सायलेंट ऑबझव्हर, सोनोग्राफी, आणि सेक्स रेशो तसेच बायल्ये
महाराष्ट्रातल्या एक माणसाने अथक प्रयत्न करुन सायलेंट ऑबझर्व्हर नावाचे एक सयंत्र शोधुन काढले त्याचा सत्कार "चला हवा येऊ द्या" कार्येक्रमात ८ मार्च च्या दिवशी अनेक स्त्रीयांनी केला हे आपण पाहीले असेल.
परदेशात नोकरी करुन भारतात स्थायीक झालेल्या माणसाने हे उपकरण शोधले जे सोनोग्राफी मशीनने काय काय दाखवले ते रेकॉर्ड करते. हे रेकॉर्डींग पाहिले की समजते की सोनोग्राफी सेंटर्स ना सेक्स रेशो संदर्भात किती सामाजीक जाणिव आहे. यामुळे सोनोग्राफीत गर्भ लिंग दाखवले गेले असेल तर ते स्पष्ट होते अन्यथा कितीही कायदे केले आणि सोनोग्राफी मशीनवर कायद्याचे फलक लावले तरी स्त्रीयांचे पुरुषांच्या प्रमाणातले घटते आकडे हेच दाखवतात की दाल मे कुछ काला है.
महाराष्ट्रातल्या बहुदा पाच कोटी जनतेला हे माहितच नव्हते की महाराष्ट्रातल्या सोनीग्राफी धारक संघटनेने या मशीनवर असा सायलेंट ऑबझर्वर लावण्यास विरोध केला. यामुळे म्हणे गोपनियता भंग होतो. स्त्रीया शिल्लकच राहिल्या नाहीत तर स्त्री विषयक कसली गोपनियता असे म्हणत मुंबई हायकोर्टाने त्याची याचीका फेटाळली.
तरीही मुलगा पाहिजे म्हणणारे यावर उपाय शोधुन काढायला तत्पर आहेत असेच म्हणावे लागेल.
फक्त सोनोग्राफीनेच भ्रुणाचे लिंग समजते असे काही नाही.
खालील लिंक उघडुन पहा म्हणजे समजेल की यावर अजुनही मार्ग आहेत आणि ते जाहिरपणे इंटरनेटच्या माध्यमातुन मार्केटींग केले जातात याबाबत काय करायचे ?
http://www.tellmepinkorblue.com/
( मी जाहीर करतो मला एकच मुलगी आहे आणि मी या पध्दतीचे मार्केटीग करत नाही. या साईटवर बंदी घालायला हवी )
हे किट मागवा म्हणजे सोनोग्राफी वाल्याकडे जायला नको आणि त्यांचा रिपोर्ट घ्यायला नको. ह्या प्रकाराने लिंगनिदान होणार असेल तर १००० पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या आज ८०० ते ९०० च्या घरात आहे ती आणखी घसरेल. मग पांडवकालात जे घडले ते घडेल. दोन पुरुषांची एक पत्नी किंवा त्याहुनही जास्त. ( अर्थात आजकालच्या स्त्रीयांना असे जाहीर लग्न पटायला हवे ) पांडवकालात पुरुष क्लोन टेक्नीक होते ज्यामुळे सेक्स रेशो तेव्हाही बिघडला असावा. कारण सगळे ९९ कौरव पुरुष होते आणि क्लोन होते असे म्हणतात.
दुसरा पर्याय ही आहे ज्याबाबत समलैंगीकता कायदेशीर ठरवण्यावर विचार मंथन चालु आहे. फार बोकाळले आहे सध्या हे सर्व. पुर्वी नाही म्हणायला एखाद्या बायल्या असायचा ज्याच्या बाबत काही उलटे सुलटे बोलले जायचे.
आजकाल " गे " आणि बायोसेक्स्युअल्स ची संख्या वाढताना दिसते आहे कारण जबरदस्तीने मुलांचे लग्न लावणे मागे पडत आहे. करीयरच्या कारणावरुन सुशीक्षीतात विवाह करण्याचे वय वाढताना दिसत आहे. त्या जोडीला इंटरनेट माध्यमातुन अश्या गे जोडीदारचा शोध घेणे, चॅट करणे सोपे झाले आहे.
म्हणजे काय स्त्रीयांची संख्या घटली म्हणजे लगेच बलात्कारच वाढतील असे नाही. त्या ऐवजी समलैगीकतेला सामाजीक मान्यता मिळुन सामाजीक प्रश्नाला पर्यायी उत्तर मिळेल असा कल समाजच दाखवत आहे. हे समाजाच्या, कुटुंब व्यवस्थेच्या, सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही ह्यावर चर्चा सुरुच आहे.
भारतात एकंदरीतच जनसंख्येच्या स्फोटाला काहीतरी उपाय पुढील १०० वर्षात मिळेल असे समजायला हरकत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारतात एकंदरीतच जनसंख्येच्या
बाकी सगळं पटलं, पण सेक्स
पण सेक्स रेशोमुळे
समलिंगी संबंध ही एक मानसिक
सेक्स रेशो मुळे स्त्रीयांची संख्या कमी झाली तर पुरुषांना विवाहासाठी स्त्रीया मिळणार नाहीत असा प्रश्न आहे. यावर समाजाने गे- विवाह हा पर्याय काढला आहे. ( हा प्रश्न आहे म्हणुन नाही तर विवाह विषयक धारणा बदलत आहे. )या दाव्याला कोणता पुरावा आहे ? आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो की, जगातल्या कोणत्या समाजाने समलैंगिकता सहजासहजी स्विकारलेली नाही. कित्येक मोठ्या धर्मांत तर समलैंगिकांना मृत्युदंडाची शिक्षा सांगितली गेली आहे. समाजाच्या भितीने समलैंगिकांना त्यांचे संबंध गुप्त ठेवावे लागले आहेत/लागत आहेत. अलिकडल्या कालात, काही व्यक्तींनी सतत केलेल्या संघर्षामुळे आणि काही समाजात विकसित झालेल्या / होत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांमुळे, समलैंगिकता आजार/विकृती नसून भिन्नलैंगिकतेसमान मानसिक स्थिती आहे हे, नाईलाजाने का होईना, पण कायदेशीररित्या तरी मानले गेले आहे, इतकेच ! सर्व समाजाने समलैंगिकता मोकळ्या मनाने स्विकारणे, आजच्या पाश्च्यात्य देशांतही कठीण आहे... तिला समाजाने काढलेला पर्याय समजणे कल्पनेपलिकडचे आहे ! ================= लैंगिकता हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्या बाबतीत निर्णय घेण्याची मोकळीक असली पाहिजे असे माझे व्यक्तीगत मत आहे. हा प्रतिसाद, लेखातले/प्रतिसादातले दावे वाचून वाचकांचा गैरसमज होऊ नये, केवळ यासाठीच लिहिलेला आहे.+1
सेक्स रेशो मुळे स्त्रीयांची
सुरुवात एका स्पृहणिय
कालच 'मातृभूमी' नावाचा हिंदी
http://www.dnaindia.com
खरे साहेब रेडिऑलॉजिस्ट आहेत.
माझ्या माहीतीनुसार हे सायलेंट
या मशिनची किंमत अवास्तव जास्त
बायल्ये?
+१०००
या अनुशंगाने एक प्रश्न डॉक्तर
ही सगळी क्लिष्ट गणितं आहेत
हो.. बहुधा पूर्वीच्या काळी
ते तसे नाही
आनंदा आणि खरे, दोघांच्याही
आनन्दा आणि खरे काका,
मुलगी हवी यात दांभिकपणा कसला ?
दुसरी मुलगीच हवी यात गैर
पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे. =))