Skip to main content

प्रिय पंडितराज

लेखक व्यंकु यांनी गुरुवार, 06/11/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रिय पंडितराज जगन्नाथ', सप्रेम नमस्कार 'वेगळं व्हायचंय मला' हे तुझ्या तोंडून ऐकताच मी 'झोपी गेलेला जागा झालो' आणि 'जणू काही कट्यार काळजात घुसली' 'माझी बायको माझी मेव्हणी' यांनी मला सावरलं पण मला प्रश्न पडला कि 'या चांगल्या घरात असं झालंच कसं' एवढं मोठं घर श्रीमंताचं असं व्हायला नको होतं असो. 'सिमेवरुन परत जा' असं तु मत्स्यंगंधेला का म्हणालास? उलट तु तिला प्रेमाने म्हणायला हवं होतं 'प्रेमा तुझा रंग कसा?' त्या दिवसापासून ती 'घराबाहेर' पडली आणि सगळीकडे 'बायको पळाली माहेरी' अशी बोंब झाली. अम्मलदार आले पण काही उपयोग झाला नाही पण 'काका किश्याचा' होता म्हणून तिला 'बटाट्याच्या चाळीत आश्रय मिळाला असो. अरे परवा तु 'एकच प्याला' घेतलास आणि हमीदाबाईच्या कोठीवर जाऊन 'लेकुरे उदंड जाहली' असे बडबडलास 'मोरुच्या मावशीला' ते फार लागलं ती रागाने म्हणाली 'ह्यांच मेलं असंच' 'वात्रट मेले' 'पुरुष सगळे सारखेच' 'मानापमान' प्रत्येकालाच असतो हे तुला कळायला हवं होतं. तु हल्ली स्वत:ला 'गारंबीचा बापू' आणि पुन्हा 'तो मी नव्हेच' असं म्हणायची तयारी असतेच. घरोघरी हीच बोंब आहे. तसा 'मी तुझ्या पाठीशी आहे' 'झालं गेलं विसरुन जा' या डोळ्यांची दोन पाखरं तुझी वाट पाहत आहेत. 'यदाकदाचीत' कधी आलोच तर बोलू. पण या सुटीत गावी येताना 'लवंगी मिरची कोल्हापुरची' आणायला विसरु नको. 'शारदेला' घेउन ये 'दिनुच्या सासुबाई राधाबाई' 'सविता दामोदर परांजपे' 'कुसुम मनोहर लेले' 'मकरंद राजाध्यक्ष' या सर्वाँना 'साष्टांग नमस्कार' कळावे आपला, 'नटसम्राट'
लेखनविषय:

वाचने 3857
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

कुठल्याशा हिंदी चित्रपटात एक गाणे आहे. त्यात अशीच इतर चित्रपटांची नावे गुंफली गेली आहेत. नाटकांची नावे गुंफून केलेला हा प्रयोग आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

कुठल्याशा हिंदी चित्रपटात एक गाणे आहे. त्यात अशीच इतर चित्रपटांची नावे गुंफली गेली आहेत. नाटकांची नावे गुंफून केलेला हा प्रयोग आवडला. चित्रपट : एक दुजे के लिये... गाण्याचे बोल : मेरे जीवन साथी प्यार किये जा जवानी दिवानी खूबसूरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदरम्.. .... :) आपला, (गाण्यातला) तात्या अग्निहोत्री.

In reply to by सुनील

कुठल्याशा हिंदी चित्रपटात एक गाणे आहे. त्यात अशीच इतर चित्रपटांची नावे गुंफली गेली आहेत. नाटकांची नावे गुंफून केलेला हा प्रयोग आवडला. चित्रपट : एक दुजे के लिये... गाण्याचे बोल : मेरे जीवन साथी प्यार किये जा जवानी दिवानी खूबसूरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदरम्.. .... :) आपला, (गाण्यातला) तात्या अग्निहोत्री.

In reply to by विसोबा खेचर

आयला.... साक्षात तात्याबासुद्धा कधी कधी गंडतात आणि दोन दोन प्रतिसाद देतात तर.... मला वाटले आमच्या सारखे णविण लोकच असे गंडतात.... असो. ह.घ्या. (गंडेश)कवटी हसन

छान वाटलं वाचतांना..मजा आली.प्रयत्न उत्तम आहे.असेच लिहा व्यंकुराजे... आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

छान गुंफ़ण ! मधे मधे काही नावे राहीलीत ती मार्क कर ! :)

मस्तच लिहिलं आहे... नाट्यपंढरी आवडली..! :) व्यकूशेठ, प्लीज येऊ द्या अजूनही असं मजेशीर लेखन.. आपला, (मराठी असल्याने 'बाय डिफॉल्ट' नाट्यवेडा असलेला) तात्या. :)

अप्रतिम, सुंदरच लिहीलय

सुंदर गुंफण. खरच अप्रतिम

व्यंकू... छान लिहिलयस रे... आता तुझ्याकडे "शिकवणी" लावायला लागणार...... कवटी

आभार सर्वांचे कवटी चेष्टा करता काय?

दगडाची फुले.. (पथ्थर के फूल) या चित्रपटात, "कभी तू छलिया लगता है, कभी दिवाना लगता है, कभी अनाडी लगता है...." या गाण्यात सगळी भन्नाट चित्रपटांची नावे आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बरोबर. ह्याच चित्रपटातील आणखी एका गाण्यामुळे आम्हाला मुंबईतले सर्व रस्ते देखिल पाठ झाल्याचे आठवते.