Skip to main content

राष्ट्रपाव

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 02/03/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
उ.ठाक्रे: माध्यमं कधी शिवसेनेची चांगली कामे दाखवत नाही. खरे बोलले. शिवसेनेने किती चांगली कामे केली आहेत. मरगळलेल्या मराठी माणसाला बलशाली बनवलं. उद्द्यमशील बनवता बनवता उत्सवशील बनवलं. त्या उत्सवास सहृदयतेने निरपेक्ष मदत न करणार्‍यास योग्य ती मायेची समज देण्याइतकं कनवाळू बनवलं. आपल्या हक्कांसाठी जागरुक राहायला शिकवलं. माध्यमं: शंभर वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वडापाववाल्याला बांबूने मारहाण केली. मला काथ्याकूट करायची हुक्की आली, उचकी आली. कारण का तर हा प्रश्न दारूच्या ग्लासात बर्फाच्या जागी पडला होता. ही माध्यमं बेणी नेअमी चुकीच्या बातम्या का ब्रे देतात? मंडली, हाय काय उत्तर? (धागा राजकिय नाही. गैरसमज करुन घेऊ नये. भावना दुखावल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल) - (कुठलाही जोक न मारणारा) तर्राट जोकर

वाचने 18562
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
ओवेशी?? शेपूट वाकडचं असतय,सरळ होत नाही.

ह्या प्रसंगा अगोदर एकंदरित थोरले ओवैसी उर्फ़ असदउद्दीन ओवैसी ह्यांच्या बद्दल एक कुतूहल असे. त्यांना मिळालेली संसदरत्न पुरस्कार. अभ्यासु प्रश्न. त्यांनी एका जाहिर टीवी चर्चेत उडवलेल्या पाकिस्तानी प्रवक्ते अन एजेंडाच्या चिंध्या (ह्यावेळी त्यांच्यासोबत किर्ती आझाद सुद्धा होते) , त्यांचा घटना अन कायद्याचा अभ्यास ह्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत जरी नाही तरी माफक आदर निर्माण झाला होता हे मान्य केलेच पाहिजे मला. एकंदरित तर्क कायदेशीर भाषेत बसवुन बोलणारा किंवा हिंदुस्तानी मुसलमान आपले प्रॉब्लम स्वतः हाताळु शकतात असे म्हणणारा म्हणूनही आदर होता. पण ह्या प्रकारात मात्र ओवैसी हे कायदा अन घटनेच्या आडून आपला उजवा एजेंडा राबवत आहेत असे वाटते. कुरआन मधे अल्लाह सोडुन कोणाच्या पूजनाची परवानगी नाही (ऐकिव माहीती) हा तो एजेंडा होय, ह्याला कायदेशीर अन घटनात्मक मुलामा चढ़वायला त्यांनी "घटनेत कुठेही 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलेले नाही, तसेच आपला 'हिंदुस्तानी मुसलमान' हा एसेंस अबाधित ठेवायला भाषणाची सांगता 'जय हिंद' केली आहे हे इथे ठळकपणे जाणवले तरी, त्यांचा मुळ मुद्दा हा नसुन हल्लीच रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी केलेल्या 'तरुण मुलांना जय हिंद म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधानाचा विरोध हा आहे. हिंदुस्तानी मुसलमान भारताला(च) आपला देश मानतात अन इमान राखतात हा त्यांचा मुद्दा इतरवेळी योग्य वाटत असला तरी ह्या विशिष्ट प्रसंगी त्यांचा एजेंडा हा फ़क्त संघाच्या सर्वेसर्वा ने दिलेल्या विधानात कुसपटे काढणे होय असे जाणवते, थोड़े 'भारत माता की जय म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधाना बद्दल भागवत जे म्हणाले आहेत ते मुळात चुक नाही , पण त्याचे डिटेल्स सुद्धा आले पाहिजेत, भारत मटैक्स की जय म्हणायला मी सुद्धा माझ्या संतती ला नक्कीच शिकवेल, पण लोकसमुच्चयाचा विचार करता, सगळ्यांना मुळात मनःपूर्वक भारत माता की जय म्हणावे वाटले पाहिजे तसे प्रेरणादायी अन निकोप वातावरण पाहिजे हे ही ह्या निमित्ताने अधोरेखित करतो, त्याच्यात जबरदस्ती नको, भारत माता की जय विधानाच्या समर्थनार्थ जर *तमाम राष्ट्रप्रेमी लोकं आक्रस्ताळे अन साचेबद्ध नारे देऊ लागले तर तोंडघशी पडतील अशी भीती ह्या निमित्ताने वाटते, इथे जिंगोइसम उपयोगी नाही कारण गाठ एका कायदा पुढे करणाऱ्या अन ह्या विशिष्ट प्रसंगी लुच्चेपणा करणाऱ्याशी आहे हे भावनवेगात विसरून चालण्यासारखे नाही असे फील होते. *संदर्भ :- उत्तरेकडल्या कुठल्यातरी एका भाजयुमो नेत्याने 'ओवैसीची जीभ कापून आणून देणाऱ्यास एक कोट रूपये देऊ' अशी घोषणा करून एका राष्ट्रिय वृत्तवाहिनी वर तो आकड़ा टाकलेला चेक फड़कवला आहे, असे करून उपयोग नाही असे म्हणायचे आहे

In reply to by नाना स्कॉच

भारत मटैक्स की जय असे टंकन अनवधानाने झाले असुन ते भारत माता की जय असे वाचले जावे ही विनंती

ह्या प्रसंगा अगोदर एकंदरित थोरले ओवैसी उर्फ़ असदउद्दीन ओवैसी ह्यांच्या बद्दल एक कुतूहल असे. त्यांना मिळालेली संसदरत्न पुरस्कार. अभ्यासु प्रश्न. त्यांनी एका जाहिर टीवी चर्चेत उडवलेल्या पाकिस्तानी प्रवक्ते अन एजेंडाच्या चिंध्या (ह्यावेळी त्यांच्यासोबत किर्ती आझाद सुद्धा होते) , त्यांचा घटना अन कायद्याचा अभ्यास ह्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत जरी नाही तरी माफक आदर निर्माण झाला होता हे मान्य केलेच पाहिजे मला. एकंदरित तर्क कायदेशीर भाषेत बसवुन बोलणारा किंवा हिंदुस्तानी मुसलमान आपले प्रॉब्लम स्वतः हाताळु शकतात असे म्हणणारा म्हणूनही आदर होता. पण ह्या प्रकारात मात्र ओवैसी हे कायदा अन घटनेच्या आडून आपला उजवा एजेंडा राबवत आहेत असे वाटते. कुरआन मधे अल्लाह सोडुन कोणाच्या पूजनाची परवानगी नाही (ऐकिव माहीती) हा तो एजेंडा होय, ह्याला कायदेशीर अन घटनात्मक मुलामा चढ़वायला त्यांनी "घटनेत कुठेही 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलेले नाही, तसेच आपला 'हिंदुस्तानी मुसलमान' हा एसेंस अबाधित ठेवायला भाषणाची सांगता 'जय हिंद' केली आहे हे इथे ठळकपणे जाणवले तरी, त्यांचा मुळ मुद्दा हा नसुन हल्लीच रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी केलेल्या 'तरुण मुलांना जय हिंद म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधानाचा विरोध हा आहे. हिंदुस्तानी मुसलमान भारताला(च) आपला देश मानतात अन इमान राखतात हा त्यांचा मुद्दा इतरवेळी योग्य वाटत असला तरी ह्या विशिष्ट प्रसंगी त्यांचा एजेंडा हा फ़क्त संघाच्या सर्वेसर्वा ने दिलेल्या विधानात कुसपटे काढणे होय असे जाणवते, थोड़े 'भारत माता की जय म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधाना बद्दल भागवत जे म्हणाले आहेत ते मुळात चुक नाही , पण त्याचे डिटेल्स सुद्धा आले पाहिजेत, भारत मटैक्स की जय म्हणायला मी सुद्धा माझ्या संतती ला नक्कीच शिकवेल, पण लोकसमुच्चयाचा विचार करता, सगळ्यांना मुळात मनःपूर्वक भारत माता की जय म्हणावे वाटले पाहिजे तसे प्रेरणादायी अन निकोप वातावरण पाहिजे हे ही ह्या निमित्ताने अधोरेखित करतो, त्याच्यात जबरदस्ती नको, भारत माता की जय विधानाच्या समर्थनार्थ जर *तमाम राष्ट्रप्रेमी लोकं आक्रस्ताळे अन साचेबद्ध नारे देऊ लागले तर तोंडघशी पडतील अशी भीती ह्या निमित्ताने वाटते, इथे जिंगोइसम उपयोगी नाही कारण गाठ एका कायदा पुढे करणाऱ्या अन ह्या विशिष्ट प्रसंगी लुच्चेपणा करणाऱ्याशी आहे हे भावनवेगात विसरून चालण्यासारखे नाही असे फील होते. *संदर्भ :- उत्तरेकडल्या कुठल्यातरी एका भाजयुमो नेत्याने 'ओवैसीची जीभ कापून आणून देणाऱ्यास एक कोट रूपये देऊ' अशी घोषणा करून एका राष्ट्रिय वृत्तवाहिनी वर तो आकड़ा टाकलेला चेक फड़कवला आहे, असे करून उपयोग नाही असे म्हणायचे आहे

शिवसेनेने केली अंध विद्यार्थ्याला मदत - हि बातमी आम्ही शेर करणार नाही. शिवसेना आमदाराची महिला कर्मचार्याला मारहाण हा विदिओ मात्र १०० वेळा शेर होणार. ह्यांत आश्चर्य काहीच नाही. कुत्रा माणसाला चावला हि बातमी होत नाही, माणसाने कुत्र्याचा चावा घेतला हि बातमी बनते. ज्या गोष्टीत "Information gain" जास्त आहे ती बातमी बनते. नरेंद्र मोदिनी ढोकळा खाल्ला हि बातमी नाही पण नरेंद्र मोदिनी खाल्ला बीफ पकोडा हि फार मोठी बातमी आहे करण ह्या दुसर्या बातमीत पहिल्या बातमी पेक्शा जास्त माहिती दडलेली आहे. मिडीयाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेनेला किंवा इतर कुणाला कितीही वायीत तर्हेने दाखवले तरी शेवटी मत देताना लोक इतर अनेक विषयांचा विचार करून देतात. मिडीयाला लोक भाव देत असते तर आज राहुल पंतप्रधान आणि मोदी जेल मध्ये असते.

In reply to by साहना

तुम्ही त्या महिला कर्मचार्‍याला कुत्रा म्हणत आहात काय? बाकी शिवसेना राडेबाजी, मारहाणीशिवाय अजुन कशासाठी प्रसिद्ध आहे?

ओवेसीचे पाकिस्तान्यांना सडेतोड उत्तरः हे विडियो इथे शेअर करण्याचे कारण फक्त एवढेच की माध्यमात नेहमीच ह्या बातम्या येत नाहीत. ओवेसीची ही पण बाजू मांडली गेली पाहिजे असे वाटते. मला कुणाचाही पुळका नाही, बस कोणाबद्दल जजमेंटल होऊ नये असे वाटते. बाकी ज्याच्या त्याच्या राजकारणाप्रमाणे भ्डकाऊ भाषणे करणे ह्या देशात कोणत्याच धार्मिक-जातीय नेत्याला वर्ज्य आहे असे वाटत नाही.

In reply to by तर्राट जोकर

हाउ रे हौले! उने हैदराबादी हिंदी बोलरे यारो! क्या की किरकिरी! ऐसे आदमी कु जज करनेवालो कु मई घफला बोलेला जैसे यारो! पैराडाइस के बिरयानी की कसम!!.

व्वा वा मस्त चर्चा ओवेसींची दुसरी बाजू पण तपासली पाहिजे,हे यानिमित्ताने सांगू इच्छितो. बाकि स्काॅचराव आणि जोकरराव यांच्या मुद्दे मांडण्याच्या पद्धतीमध्ये,विचारांमध्ये बरीच समानता आढळते.

कन्हया खतम, अब ओवेसी शुरु. गौमातासे आगाज हुवा, अब अंजाम-ए-सफर क्या होगा. पांच साल जब खत्म होंगे, वजह-ए-फकर क्या होगा

राष्ट्रशॉपः
फोटोशॉप वापरुन राष्ट्रीय नेत्यांची यथेच्छ खिल्ली उडवायची मुभा आहे.
फक्त संघ व भाजप यांचे सोडून. अन्यथा अटक होऊन जेलमधे जाल.

In reply to by तर्राट जोकर

नाशिकला एक फरशीवाले बाबा म्हणुन कोणी आहेत. ते काविळीवर औषधोपचार करतात. (अजुन कृष्णजन्मभुमीमधे गेले नसतील तर) जवळ पडेल तुम्हाला. लवकर बरे व्हा बरं. आपल्या पिवळ्या डोळ्यांचा रंग लवकर उतरो, आपल्या प्रकृतीस लवकर उतारा पडो ह्यासाठी त्र्यंबकेश्वर समर्थ आहेचं. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला का मिरच्या झोंबल्यात कॅप्टन? वैयक्तिक हल्ले करत आहात म्हणून म्हटलं. असे कुजकट हल्ले करण्याची मुभा आणि आयडी तरीही शाबूत राहण्याची तुम्हाला इमुनिटी प्राप्त असावी. बाकी मुद्दे नसले की लोक वैयक्तिक विखार दाखवतात हे आता सवयीचं झालंय.

In reply to by तर्राट जोकर

कुठाय बॉ वैयक्तिक हल्ला? वैयक्तीक हल्ला पहायचा असेल तर आपण तुडतुडी तैंची खरडवही बघु कसं? तब्बेतीची काळजी वाटली म्हणुन आपला सल्ला दिला. आता तुम्ही त्याला जर हल्ला समजणार असाल तर मी काय करणार बॉ? आपणही एकांगी भुमिका घेउन एकाचं विशिष्ट विचारधारेला विनाकारण टारगेट करुन इथे गाळ खरवडताय. आधी एका धाग्यावर बोललो त्याप्रमाणे चांगल लिहायची क्षमता असुनही आपण ***दारी करता त्याला लोकं कंटाळलित. बाकी चालु द्या. इम्युनिटी नाही बॉ आपल्याला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बघा ना. जशास तसे उत्तर होते ते. तुम्हाला तुडतुडींचे बोबडे बोल मात्र खटकले नाहीत हे विशेष. एवढीच काळजी आपण दुसर्‍या एका विशिष्ट विचारधारेच्या एकांगी आयडींबद्दल दाखवतांना दिसत नाही. मग आपल्याला मलाच सल्ला द्यायची काय हुक्की येते ब्वा? सहन होत नै का आपल्या आवडत्या विचारधारेची पिसं काढली तर? ***दारी म्हणाल तर ते करुन नंतर स्वतःच लेख मिटवून टाकणार्‍यांतला मी नाही. तुमचं काय ते बघा. 'पहले अपने गिरेबान में झांको' का काय म्हणतात ते.

In reply to by तर्राट जोकर

एवढीच काळजी आपण दुसर्‍या एका विशिष्ट विचारधारेच्या एकांगी आयडींबद्दल दाखवतांना दिसत नाही. मग आपल्याला मलाच सल्ला द्यायची काय हुक्की येते ब्वा? सहन होत नै का आपल्या आवडत्या विचारधारेची पिसं काढली तर?
नाही आवडत आवडत्या विचारधारेची पिसं काढलेली. कारण लैचं स्पष्टं आहे. आपण आधी त्या पिसांची उधळण विचारसरणीवर करता. नंतर मग पिसं काढायचा प्रयत्नं करता. तस्मात नाही आवडत. जे आहे ते दाखवा मग बोलु कसं? पण मग तुम्हाला तुमचं नेटवरचं सुलभ आणि मोफत **लय बंद करायला लागेल नै का? पोटापाण्याचा धंदा सोडवणार नाही एकदम काय?
***दारी म्हणाल तर ते करुन नंतर स्वतःच लेख मिटवून टाकणार्‍यांतला मी नाही. तुमचं काय ते बघा. 'पहले अपने गिरेबान में झांको' का काय म्हणतात ते.
तो धागा परत येणार. वेळ लागेल जरा. पण नक्की येणार. मग त्यावर मैत्रीच्या मुखवट्याआडुन वार करणारे लोक्स येउंदे नैतर कोणीपण. तुम्हाला काय वाटलं ट्रॉलिंग ला घाबरुन बंद केला धागा? गैरसमज. तुमची जी काय मतं असतील ती तुमच्या जवळ ठेवा. You are not important. Your existence is not important. Your way of thinking is not important.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमची जी काय मतं असतील ती तुमच्या जवळ ठेवा. You are not important. Your existence is not important. Your way of thinking is not important. >> exactly my feeling.

धागा: चोरी ..>>.. भरल्या पोटावरुन एक हात फिरवता दुसर्‍या हाताने धरलेल्या टॅबवर ही कथा वाचतांना छान वाटतं.

स्वतःच्या इभ्रतीपेक्षा पक्ष मोठा, त्याची इभ्रत मोठी असे मानणार्‍यांच्या त्याग, बलिदान अशा हुच्च विचारांना माझा राष्ट्रसलाम. टिंबटिंबटिंबदारी करणार्‍यांची विचारधारा महान आहे. जय हो! letter रच्याकने, वेलेंटाइनडेला प्रेमीयुगुलांना मारहाण करणार्‍यांच्या ट्रेनिंगसेशनमधे मुलेमुली एकत्र राहतात, नाचगाणे करतात. लै भारी. करोत बापडे, हम्कू क्या? हमारा तो नजरही गंदा है. छोडो.

In reply to by तर्राट जोकर

माननीय संपादक मंडळ, कॄपया ह्या प्रतिसादातील पत्राचा फोटो त्वरित काढून टाकावा, त्यात सदर मुलीचे नाव असल्याचे नंतर लक्षात आले. तसदीसाठी क्षमस्व.

In reply to by sagarpdy

धन्यवाद! महिलांसोबत कथित आक्षेपार्ह वागण्याबद्दल कन्हयाला तोंड दुखेपर्यंत शिव्या घालणारे, हिरिरीने पुरावे देणारे पांडेच्या बाबतीत काय भूमिका घेतात बघूया.

In reply to by तर्राट जोकर

महिलांसोबत कथित आक्षेपार्ह वागण्याबद्दल कन्हयाला तोंड दुखेपर्यंत शिव्या घालणारे, हिरिरीने पुरावे देणारे पांडेच्या बाबतीत काय भूमिका घेतात बघूया.
कथित???? कन्हैय्याचे वागणे कथित नसून प्रत्यक्षात घडले होते. ते चौकशीत सिद्ध झालेले आहे व त्याला त्याबद्दल दंड भरावा लागला होता. तेव्हा कथित असा शब्द वापरून त्यावर पांघरूण घालू नका. कन्हैय्याने केलेल्या व सिद्ध झालेल्या किळसवाण्या प्रकाराची आणि या गणेश पांडेच्या प्रकरणाची तुलना निदान अजूनतरी होऊ शकत नाही. कन्हैय्याने विद्यापीठात भर रस्त्यात चारचौघात विजारीची चेन उघडून लघवी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर एका मुलीने हटकल्यावर त्याने तिलाच धमक्या दिल्या. त्या मुलीने विद्यापीठात तक्रार केल्यावर चौकशी होऊन कन्हैय्याने हा घाणेरडा प्रकार केल्याचे सिद्ध होऊन त्याला ३००० रूपये दंड भरायला लागला होता. गणेश पांडेची केस निदान सध्यातरी वेगळी आहे. त्यातले सत्य अजून बाहेर आलेले नाही. दोन्ही बाजूने आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. गणेश पांडेने ४ मार्चला आपला विनयभंग करायचा प्रयत्न केला अशी तक्रार मैथिली जावकरने तब्बल १८ दिवसांनी केली. ती तक्रार पोलिसात न करता आशिष शेलारांकडे केली. खरं तर ४ मार्चलाच तिने पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. ती पोलिसांकडे न जाता शेलारांकडे का गेली हे समजत नाही. दोघेही राजकारणात आहेत. राजकारणातील वैयक्तिक महत्वाकांक्षा, प्रतिस्पर्धी, एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍यावर गोळी झाडणे असे अनेक अँगल आरोप करताना असू शकतात. तिथे नक्की काय झाले हे अजून पूर्णपणे बाहेर आलेले नाही. ४ मार्चला कथित विनयभंगाचा प्रकार झाल्यावर, ५ व ६ मार्चला ती आमच्याबरोबरच होती व ७ मार्चला तिने व्हॉट्सअ‍ॅपवर पांडेचे कौतुक करणारे संदेश पाठविले होते असे पांडेचे म्हणणे आहे. त्याने ते मेसेजही पत्रकारांना दाखविले. त्यामुळे यात कोण खरेखोटे बोलत आहे याविषयी अजूनतरी गोंधळ आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रकरण अजून पोलिसांकडे गेलेले नाही. आआपच्या जसलीन कौरने प्रसिद्धीसाठी सरबजित सिंग वर केलेला विनयभंगाचा आरोप शेवटी खोटा निघाला होता. रोहतकच्या दोन भगिनींनी बसमधील आसनावरील जागेवरून भांडण झाल्यावर विनयभंगाचे आरोप करून ३ मुलांना पट्ट्याने मारहाण केली होती. शेवटी त्या दोघी भगिनी खोटे बोलत आहेत हे सिद्ध झाले होते. जोपर्यंत या पांडे प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत दोघांपै़की कोणा एकाची बाजू घेणे टाळायला हवे. या प्रकरणातील ही पांडेची बाजू - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-p… या प्रकरणातील ही मैथिली जावकरची बाजू - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-p…

१००

जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे. 1 2 3

अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे.
म्हणे !!!!!!!!!!!!!!!!!!!!! यातच सर्व काही आलं. बादवे, ती चित्रफीत मी संपूर्ण पाहिली. त्यातले एक वाक्य वगळता ("हा आमचा माणूस नाही ..." असं एक बो घातलेला माणूस सांगताना दिसतो) इतर काहीही ऐकू येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

लोल्झ =)))))) चित्रफित पाहण्यसाठीच टाकली होती. बाकी सुजात आम्बेडकर (तोच तो बो घातलेला माणूस - बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू आहे) ह्यांना जाऊन विचारू शकता, काय घडले ते. पुण्यातच आहेत. फर्गुसनमधे. त्यांच्या गृपमधे हा काय करत होता एकटाच ते. आणि का पकडला ते.

In reply to by तर्राट जोकर

त्या चित्रफीतीत एकसुद्धा घोषणा ऐकू येत नाही. प्रचंड गोंधळ सुरू आहे. एक मोठा घोळका आहे. कॅमेरा सतत एकडेतिकडे हलत आहे. त्यादिवशी अनेक विद्यार्थी संघटनांचे अनेक कार्यकर्ते फर्ग्युसनमध्ये आले होते. जोरदार गोंधळ सुरू होता. गोंधळात कार्यकर्ते इ़कडेतिकडे जाणे सहज शक्य आहे. या आरोपाच्या समर्थनार्थ जी चित्रफीत टाकली आहे. त्यात कोणीही एकही घोषणा देताना ऐकू येत नाही. त्यामुळे अभाविपचा कार्यकर्ता घोषणा देताना पकडला हा शुद्ध खोडसाळ आरोप आहे. फर्ग्युसनमधील या चित्रफितीत तर एकही घोषणा ऐकू येत नाही. त्यामुळे मूळ प्रतिसादातील "जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे." हा खोडसाळ आरोप नेहमीप्रमाणे ऐकीव माहितीवर केलेला दिसतोय.

In reply to by श्रीगुरुजी

ओ महाराज, चित्रफित पकडल्याचे दाखवते. घोषना चित्रफितित ऐकु आली पाहिजेच ह्या तुमच्या हट्टाचे काय करावे बरे? त्या घोळक्यात हजर असलेल्यांनी त्याला घोषणा देतांना पकडले. तो पकडला गेला हे दाखवण्यासाठी चित्रफित आहे. त्याने काय घोषणा दिल्यात ह्या ऐकवण्यासाठी नाही. बाकी त्याला का पकडला आणि तो तिथे काय करत होता ह्याबद्दल तुम्ही सांगा. पकडणारा आणी पकडला गेलेला दोघांचेही नाव दिले आहे. तुम्ही खात्री करुन घ्या. अगदी महत्त्वाचा नसलेला मुद्दा कुठुनतरी काढायचा आणी मग विजयाचे ढोल पिटायचे. तुमच्या ढोलाच्या आवाजात सत्य दबत नाही.

In reply to by तर्राट जोकर

कोणी पकडला? पोलिसांनी? मग पुढे काय झाले? नक्की कोणत्या घोषणा दिल्या? कोणत्या घोषणांमुळे पकडले? नक्की कोणत्या कारणासाठी पकडले? इ.इ. गोष्टींची माहिती आहे का?
अगदी महत्त्वाचा नसलेला मुद्दा कुठुनतरी काढायचा आणी मग विजयाचे ढोल पिटायचे. तुमच्या ढोलाच्या आवाजात सत्य दबत नाही.
मी विजयाचे ढोल पिटत नाही. मी जिथे जिथे ऐकीव माहितीवर खोटे आरोप केले जातात, तिथे जाऊन सत्य समोर आणून त्या आरोपांचा खोटेपणा उघडकीला आणतो. १५ लाख परत न आणल्यास मला फासावर चढवा असे मोदी म्हणाले, हुसेनने जीवाच्या भीतिने देश सोडला, शिवसेनेच्या भगवान गोयलने हुसेनचे हात कापण्याची धमकी दिली होती या तुमच्याच पूर्वी केलेल्या आरोपांचा असत्यपणा मी सप्रमाण सिद्ध केलेला आहे व सिद्ध केल्यानंतर कोठेही ढोल पिटलेले नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

कोणी पकडला? पोलिसांनी? मग पुढे काय झाले? नक्की कोणत्या घोषणा दिल्या? कोणत्या घोषणांमुळे पकडले? नक्की कोणत्या कारणासाठी पकडले? इ.इ. गोष्टींची माहिती आहे का? >> तुम्हाला आहे काय? . मी जिथे जिथे ऐकीव माहितीवर खोटे आरोप केले जातात, तिथे जाऊन सत्य समोर आणून त्या आरोपांचा खोटेपणा उघडकीला आणतो. >> हा हा. तुम्ही राहु द्याहो. तुम्हीच वकील आणि तुम्हीच जज, तुमच्या न्यायालयात तुम्ही म्हणाल ते विश्वासार्ह आणि तुम्हाला नाय रुचलं ते खोटं असतं.

In reply to by तर्राट जोकर

>> तुम्हाला आहे काय?
तुम्हीच लिहिलंय ना देशद्रोही घोषणा देताना अभाविपचा कार्यकर्ता पकडला गेला म्हणे आणि पुरावा म्हणून एक चित्रफितही टाकलीत. आणि आता मलाच पुरावे मागताय? तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे मी द्यायचे का तुम्ही द्यायचे?
>> हा हा. तुम्ही राहु द्याहो. तुम्हीच वकील आणि तुम्हीच जज, तुमच्या न्यायालयात तुम्ही म्हणाल ते विश्वासार्ह आणि तुम्हाला नाय रुचलं ते खोटं असतं.
मी वकीलही नाही आणि जजही नाही. न्यायालय देखील माझे नाही. तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारे अनेक संदर्भ मी दिले आहेत. ते संदर्भ वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे आहेत. ते संदर्भ मी तयार केलेले नाहीत. आपले आरोप सिद्ध करणारा एकही संदर्भ तुम्हाला देता आलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मी कुठे आरोप करतोय की त्याने घोषणा दिल्यात. 'त्याने घोषणा दिल्या म्हणून त्याला पकडले' असा हा विडियो सांगतोय. तेवढं इथं टाकलंय. आता खरं मानायचंच नसेल तर त्याला कोण काय करणार? त्याला घोषणा देण्यासाठी पकडले नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतील ना? बाकी, मी दिलेले संदर्भ अमुकतमुकचा आहे म्हणुन तुम्ही शिक्के मारत नाकारले. ह्यात मी काय करु शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

माफ करा मध्येच बोलतोय
अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे
अशी अजूनतरी खात्रीलायक बातमी नाहीये.असेल तर ती स्वीकारली जाईल. मात्र तुम्ही हा विडियो पाहिला आणि घाईने शाहनिशा न करता इथे डकवून मोकळे झालात.

In reply to by दिग्विजय भोसले

https://www.facebook.com/sujat.ambedkar?fref=ts ह्या टाइमलाईनवर आपल्याला ह्या प्रकरनाचे अधिक डिटेल्स मिळतील. तसे म्हटले तर जे एन यु प्रकरनाचे सत्यही अजुन पुर्ण बाहेर आले नाही. तरीही बरीच काथ्याकूटं झालीच चिंधीभर माहिती आणि टोपलंभर अंदाजांवरुन. इथे भाजपविरोधी लोकांनी खुट्ट जरी केलं तरी साद्यंत मेगाबायटी टाकणारे बघितले मग ह्याच प्रकरनाला का झाकून ठेवायचे?

In reply to by तर्राट जोकर

तुम्हाला तिथे हे मिळाले नाही काय? अभाविपच्या राम सातपुतेने सुजात आंबेडकरांना लिहलेली कमेंट सुजात नमस्कार, आताच तुझी फेसबुक वरची चन्नवीर बंकुर या आमच्या कार्यक्रत्याबद्दलचि पोस्ट वाचली मला एक समजत तू आणि तुझ्यासोबत च्या डाव्या लोकांनी त्याला आक्षेपार्ह आणि देशद्रोही ठरवायचा जो केविलवाना प्रयत्न चालवला आहे यावरून तुमची मानसिकता लक्षात येते .मुळात तो आमचा कार्यकर्ता आहे तो भारत माता की जय ,जय भीम आशा घोषणा देत होता त्या कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह नाहीत .त्याला एवढ घाबरन्यासारख काय आहे ? एकाबाजूला तुम्ही मान्य करत आहात की तेथे देशद्रोही घोषणा दिल्या नाहीत अस म्हणता आणि दुसऱया बाजूला त्या कार्यकर्त्याला Socail media च्या माध्यमातून बदनाम करण्याचा केविलवाना प्रकार का करत आहात ? पराभूत मानसिकतेच तर हे लक्षण नाही ना ? त्यावर सुजातची कमेंट पहा:- Priya Ramji, Jai Bheem! Ek manus aplya gatala sodun dusrya gatat jato ani tyanchat ghoshna baji karto, tyachya manasikte var tumhala prashna kase padat nahi ho? Mi tumchya bajula basun, he manya kele ki amhi kinvha ABVP ni kontya hi Deshdrohi ghoshna dilya nahit. Pan, tyala jar pakadle naste tar ani tyane tasech continue kela asta tar pudhe kay देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत असे सुजात आंबेडकरच सांगत आहेत. मग तुम्ही इतकी घाई का केलीत?
तसे म्हटले तर जे एन यु प्रकरनाचे सत्यही अजुन पुर्ण बाहेर आले नाही.
भारतातच राहता ना? झापड ओढली असेल तर काढून टाका.

In reply to by दिग्विजय भोसले

tyala jar pakadle naste tar ani tyane tasech continue kela asta tar pudhe kay हे टाळले काय? अभाविप किंवा सुजातच्या गृपनी घोषणा दिल्या नाहीत असे म्हटले आहे. त्या मुलाने दिल्या का कसे ह्याबद्दल नाही ते. असो. हे प्रकरण अजून संपलेले नाही. सुजात आंबेडकरला मेल धाडला आहे खुलाशाबद्दल. आला की टाकेन इथे. जे ही उत्तर येईल ते.

In reply to by तर्राट जोकर

जर आणि तर मध्ये काथ्याकूट होत नसतो. त्याला जर पकडले नसते आणि त्याने तसेच कंटीन्यु केले असते तर? म्हणजे तो त्या गृपमध्ये जाऊन जय भीम,भारत माता कि जय,या घोषणा देत होतो,पण त्याने जर आमच्या गृपमध्ये राहून देशविरोधी घोषणा दिल्या तर? असे आहे ते साहेब.

In reply to by तर्राट जोकर

1)जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे. 2)तो त्यांच्या गृपमधे कशाला गेला होता हे तर गुलदस्त्यातच आहे ना? वरील दोन प्रतिसांदांमध्ये बराच फरक आहे,त्याबद्दल आभारी आहे. मुद्दा इतकाच आहे कि तुम्ही पूर्ण माहिती नसताना तो विडीयो इथे डकवला होतात.

In reply to by दिग्विजय भोसले

पूर्ण माहिती नसतांना जे एन युत डॉक्टर्ड विडियो वर घमासान सुरु होते तेव्हा कुठे होतात साहेब? साहेब, तो त्या गृपमधे जाण्याचे आणि पकडले जाण्याचे तर सत्य आहे ना? त्याने घोषणा दिल्या किंवा नाही हा माझा मुद्दा नाहीच, ते तर विडियो तल्या लोकांचे म्हणणे आहे, म्हणुनच म्हणे हा शब्द वापरला आहे. म्हणे म्हणजे ज्यांनी विडियो बनवला युटुब वर टाकला त्यांचे. माझा मुद्दा आहे तो त्या गृपमधे जाऊन काही घाणेरडे प्रकार करण्याच्या प्रयत्नात होता का किंवा केले का? अभाविप आणि विडियोतले लोक ह्यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य आहे हे फर्गुसनमधे सर्वांना माहिती आहे. त्यांच्यात हा ऑडमॅन आउट काय करत होता हा प्रकार दुर्लक्षिला काय हे विचारणे होते. आता तुम्ही मूळ कारनामा बाजूला ढकलून 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. बाकी ह्या प्रकरणाचे पूर्ण सत्य दहा वर्षांनी बाहेर येईल तोपर्यंत थांबावे काय?

In reply to by तर्राट जोकर

'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. आणि 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार सोडून तुम्ही बाकिचं सगळं बोलत आहात.कारण बाकि सगळं तुमच्या सोयीचं आहे. 'भारत विरोधी घोषणा' हा तुमच्यासाठी अडचणीचा विषय आहे,हा एक असा विषय आहे कि ज्यामध्ये प्रतिवाद करायला फारसं काही शिल्लक राहत नाही.
पूर्ण माहिती नसतांना जे एन युत डॉक्टर्ड विडियो वर घमासान सुरु होते तेव्हा कुठे होतात साहेब?
म्हणजे त्यांनी केलं म्हणून यांनीही करावं,असा तुमचा आशय आहे का? डाॅक्टर्ड विडियो अभाविपने केले होते का? ढीगभर विडियोमधले दोन विडियो डाॅक्टर्ड आढळले आहेत.बाकि तुम्ही कन्हैय्याची कितीही बाजू मांडली तरी सत्य आज उघड आहे. डाॅक्टर्ड विडियोचे मी समर्थन करीत नाही.बाकि घमासान सुरू होते तेव्हा मी मिपावर नव्हतो.
साहेब, तो त्या गृपमधे जाण्याचे आणि पकडले जाण्याचे तर सत्य आहे ना? त्याने घोषणा दिल्या किंवा नाही हा माझा मुद्दा नाहीच, ते तर विडियो तल्या लोकांचे म्हणणे आहे,
बापरे!खरचं कि काय? मग हा प्रतिसाद काय म्हणतोय? "जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे." "म्हणे" हा शब्द वापरला म्हणून तुम्ही निसटू शकत नाही.ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखा प्रकार झाला हा.तुम्हाला जे हायलाईट करायचं होतं तेच तुम्ही केलं आहे.
त्यांच्यात हा ऑडमॅन आउट काय करत होता हा प्रकार दुर्लक्षिला काय हे विचारणे होते. आता तुम्ही मूळ कारनामा बाजूला ढकलून 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. बाकी ह्या प्रकरणाचे पूर्ण सत्य दहा वर्षांनी बाहेर येईल तोपर्यंत थांबावे काय?
मुळ कारनामा देशविरोधी घोषणाबाजी हा आहे साहेब. तो तिथे काय करत होता?हा दुय्यम कारनामा आहे.जरी त्याच्या मनात काही खोडसाळपणा असला तरी पुढे त्याला पकडल्यावर स्वतःच्या आणि संघटनेच्या बदनामीची काळजी त्याला असेल कि नाही? मुळ कारनाम्यातला मुळ मुद्दा हा आहे कि त्याने देशविरोधी घोषणाबाजी केली नाही,आणि हे सजेत आंबेडकरच सांगतोय.बाकि त्याला तुम्ही मेल केला आहेच तर त्याचं काय म्हणणं आहे तेही सांगा.

In reply to by दिग्विजय भोसले

मुळ कारनामा देशविरोधी घोषणाबाजी हा आहे साहेब. तो तिथे काय करत होता?हा दुय्यम कारनामा आहे.जरी त्याच्या मनात काही खोडसाळपणा असला तरी पुढे त्याला पकडल्यावर स्वतःच्या आणि संघटनेच्या बदनामीची काळजी त्याला असेल कि नाही? मुळ कारनाम्यातला मुळ मुद्दा हा आहे कि त्याने देशविरोधी घोषणाबाजी केली नाही,आणि हे सजेत आंबेडकरच सांगतोय.बाकि त्याला तुम्ही मेल केला आहेच तर त्याचं काय म्हणणं आहे तेही सांगा.
विद्यापीठात भर रस्त्यात चारचौघांसमोर लघवी करताना कन्हैय्या पकडला गेला. ते करताना एका मुलीने हटकल्यावर त्याने त्या मुलीशी गैरवर्तन केले. हे आक्षेपार्ह वर्तन त्याने केल्याचे सिद्ध होऊन त्याला तीन हजार रूपये दंड झाला. तरी यांना वाटते की ते कन्हैय्याचे ते वर्तन "कथित" आक्षेपार्ह वर्तन होते. आणि "मी १५ लाख रूपये प्रत्येकाला न दिल्यास मला फाशी द्या, असे मोदी म्हणाले", "हुसेनने जीवाच्या भीतिने देश सोडला", "शिवसेनेच्या गोयलने हुसेनचे हात तोडल्यास ५० लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते" इ. खोडसाळ अफवा १०० टक्के खर्‍या आहेत यावर मात्र यांचा ठाम विश्वास आहे.

In reply to by तर्राट जोकर

मी कुठे आरोप करतोय की त्याने घोषणा दिल्यात. 'त्याने घोषणा दिल्या म्हणून त्याला पकडले' असा हा विडियो सांगतोय. तेवढं इथं टाकलंय. आता खरं मानायचंच नसेल तर त्याला कोण काय करणार? त्याला घोषणा देण्यासाठी पकडले नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतील ना?
त्याला पकडलं म्हणजे नक्की कोणी पकडलं? पोलिसांनी? सीबीआयने? सीआयडीने? एफबीआयने? सीआयएने? रॉने? केजीबीने? मोसादने? .... आणि पकडलं म्हणजे नक्की काय केलं? नक्की कोणत्या कारणासाठी पकडलं? या सर्व गोष्टी अजिबात माहिती नसतील तर "अभाविपचा एक कार्यकर्ता पकडला गेला. त्याने देशद्रोही घोषणा दिल्या म्हणे." असली दिशाभूल करणारी वाक्ये टाकून ज्यात एकही घोषणा ऐकू येत नाही अशी चित्रफीत इथे टाकण्याचे कारणच काय?
बाकी, मी दिलेले संदर्भ अमुकतमुकचा आहे म्हणुन तुम्ही शिक्के मारत नाकारले. ह्यात मी काय करु शकत नाही.
तुमचा एक संदर्भ म्हणजे समाजवाद्यांच्या एका संकेतस्थळावर केला गेलेला एक निराधार दावा आणि दुसरा संदर्भ म्हणजे एका ट्रॅव्हल कंपनीचे संकेतस्थळ जिथे त्यांनी आधीच लिहून ठेवले आहे की "इथे प्रसिद्ध झालेल्या राजकीय मजकूराच्या अचूकतेची खात्री नाही व त्याची सत्यासत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही.". मुळात ट्रॅव्हल कंपनीला आपल्या संकेतस्थळावर कोणत्याही तर्‍हेने व्हेरिफाय न केलेला सिलेक्टिव्ह राजकीय मजकूर टाकण्याचे कारणच काय? असले दोन हास्यास्पद संदर्भ हा तुम्हाला आपण केलेल्या असत्य आरोपांचा पुरावा वाटतो! गंमत म्हणजे टाइम्स ऑफ ईंडिया, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, हिंदुस्तान टाईम्स, डीएनए अशांसारख्या कोणत्याही वृत्तपत्रात हा उल्लेख नाही. एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, आजतक, झी न्यूज, आयबीएन, टाईम्स नाऊ, इंडिया टीव्ही अशांसारख्या कोणत्याही वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याचा उल्लेख नाही. वरील दोन हास्यास्पद संकेतस्थळे वगळता भारतातील कोणत्याही वृत्तसंस्थेकडे हे वृत्त नाही.

जोकर भाऊ, तुम्ही नक्की काय करता,म्हणजे मला अस विचारायचे आहे तुम्ही पोटापाण्यासाठी काय करता? सरकारी नोकरीत आहात काय कि व्यवसाय आहे तुमचा? कुतुहल हो दुसरं काही नाही म्हणजे अस बघा, तुमचा संचार सर्व धाग्यांवर....बरे प्रतिसाद पण लांबलचक....आपले मत पटवण्यासाठी दिलेले लिंक्स....म्हणजे कायम इंटरनेट च्या समोर.... तुमचे एका दिवसात जेव्हढे टंकटाय ते पाहून कोणीही अवाक होईल .. जर नोकरीत असाल तर कुठल्या नोकरीत? जिथे नेट आणि वेळ भरपूर आहे कि कुठल्या पक्षासाठी मार्केटिंग चे काम घेतलाय?

In reply to by आरोह

जोकरसाहेब एकतर आयटीवाले नोकरदार असावेत, कारण आयटीवालेच हाफीसातलं फुक्कटचं नेट वापरून मिपावर पडीक असतात:'(::-( किंवा स्वतःचा बिझनेस असावा,इतरांना कामाला लावून मिपावर वावरायला नामानिराळे.(ह.घ्या)

प्रश्न चांगले आहेत हो...पण तुम्हाला अडचणीचे आहेत असे दिसते तुम्हाला नेट adiction झालेय का? काही काही धाग्यांवर तर तुमचे प्रतिसाद तर दिवसभर सुरु...जसे ऑनलाइन chatting... असो...

In reply to by आरोह

तुम्हाला खुपतंय ते कळतंय हो, पण काय करणार सौदीचा पैसा आहे, इसिसची नोकरी, डोक्यावर गन लावून लिहायला बसवतात दिवस दिवस. =))