✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

म
मार्गी यांनी
Tue, 03/15/2016 - 12:48  ·  लेख
लेख
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . . सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . . सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . . सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . . सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २! सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . . सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी! सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड! सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस दुखापत व नंतरच्या राईडस सप्टेंबर २०१४ मध्ये नियमित सायकल चालवल्यानंतर काही दिवस परत गॅप पडली. जेव्हा असं होतं, तेव्हा प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करावी लागते. हळु हळु लय प्राप्त करावी लागते. ऑक्टोबरमध्ये परत राईडस सुरू केल्या. छोट्या राईडचा आनंद घेतला. परभणीजवळच्या रस्त्यांवर सायकल चालवली. परत एकदा मोठी राईड करण्यासाठी निघालो. आता हे रस्ते पाठ झाले आहेत! कोणत्या रस्त्यावर किती अंतरावर कसा खड्डा आहे, कुठे किंचित चढ आहे हे सर्व पाठ झालं आहे. परभणीजवळच्या तीस किलोमीटरपर्यंतच्या राईडस तर अंगणातल्याच वाटतात. आत्मविश्वासामुळे असा फरक पडतोच. ३० ऑक्टोबरची सकाळ. काही दिवसांची गॅप असूनही चांगला वेग मिळाला. आजच्या राईडमध्ये एकूण ६० किलोमीटर करण्याचं उद्दिष्ट आहे. परभणीपासून मानवत रोडला जातो आहे. तिथे एका हॉटेलात माझ्या आवडीचे पोहे मिळतात. पहिल्या एका तासात वीस किलोमीटर ओलांडले. जास्त कुठे थांबलो नाही. थोडा वेळाने उजव्या पायाच्या गुडघ्यात वेदना सुरू झाली. पाय सरळ करून बघितला, पायाला थोडा आराम दिला, तरी फरक नाही वाटला. पोहे खाण्यासाठी थांबलो तेव्हा पायांना थोडा आराम मिळाला. पण परतीचा प्रवास सुरू केल्यावर परत पाय जास्तच दुखतोय. पाय वेगवेगळ्या कोनात पेडलवर ठेवून चालवून बघितलं. पण हळु हळु जास्तच दुखतोय. अर्थात् अजून सायकल चालवू शकतोय. परभणीही जवळ येतं आहे. त्यामुळे लिफ्ट घेण्याचा विचार केला नाही. नंतर नंतर तर सायकलवरून उतरताना आणि परत बसतानाही त्रास सुरू झाला. परभणीत पोहचेपर्यंत अशी वेळ आली, की शेवटचे दोन किलोमीटर- बस स्टँडपासून घरापर्यंत ऑटोने जावं लागलं. इतकी वाईट अवस्था झाली. उजवा गुडघा हलवताही येत नाहीय. आता काय करावं?   त्या दिवशी पायाला पूर्ण आराम दिला. हळु हळु पाय ठीक झाला. संध्याकाळ होताना गुडघा हलवता येतोय. पण असं झालं कशामुळे? सायकल चालवण्यात तर काहीच बदल केला नव्हता. मग आठवलं की, काहीच दिवस आधी श्रीनगरमध्ये ट्रेकिंग करताना तोच पाय दुखला होता आणि नंतर जम्मूमध्ये फिरतानाही मी लंगडतच होतो. कदाचित तोच प्रॉब्लेम असणार. हो, तसंच आहे! त्या वेळी लवकर खाली उतरताना गुडघ्याच्या लिगामेंटला थोडी दुखापत झाली. ती अजून बरी झालेली नसावी. किंवा थोडीच रिकव्हर झाली असावी. कारण दोनच दिवसांआधी मी छोटी ३० किलोमीटरची राईड केली होती, त्यावेळी काहीच त्रास झाला नव्हता. आजच्या मोठ्या राईडमध्ये २५ किलोमीटर नंतरच हळु हळु त्रास सुरू झाला. गुडघ्याला नी कॅप लावल्यानंतर थोडं बरं वाटलं. बाबा डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं दोन आठवडे सायकलिंग बंद! चांगली गोष्ट अशी आहे की, ही इंज्युरी छोटीशीच आहे. आराम केल्यावर आपोआप बरी होईल. पण त्यामुळे परत पंधरा दिवस सायकलिंग बंद. बाकी हालचालीमध्ये काही त्रास नाहीय. वीस दिवसांनंतर एक छोटी अकरा किलोमीटरची राईड केली. काही त्रास नाही झाला. उत्साह वाढला, पण तरी घाई केली नाही. एक आठवडा थांबलो. आता मोठी राईड करून बघायला हवी. परभणीपासून ४८ किलोमीटर अंतरावरच्या पाथरी गावात साईबाबांचं जन्मस्थान आहे. तिथे जाण्याचा विचार केला. नेहमीप्रमाणेच राईड सुरू केली. फक्त ह्यावेळी नी कॅप लावून सायकल चालवतो आहे. छोटे छोटे टारगेटस समोर ठेवून निघालो. पहले बारा किलोमीटर नॉन स्टॉप, नंतर पाण्याचा ब्रेक, नंतर दहा किलोमीटर्सवर चहा असं. काहीच त्रास होत नाहीय. इतक्यात होणारही नाही. पुढे गेल्यावरच कळेल. आणि तसंच झालं. तीस किलोमीटरनंतर परत त्रास सुरू झाला. हळु हळु गुडघा दुखायला लागला. थोडा वेळ सहन करत पुढे गेलो. पाथरीमध्ये साईबाबा मंदीर बघितलं. परत फिरलो. जास्त दुखतंय हळु हळु पण सायकल चालवता आली तोपर्यंत चालवली. मानवत रोडपासून लिफ्ट घेतली. कारण पुढे चालवत राहिलो असतो तर जास्त दुखत गेलं असतं. वेळेमध्ये सायकल थांबवल्याने पुढे त्रास वाढला नाही. नी कॅप वापरणं सुरू ठेवलं.   पाथरी- साईबाबा जन्मस्थान  चार दिवसांनी परत सायकल चालवली. एक छोटी तीस किलोमीटरची राईड केली. त्यामध्ये चांगला वेगही मिळाला आणि दुखलंही नाही. अर्थात् आता मी दुस-याच गेअरवर सायकल- २-५, २-६ अशी चालवतो आहे. आधी जेव्हा ३-४ व ३-५ वर चालवली होती, तेव्हाही गुडघा दुखला होता. त्या काँबीनेशनमध्ये गुडघ्यावर जास्त ताण येतो. क्रँप्सही येऊ शकतात. त्या तुलनेत २-५ किंवा २-६ पर्याय ठीक वाटतोय. दुस-या दिवशी परत ४० किलोमीटरची राईड केली. अर्ध्या वाटेनंतर गुडघा खूप दुखला. पण गमतीची गोष्ट म्हणजे तिरपा पाय करून पेडल मारताना दुखणं कमी झालं. त्यामुळे अगदी कमी वेगात आणि २-३ व २-२ अशा लोअर गेअर्सवर हळु हळु आलो. थांबत थांबत पेडल मारत राहिलो. दुखत असतानाही सायकल चालवल्याचा आनंद झाला. थोडी रिस्क होती, पण पुढे जेव्हा मोठ्या एक्सपिडिशनला जाईन, तेव्हा आणखी जास्त गलितगात्र अवस्थेत सायकल चालवायची आहे. क्रँप्स आलेले असतील, एक एक पेडल कठिण होईल, तेव्हा सायकल चालवता येण्यासाठी आज अशा स्थितीत चालवल्याचा फायदाच होईल. असो. त्यानंतर अगदी रोज राईडस सुरू केल्या. पूर्ण बरं व्हायच्या आधी नी कॅप लावूनच अनेक सलग अर्धशतक केले. ४० किमी नंतर रोज ५० व मग ६० किमी राईडस सुरू केल्या. चार रस्ते निवडले आणि त्यांच्यावर आळीपाळीने राईडस सुरू केल्या. पहिल्यांदाच एका आठवड्यात सात अर्धशतक झाले! नऊ दिवसांमध्ये ५०० पेक्षा जास्त किलोमीटर्स झाले. आणि काहीही त्रास झाला नाही. थकवाही हळु हळु कमी होत गेला. कारण आपण शरीराला जितकं जास्त थकवत जातो, तितकं ते कमी थकत जातं! रोज ६० किलोमीटर तर डोळे झाकून चालवू शकेन, असा आत्मविश्वास मिळाला. २०१४ वर्ष संपता संपता सायकल चालवण्यातली रंगत अजून वाढली!    पुढील भाग २०: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Book traversal links for सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

  • ‹ सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवाणा-या राईडस
  • Up
  • सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
4962 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

वाचतोय.

एस
Tue, 03/15/2016 - 21:48 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

वाचत आहे.

राघवेंद्र
Tue, 03/15/2016 - 22:25 नवीन
वाचत आहे.लिहित रहा.
  • Log in or register to post comments

मस्तच!

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 22:51 नवीन
वाचतोय. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

कमकुवत जोडीदार स्नायू

विंजिनेर
Wed, 03/16/2016 - 04:44 नवीन
डिस्क्लेमरः मी डॉक्टर नाही. दुखापतीवर योग्य उपाय करण्यासाठी डॉक्टरचा(च) सल्ला घ्यावा. तुम्ही दिलेल्या वर्णनावरून तुम्हाला आयटी बँड सिन्ड्रोमचा त्रास झाला असावा असा माझा कयास आहे - कुठल्याही दमसास वाढविण्यार्‍या व्यायाम प्रकारात (उ.दा. धावणे, पोहणे, सायकलिंग) ज्यात हात/पाय इ.चे प्रमुख स्नायूच कामाला येतात, अशा व्यायामप्रकारात जोडीदार स्नायू - सहसा कमकुवत राहतात. अशा कमकुवत स्नायूंवर अधिक ताण पडू लागला (आणि तो व्यायाम प्रकार चालूच ठेवला) तर शरीर आपोआप पर्यायी स्नायूंचा वापर करते. अशा परिस्थितीत व्यायाम चालूच ठेवला तर दुखापत हमखास होते(च). सायकलिंग करताना कंबर/हिप्स इ.चे ३ स्नायू वर्ग - जे जोडीदार स्नायु असतात ते कमकुवत राहतात. पर्यायाने कंबर आणि गुडघ्याला जोडण्यार्‍या आय टी बँड वर ताण येऊन गुडघे दुखायला लागतात - विशेषतः गुडघा वाकविल्यास गुड्घ्यांच्या बाहेरच्या बाजूला असह्य वेदना होतात. स्वानुभवावर आधारित मी खालील उपाय सुचवीन (डिस्क्लेमर पहा)
  1. दुखापत असह्य असेल तर प्रथम सायक्लिंग पूर्ण थांबवावे (ह्या उपायाने तुम्हाला लगेच आराम पडला असे तुम्ही लेखात म्हटलेच आहे)
  2. तुम्ही ज्या दिवशी सायकलिंग करत नाही त्या दिवशी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे आवश्यक आहे - आठवड्यातून कमीत कमी २-३ वेळा. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे अगदी मि. युनिवर्स नाही पण पुरेसा ताण पडेल इतपत वजने उचलणे (डंबेल्स, बारबेल्स), स्ट्रेचिंग करणे, रेझिस्टन्स बँड वापरणे/फोम रोलिंग करणे इ. व्यायाम शाळेत सहजी जाता येत असेल तर उत्तमच पण स्ट्रेंथ ट्रेनिंग घरच्या घरी सहज साध्य आहेत.
  3. प्रोग्रेसीव ओवरलोड - व्यायामाची तीव्रता/वारंवारिता किंव्हा दोन्ही वाढवत नेणे.
असो. ह्या विषयावर अजून बरेच काही लिहिण्या सारखे आहे. वेळ मिळाला तर नक्की लिहीन.
  • Log in or register to post comments

डिस्क्लेमरः मी डॉक्टर नाही.

sagarpdy
Wed, 03/16/2016 - 09:39 नवीन
डिस्क्लेमरः मी डॉक्टर नाही. दुखापतीवर योग्य उपाय करण्यासाठी डॉक्टरचा(च) सल्ला घ्यावा.
आम्हाला माहितीये तुम्ही विंजिनेर आहात :D येस्स. सायकलिंग आधी आणि नंतर किमान स्ट्रेचींग चे व्यायाम तरी नक्की करावेच. याखेरीज आपले नेहमीचे सूर्यनमस्कार, जोर-बैठका (अगदी ५-१० जमल्या तरी), इ. देखील उपयोगी पडतात. वजने असतील तर उत्तमच. मागे प्रशांत साहेबांनी सायकलिंग ला पूरक व्यायामाचा दुवा दिला होता त्यामध्ये चांगली माहिती आहे. http://home.trainingpeaks.com/blog/article/the-best-strength-exercises-for-cyclists
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

सर्वांना धन्यवाद!

मार्गी
Wed, 03/16/2016 - 13:44 नवीन
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!! @ विंजिनेर जी, खूप महत्त्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद! कदाचित असेल. पण त्यानंतर तो त्रास पुढे कधीच झालेला नाही! @sagarpdy खूप उपयोगी माहिती व दुव्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त राइड

मित्रहो
Wed, 03/16/2016 - 19:56 नवीन
दुखापतीनंतरही तुम्ही राइड चालू ठेवली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा