पब्लिक इश्यु काढणे कारण होते ..पण.. जाऊद्या लै मोठा इषय आहे..

सरकरी कंत्राटं मिळवायचे, त्यांचा निधी बनावट कंपन्यांकडे वळवायचा, तो परत लेजीटीमेट कंपन्यांना ट्रान्स्फर करायचा. या सगळ्या प्रकरणात नेमका पैसा कसा आणि कुठे मुरतो ? बनावट कंपन्या म्हणजे नेमकं काय तयार करतात हे लोकं ?
मला वाटतं की भुजबळ प्रकरणात बनावट कंपन्या नसून वेगळाच प्रकार आहे. मंत्र्यांना सार्वजनिक कामे टेंडर बघूनच देता येतात व स्वतः किंवा स्वत:चे जवळचे नातेवाईक ज्या कंपन्यात आहेत अशा कंपन्यांना डायरे़क्ट काम देता येत नाही. त्यामुळे भुजबळांनी एक युक्ती केली. त्यांनी बरीचशी कामे चमणकर नामक एका व्यक्तीच्या कंपनीला मिळवून दिली. चमणकर कागदोपत्री भुजबळांशी संबंधित नव्हता. त्यामुळे स्वतःच्या नातेवाईकांना खिरापत वाटण्याची अधिकृत समस्या नव्हती. परंतु चमणकरांनी आपल्याला मिळालेल्या कामाची सबकंत्राटे ज्या कंपन्यांना दिली त्या कंपन्या भुजबळांचे चिरंजीव, पुतणे, सूनबाई इ. च्या मालकीच्या होत्या. त्यांना सबकंत्राटे दिली असल्याने व मुख्य कंत्राट चमणकरांना दिले असल्याने (आणि ते भुजबळांचे नातेवाईक नसल्याने) कायदेशीर दृष्ट्या समस्या नव्हती. चमणकरांनी जी जी बिले लावली ती ती मंजूर केली गेली व तो पैसा प्रत्यक्षात सबकंत्राटामुळे भुजबळांच्या कुटुंबातच आला. हे सर्व होत असताना कामाचा दर्जा खराब राहिला.

अवांतर : मल्ल्या सटकला इंग्लंडला तो जिवंत राहण्यासाठी. अन्यथा त्याचा दाभोलकर झाला असता. कारवाईच्या वेळेस छगनबाप्पा अमेरिकेत होते. बहुधा स्वत:चा जीव वाचवायची धडपड करीत असावेत. भांडं फुटल्यावर वेळ घालवायचा नसतो. घोटाळेबाजांची कार्यपद्धती एकंच असावी हा योगायोग नाही. -गा.पै.

म्हणजे दाभोळकरांना त्यांनि बुडविलेल्या कर्जा करता मारण्यात आले ? तुमच्या प्रतिसादातुन असेहि दिसतय कि आशि कुठलि यंत्रणा ह्या देशात आहे जि घोटाळे बाजांना कायद्याच्या तर्‍हेने नाहितर आपल्या पध्दतिने शिक्षा देते. म्हणजे हि जि काहि यंत्रणा / व्यवस्था आहे ति कायद्याच्या वर आहे ?

होबासराव, दाभोलकरांना कितीतरी बेहिशोबी पैसा मिळत होता. कशावरून हेच त्यांच्या हत्येचे कारण नसेल? बेईमानीच्या धंद्यात सर्वात जास्त इमानदारी लागते. त्यांना 'शिक्षा' देणारी यंत्रणा वगैरे काही आहे का ते मला माहीत नाही. पण भारतात काही लोकं कायद्याच्या वर आहेत हे नक्की. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दाभोलकरांना कितीतरी बेहिशोबी पैसा मिळत होता. साहेब, तुम्ही आधीपण एकदा हे लिहिलं होतं. काही सदस्यांनी पुरावा मागितल्यानंतर तुम्ही तो आजपर्यंत दिलेला नाही. काय मिळतं हो बदनामी करून ? का करताय असं ?

In reply to by नाव आडनाव

नाव आडनाव, केंद्रीय गृहखात्याचे राज्यमंत्री श्री किरण रिजीजू यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे लेखी उत्तरात कळवले आहे. हे झालं ३ डिसेंबर २०१५ रोजी. पुढे लगेचच २७ तारखेला दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यांना धमकीचे लघुसंदेश (एसेमेस) आले आहेत. हा नक्की काय प्रकार चाललाय? केंद्रीय गृहखात्यास कोण बरे जुमानत नाही? दाभोलकरांच्या संस्थांचे हिशोब धर्मादाय आयुक्तांकडे का सादर झालेले नाहीत? का करताय असं, म्हणून तुम्ही विचारलंय. त्याचं उत्तर म्हणजे दाभोलकर मेल्याचं दु:ख नाही, पण हिंदुद्रोही सोकावतात. या हत्यांच्या आडून हिंदुत्ववाद्यांना तुरुंगात पाठवायचा डाव कशावरून शिजत नसेल? आ.न., -गा.पै.

In reply to by नाव आडनाव

गामा साहेब, मी विज्ञानदिनाच्या धाग्यात तुंम्हाला दाभोळकरांबाबतचा तुमचा दृष्टीकोन असा का अाहे, हा प्रश्न विचारला होता. तिकडे अजून उत्तराची वाट पहात होतो, तेवढ्यात इथेही तुंम्ही पुन्हा दाभोळकरांवर अनाठाय़ी टीका केलेली अाहे. बघा, विचार करा.

In reply to by नाव आडनाव

गामा साहेब, मी विज्ञानदिनाच्या धाग्यात तुंम्हाला दाभोळकरांबाबतचा तुमचा दृष्टीकोन असा का अाहे, हा प्रश्न विचारला होता. तिकडे अजून उत्तराची वाट पहात होतो, तेवढ्यात इथेही तुंम्ही पुन्हा दाभोळकरांवर अनाठाय़ी टीका केलेली अाहे. बघा, विचार करा.

सोनिया आणि राहूल गांधीच्या हेराल्ड केसच काय झाल? निवडणूकपुर्वी एकमेकांविरुध्द गरळ ओकणारे निवडणूकनंतर मुग गिळून गप्प का?

१ फेब्रुवारीला पुतण्या आत गेला आणि आता काल काकाही आत गेले. हे पुढे जामिनावर सुटोत वा निर्दोष सुटोत, निदान काही दिवसांपुरते तरी तुरूंगात वास्तव्य करावे लागले ही आनंदाची गोष्ट आहे. दोषी ठरले तर उत्तमच. काल व्हाट्सअ‍ॅपवर सोमय्यांची प्रतिक्रिया फिरत होती - "थकाळी अक्रापाथून थगन भुजबळांची थौकशी थुरू आहे."

त्यांच्या कडून किती हजार कोटी रुपये सरकार वसूल करू शकेल हा खरा मोठा प्रश्न आहे. ते नुसते जेल मध्ये बसून मानसिक समाधान मिळवण्या पेक्षा सरकार त्यांच्या कडून पैसे वसूल करू इच्छिते आहे का ? का दीड लाख कोटी रु खाऊन हसन आली जसा आता बाहेर आहे, तसेच हे पण बाहेर येणार ?

In reply to by अभिजित - १

राजकीय भ्रष्टाचार दुर्मिळात दुर्मिळ गुन्हा ठरवून भ्रष्टाचाराला हिच शिक्षा हवी जो पर्यंत पैसा व्याजासकट वसूल होत नाही तोपर्यंत तुरुंगवास

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊ भावना पोहोचल्या.. पण जेल मध्ये राहून भुजबळ किंवा अन्य कोणी गुन्हेगार पैश्याची व्याजासकट वसुली कशी करून देईल हे जरा सांगाल का ? सक्तीच्या मजुरी द्वारे मिळणारा पैसा इतका असतो ???

Following Somaiya’s complaint, the ACB conducted a discreet inquiry and submitted a report to the government on October 14, 2014, a day before Maharashtra went to polls. On October 22, even as the BJP was contemplating an offer of “unconditional” outside support from the NCP, the Home Department sanctioned an open inquiry. आता समजतंय १९ ऑक्टोबर २०१४ या विधानसभा मतमोजणीच्या दिवशी काकांनी घाईघाईत पत्रकार परीषद बोलावून भाजपने न मागता सुद्धा बिनशर्त पाठिंबा का जाहीर केला ते. एसीबी च्या अहवालात काय आहे ते काकांपर्यंत गेले असणारच. सुदैवाने भाजपने राकाँचा पाठिंबा नाकारलाही नाही आणि स्वीकारलाही नाही आणि त्याबाबत मौन पाळून पाठिंब्याच्या ऑफरचा शिवसेनेला नमविण्यासाठी अचूक उपयोग करून घेतला.

फारच विदारक परिस्थिती आहे. छगन भुजबळ भ्रष्टाचार केला म्हणून आत गेलाय. आणी इकडे लोकांनी रस्ते अडवले, पेटते टायर रस्त्यात टाकले, बंद पाळला. भ्रष्टाचार करून देखील ह्या माणसाला इतके समर्थन? खरच विचार करून करून डोके फिरायची वेळ आलीय.

शेतीचे नविन तंत्र -सुप्रिया शेती शेती करावी तर सुप्रियाताई सुळे सारखी. सौ. सुप्रियाताई सुळे बारामती मतदार संघातून निवडणूक लडवत असून त्यांचा मूळ व्यवसाय शेती दाखवलेला आहे . त्यांचेकडे फक्त १० एकर शेती असूनही त्यांनी यामध्ये तब्बल ११३ कोटी रुपये कमावले .याच शेतीमधील उत्पादन २००९ च्या निवडणुकीमध्ये दाखवले होते ५२ कोटी रुपये, मात्र २०१४ ला ते झालेत तब्बल ११३ कोटी म्हणजे ६१ कोटी केवळ ५ वर्षात १० एकरात कमावले म्हणजे त्या नक्कीच शेतीत काहीतरी जादू करत असणार. इकडे विदर्भात मात्र २० एकर वाले शेतकरीसुद्धा कर्जबाजारी होवून आत्महत्या करत आहेत. त्या सर्वांना सुप्रीयाताईकडून कमीत कमी जागेत भरघोस नफ्याची शेती कशी करावी हे तंत्र शिकण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यावेळी ताईना हात जोडून एकच विनंती कि तुमच्याकडील शेती एवढी नफ्यात असेल तर विदर्भातीलच नवे तर तमाम भारतातील शेतकर्यांना या जादूच्या शेतीचे रहस्य, तंत्र किंवा माहिती सांगावी. म्हणजे या देशातील दरिद्री शेतकरी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतील. " . . . .

In reply to by बबन ताम्बे

आहेच. आणि मुळात नुसता कर काय ? उत्पन्न आले कुठून हा पण मोठा प्रश्न आहे. अर्थात जेटली ची काही तिथे लक्ष द्यायची हिम्मत नाही. हा .. तुम्ही बँक FD वरचा काही हजार रुपये उत्पन्न असून त्याच्या वर tax भरला नाही तर मग मात्र तुमची खैर नाही.

In reply to by अभिजित - १

स्टेट बँकेकडून २०११ साली घेतलेल्या फ्लेक्सी बाँडचे व्याज पाच वर्षांनी बँक अकाउंट मधे जमा झालेय. त्यावरही कर द्यावा लागणार आहे.

In reply to by बबन ताम्बे

असं नाही. स्वत: शेती करून पैसे मिळवले तर कर नसतो.कोणाकडून करून घेण्याचा करार सापडला तर कर लागतो. प्रचंड अनाकलनीय रक्कम सिद्ध करावी लागते.बियाणे कितीचे,खत कितीचे,वाहतूक करून कुठे विकले ,त्या दिवशी किती भाव होता,पेरले कधी आणि कापणी कधी केली,किती मजूर लागले वगैरे बिलं ,पावत्या मागितल्या तर दाखवाव्या लागतात.

काही लोक श्रीमंत झाले तरी पैसे रिचवण्यात कच्चेच असतात.दीड शहाणे अकाउंटंट त्यांना सल्ले देतात कसा कर वाचवायचा ते.तर काहीवेळा दिडशहाणे श्रीमंत लोक चांगल्या प्रामाणिक सिएची सर्वीस घेऊन त्यालाच डुबवायला बघतात.मग तो सीए त्याला एका झटक्यात वठणीवर आणतो.वेळ आली की ------