मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अमलेश्वर आणि खोलेश्वर - अंबाजोगाई

स्पा · · भटकंती
या वर्षी अंबेजोगाई ला जायचा योग आला.योगेश्वरी देवी कुलदेवता असल्याने तसे अधे मध्ये जाऊन येतो.लातूर एक्सप्रेस झाल्याने आता जाणे सोपे झाले आहे. पूर्वी सारखे औरंगाबाद हून बस ने वेग्रे जावे लागत नाही. लातूर ला उतरून एक गाडी केलेली होती.आमच्याच गाडीला अमित देशमुख असल्याने , सिंघम स्तैल मध्ये आधी त्याच्या २०-२५ गाड्यांचा ताफा धुरळा उडवत निघून गेला. मग इतर लोकांच्या गाड्या निघाल्या सकाळचे लातूर स्टेशन ॑wdeew मध्ये पोहे आणि चहा ब्रेक झाला, लातूरहून अंबाजोगाई साधारण पन्नास किलोमीटर आहे. fef गेल्यावर अंघोळी आटपून दर्शनाला गेलो.अभिषेक नेवेद्य झाला कि तसे करण्यासारखे काही नसते, आजूबाजूला फिर्ण्यासारखे पण विशेष काही नाही असे वाटत असतानाच हातातल्या एक कागदावर अम्लेश्वर आणि खोलेश्वर अशी शिवाची दोन प्राचीन मंदिरे असल्याचे समजले. म्हटले चला काहीतरी वेगळे बघायला मिळेल.गाडी केलेली असल्याने ड्रायवर दिवसभर सोबत होताच , वैजनाथ ला अनेकवेळा गेल्याने तिकडे गेलो नाही.दुपारी जेवण झाल्यावर थोडा आराम केला, प्रचंड उकाडा होता त्यामुळे लगेच बाहेर पडणे अशक्य होते. चहा घेऊन थोडा वेळ देवळात बसलो. योगेश्वरी देऊळ wdeew देऊळ अगदी प्रशस्थ आहे, पूर्व आणि दक्षिण दिशेला महाद्वार आहेत. समोर दीपमाळा आहेत.चहूबाजूंनी तटबंदी आहे wdeew wdeew jbjhb देवळाच्या आवारात अनेक विरगळ, प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. पण सर्वांची अवस्था खूपच कठीण आहे fssf तिथून आधी अमलेश्वरा कडे निघालो, दहाव्या शतकातले मंदिर यापुढे याबद्दलची काहीही माहिती मिळाली नाही, इथले माहितगार याबद्दल मार्गदर्शन करू शकतील.पण हेमाडपंती बांधकाम वाटले नाही. देऊळ अगदी एकांतात होते, बाकी कुणीच नव्हते. इतक्या देखण्या मंदिराची अशी अवस्था पाहून वाईट वाटले. अमलेश्वर wdeew गाभार्यात अप्रतिम कोरीवकाम केले होते, पण खूप अंधार असल्याने शिवाय सोबत क्यामेराही नसल्याने तसेच टिपण्याचा प्रयत्न केला wdeew wdeew वर चढायला पायर्या होत्या, पलीकडील बाजूला एक सुंदर पाण्याचे टाके होते, इतक्या दुष्काळात या टाक्याला पाणी असलेले पाहून आश्चर्यच वाटले. wdeew wdeew wdeew अवस्था खराब असली तरी मुळचे सौंदर्य एकेकाळचे वैभव दाखवतच होते. wdeew wdeew wdeew देवळाच्या पायर्यांवर असे हत्ती कोरलेले आहेत wdeew wdeew याचं हास्य लैच विकृत वाटतंय :) wdeew माहितगार कोणी नसल्याने विशेष माहिती समजली नाही , तिथून निघून मग खोलेश्वराकडे निघालो आता उकाड्याने परिसीमा गाठलेली होती, पण आकाशात मात्र ढग दाटून यायला लागलेले होते. wdeew wdeew wdeew खोलेश्वर wdeew इथे थोडी माहिती लिहिलेली दिसली,अतिशय सुंदर देऊळ पण आत भयंकर अंधार असल्याने, शिवाय सर्व भिंतींना कचकून ओईल पेंट चोपडल्याने हिरमुस झाला :( wdeew अजूनही हातात बराच वेळ होता, म्हटले मुकुन्द्राजांची समाधी पाहून येऊ, ग्रुप मधल्या बर्याच लोकांनी पाहिलेली नव्हती यावेळी मात्र आम्ही बरोबर वेळेला पोहोचलो, समोरच्या दरीत भरपूर मोर पाहायला मिळाले, सोबतची बच्चे कंपनी खुश झाली, पूर्ण पिसारा दाखवत उडणारे मोर पाहणे म्हणजे खरेच विलोभनीय दृश्य होते. सूर्यदेव हळू हळू घरी पळायच्या मार्गावर होते fsdf wdeew wdeew आम्हालाही लातूर ला पोहोचायचे असल्याने छोटी भटकंती आम्ही आटोपती घेतली आणि निघालो. लातूर ला वाडा नावाच्या एका अप्रतिम हॉटेल मध्ये जेवलो, एकदमच सुपर, झकास वातावरण निर्मिती केलेली होती, अंधारलेला वाडा, त्याचे महाद्वार, आतमध्ये स्वागताला तुळशी वृंदावन त्यात उदबत्ती पण जळत होती, खर्या तुळशीचे जंगल, नंतर विहीर , आणि आत मध्ये दगडी वाडा.एकदम अंधुक उजेड , जागोजागी कंदील लटकलेले. जेवण तर जबराटच होते. वांग्याचे भरीत, ज्वारीच्या भाकर्या, दाण्याची चटणी, हिरवा ठेचा, शेवभाजी, दही , मजबूतच अडवा हात मारला. जेऊन बाहेर आल्यावर मात्र वातावरण बदललेले होते , दणकून विजा चमकायला लागल्या.सगळीकडे मस्त मातीचा सुवास सुटला, बारीक पावसाला सुरवात झाली, सुरवातीला गम्मत वाटत होती, पण हळू हळू विजांनी रौद्ररूप धारण केले. कसेबसे स्टेशन ला पोचलो. लातूर एक्स्प्रेस उभी होतीच. मुंबई च्या दिशेने एका सुंदर दिवसाची समाप्ती झाली टीप : सर्व फोटो मोब्ल्यावरून काढल्याने सर्वसाधारण आलेले आहेत

वाचने 15688 वाचनखूण प्रतिक्रिया 45

प्रचेतस Sun, 03/13/2016 - 18:36
यु मेड इट. योगेश्वरी देवळात आहे तो गधेगाळ आहे. खोलेश्वर हा सिंघण (दुसरा) ह्याचा सेनापती. आंबे गावात ह्याचे दोन लेख आहेत. एक बहुधा हा योगेश्वरीतील गधेगाळावरील असावा. दुसरा लेख हा खोलेश्वर मंदिराच्या भिंतीत आहे. ह्याचे छायाचित्र दिसले नाही. खोलेश्वराची कन्या लक्ष्मी हिने रामनारायणाचे देऊळ बांधले असा उल्लेख त्या लेखात आहे. लेखात सिंघण यादव आणि खोलेश्वर ह्याची प्रशस्ती गायिली आहे. कालांतराने हे रामनारायणाचे देऊळ खोलेश्वराचा मठ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि सध्या हेच नाव प्रचलित दिसतेय. अमलेश्वराचे मंदिरही भारी दिसतेय. एकदा आंबेजोगाईला जावेच लागेल. कचकून अवशेष आहेत.

अभ्या.. Sun, 03/13/2016 - 18:39
स्पावड्या लेका आंबेजोगाईला येऊन गेलास? सोलापुरात भेटलो नाही त्याची कसर भरुन काढली असती. ;) असो. अप्रतिम फोटो. शेवटचा तर लैच आवडण्यात आला आहे.

बोका-ए-आझम Sun, 03/13/2016 - 19:05
किती तो विनय? फोटो अप्रतिम आलेले आहेत. हे म्हणजे एखाद्या लेखकाने पेन साधं होतं म्हणून लेख फालतू झाला असं म्हणण्यासारखं आहे. रच्याकने मराठवाडी पोहे दाखवायला हरकत नव्हती. तो प्लेटमध्ये डोंगर करुन देण्याची पद्धत खूप आवडते.

सुधांशुनूलकर Sun, 03/13/2016 - 19:44
वाडा लक्षात ठेवला आहे! प्रचेतसबरोबर भविष्यात करायच्या करायच्या कट्ट्यांमध्ये एका कट्ट्याची भर घातली आहे.

नाखु Mon, 03/14/2016 - 10:32
एका दिवसात करण्यासारखी दिसताहेत. वल्लीम्बरोबर गेलो तरच उजेड पडेल. वाडा शाकाहारी(सुद्धा) असल्यास नक्कीच भेट दिली जाईल. वल्ली मनावर घेणे.

In reply to by प्रचेतस

Parag Purandare Mon, 03/14/2016 - 13:58
निलंगा व खुद्द लातुरमधले सिध्देश्वर मंदिरपण करायला विसरु नका. सर्व मंदिरे एका ट्रिपमधे करायची असल्यास ८ दिवस तरी पाहिजेत.

जिन्गल बेल Mon, 03/14/2016 - 11:59
चार वर्षे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात काढल्याने अंबेजोगाई चे माझ्या आयुष्यात एक खास स्थान आहे!! जुने दिवस आठवले... योगेश्वरी, मुकुंदराज, खोलेश्वर म्हणजे आमचे पिक-निक spots होते... :) अनेक धन्यवाद!

पैसा Mon, 03/14/2016 - 12:16
मस्त रे स्पावड्या! जुन्या दगडी देवळाला ऑईलपेंट लावलेला बघितला की त्या लोकांना चिंचेच्या फोकाने झोडपून काढावेसे वाटते!

जेपी Mon, 03/14/2016 - 12:43
छान व्रुत्तांत.जवळ असुनही अंबाजोगाई कधी पाहिल नाही.. बाकी वाडा चा उल्लेख आला आहे तर ते ठिकाण आमच्यासाठी हेवनवाशी होण्याचे आहे..

हासिनी Mon, 03/14/2016 - 13:20
एकदम मस्त रे स्पावड्या!! वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख येऊ देत अजून..! :)

चौकटराजा Mon, 03/14/2016 - 13:28
आमची कुलदेवता योगेश्वरीच आहे १९७२ नंतर आज पर्यन्त गेलो नाही. पण आता लातूरला जाउन जवळ पडतेय का ? असे असेल तर जाईन म्हण्तो. आपल्याला रेल्वेचा प्रवास आवडतो. बाकी फटू मस्त अल्यात.

कंजूस Mon, 03/14/2016 - 16:49
छान ओळख झाली फोटोंतून.एवढं वाइट म्हणतोस तसा काही फरक दिसत नाहीये.मोबल्यातला कॅम्रा वाइड अँगल नेचर फोटोग्राफीत मार खातो पण देवळातल्या मूर्ती वगैरे चांगल्याच येतात.दूरचे फोकसिंग मार खाते. १)मन्युअल कंट्रोलवाला आहे का?, २) फोनमध्ये सेव झालेला फोटो जास्तीत जास्त किती एमबीचा आहे? एकदा मोबाइल विरुद्ध एसएलआरने काढलेले फोटो देऊन तुलनात्मक लेख टाक कधीतरी.

पिलीयन रायडर Mon, 03/14/2016 - 18:43
लहानपणीच्या कित्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्या अंबेजोगाईत गेल्या आहेत. पण आता मात्र ६-७ वर्ष होऊन गेली, जाणे झाले नाही. लहानपणी योगेश्वरीच्या देवळात जायचो, तेच हे देऊळ का असा प्रश्न पडला इतके सुंदर फोटो!! परत जाऊन पहावे लागणार मंदिर. तुमच्या फोटोत जो मुड आला आहे.. पाऊस दाटुन आल्याचा, तशा मुड मध्ये अंबेजोगाई क्वचितच असते. रखरखीतपणाच जास्त. पाणी नाही.. लाईट नाही.. गच्चीवर झोपणे मस्ट. रोज आईस्क्रिम मस्ट! होलसेलमध्ये डुकरे मी फक्त अ.जोगाईलाच पाहिली आहेत! बाभळीची झाडे खुप. पण आता खुप बदलले असणार. कशी का असेना.. अंबेजोगाई = उन्हाळ्याच्या सुट्ट्या..! तुमच्या लेखाने सगळ्या आठवणींनी मस्त वाटले!

खेडूत Sun, 04/03/2016 - 07:19
कुलस्वामिनीस दंडवत! अतिशय रम्य परिसर आहे हा..आता पुनः एकदा जायला हवे. तो दगड झालेल्या हत्तींचा फोटो हवा होता. आणी त्यांची ती कथाही पुनः ऐकायला आवडेल. लेखासाठी धन्यवाद. ( @चौराकाका: लातुरातूनच जाणे सोयीचे आहे पुणेकरांना.)

In reply to by खेडूत

प्रीत-मोहर Mon, 04/04/2016 - 20:22
परवाच गुड फ्रायडे वाल्या वीकांताला जाउन आलो अंबाजोगाईत. हत्तीखान्याची अतिशय वाईट अवस्था आहे. दारुच्या बोटल्स फोडुन काचा प्रत्येक पावलाला होत्या. नावापुरता फलक होता महाराष्ट्र शासनाचा नेहमी असतो तसा, आणि ते हार्ट शेप , नाव वगैरे सगळ्या हत्तींवर आहे काढलेलं. अगदी नंदी पण सुटला नाही त्यातुन. आम्ही काठ्या वगैरे वापरुन जमल तेवढ साफ केल, बघितल काय बाय आणि परतलो.

रेवती Mon, 04/04/2016 - 03:01
फोटू व लेख आवडला. जुनी दुर्लक्षित मंदिरे आवडली. आंबेजोगाई मंदिराचे प्रवेश्द्वार आता रंगवलेय. पूर्वी रंगवले नसताना/ रंग उडालेला असताना गेल्याचे आठवते आहे. माझ्या सासूबाईंना माझ्याहातून देवीची ओटी भरायची असल्याने गेलो होतो असे काहीसे आठवते. तेथील एका गुर्जींकडे जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी तरी देवळाच्या बाहेर बांगड्यांचे दुकान होते. बरोबर असलेल्या सर्व महिलांनी देवीचा प्रसाद म्हणून डझनभर बांगड्या भरून घेतल्या होत्या. नंतर आजूबाजूला राहणार्‍या एक दोन परिचितांना भेटून आम्ही परत आलो होतो. कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भयंकर उकाडा अजूनही आठवतोय पण गुरुजींच्या जुन्या पद्धतीच्या घरात गारवा होता. दोनेक मिनिटात आंबेजोगाईची सफर झाली.

चांदणे संदीप Mon, 04/04/2016 - 06:02
या ठिकाणी आधी जाऊन आलेलो असल्याने फोटो व माहिती विशेष आवडली व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुकुंदराजांपर्यंत तुम्ही गेलेलाच मग थोडं पुढे बुट्टेनाथ आणि नागनाथला गेला नाही का? बुट्टेनाथ जरा उंचीवर अवघड कपारीत आहे, तरी पण तिथे मिनी फ्रीस्टाईल रॉक क्लाइबिंग करत जायला मज्जा येते. रिस्की आहे खरं! तेवढे लातूरातल्या वाड्याचेही फोटो टाकायचे होते की! Sandy