काही टीप्स....
१) इड्ल्या उरल्या असतील तर दुसरया दिवशी त्याना तिखट, मीठ लावुन फ्रायपॅन वर तेल घालुन फ्राय कराव्यात.
सॉस बरोबर खायला द्याव्यात. सुन्दर लागतात.
२) शिळा भात फ्रिज मधे ठेवुन कडक होतो. ताजा भात कुकरला लावताना हा कडक झालेला भात मोकळा करुन त्यावर
पेरावा. झालेला भात उत्तम होतो व शिळा वापरला जातो.
३) एखादा पदार्थ भान्ड्याला लागला (करपला, म्हणजे कोळसा नव्ह्ये ) असेल तर गॅस बन्द करुन भान्ड्यावर झाकण ठेवावे व ३० मिनिटाने काढावे, खरपुड आपोआप निघते, खरवडावे लागत नाहि, भान्डे घासताना त्रास होत नाहि व पदार्थ फुकटपण जात नाहि.
४) मिरच्या आणल्या की देठ काढुन फ्रिज मध्ये बन्द ड्ब्यात ठेवाव्यात, खुप टिकतात. कोथिम्बीर निवडुन टिशु पेपर मध्ये गुन्डाळुन बन्द ड्ब्यात न धुता ठेवावी, खुप टिकते, वापरताना धुवुन घ्यावी.
५) दुधाचे भान्डे रिकामे झाले कि त्यात कणीक भिजवावी, भान्डे घासताना त्रास होत नाहि व साय फुकटपण जात नाहि,
पोळ्या मऊ होतात.(माझ्या आईला हे मात्र पटत नाहि, तिच्या मते दुधाचे भान्डे फक्त दुधासाठी वापरावे.)
६) साबुदाण्याही खिचडी करताना थोडे दुध घालावे, खिचडी मऊ व खमंग होते.
आपली,
चुचु
वाचने
8493
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि गुलाब जाम ...?
+१
In reply to आणि गुलाब जाम ...? by कुंदन
टार्या सुगरण्याच्या टिप्स
In reply to +१ by वल्लरी
करु हो
फुटाणे
आणि हळद?
In reply to फुटाणे by परिकथेतील राजकुमार
फुटाणे
हळदही उरत
:)
मी तुझ्या
त्यावर ही उपाय आहे.
त्यावर ही उपाय आहे.
बरोबर.... चुच
In reply to त्यावर ही उपाय आहे. by मिना भास्कर
टिपांबद्द
मिरच्या
माझ्या
आमची आई दुधाचे भांडे
कहिहि काय
In reply to आमची आई दुधाचे भांडे by वेताळ