साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते.
‘एका पोलीथिन पिशवीने आपला ‘आ’ वासला आहे आणि ती संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करते आहे’ असे ते चित्र होते. कदाचित अजुनहि असेल. कारण परिस्थितीत चांगला स्वागतार्ह काहीही बदल झालाच नाही आहे उलटपक्षी ती हाताबहेरच गेली आहे की काय अशी शंका यावी. मधूनच जाग आल्यावर काही कडक नियम लागू केल्याचा फक्त आव आणला जातो. जणू मी ओरडल्यासारखे करतो तू घाबरल्याचे दाखव. बस्स! मोजके काही दिवस हे नियम वरवर पाळले जातात परत ये रे माझ्या मागल्या!
दोन वर्षांपूर्वी माझी लेक साताऱ्याला कास पठारला गेली होती. सातारा म्हंटले म्हणजे कंदी पेढे आणणे ओघाने आलेच. तेव्हा पेढ्यांसाठी तिला साताऱ्याला चक्क कापडी पिशवी दिली गेली होती. मी हाताळलेली ती पहिली वहिली कापडी पिशवी. छोटूली, सुबक, लाल रंगाची पिशवी आणि तिने साताऱ्यात जन्म घ्यावा? मला हेवा वाटला त्यांचा. खरच!
एक वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला जाताना वाटेत जेवणासाठी नेमके साताऱ्याला थांबलो. त्या प्रशस्त हॉटेल मध्ये Mapro ची उत्पादने विकायला ठेवली होती. माझ्यासारखा मासा अशा गळाला लगेच फसतो. मग काय? मी नवऱ्याच्या नापसंती दर्शक अविर्भावाकडे पूर्ण दुर्लक्ष करत काही घेतली विकत. मी त्या दुकानदाराला माझ्या कडची पिशवी देणार इतक्यात त्यानेच मला कापडी पिशवीत माझी खरेदी घालून मला ती दिली. पुन्हा धन्य तो सातारकर असे म्हणावेसे वाटले.
आमची मुंबई इतकी सुधारलेली राजधानी! तरीही आम्ही मात्र अजूनही त्या निकृष्ट दर्जाच्या टाकाऊ प्रतीच्या पिशव्याच वपरतो आहोत. हे काम दोन स्तरांवर होणे आवश्यक आहे. एक ग्राहक तर एक विक्रेता. दोघांनी हातमिळवणी केल्याशिवाय हे होणे नाही. ग्राहकांनी आपली पिशवी सोबत ठेवली तर हा प्रश्न उद्भवणार नाही. परंतु कधीतरी चुकून त्याच्याकडे नसली तर त्याला मिळणारी पिशवी ही पण कापडीच असावी ह्याकडे विक्रेत्यांनी लक्ष द्यायला हवे.
मागे मी ह्या संदर्भात माझ्या फेसबुक पेज वर लिहिले तेव्हा एक प्रतिक्रिया आली की आपण आपली पिशवी घेऊन जावी. इतरांना आपण सांगू अथवा सुधरवू शकत नाही. असे आपण आपल्याच पुरते बघत बसलो तर कशी सुधारणा होणार? आणि तसे बघितले तर ह्याचा फायदा आपल्याया आणि आपल्या पुढील पिढीला होणार आहेच.
माझा नेहमीचा फळ विक्रेता अगदी खुल्या मनाने मी माझीच पिशवी वापरते म्हणून कौतुक करतो. मी त्याला म्हंटले की “तू ह्या पिशव्या का देतोस? इतक्या पातळ पिशव्या हानिकारक असतात.” तर तो म्हणाला की “मी पिशवी दिली नाही तर ग्राहक परत जातात. दुसरा विक्रेता शोधतात. महाग पिशव्या मला परवडत नाहीत. कधी कधी काही ग्राहक दोन दोन पिशव्या मागतात. विकत आणलेला माल वेळेत नाही खपला तर खराब होऊन तोटा होणार म्हणून ग्राहक हा राजा समजून मी देतो त्यांना पिशव्या. काय करू? म्हणूनच तुमचे कौतुक वाटते ना?”
आता अशा वेळी नागरिकांनीच पुढाकार नको का घ्यायला? गरीब विक्रेत्यांना भुर्दंड भरायला लावून वर पर्यावरणाची हानी करायची. कहॉं का इन्साफ है? चांगल्या दुकानात, जिथे आपल्या कडून पिशवीचे पैसे आकारतात तिथेही प्लास्टिकच्याच पिशव्या मिळतात. मागच्या वर्षी ‘शब्द’ पुस्तक मेळाव्याला गेले होते. तिथे ५ रुपयांना मोठी कापडी पिशवी देत होते. ‘सहकारी भांडार’ या दुकानात पण कापडीच पिशव्या मिळतात. असे सगळ्या दुकानांमध्ये होणे गरजेचे आहे. एकत्रित येउन हा निर्णय घेणे गरजेचे आहे.
सरकारने निकृष्ट पिशव्यांची निर्मिती थांबवून त्या ऐवजी कापडी पिशवीच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे होणे निकडीचे आहे.
हे अशक्य नाही!
-उल्का कडले
वाचने
8557
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला..
चांगला विषय आणि चांगला लेख
हो. आजकाल ज्युट बॅग म्हणून
In reply to चांगला विषय आणि चांगला लेख by बहुगुणी
आजकाल ज्युट बॅग म्हणून स्पन
In reply to हो. आजकाल ज्युट बॅग म्हणून by अभ्या..
जळती काडी जवळ न्यायची.
In reply to आजकाल ज्युट बॅग म्हणून स्पन by आदूबाळ
मी जी कापडी पिशवी म्हणते आहे
In reply to चांगला विषय आणि चांगला लेख by बहुगुणी
उल्काजी,
मीही कापडी पिशव्या वापरते.
धन्यवाद
सध्या माझ्याकडे ती पिशवी नाही
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
कापडी पिशव्या बरोबर ठेवणे
कल्पना छान आहे.
In reply to कापडी पिशव्या बरोबर ठेवणे by सही रे सई
खरे आहे तुमचे. त्या फळे
प्रशंसनीय!
In reply to खरे आहे तुमचे. त्या फळे by रुपी
छान लेख!
अगदी खरे आहे.
In reply to छान लेख! by बोका-ए-आझम
लेखनाशी सहमत आहे. मीही कापडी
रायगड आणि
माझ्या आईने आत्ता संक्रातीला
कुठे मिळते अशी पिशवी ?
In reply to माझ्या आईने आत्ता संक्रातीला by पिलीयन रायडर
आईने औरंगाबादहुन आणल्या.
In reply to कुठे मिळते अशी पिशवी ? by उल्का
पुण्यामधे तुळशी बाग मधे नक्की
In reply to कुठे मिळते अशी पिशवी ? by उल्का
paristhitee phaaraca bhayaMkara aahe
अजून एका गोष्ट जी मला नक्की
In reply to paristhitee phaaraca bhayaMkara aahe by ज्ञानोबाचे पैजार
तुमचे मनःपूर्वक कौतुक व
In reply to अजून एका गोष्ट जी मला नक्की by अभ्या..
हा प्रतिसाद वाचनीय आहे.
उत्तम धागा व प्रतिसाद. सवडीने
उत्तम धागा !
हे ठीक आहे.
प्रतिसाद आवडला..
In reply to हे ठीक आहे. by निशांत_खाडे
हुश्श.. एकजण तरी सापडले,
In reply to प्रतिसाद आवडला.. by जेपी
थँक्यू, जॉर्ज कार्लिन साहेब!
In reply to हुश्श.. एकजण तरी सापडले, by निशांत_खाडे
"इन्फरनो" आठवलं उगाचच
In reply to हे ठीक आहे. by निशांत_खाडे
कापडी पिशव्यांना प्रोत्साहन, प्लास्टिकचा रस्तेबांधणीत वापर
PLASTIC ROADS
दुकानदारांनी कापडी पिशव्यांवर
In reply to कापडी पिशव्यांना प्रोत्साहन, प्लास्टिकचा रस्तेबांधणीत वापर by बहुगुणी
रस्तेबांधणीत वापर हा एक उत्तम
In reply to कापडी पिशव्यांना प्रोत्साहन, प्लास्टिकचा रस्तेबांधणीत वापर by बहुगुणी
लेख आवडला... खरा प्रॉब्लेम
लेख आवडला. एवढं तरी करायलाच
सध्यातरी प्लॅस्टीकला पर्याय नाहि
लाव्हा रसाच्या प्रवाहात
In reply to सध्यातरी प्लॅस्टीकला पर्याय नाहि by अर्धवटराव
बरं आहे कि मग.
In reply to लाव्हा रसाच्या प्रवाहात by अभ्या..
सुरवात स्वता पासुन करणे.... हे अशक्य नाही.....
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा
खूप सविस्तर प्रतिसाद आणि
In reply to अत्यंत महत्त्वाचा मुद्दा by मैत्र
लेख आवडला