मंडळी,
मला मराठीतील काही शब्दांच्या अचूक उच्चारांबद्दल तुमच्याकडून माहिती हवी आहे. माझा एक मित्र एका एकांकिकेच्या तालमींमध्ये गुंतला आहे. टिळक-आगरकरांच्या काळातील काही घटनांवर ही एकांकिका आधारली आहे. आजच्या काळात उच्चारांचे नियम (दुर्दैवाने) थोडे शिथिल झाले असले तरी या एकांकिकेचा काळ पाहता यातील उच्चार अचूक व प्रमाण असणे आवश्यक आहे. तर माझे प्रश्न असे ...
* आमचे, टिळकांचे, देशाभिमानाचे, कार्याचे या शब्दांतील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
* द्यायचे, करायचे, पोहोचवायचे या शब्दांतील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
* कुठचेही (उदाहरणार्थ, कुठचेही कार्य आम्हांस अशक्य नाही) या शब्दातील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
* चाकू या शब्दातील 'चा'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पूर्ण शिक्षण झाले असले तरीही मराठी वाचनाची आवड असल्यामुळे शब्दांच्या लिखित स्वरुपाबाबतीत तेवढा घोळ होत नाही, मात्र उच्चारांच्या बाबतीत क्वचित कधी होऊ शकतो म्हणून हा धागा. उत्तराची वाट पाहत आहे.
- दिपोटी
वाचन संख्या
2572
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरील सर्व चे. चा हलके
धन्यवाद!
In reply to वरील सर्व चे. चा हलके by खेडूत
'झालाच' मधला हलका 'च'.
In reply to धन्यवाद! by दिपोटी
चाकूतला च तरी जडच असावा असे
In reply to वरील सर्व चे. चा हलके by खेडूत
नाही हो.
In reply to चाकूतला च तरी जडच असावा असे by मराठी कथालेखक
"चाकवाने काय माझी........" हा
In reply to नाही हो. by अभ्या..
शहरी लोक 'च' चे उच्चार हलके
चंन्द्राप्रमाणे नाही.
+१
In reply to चंन्द्राप्रमाणे नाही. by खेडूत
चकली
In reply to चंन्द्राप्रमाणे नाही. by खेडूत
सर्व हलके "च" उच्चार करतो मी
चंदु के चाचा ने चंदु के चाचि
हिंदीमध्ये सगळे जडच की हो.
In reply to चंदु के चाचा ने चंदु के चाचि by होबासराव
धन्यवाद!
आमचे, टिळकांचे, देशाभिमानाचे,
असाच गोंधळ जाधव हा शब्द