वीजेची बचत केली पाहिजे , हे मात्र पटायला लागलं आहे !
*शेतकर्यांनी दांड्यांनी पिकांना पाणी भरतांना मोटर चालू करुन इतर कामासाठी निघून जाऊ नये ! त्यामुळे पाणी तर वाया जातेच पण वीजेचाही अपव्यय होतो.
-दिलीप बिरुटे
खालील उपाय करून पहावेत. त्या आधी आपल्या विजेच्या बिलावरचे खर्चलेले युनिटस पाहून नंतरच्या बिलाबरोबर तुलना करावी.
१) वॉशिंग मशीन चालवताना, फ्रिझ, ए.सी., झुंबराचे दिवे, गिझर, टि.व्ही. इ. उपकरणे बंद करावित. म्हणजे एकावेळेस एकच (किंवा कमितकमी) खार्चीक उपकरण चालवावे.
२) रात्री झोपताना फ्रिझ बंद करावा. रात्रिच्या वेळेस आपण फ्रिझचे दार उघडत नसल्यामुळे, रात्री ११वा. ते सकाळी ५वा. पर्यंत फ्रिझ बंद ठेवू शकतो (आतील पदार्थ नाशिवंत नसतील तर हे करून पहावे).
३) काँप्युटरचा मॉनीटर नको असेल तेव्हा बंद ठेवावा.
प्रत्येकजण अभ्यासाने, आपापल्या घरात अशा प्रकारचे उपाय नियोजनाने अमलात आणू शकतो.
४) अलिकडेच काहि तंत्रज्ञांशी चर्चा करताना CVT (Constant Voltage Transformer) चा उल्लेख झाला. ह्या उपकरणाने, घरातील विद्युत उपकरणांचे जळण्या पासुन संरक्षण तसेच विजेची बचत होते असे त्या तंत्रज्ञां कडून कळले.
CVT (Constant Voltage Transformer) वर मि.पा.कर अधिक प्रकाश टाकू शकतील काय?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
प्रतिक्रिया
फ्रीज मात्र
हेच
+२
+३
फ्रीजसुद्
जाणीव
चांगले उपाय
विजेची बचत... काही उपाय!
ब्लॅकल
सेल फोन
CFL दिवे
दुर्दैवान