अतिंद्रिय शक्ति कि काय माहिति नाहि पण मला डिप्लोमा ला असताना स्वप्नामधे 'C language' चा पेपर दिसला होता.परिक्षेच्या एक दिवस आधि. आणी परिक्षे मधे ९०% पेपर तसाच्या तसा आला होता.पण बस हे एकदाच घडले होते माझ्ह्या बाबतित.त्या नतंर कधि असा अनुभव आला नाहि मला.
हेच तर होतं. पण अर्थात पेपर स्वप्नात दिसायचा नाही. अभ्यास करून (पुस्तकांचा आणि आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही) मला साधारण ८०% प्रश्न समजायचे. अगदी पीएच.डी.च्या व्हायव्हालासुद्धा असंच काहिसं झालं होतं.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
मी परिक्षेच्या आदल्या दिवशी २१ अपेक्शित प्रश्नसंग्रह घेऊन यायचो. त्यातलेच सगळे प्रश्न थोडाफार शब्दात फरक करून यायचे पेप्रात. त्यामुळे उगाच अतींद्रीय शक्तिची मदत नाही घ्यायला लागली पेप्रात.
(एटीकेटीवाला)
पुण्याचे पेशवे
Since 1984
आपल्याला न कळणार्या बर्याच गोष्टी जगात आहेत हे मी सरळपणे मान्य करतो. त्यामुळे संभ्रम पैदा होत नाहीत. हे अनुभव सापेक्ष व सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला अनुभव नाही आला तरी कुणाला येऊ शकणार नाहीच असे नाही.
मुमुक्षु
मागे अश्याच विषयावर मी एक चर्चा प्रस्ताव ठेवला होता.अध्यात्म आणि अद्भुत अनुभवांचे जग
वेळ मिळाल्यास जरुर वाचावा.
असे अनुभव येतात. येऊ शकतात. त्यांना आज समजलेल्या विज्ञानाच्या भाषेत बसवण्याची मी घाई करत नाही. आणि ते अनुभव सरळ असल्याने न मानण्याचा अवैज्ञानिकपणा करायला मी कचरतो. तर्काने काही उलगडले नाही तर पुढे कधीतरी कळेल असे म्हणून ते फडताळात ठेऊन देतो.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
अतिंद्रीय या शब्दांतच इंद्रियापलिकडच्या गोष्टी दडल्या आहेत.
जे इंद्रियाला समजत वा उमगत नाही ते अतिंद्रिय होते.
मानवाचा मेंदू हे एक आजही कोडे आहे. सर्वसामान्य लोक मेंदूचा ५% भागही वापरत नाहित असे कोण्या एका संशोधनात म्हटले आहे (गूगळायचा कंटाळा आला म्हणून संदर्भ देणे टाळत आहे.) आईनस्टाईनचा मेंदू देखील सर्वसामान्यांपेक्षा थोडा जास्त वापरला गेला म्हणून इतके शोध तो लावू शकला.
ढोबळमानाने मनुष्य इंद्रिय हे त्रिमितीचे जग अनुभव करते.
इतर मितींबाबत फक्त अनुमाने, गणिते, कल्पना आहेत.
पण आपल्यातही अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांना भविष्यकाळात घडणार्या घटनेची चाहूल लागते. (येथे एक सांगावेसे वाटते, चाहूल लागली तरी त्या घटनेत बदल करण्याची शक्ती त्यांच्यात नसते.) यालाच सिक्स्थ सेन्स असेही म्हणतात.
ही झाली अतिशय प्राथमिक माहिती ...बाकी इथे अनेक जाणकार अभ्यासक आहेत. तेही प्रकाश टाकतीलच या विषयावर
आणि चर्चेचा रागरंग पाहून मी देखील अजून ज्ञान (अ)ज्ञान पाजळेल :)
सागर
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का?
प्रत्यक्ष अनुभव नसल्याने याबतचा विचार तितका स्पष्ट नाही. पण - अनेकांना तसा प्रत्यक्ष अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि त्या व्यक्ती विश्वासार्ह वाटतात - (उदा. प्रस्तुत लेखक). त्यामुळे तो अनुभव प्रत्यक्ष स्वतः (कधी संधी मिळाली तर) जोखून बघायची आणि जर सिद्ध झाला तर विश्वास ठेवायची तयारी आहे.
प्रभुजी, अनुभव प्रत्यक्ष आल्याने तुम्ही त्यावर विश्वास ठेवता पण - 'मी ह्या न उलगडणा-या प्रष्नापासुन सहसा लांब रहातो.असतात हे त्या न दिसणा-या वर बसलेल्या 'जोकर' चे खेळ असे म्हणतो आणि पळुन जातो.' - असे तुम्ही का करता?
पळ न काढता, याप्रकारची अतिंद्रीय शक्ती तुमच्यात आहे काय?- याचा समर्थपणे शोध का घेत नाही?
'मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.'
'भाकीत' केल्याने काही नुकसान होईल असे आपणास वाटते काय?
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का?
होय.
ह्याला अतिंद्रिय शक्ती म्हणावे काय.?
नाही. हे केवळ अतिनिकट परिचयामुळे आपल्या मातोश्रींनी केलेल्या विचारांचे फळ आहे. अतिंद्रीय शक्ती असती तर, नाते संबंध नसलेल्या व्यक्तींबाबतही हे अनुभव आले असते. पण आपल्या लेखात तसे उल्लेख नाहीत. त्यामुळे अगदी प्राथमिक स्वरुपाची शक्ती असावी असे वाटते.
भविष्यात येणा-या संकटाची चाहुल लागते?
स्वतःवर येणार असलेल्या संकटाची चाहुल लागत नाही. दुस-यावर येणा-या संकटाची कदाचित लागु शकते.
दैव एवढे दयाळु नाही की शकुन अपशकुनाचे अथवा सुचनांचे दुत पाठवुन मनुष्याला सावध करेल आणि इतके मुर्ख तर नक्कीच नाही.
मग लिहुन ठेवलेले प्राक्तन म्हणजे काय.?
अज्ञाताच्या अंधारगुहेत हात घालुन आपल्याला दिलेला दिवस. जो रोज वेगळा असतो.
मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.
आपण आपले आप्त सोडुन, ज्यांच्याशी आपला निकटचा परिचय नाही, त्यांच्या विषयी जाणु शकत नसाल असा माझा अंदाज आहे. आणि जर जाणु शकत असाल तर भाकित करण्याचे टाळणे हाच योग्य निर्णय.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
अवलिया,
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
काही जळमटे दुर झाली.
माझा ई.एस्.पी. ला समांतर मराठी शब्द चुकला.(एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर)
ही बहुदा आपल्या सर्वांमधे असावी.. इतर गोष्टीमधे अडकल्यामुळे तीचा योग्य वापर करता येत नसावा. मेंदुच्या विस्तृत कक्षेचा संपुर्ण उपयोग करणे ह्या दृष्टीने बघितल्यास ह्या वापराचा आपण करतो त्या कामात खुप उपयोग होउन प्रगती होईल असे वाटते.
अवांतरः व्यं.नी मधे टाइम फ्रेम चे स्पष्टीकरण्-लई भारी. मी नेहेमी लक्षात ठेवीन.
आपला विद्यार्थी,
वि.प्र.
८ वर्षापुर्वीची गोष्ट. माझ्या सख्ख्या भाऊजींकडे बघून मला त्याकाळात काहितरी विचित्र वाटायचे..मी त्यांना तसेच घरच्यांना तसे म्हणालो पण की जरा भाऊजींची तब्येत तपासा. सगळ्यांना परत परत सांगितले...पण कोणीच मनावर घेतले नाही..
दुर्दैवाने त्याच काळात त्यांचे अचानक आलेल्या ह्रदयविकारामुळे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी निधन झाले. कदाचित दैवाने मला सांगितले होते. मीच जरा पुढाकार घेऊन त्यांना जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन जायला हवे होते.
तसे केले असते तर ते आज आमच्यात असते.
खादाडमाऊ
प्रभू सर
काही व्यक्तींमध्ये जन्मताच अतिंद्रीय शक्ती असते. त्यातून त्यांना अशा काही गोष्टी साधतात असे मी काही पुस्तकातून वाचले आहे. प्रा. मधुकर दिघे यांची काही पुस्तके या विषयावर आहेत.
माझा एक अनुभव
सुमारे २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी संमोहनाचे कार्यक्रम प्रसिद्ध होते. त्यामुळे हा प्रकार आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही मित्र धडपडत होतो. असेच एकदा दुपारच्या वेळेस एका मुलाला संमोहीत करण्यात आले असता तो प्रगाढ मोहनिद्रेत गेला. त्याची चाचणी घेण्यासाठी दुसर्या खोलीत पालथे ठेवलेले पत्ते कोणते आहेत ते त्याला विचारण्यात आले असता त्याने ते दहाही पत्ते बरोबर त्याच क्रमाने सांगितले. तो मोहनिद्रेतून बाहेर आल्यानंतर त्याला विचारले असता तो म्हणाला की मोहनिद्रेत असताना ते पत्ते त्याला दिसत होते.
स्तोत्रं पाठ न झालेल्यांचे दु:ख ! (ह घ्या)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
हे सरता संपत नाही , भांडणे मिपा-कर्त्यांचे ! हाहाहा ...
मिपाकर्ते का मिपाकर?
(शंकासूर) अदिती
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
कर्णाशी (नेहमीप्रमाणे ) सहमत आहे.
पण .... इथे २ शक्यता येतात.
१. शंकासुर ( ते सुदलेखणाचे तुम्ही बघुन घ्या भौ, आपल्याला काही उमजत नाही त्यातले ):
शंका + असुर ....
म्हणजे जे सारख्या "शंकावर शंका" काढतात ते असुर सदॄष्य ,नराधम, अमानवी प्राणी
२. शंकासुर :
आपल्याला "शंका" आहे हे तार"सुरात" ( तारस्वराच्या चालीवर ) ओरडणारा ...
आता यातले योग्य कुठले ?
------
छोटा डॉन
मला ही असली इन्ट्यूशन चा आजार आहे. बरेच अनुभव आले आहेत. एखादी गोष्ट घडेल असे पटकन वाटून जाते. ती घडतेच. उदा देतो.
१. माझ्या कारसमोर एक बाइ स्कूटीवरुन चालल्या होत्या. थोडा पाउस होउन गेला होता. माझ्या मनात आलं की आता ही बाइ पडणार. पुढच्या दोन मिन्टात बाइ पडल्या. मी सावध होतो त्यामुळे कार वेळीच थांबवली.
२. हापिसातून परत येताना, समोरुन एक गवत भरलेला ट्रक येताना दिसला. बरेच गवत भरले होते. तेव्हा वाट्ले की हा ट्रक उलटणार. बायकोला तसे बोललो. ती काही बोलणार तेवढ्यात डोळ्यासमोर तो ट्रक उलटला.
३. एकदा कारने गावाला जात होतो. प्रवास ७-८ तासाचा.जायच्या आधीपासूनच गाडीचा इग्निशन फ्युज उडणार असे वाटत होते. त्यामुळे जादा फ्युज घेउन ठेवले होते. त्याप्रमाणे प्रवासात दुपारीच इग्निशन फ्युज उडालाच!
असे अनेक अनुभव आहेत. पण परिक्षेचे पेपर मात्र नाही बुवा दिसले कधी.
माझा विश्वास नव्हता आधी पण काही अनुभव मला आले त्याही पेक्षा एक निंबळकर नांवाचे कोल्हापुरचे गृहस्थ भेटले होते त्यांची शक्ती माझ्या आकलना बाहेर होती.
पण ते सांगायचे, मला दिवसाचे २४ तास असे काही 'दिसत' नाही पण कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी मनःचक्षूंना दिसू लागतात आणि मी सांगायला सुरूवात करतो. अशा वेळी मला डिस्टर्ब करू नका. नाहीतर माझी लिंक तुटते. आणि पुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भात काही सुचेलच असे नाही.
माझ्या बाबतीत त्यांनी केलेली भाकिते बर्यापैकी (८०-९० टक्के) खरी ठरली. त्यांची प्रसिद्धी एवढी होती की ते मस्कतला आले असताना मस्कतच्या राजाच्या आईच्या कानावर ती (प्रसिद्धी) गेली. राजमातेने त्यांना खास आपल्या महाली बोलावून घेतले आणि काही चर्चा केली. काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितले नाही. एकाची केस ते दुसर्याबरोबर शेअर करायचे नाहीत.
त्यांच्या त्या अतिंद्रिय शक्तीवर एक लेख लिहीता येईल एवढ्या आठवणी आहेत.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
याला कसली शक्ती म्हणावं की काय या बाबतीत मी गोंधळलेली आहे.
पण इन्ट्युशन्स मलाही खूप येतात. आणि जेव्हा जेव्हा मी त्या इन्ट्युशनप्रमाणे वागले आहे तेव्हा मला कधीही पस्तावायची वेळ आलेली नाहीय. पण जर उलटे झाले, की आतून वाटतंय एखादी गोष्ट करावी, आणि तशी काही कारणाने नाही केली की मात्र पस्तावा होतोच होतो!
मात्र, हे मला केवळ माझ्याबाबतीतच होते. दुसर्या कुणाबद्दल काही वाटले नाहीए.
हा विषय वाचल्यावर अपरिहार्यपणे 'देजावू' ही कन्सेप्ट आठवलीच! जवळपास सगळ्यांना येणारा या अनुभवाबद्दल मला फार आकर्षण आहे. कसे होते काय वगैरे. खूप कारणं ऐकली /वाचली आहेत. ठोस कुठलं हे माहीत नाही, तरी रिडर्स डायजेस्ट च्या एका ब्रेन विषयक पुस्तकात वाचलेले कारण पटते.
तसेच, देजावू च्या उलटे 'जमैसवू' म्हणजे, ओळखीच्या गोष्टी अनोळखी वाटणे हे ही कधी कधी अनुभवले आहे.
http://bhagyashreee.blogspot.com/
शक्ति... आतिंद्रिय... दीज आर ऑल adjectives चिको!
डोण्ट एव्हर ट्राय, क्वालिफाय सॉमथिंग...
अनुभव आला नसेल असा एक ही माणूस नसेल... मग एकाद्या माणसात "खास गुण" म्हणण्या सारखं काय?
अनुभवणारे आपणच.. ते ही इंद्रियाद्वारे... मग आतिंद्रिय कशाला?
शक्ति असेल तर जी आपल्या कन्ट्रोलमध्ये नाही तिचा उपयोग काय?
काळ आणि अवकाश यांचा परीघ आणि छेद अज्ञात आहेत...
जे अज्ञात आहे ते विज्ञान नाही असं म्हणणं चुकीचं होईल.
सो... जे आहे ते आहे... लेट इट सिंपली एक्झिस्ट चिको!
-रेझर
अनुभव आला नसेल असा एक ही माणूस नसेल...
आहे, मी आहे (आणि माणूसही आहेच).
आपला प्रतिसाद ऐंद्रीय शक्ती वापरून मला कळला नाही आणि विशेषतः हे वाक्यः
काळ आणि अवकाश यांचा परीघ आणि छेद अज्ञात आहेत...
माझ्या माहितीत काळ आणि अवकाश यांचा छेद शून्य आहे, कारण काळ (१ मिती/dimension) आणि अवकाश (३ मिती) या चार मितींमधे आपण रहातो. कोणतीही घटना, वस्तू यांची स्थिती(? positions) देण्यासाठी हे चारही coordinates देण्याची गरज असते.
अवांतरः माझ्या अल्पमाहिती आणि स्मरणशक्तीनुसार chico या शब्दाचा अर्थ छोटा मुलगा असा आहे. मी छोटा मुलगा नाही, तरीही आपला प्रतिसाद वाचला आणि प्रतिप्रश्न(?) विचारला, तेव्हा राग मानू नये.
अदिती
ऐंद्रीय अनुभवांची गुंतागुंत उलगडत नाही. भौतिक जगाचे प्रश्न पुरते कळत नाहीत. या आयुष्यातल्या समस्यांची पूर्ती होत नाही.मित्रांनो , अतींद्रीय अनुभवांची लक्झरी परवडते आहे कुणाला ? "मुक्ती नको , हा इहलोक हवा" असे कवी बोरकर म्हणून गेलेत. मी म्हणतो , "एकावेळी एक प्रॉब्लेम." इहलोकी आहोत , तर "रक्तामधल्या प्रश्नांकरताचे होकार" मिळवूयात. पारलौकिक आणि अतींद्रीयाबद्दल बोलू जेव्हा त्या "लोकी" जाऊ. मुझको मालूम है जन्नतकी हकी़क़त लेकिन, दिलके खुष रखनेको , विप्रसाहेब , ये ख्याल अच्छा है ! =))
एक साधे उदाहरण सांगू?
आपण एखादे गाणे गुणगुणत असतो आणि तेच कुठेतरी ऐकू येते. आपल्या बाबतीत हे हज्जारदा होते. कधी कधी एखाद्या व्यक्तीची आठवण येते, भेटावेसे वाटते आणि ती व्यक्ती अचानक भेटते. भेटण्याची सुतराम शक्यता नसताना! किंवा, तिचा फोन तरी येतो. आपण त्याला `१०० वर्षं आयुष्य' असं म्हणतो.
हे अतींद्रिय शक्तीचं प्रकरण `१०० डेज' मध्ये जरा (अतिशयोक्त रूपात) दाखवलं होतं. मला वाटतं, स्वप्नात पण असल्याच काय काय चमत्कारिक गोष्टी दिसतात. `मनी वसे ते स्वप्नी दिसे' म्हणतात. पण मला तर अनेकदा अनोळखी चेहरे, किंवा ओळखीच्या व्यक्ती अनोळखी ठिकाणी दिसतात.
काहीतरी गूढ आहे, नक्की!
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का?
अर्थातच आहे!!!
किती उदाहरणे देऊ?
१. आज दुपारी कॅन्टीनमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक माणूस बसून समोरचे जेवण चमच्याने चिवडत होता. मला एकदम वाटलं की आता हा चमचा एक्दम तोंडात घालणार! आणि काय आश्चर्य!! त्याने खरंच तो चमचा नाकात किंवा कानात न घालता चक्क तोंडातच सारला.
२. आज सायंकाळी ऑफिसातून घरी येतांना! समोर ट्रॅफिक सिग्नल पिवळा झाला होता. मला एक्दम वाटलं की आता रस्त्यावरची सगळी वहानं थांबणार!!! आणि काय चमत्कार! तो लाईट लाल झाला आणि सगळी वहानं थांबली....
३. आज घरी आल्यावर आपल्याला मासळी खायला मिळणार असं सारखं वाटत होतं. आणि बघितलं तर खरंच! पानात मासळी होती. (मासळी शिजतानाचा वास आला होता पण त्याचं एव्हढं काही विशेष नाही!!!)
तेंव्हा होय! अतिंद्रिय शक्तींवर आमचा पूर्ण भरवंसा आहे.....
-अतिंद्रिय डांबिस
:)
पिडाकाका, माझ्या मनातलं लिहिलंत, सहमत, +१, आपल्या प्रतिसादात पिडा दिसले.
घ्या, आणखी एक पुरावा अतिंद्रिय शक्तिंचा! ;-)
अवांतरः ट्रॅफिकचं प्रेडीक्शन, खाणं, गाणं वगैरे वाचून मलाही असंच काहीसं वाटत होतं.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
१. आज दुपारी कॅन्टीनमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक माणूस बसून समोरचे जेवण चमच्याने चिवडत होता. मला एकदम वाटलं की आता हा चमचा एक्दम तोंडात घालणार! आणि काय आश्चर्य!! त्याने खरंच तो चमचा नाकात किंवा कानात न घालता चक्क तोंडातच सारला.
खरेच आश्चर्य. त्याने चमचा तुमच्या तोंडात घातला आणि तुम्हाला राग नाही आला? तुम्ही उठून निदान दुसरीकडे तरी जायचे.
२. आज सायंकाळी ऑफिसातून घरी येतांना! समोर ट्रॅफिक सिग्नल पिवळा झाला होता. मला एक्दम वाटलं की आता रस्त्यावरची सगळी वहानं थांबणार!!! आणि काय चमत्कार! तो लाईट लाल झाला आणि सगळी वहानं थांबली....
हम्म्म! म्हणजे तुम्ही नक्कीच पुण्यात नव्हतात.
३. आज घरी आल्यावर आपल्याला मासळी खायला मिळणार असं सारखं वाटत होतं. आणि बघितलं तर खरंच! पानात मासळी होती. (मासळी शिजतानाचा वास आला होता पण त्याचं एव्हढं काही विशेष नाही!!!)
अच्छा! म्हणजे आज मासळी शिजवून पानात वाढली त्याचं आश्चर्य वाटलं का?
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
त्याने चमचा तुमच्या तोंडात घातला आणि तुम्हाला राग नाही आला?
त्याने चमचा स्वतःच्या तोंडात न घालता आमच्या तोंडात घातला हा शोध तुम्हाला कसा लागला? तुमच्या अंगी असलेल्या अतिंद्रियशक्तीमुळे का?
म्हणजे तुम्ही नक्कीच पुण्यात नव्हतात.
हुश्श्श्य!!! अगदी खरंय! नव्हतो बाबा!!
म्हणजे आज मासळी शिजवून पानात वाढली त्याचं आश्चर्य वाटलं का?
आमच्याकडे पिढ्यानपिढ्या मासळी शिजवूनच खातात. तुम्हाला पेठकरकाकू जी मासळी पानात वाढतात ती न शिजवलेली असते का? काकूंना विचारून बघा आणि मग (जगलात वाचलात तर!) आम्हाला कळवा ती रेसेपी.....
:)
आवडीचा विषय!
या बाबतीत मला देखील काही अनुभव आले. भले ते फार सुरस नसतील पण नक्की सान्गावेसे वाटतात.
१. मला स्वप्नात एकदा एक प्रशस्त आवार दिसले होते. जिथे २ शिपाया सारखी ( एंग्रजीमध्ये 'पिऊन' ) माणसे गप्पा मारत होती. मी आणि आई असे दोघेच होतो. आणि मी त्यांना काहीतरी विचारतोय, एवढेच दिसले. आणि गंमत म्हणजे आठवड्याभरातच मी आणि आई मला ११वी चा प्रवेश मिळालेल्या कॉलेज मध्ये थोडी चौकशी करयला म्हणून गेलो होतो. ऑफिस कुठे आहे म्हणून विचारयला म्हणून माणूस शोधू लागलो तर समोर दोन शिपाई दिसले. आईला थांबायला सांगून मी त्यांना विचारयला गेलो आणि एकदम आधी स्वप्नात दिसलेला प्रसंग आणि हा यातलं साम्य जाणवून विस्मयचकीत झालो.
२. याखेरीज कित्येकदा मला एखाद्या दिकाणी सहज म्हणून फिरताना सारखं वाटू लागतं की अमूक अमूक व्यक्ती एथे दिसणार आणि खरच ती व्यक्ती तिथे दिसते. आणि हा प्रकार मी अनेकदा अनुभवलाय.
३. परीक्षेच्या आधी एखादा टॉपिक वाचवासा वाटणे आणि त्यावरच प्रश्न विचारला जाणे हा प्रकार तर बर्याच जणांच्या बाबतीत अनुभवास आल्याचं पाहीलंय.
यावर जेवढा विचार आणि वाचन केलं त्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपलं मन ( किंवा मेंदू ) जेवढा जास्त एकाग्र होतो तेवढ्याच प्रमाणात असे अनुभव येण्याचं प्रमाण वाढतं. परीक्षेच्या काळात आपण पूर्णपणे परीक्षेचा विशय या एकाच गोष्टीवर एकाग्र झालेलो असल्याने क्र. ३ मध्ये म्हटलेला प्रकार जास्त प्रमाणात अनुभवास येतो. त्या सामर्थ्याचा अविष्कार मात्र व्यक्ती व्यक्तींमध्ये भिन्न असू शकतो. योगशास्त्राचा अभ्यास ( प्रात्यक्षीक ) करणारे सरावने ही एकाग्रता वाढवत असतात.
याशिवाय जसे प्रत्येक व्यक्ती मध्ये उपजतच एखाद्या क्षेत्रात / कलेत जास्त जाण / प्रगती असते ( उदा. गणित, सन्गीताचा कान , भाषा वगैरे. ) त्याप्रमाणे एखाद्या ला विशेष प्रयत्न न करताही असे अनुभव येतात. नेहमीच्या इन्द्रीयांना जाणवणार नाही असे हे अनुभव असल्यामुळे आपण त्यांना अतींद्रीय असे म्हणतो.
या बाबतीत अ.ल. भागवत यांचं 'मोहीनी विद्या - साधना व सिद्धी' हे पुस्तक वाचल्यास अनेक नवीन गोष्टींचा नक्कीच परिचय होईल. अर्थात त्यातल्या सर्वच गोष्टी मला पटल्या किंवा तुम्हाला पटतील असे नव्हे. पण वाचायला काहीच हरकत नाही.
----अत्तीन्द्रीयानन्द
काही अगदी जवळच्या नातेवाईकांना असे अनुभव आले आहेत.
पण इन्ट्युशन्स मलाही खूप येतात. आणि जेव्हा जेव्हा मी त्या इन्ट्युशनप्रमाणे वागले आहे तेव्हा मला कधीही पस्तावायची वेळ आलेली नाहीय. पण जर उलटे झाले, की आतून वाटतंय एखादी गोष्ट करावी, आणि तशी काही कारणाने नाही केली की मात्र पस्तावा होतोच होतो!
याबाबतीत एकदम सहमत.
असाच एक अनुभव पु.लं.च्या पुस्तकातही वाचलेला स्मरतो. तेव्हां अश्या काही आकलनापलिकडील गोष्टी होतात ज्याचे स्पष्टीकरण सध्यातरी विज्ञानाकडे नाही हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
अवांतरः समोर दिसणारे फक्त नियमात बसत नाही म्हणून मान्य न करणार्यांना 'विज्ञाननिष्ठ' म्हणतात का? (काही वर्षांपूर्वी 'आयुका'त काम करताना असे काही विज्ञाननिष्ठ पाहिले आहेत)
विज्ञाननिष्ठ माणसांना झोडण्याची! :-)
असाच एक अनुभव पु.लं.च्या पुस्तकातही वाचलेला स्मरतो.
(पुलंच्या लेखनाबद्दल, प्रतिभेबद्दल संपूर्ण आदर ठेवून) पुलंनी या विषयात संशोधन केल्याचं ऐकीवात, वाचनात नाही. तेव्हा पुलंचा या विषयात (बिनासंदर्भ) उल्लेख करण्याचं कारण समजेल का?
तेव्हां अश्या काही आकलनापलिकडील गोष्टी होतात ज्याचे स्पष्टीकरण सध्यातरी विज्ञानाकडे नाही हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचं पुरेसं आकलन आजच्या विज्ञानाला होत नाही, त्या सगळ्याच गोष्टींना चमत्कार म्हणणार का? उदाहरणार्थ आपल्या सूर्यावरून अधूनमधून प्रचंड प्रमाणात वायू, भारीत कण बाहेर पडतात त्यांचं नीटसं आकलन सौर विज्ञानाला झालं नाही, त्याला तुम्ही चमत्कार म्हणता का? ग्रहणांना, ग्रह वक्री होण्याला, एकेकाळी चमत्कार मानायचे, आज तुम्ही मानता का? मग ज्या गोष्टींचं आकलन झालं नाही त्याला सरळ चमत्कार किंवा तत्सम लेबल न लावता त्याबद्दल कोणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकीत्सा केली तर त्यालाही प्रत्यवाय नसावा. किंबहुना चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं; भले मग विषय अशा अतिंद्रीय शक्तीचा असेल वा शनी-मंगळ युतीचा!
अवांतरः समोर दिसणारे फक्त नियमात बसत नाही म्हणून मान्य न करणार्यांना 'विज्ञाननिष्ठ' म्हणतात का? (काही वर्षांपूर्वी 'आयुका'त काम करताना असे काही विज्ञाननिष्ठ पाहिले आहेत)
('आयुका' ही संस्था आणि तिथे कार्यरत असणार्या सर्व वैज्ञानिकांविषयी संपूर्ण आदर ठेवून) भारतात 'आयुका' ही एकमेव संस्था नाही जिथे विज्ञानविषयात संशोधन होतं. फक्त तिथेच (खरे अथवा स्वयंघोषित) विज्ञाननिष्ठ लोक असतात असा आपला काहीसा ग्रह (आकाशातला नव्हे!) झालेला दिसतो. आपण तिथल्याही किती लोकांवरून असा अंदाज केलात मला कल्पना नाही, पण काही मूठभर लोकांच्या मतांमधून भारतीय संशोधकांच्या वृत्तीचं सरलीकरण (जनरलायझेशन) करण्याच्या वृत्तीचा तीव्र निषेध.
बाकी मला या चर्चेत फार काही गती नाही त्यामुळे फारसा रसही नाही; तुमचं काय ते चालू द्या. पण उगाचच माझ्या "जातीतल्या" लोकांवर आरोप झाल्यामुळे टंकाळा सोडून प्रतिसाद प्रपंच केला.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं
अगदी बरोबर. पूर्ण सहमत.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
तेव्हा पुलंचा या विषयात (बिनासंदर्भ) उल्लेख करण्याचं कारण समजेल का?
पुलं हे देव मानणारे नव्हते असा ग्रह त्यांची पुस्तके वाचताना होतो (खरे खोटे माहीत नाही. हे आपले माझे मत). तरिही त्यानी घोडेछाप दृष्टीकोन न ठेवता एका परदेशातील मानसोपचारतज्ञाचा असा अनुभव शब्दबद्ध केलेला स्मरला म्हणून त्यांचा उल्लेख.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचं पुरेसं आकलन आजच्या विज्ञानाला होत नाही, त्या सगळ्याच गोष्टींना चमत्कार म्हणणार का? उदाहरणार्थ आपल्या सूर्यावरून अधूनमधून प्रचंड प्रमाणात वायू, भारीत कण बाहेर पडतात त्यांचं नीटसं आकलन सौर विज्ञानाला झालं नाही, त्याला तुम्ही चमत्कार म्हणता का?
याला आम्ही सध्यातरी निसर्गाचा चमत्कार मानतो. (जोपर्यंत त्याचं पुर्ण आकलन विज्ञानाला होत नाही तोपर्यंत)
मग ज्या गोष्टींचं आकलन झालं नाही त्याला सरळ चमत्कार किंवा तत्सम लेबल न लावता त्याबद्दल कोणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकीत्सा केली तर त्यालाही प्रत्यवाय नसावा.
त्याला आमची काहीही हरकत नाही. किंबहुना स्वागतच आहे. पण त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही म्हणून ती घडलीच नाही असं म्हणण्याला नक्कीच विरोध आहे.
भारतात 'आयुका' ही एकमेव संस्था नाही जिथे विज्ञानविषयात संशोधन होतं. फक्त तिथेच (खरे अथवा स्वयंघोषित) विज्ञाननिष्ठ लोक असतात असा आपला काहीसा ग्रह (आकाशातला नव्हे!) झालेला दिसतो.
असा माझा ग्रह झाला आहे हा आपला ग्रह का झाला? हा एक चमत्कारच म्हणावा काय? :) माझ्या प्रतिसादात असं कुठं ध्वनित होत नाही असा आपला माझा समज.
पण काही मूठभर लोकांच्या मतांमधून भारतीय संशोधकांच्या वृत्तीचं सरलीकरण (जनरलायझेशन) करण्याच्या वृत्तीचा तीव्र निषेध.
भारतीय संशोधकांच्या वृत्तीचं सरलीकरण आम्ही कुठे केलं बुवा? असो ज्यांनी केलं त्यांचा निषेध असेल.
सर्वच अनाकलनीय गोष्टीना 'भानामती' म्हणणार्या विज्ञाननिष्ठांचा तीव्र निषेध.
अवांतरः ज्या गोष्टी चांगल्या आहेत, मग त्या भलेही अंधश्रद्धेवर आधारीत असतील, त्या तश्याच राहू द्यायला काय हरकत आहे? उदा. शनिशिंगणापूर मधे दारे उघडी ठेवली तरी चोर्या होत नाहीत असा समज आहे. म्हणून मी तिथे जाऊन चोरी करून दाखवतो (इति: नरेंद्र दाभोळकर) असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. चोरी होत नाही ही चांगली गोष्ट आहे. मग हा प्रवाद असाच ठेवला तर बिघडलं कुठं? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.
एकूणच विज्ञाननिष्ठ हा शब्द वाचून माझा गैरसमज झाला. पण तरीही चमत्कार ही संज्ञा मला चिकीत्सक वृत्तीला मारक वाटते.
आपल्या अवांतराशी जवळजवळ सहमत. शनिशिंगणापूरमधे चोरी होत नाही ही चांगली गोष्ट आहेच. भीमाशंकरच्या जवळचं जंगल देवाच्या नावामुळे अजूनही घनदाट आहे, त्यामुळे (लोकांच्या डोक्यातल्या) देवाचे आभारच.
अंधश्रद्धेवर आधारीत विश्वासाला तडा जाऊ शकतो. पण कारणमीमांसा समजून घेऊन मान्य केलेल्या गोष्टी या जास्त चांगल्या पटतात आणि आचरणात आणल्या जाऊ शकतात. चांगली गोष्ट करण्यासाठी असत्य (उदा: अंधश्रद्धा) बोलणं, करणं मलातरी पटत नाही. लहान मुलांनाही भीती दाखवण्यापेक्षा समजावलं तर जास्त फायदा होतो असा अनेकांचा अनुभव असेलच.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
पण तरीही चमत्कार ही संज्ञा मला चिकीत्सक वृत्तीला मारक वाटते.
'चमत्कार ही संज्ञा' नव्हे तर 'तो घडला तरी अमान्य करण्याची वृत्ती ' चिकीत्सक वृत्तीला मारक असते असे मला वाटते. जर चमत्काराचे अस्तित्व मान्य केले तरच त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून स्पष्टीकरण हुडकणे शक्य आहे. तो घडलाच नाही असेच जर वैज्ञानिक म्हणत राहीले तर संशोधन कशावर करणार? म्हणूनच ज्योतिष हे थोतांड ठरविण्यासाठी जे सव्यापसव्य अलिकडेच झाले ते मला चुकिचे वाटतात. जो काही प्रयोग केला गेला तो आणि त्याचे निष्कर्ष अगदीच हास्यास्पद होते. हे म्हणजे रसायनशास्त्रातील एक प्रयोग चुकला म्हणून संपूर्ण रसायनशास्त्र थोतांड आहे असे म्हणण्यासारखे आहे. ज्या एका ज्योतिषाचे निष्कर्ष अगदी अचूक आले ते का आले यावर संशोधन झाले असते तर ते जास्त योग्य झाले असते. आमचा विरोध आहे तो याला. जे सत्य समोर आहे ते 'निकषांमध्ये बसत नाही' म्हणून नाकारण्याला. ते का बसत नाही हे शोधणारे खरे शास्त्रज्ञ. म्हणूनच ब्लॅकहोल मधूनही काही बाहेर पडते हे दाखवून देणारा स्टीफन हॉकिंग्ज वेगळा ठरतो. असो.. अर्थात हा आमचा व्यक्तिगत दृष्टीकोन...
चांगली गोष्ट करण्यासाठी असत्य (उदा: अंधश्रद्धा) बोलणं, करणं मलातरी पटत नाही.
याच्याशी मात्र पूर्णपणे असहमत. कधीकधी चांगली गोष्ट करण्यासाठी असत्य बोलावं किंवा आचरावं लागतं. हे तर गीतेत सुद्धा सांगितले आहे आणि रोजच्या जीवनात कित्येकदा अशा अनुभवाला सामोरे जावे लागते. मला वाटत नाही आयुष्यात एकदाही असत्य न बोललेला माणूस पृथ्वीतलावर असेल. आणि जर वाईट गोष्टींसाठी असत्य बोलले जाऊ शकते तर चांगल्या गोष्टींसाठी बोलण्यास काहीच प्रत्यवाय नसावा.
मुलांशीही बर्याच वेळा खोटं बोलावंच लागतं. कुठल्या गोष्टीचं खरंखुरं स्पष्टीकरण आपण मुलांना देऊ शकतो हे त्यांच्या वयावर अवलंबून असते. चुकिच्या वयात जास्त अथवा चुकीची (किंवा पुर्णपणे खरी) माहिती ही हानिकारक ठरू शकते.
प्रतिक्रिया
शक्ती..
पुस्त्काचे नाव
विवेकानंदांचे पुस्तक
अतिंद्रिय
माझ्या फर्स्ट क्लासचं रहस्य
माझ्या फर्स्ट क्लासचं रहस्य- २१ अपेक्षित.
शक्ती..
आपल्याला न
+१
मागे
अतिंद्रीय शक्तीबाबत थोडेसे
विचार
नको
तुमचा
प्रतिसाद
माझा अनुभव..
प्रभू
वा प्रभूजी,
हाहा
गात्रांत
खि खि
हे सरता
शंकासूर??
२ शक्यता आहेत.
मलाही आहे ही बीमारी
mala thodafar anubhav aahe
अतिंद्रिय शक्ती...
याला कसली
आतिंद्रिय?
>>सो... जे आहे
काही कळलं नाही.
मला पण
आणखी एक गोष्ट मी एकली आहे ती
पायाळु
अतींद्रीय अनुभव /शक्ती
अतींद्रिय शक्तीचे
हा काय प्रश्न आहे विप्रकाका?
लय भारी
एकदम झकास
खरेच आश्चर्य...
आपल्या शंकांचे समाधान!
आवडीचा
असे अनुभव येत असावेत...
संधी सोडू नका
सहमत....
चमत्कार
+१
उत्तर...
सॉरी.
थोडी दुरुस्ती...