✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कूट-मिपा

ब
बहुगुणी यांनी
Mon, 03/14/2016 - 08:17  ·  लेख
लेख
मंडळी, हे शब्दकोडं म्हणजे एक किंचित गंमत. बरेचदा आंतर्जालावर, पण त्यातल्या त्यात मिपावर, काही अफलातून तर काही टंकनकष्ट वाचवणारी लघुरुपं किंवा काही शब्दसमूह वापरले जातात. त्यांचा वापर करून हे कोडं जन्माला आलेलं आहे. तुलनेने नंतर आलेल्या वाचकांनी सहभाग घेतला तर १०-१२ प्रतिक्रियांत, अन्यथा मुरलेल्या मिपाकरांनी भाग घेतला तर २-३ च प्रतिसादांत या कोड्याचा फडशा पडेल अशी अपेक्षा आहे. पण यानिमित्ताने (सर्वच शब्द सामावून घेणं जमलेलं नाहीच, तरीही) बऱ्याचश्या मिपा-शब्दांची एकाच ठिकाणी गाठ पडावी हा या संकलनामागचा हेतू. म्हंटलं शहाणे करून सोडावे सकल मिपाजन! तर हे घ्या, कूट-मिपा! (क्रीडा प्रकारात 'शब्दकोडे' हा पर्याय नसल्याने 'नेमबाजी' हा पर्याय वापरला आहे :-)) १ आडवे: एकदा का मिपावर प्रवेश मिळाला की ज्ञानार्जनाचं हे आणखी एक दालन उघडतं. १ उभे: मिपावर प्रवेश मिळाला की ही उचकपाचक करायला मंडळी शिकतातच! २ उभे: हपापाचा माल गपापा ३ उभे: कुणाचे उपहासात्मक कौतुक करायचे झाले की असं म्हणत असावेत… ४ उभे: कळफलक बडवायचा नसलं की हे कारण पुढे केलं जातं ५ उभे: त्यात काय मोठंसं? ६ आडवे: कशापायी? ७ आडवे: हल्ली मेघदूत वगैरे नाही, विजेच्या झटक्यात संदेश! ७ उभे: फेका मारू नका, नक्की माहिती द्या! ८ आडवे: अनाहितांना हल्लीच हे नामाभिधान मिळालंय! ९ उभे: 'क्रमशः' लिहून उत्कंठा वाढली की लेखकांना / लेखिकांना असा प्रेमळ दम दिला जातो. १० आडवे: पूर्वी मिपावर स्व-संपादनाची सोय होती तेंव्हा स्वत: लेखकांना / लेखिकांना असं करता यायचं, हल्ली साहित्य संपादक मदत करतात. ११ आडवे: साहित्यकृती निर्मिणारे वाचकांना वीट येईल इतक्या वारंवारितेने लिखाण करीत असतील तर ही पडणारच! १२ उभे: बहुतेक 'चुचू' नामक सदस्याने जन्माला घातलेली ही एक अजरामर शेलकी बायकी शिवी आहे. १३ आडवे: अंमळ उपहासाने 'माझ्या बाल-मनाला लागलं हो!' असं काहीसं म्हणण्याचं हे लघुरूप, '३ उभे'चं दुसरं रुपडं. १४ उभे: रागावू नका बॉ! १५ उभे: स्वमत उत्सर्जित करणं अनावर झालं की ही पडते! १६ उभे: आता हे काय वेगळं सांगायला नको! १७ आडवे: जाता जाता काही आठवलं की असं म्हणायची पद्धत आहे १८ उभे: सनविवि ने पूर्वी पत्रं सुरू व्हायची, हल्ली प्रेमाने --- असं म्हणून प्रतिसाद संपतात १९ उभे: लेखात चढवलेले फोटो न दिसणे २० आडवे: स्वतःला जपणे म्हणजे -- घेणे २१ आडवे: किमान शब्दांत कमाल उपहास २२ आडवे: लेखाअखेरची जोडणी २३ आडवे: एखाद्या प्रतिसादाने कुणा वाचकांची जळजळ खूपच वाढली तर त्यांना हा प्रेमळ सल्ला दिला जातो!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7705 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

बहुगुणींचा अजून एका वेगळा उपक्रम.......

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/14/2016 - 09:00 नवीन
जबरदस्त इंटरेस्टिंग प्रयत्न करतो. पैजारबुवा
  • Log in or register to post comments

मस्त

नाखु
Mon, 03/14/2016 - 09:36 नवीन
प्रयत्न करतो आणि उत्तरे व्यनीत धाडतो (इतरेजनांचा विरस नको)
  • Log in or register to post comments

बरंचसं सोडवलं पण तोंडी.टंकाळा

अजया
Mon, 03/14/2016 - 11:08 नवीन
बरंचसं सोडवलं पण तोंडी.टंकाळा आला लिहायला!
  • Log in or register to post comments

भन्नाट कल्पना

सुधांशुनूलकर
Mon, 03/14/2016 - 11:10 नवीन
सोडवायचा प्रयत्न करतो बहुगुणी, भन्नाट कल्पना.
  • Log in or register to post comments

सोडवलं तोंडीच. ;-)

एस
Mon, 03/14/2016 - 11:48 नवीन
सोडवलं तोंडीच. ;-)
  • Log in or register to post comments

कौतुक

आतिवास
Mon, 03/14/2016 - 14:09 नवीन
तुम्हाला नेहमी नाविन्यपूर्ण कल्पना सुचतात याचं कौतुक वाटतं. कोडं सगळ सुटलं नाही, पण वाचताना मजा आली. मी मिपावर अजून तितकी मुरले नाही हे त्यानिमित्ताने लक्षात आलं.
  • Log in or register to post comments

सुटले ब्वा सगळे. :)

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 14:28 नवीन
सुटले ब्वा सगळे. :) काय करायचे आता? काय मिक्सर बिक्सर हाय का बक्षीस? ;)
  • Log in or register to post comments

.

कवितानागेश
Mon, 03/14/2016 - 16:00 नवीन
मला दाखव ना पेपर. मला कळत नाहीये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नक्को. डिबार करतेत. ;)

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 16:49 नवीन
नक्को. डिबार करतेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पेपर नाही दाखवला तर..

तुषार काळभोर
Mon, 03/14/2016 - 19:30 नवीन
डोकं फोडतेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मिक्सर ?

चौकटराजा
Mon, 03/14/2016 - 19:31 नवीन
आरं . म्होटा प्रिन्टर मागीव ! त्ये आमदाराच्या खापर नातवाच्या एक मह्यन्याच्या वाडदिवसाचा ब्य्यानर बन्वाचा हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाविन्यपूर्ण उपक्रम.

सस्नेह
Mon, 03/14/2016 - 15:32 नवीन
नाविन्यपूर्ण उपक्रम. मलासुद्धा सगळे कोडे नाही बॉ सुटले ! मी किती टक्के मिपाकर याचा विचार करत आहे :)
  • Log in or register to post comments

उत्तरे कुठेत..

नीलमोहर
Mon, 03/14/2016 - 16:11 नवीन
पूर्ण सोडवलेले चित्रकोडे कधी दाखवणार ? - एक अबोध, अजाण मिपाकर..
  • Log in or register to post comments

हे घ्या उत्तर

बहुगुणी
Mon, 03/14/2016 - 17:32 नवीन
तीन ठिकाणी झालेल्या मोकळ्या चौकोनाच्या चुका उत्तर देतांना लक्षात आल्या, त्या चाणाक्ष वाचक ओळखतीलच! सहभागाबद्दल सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

यात "छबोकझो" हे पण घ्या..

टवाळ कार्टा
Mon, 03/14/2016 - 17:49 नवीन
यात "छबोकझो" हे पण घ्या...मिपाच्या एका कायप्पावर भलताच फेमस आहे हा शब्द =))
  • Log in or register to post comments

?

नीलमोहर
Tue, 03/15/2016 - 11:06 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मूळ कोडे

बहुगुणी
Mon, 03/14/2016 - 19:23 नवीन
तांत्रिक नजरचुकीमुळे मूळ शब्दकोडे धाग्यातून गायब झालेले दिसते आहे, ते पुन्हा खाली देतो आहे.
  • Log in or register to post comments

ऑनलाईन सोडवता येण्यासारखं

आदूबाळ
Mon, 03/14/2016 - 19:42 नवीन
ऑनलाईन सोडवता येण्यासारखं कोडं नसतं का?
  • Log in or register to post comments

ग्रेट!

जव्हेरगंज
Mon, 03/14/2016 - 21:33 नवीन
ग्रेट!
  • Log in or register to post comments

ग्रेट!

जव्हेरगंज
Mon, 03/14/2016 - 21:34 नवीन
ग्रेट!
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Tue, 03/15/2016 - 09:05 नवीन
पुभालटा
  • Log in or register to post comments

वाह्ह, क्या बात हय ! :)

मदनबाण
गुरुवार, 03/17/2016 - 23:02 नवीन
वाह्ह, क्या बात हय ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू तू तू तू मेरी री री री मे तेरा रा रा होने लगा, में में में में तेरा रा रा रा तू मेरी री री होने लगी... :- BANGBANG
  • Log in or register to post comments

लै भारी!

पैसा
Fri, 03/18/2016 - 12:07 नवीन
आता पुन्हा एकदा बुद्धिबळाची स्पर्धा घ्या!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा