संक्रांतीचे दिवस..रविवारचे दुपारचे जेवण झाल्यावर मस्त झोपण्याचा विचार सुरु असताना बायकोने आपल्याला जेवणानंतर तुळशीबागेत जायचे असल्याची घोषणा केली. उणेकरांसाठी (जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो ) तुळशीबाग म्हणजे काय प्रकार आहे हे प्रथम सांगतो..तुळशीबाग हि काही फुलांची बाग नाही. तुळशीची रोपे सुद्धा येथे मिळत नाहीत... खरेदीविक्री या विषयात डबल ग्र्याजुएट महिलां तर डॉक्टरेट झालेल्या व्यावसायिक यांच्यामध्ये वस्तूच्या खरेदी विक्री साठी घासाघीस करण्याचे ठिकाण म्हणजे पुण्यातले तुळशीबाग.
बायकोच्या आग्रहाखातर मी ह्या ऐतिहासिक बागेत जाण्यासाठी तयार झालो..म्हटलं तर माझ्याजवळ दुसरा कुठला पर्यायच नव्हता. कारण हि एकटी गाडी चालवते तेव्हा मला खूप काळजी वाटते................रस्त्यावरून चालणा-या लोकांची. भर उन्हात एक तासाचा प्रवास करत आम्ही बागेत पोहचलो. गाडी पार्किंग साठी जागा नाही हे कारण पुढे करत मी बायकोला इथेच रस्त्यावर थांबतो असे सांगितले. एका छोट्या दुकानाच्या सावलीत मी वाट पहात उभा होतो....तेवढ्यात एका फुलाच्या विक्रेत्याने मला इथे दुकान मांडायचे असल्याचे कारण देत माझ्या डोक्यावरची सावली काढून घेतली. मी आता भर उन्हात गाडीवर बसून बायकोची वाट पाहू लागलो.
दोन तासानंतर बायको हात हलवत येताना दिसली... मी हि काहीसा त्रागा दाखवत पहिला प्रश्न केला... पिशवी कुठे आहे? कारण नेहेमी चार-चार पिशव्या भरून खरेदी करणारी माझी बायको रिकाम्या हाताने परतली याचा धक्का मला बसला होता. बायकोने सुरवात केली..चला गाडी सुरु करा... मी म्हटलं, काय झाले ते तर सांगशील...काही नाही हो...आपल्या घराजवळच्या मॉल मध्ये यापेक्षा कमी किमतीत सारी खरेदी होईल ..आधीच उन्हाने तापलेल्या डोक्याच्या झळा आता मेंदूला जाणवत होत्या......म्हणजे तुझा हा फक्त अभ्यासदौरा होता तर..घरीच सांगितले असते तर आजच्या दिवस भगवान भरोसे तुला एकटीलाच पाठविले असते. घरी तरी तुम्ही कुठला मोठा तीर मारला असता ..बायकोने माझ्या पेटलेल्या मेंदूवर तेल ओतले..मी सुद्धा मग येथे भर उन्हात केलेला प्रवास, वाया गेलेला वेळ ( किमती वेळ म्हणणार नाही कारण ह्या जगात माझ्या वेळेला काय भाव मिळतो ह्याची मला पूर्ण कल्पना आली आहे ) आणि वर कुठलीही खरेदी न करता रिकाम्या हाताने परत जायचं याचा चढत्या आवाजात पाढा वाचत हि संक्रांत आपल्यावरच का असा प्रश्न करत त्रागा करू लागलो. बायको यावर ..अगदीच काही चक्कर वाया गेली नाही असं सांगत ... पर्समधून खरेदी केलेली चहाची गाळणी काढत, ब-याच दिवसापासून गाळणी खराब झाल्यामुळे चहा पावडर कशी कपात जमा होत होती हे सांगू लागली..आता मात्र मला चक्कर आल्यासारखा भास होउ लागला. गाडीला किक मारली आणि तोंडातून कुठलाही शब्द न काढता घर गाठलं.
त्या दिवसापासून माझ्यालेखी जालियानवाला बागेचं इतिहासात जे स्थान आहे तेच तुळशीबागेचं...फरक इतकाच कि एक बाग इंग्रजांच्या अन्यायाचं प्रतिक तर दुसरी माझ्यावरील.. आता मित्रांनो तुम्हाला हे सांगण्याच कारण म्हणजे.. तुम्हाला कितीही फुलांची,पाखरांची किंवा फुलपाखरांची आवड असो कि तुम्हाला कितीही पक्षीनिरीक्षणाची इच्छा झाली तरीसुद्धा तूमच्यावर बायकोसोबत (स्वतःच्या ) जर कधी बागेत जायची वेळ आली तर तुम्ही, बागेत काय आहे हा प्रश्न विचारायला विसरायचं नाही .......
याद्या
6016
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
उणेकर
जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतोशब्द आवडलेला आहे :-) (मराठी भाषेला ही खरोखर तुमची स्वतःचीच देणगी आहे असं गृहीत धरून मी म्हणेन की) उणेकरांकडून शिव्या खायला तयार व्हा! आणि हो, तुळशीबागेला नावे ठेवल्याबद्दल पुणेकरांकडूनही :-) जय मृदुंग!मृदुंग की मृदंग वरुन आठवले,
In reply to उणेकर by बहुगुणी
हम्म. यात विनोद कुठे आहे!
विनोद शोधला तर सापडेल.दुपारची
प्रतिसाद
In reply to विनोद शोधला तर सापडेल.दुपारची by कंजूस
एक लंबर प्रतिसाद कंजूष काका
In reply to विनोद शोधला तर सापडेल.दुपारची by कंजूस
लेखन आवडले. उणेकर शब्द आवडला.
प्रतिसाद
In reply to लेखन आवडले. उणेकर शब्द आवडला. by रेवती
प्रतिक्रिया
काय दिनेशराव स्त्रीयांनी
In reply to प्रतिक्रिया by Dinesh Satpute
आपले लेखन ललित लेखन ....
In reply to काय दिनेशराव स्त्रीयांनी by माहितगार
लेख आवडला खास करून तुळशी
:)
बायकांना ( लग्न झाल्यावर )
विंडो शॉपिंगला वापरलेला
दिवसभराचा ताण दूर होण्यास मदत केल्याबद्दल....
In reply to विंडो शॉपिंगला वापरलेला by विद्यार्थी
ते १४ तारखेचा ताण रिलीज झाला
In reply to दिवसभराचा ताण दूर होण्यास मदत केल्याबद्दल.... by Dinesh Satpute
आतिशय खुमासदार लेख.
:)
खुसखुशीत
छान लिहीलंय
:) छान लिहिलंय.
छान! ;)
मस्त आहे.
जमतय...
विनोद
माझ्या माहीतीमधल्या एका अमराठी जोडप्याच्या
अक्खा जन्म मुंबईत गेला म्हणून
नाहि पटले